प्रीत नव्याने बहरली...भाग 65
"कालचा पूर्ण दिवस खूप टेन्शन मध्ये गेला ग, मी तुला कॉल करू शकलो नाही, काही वेळाने मोबाईलला रेंज नव्हती आणि मी बिझी होतो, ऑफसेट होतो. त्यामुळे मी तुझ्याशी बोलू शकलो नाही. त्याबद्दल खरंच खरंच सॉरी ग."
अंशुमनने तिच्या माथ्यावर चुंबन घेतलं.
"इट्स ओके मी समजू शकते पण तू कुठे होतास काल दिवसभर?"
"हॉस्पिटलमध्ये."
"हॉस्पिटलमध्ये? पण का? सौरभचं काही झालंय का? तो सिरीयस आहे का? काही त्रास होतोय का त्याला? कसा आहे तो बरा आहे ना?"
"सानू रिलॅक्स, शांत हो मी सगळं सांगतो."
अंशुमन तिला बाल्कनीतून रूममध्ये घेऊन आला.
"आधी काही खाऊन घे, मग मी तुला सविस्तरपणे सगळं सांगतो."
"ये नाही हं, ही चीटिंग आहे. तू खाली नेणार मला आणि मग नाश्ता करून तू निघणार ऑफिसला जायला, नाही आधी तू सांग मला प्रॉमिस कर."
"मी निघून जाणार नाही, तुला सगळं सांगेल आणि नंतर जाईल. चल खाली आधी काही खाऊन घे, तुला भूक लागली नसेल पण बाळाला लागली असेल ना."
दोघेही हसले आणि खाली गेले.
दोघांनी नाश्ता केला, त्यानंतर पुन्हा खोलीत जायला निघाले. मागेहुन त्याच्या आईने आवाज दिला.
"काय रे अंशुमन आज ऑफिसला जायचं नाहीये का?"
"जातो आई थोड्यावेळाने."
"बायको शिवाय करमत नाहीये वाटतं." तिनेही गम्मत केली.
"असं नाहीये ग, जातो मी थोड्या वेळात." तो हसून बोलला.
दोघेही खोलीत गेले,
"बस इथे मी तुला सगळं सांगतो."
ती बसली.
"
ऍक्च्युली काल हॉस्पिटल मधून मला फोन आला, सौरभची तब्येत क्रिटिकल झाली होती, त्याला झटके यायला लागले होते. त्याची आई त्याला हॉस्पिटलला घेऊन गेली पण ती मला फोन करण्याच्या मनस्थितीत नव्हती म्हणून मग तिथल्या स्टाफ मेम्बरने मला फोन केला. खरंतर तिथे गेल्यानंतर मी घाबरलो होतो पण डॉक्टरांनी लगेच ट्रीटमेंट सुरू केली आणि सौरभ स्थिर स्थावर झाला.
डॉक्टर बोलले की अस अधून मधून होऊ शकतं पण तो स्टेबल होतोय, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय आणि मला खात्री आहे की तो लवकर बरा होईल."
हे सगळं ऐकून सानिकाच्या डोळ्यातून पाणी तरळलं.
"तुझ्याशी काही नातं नसताना किती करतोयस तू त्याच्यासाठी? तुझ्याजागी दुसर कुणी असत ना तर त्याने त्याचा विचारही केला नसता पण तू त्याच्या ट्रीटमेंटसाठी धडपड करतोयस. त्याच आयुष्य सुखकर व्हावं म्हणून."
ती बोलता बोलता थांबली.
"किती स्वतःला त्रास करून घेतोस रे तू."
"
सगळं ठीक होईल आता तू काळजी करू नकोस."
त्याने तिला जवळ घेतलं.
हळूहळू दिवस सरत गेले सौरभ बरा व्हायला लागला. सानिकाला तीन महिने पूर्ण झाले.
"
सानिका उठ, हॉस्पिटलला जायचंय. मी सकाळची अपॉइंटमेंट घेऊन ठेवलेली आहे. मग मला ऑफिसला जायला उशीर होईल. आधी आपल्याला हॉस्पिटलला जायचंय. मी रात्रीच बोललोय डॉक्टरांशी त्या असणार आहेत सकाळी. चल उठ उठ पटकन उठ."
असं म्हणून त्याने तिला उठवलं.
"
पटकन फ्रेश हो, मी तोवर नाश्ता करून घेतो."
सानिका पटापट तयार झाली, तिनेही नाश्ता केला आणि दोघे हॉस्पिटलला जायला निघाले.
आज सानिकाची पहिली सोनोग्राफी होती.
सानिका खूप एक्साईटेड होती आज तिला पहिल्यांदा बाळाला बघता येणार होतं.
"
आज मी खूप हॅप्पी आहे."
"का ग एवढा का आनंद होतोय तुला?"
"म्हणजे काय मी पहिल्यांदा माझ्या बाळाला बघणार आहे."
"म्हणून इतक्या आनंदात आहेस?"
"हो मला खूप खूप खूप खूप आनंद होतोय." ती त्याला बिलगली.
काही वेळाने ते हॉस्पिटलला पोहोचले.
डॉक्टरच्या केबिनमध्ये गेले,
"गुड मॉर्निंग मिस्टर अंशुमन, गुड मॉर्निंग सानिका.
"गुड मॉर्निंग डॉक्टर."
"डॉक्टर तिला बाळाला बघण्याची खूप एक्साईटमेंट झालेली आहे, खूप आनंदात आहे सकाळपासून."
दोघेही हसले.
त्यानंतर डॉक्टरांनी तिला चेक केलं, सोनोग्राफी केली. काही वेळाने दोघेही बाहेर आले.
"काय मग झाली इच्छा पूर्ण." अंशुमन
"हो मला खूप छान वाटलं. तु ही हवा होतास, तू बघितल असत ना तुला तितकाच आनंद झाला असता." सानिका
"ओके नेक्स्ट टाईम करूया आपण तेव्हा मी असेल तुझ्यासोबत, ओके चल आता मी तुला आधी घरी सोडतो आणि त्यानंतर मी ऑफिसला जातो."
"
मी जाईल ना घरी तू डायरेक्ट ऑफिसला जा."
"नाही तू कशाने जाणार आहेस?"
"अरे मी कॅब किंवा ऑटोने जाते ना."
"नको मी तुला सोडतो नाहीतर मी एक काम कर तू गाडी घेऊन जा मी कॅबने ऑफिसला जातो."
"नाही नको तुला पुन्हा रिटर्न संध्याकाळी कॅबनेच यावे लागेल त्यापेक्षा तू चल घरी मला सोड आणि मग लगेच निघ."
दोघे घरी पोहोचले.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा