❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 6

Katha eka mirechi

❤️प्रीत मनी जपली❤️...भाग 6


आधीच्या भागात आपण पाहिले की,


शहरातून एक अधिकारी आलेला होता समीर उपाध्याय.. त्यांनी मीराला बघितलं आणि बघताक्षणी त्याला मीरा आवडली. त्यांनी मीराच्या घरी जाऊन लग्नाची मागणी घातली. पण मीरा लग्न करायला तयार नव्हती. ती त्या अधिकाऱ्याला भेटायला गेली आणि त्याला विचारलं की त्याला लग्न का करायचं त्यांनी सांगितलं की त्याला ती आवडली आहे आणि ते त्याच्यासोबत सुखी संसार करू शकते.

आता पुढे,

मीरा तिथून निघून राधेकडे गेली. 
“राधे तू चल आधी माझ्यासोबत” मीराने त्याचा हात पकडला आणि त्याला खेचत नेऊन ती मंदिरात घेऊन गेली. तिथे त्याचा हात सोडला आणि त्याला समोर उभं केलं.

“काय चाललय मीरा तुझं? का आणलंस तू मला इथे?”

“सोक्षमोक्ष लावायला.”

“म्हणजे?”
“म्हणजे काय म्हणजे, तो अधिकारी मला लग्न करून घेऊन जाणार आहे आणि तू बस इथे.”

“मीरा.. मीरा.. मीरा थांब आज आता बोलायचं नाहीये त्या विषयावर, काय ग आपण रोज रोज एकच बोलतो. हे बघ मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय.”

“काय आणलं?”

“डोळे बंद कर आणि बस इथे.” राधेनी तिला बाकावर बसवलं, तिने डोळे बंद केले. राधेने खिशातून पायल काढली आणि तिच्या पायात घालून दिली.

“मीरा डोळे उघड.”
मीराने हळूच डोळे उघडले आणि तिने पाहिलं.

तिच्या पायात पायल बघून तिला खूप आनंद झाला.
“अरे पण राधे एकच पायल दुसरी पायल कुठे आहे?”

“एक पायल तुझ्याजवळ एक पायल माझ्याजवळ. उद्या तू खरच मला सोडून गेलीस तर तुझी आठवण माझ्याजवळ नको का?” असं म्हणून तो हसायला लागला.

“राधे मार खाशील आता.” असं म्हणून ती त्याला मारायला लागली. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तिला मिठीत घेतलं.

“राधे आपण पळून जाऊन लग्न करूया.”

“काय बोलतेस तू?”

“आपण पळून जाऊन लग्न करूया, दुसऱ्या गावी, दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी जाऊन राहूया. दोघे काम करूया आणि नेटाने संसार करूया.”

“ए बाई तू बोलतेस तेवढे सोप्प नाहीये.”

“तर काय झालं जाऊ या ना प्लिज, असं काय करतोस.”
“बघू विचार करू.”

दोन दिवसानंतर समीर शहरात गेला. तो त्याच्या घरी गेलेला,  त्याच्या डोळ्यासमोरून मीराचा चेहरा जात नव्हता. समीरच्या आईला त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसले. समीरची आई सुशीला की त्याच्याजवळ गेली.

“काय समीर कुणाच्या आठवतील गुंतलास? कुणाचा इतका विचार करतोयस?”

“नाही आई काही नाही.”

“काही नाही काय तुझा चेहरा सांगतोय सगळं. खरं सांग कुणाबद्दल विचार करतोयस.”

“आई मी कामानिमित्त गावाला गेलो होतो ना तिथे एक मुलगी मला आवडली.

“अरे वा हे तर मस्तच आहे.”

“काहीच मस्त नाहीये, दिसताच क्षणी मला ती आवडली पण तिचे एका दुसऱ्या मुलावर प्रेम आहे त्यामुळे तिने लग्नाला नकार दिला.”

“काय? नकार दिलाय, तुझ्यासारख्या मुलाला नकार देणे म्हणजे गुन्हाच करणे होय, नाही का?”


“आई प्लिज मस्करी करू नकोस गं. खरच तीच एका मुलावर प्रेम आहे, दोघे एकमेकावर मनापासून प्रेम करतात म्हणून तिने मला लग्नाला नकार दिला, आता त्यांचं प्रेम यशस्वी होतं की नाही माहित नाही, माझं तर नाहीच नाही. बरं जाऊ दे, आई मला लवकर झोपायचे उद्या सकाळी ऑफिसला लवकर जायचंय. उद्या माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि खूप मोठ काम होणार आहे.”

“ठीक आहे तू झोप बोलू मग आपण.”

दुसऱ्या दिवशी सकाळी समीर त्याच्या कामाला निघून गेलेला.  समीरच्या असिस्टंटला सुशीलाने सगळी माहिती विचारली. त्यालाही नीटसं काही माहिती नव्हतं. त्याच्यामुळे तो जास्त काही बोलला नाही.

राधे मीराकडे आला,

“मीरा चल लवकर, आपण मेलामध्ये जाऊ फिरायला.”

“आता, काय रे आता कुठे जायचंय.”

“अगं बाजूच्या गावाला मेला लागलाय तुला काहीतरी घेऊन देतो.”

“आता काय घ्यायचं? मला नाही घ्यायचं.”

“फिरूया चल ना.”

दोघेही मेल्यामध्ये फिरायला गेले, मेल्यामध्ये खूप गर्दी होती. खूप नवीन नवीन प्रकारची दुकाने लागलेली होती. वेगवेगळ्या प्रकारचे झुले होते, दोघेही छान तिथे फिरले. थकून भागून आल्यानंतर मीरा घरी तशीच झोपली.

दिवस असे सरत गेले. शामाचं दहावीचं वर्ष झालं, शामा चांगल्या मार्काने पासही झाली. पण आता समोर काय? तिला शिक्षणाची आवड होती तिला समोर शिकायचे होतं पण घरच्या आर्थिक अडचणीमुळे ते काही शक्य नव्हतं. शहरात पाठवणे म्हणजे पैसा लागेलच. शिक्षणाचा खर्च लागणार या सगळ्यांमुळे सगळे चिंतेत आले.

काही दिवसानंतर समीर पुन्हा त्या गावी आला, तो मीराच्या आई-वडिलांना भेटला. मीरा त्यावेळी घरात नव्हती. घरातले लोकांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता बघून त्यांनी विचारलं.

“काय झालं काही समस्या आहे का? मला सांगू शकाल का?” त्यावेळी मीराच्या आईने श्यामाच्या शिक्षणाबद्दल सांगितलं.
“हे बघा मी तुम्हाला मदत करू शकतो पण त्याबद्दल तुम्हालाही मला माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल असं नका समजू की मी स्वार्थी आहे किंवा मी माझ्यासाठी हे सगळं करतोय असं काही समजू नका मी शामाच्या शिक्षणाचा आणि तुमच्या आर्थिक अडचणीचा प्रश्न निवारू शकतो त्यासाठी तुम्हाला मला एक वचन द्यावं लागेल.”

“कुठचं वचन?”

“तुम्ही मीराचं लग्न माझ्याशी लावून द्या. मी तुमच्या शामाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलेन. तिचं शिक्षण, तिचं लग्न, तुमच्या घरची जी काही जबाबदारी आहे ते सगळे मी घेईन. पण त्या बदल्यात तुम्हाला मीराच लग्न माझ्याशी लावून द्यावं लागेल.”

“मग चांगलच आहे की साहेब.”

“नाही पण कदाचित तुम्हाला माहिती नसेल मीरा एका मुलाच्या प्रेमात आहे, तसं तिने मला सांगितलं त्यामुळे ती लग्नाला तयार नाहीये. तुम्हाला तिला लग्नाला तयार करावा लागेल. तुम्ही आज म्हणाल तर मी आजही लग्न करून तिला नेऊ शकतो.”

“साहेब मी तिला तयार करेन.” मीराची आई बोलली
“मी तिला तयार करेल तुम्ही काळजी करू नका साहेब.”

“हो चालेल.” 
कमलाने चहा बनवला, समीरने चहा घेतला आणि तो त्याच्या घरी परतला.

काही वेळाने मीरा घरात परत आली,
“मीरा, समीर साहेब आले होते. मीराची आई 

“काय म्हणाले?”

“त्यांना तुझ्याशी लग्न करायचंय.”

“नाही आई मला इतक्यात लग्न करायचं नाहीये.”

“हे बघ मीरे जास्त आगाऊपणा करू नको, तुझं बाहेर काय काय चाललय ना मला सगळं कळलं. समीर साहेबांनी सगळं सांगितलं मला. तू राधेच्या नादाला लागू नकोस.”

“आई माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, त्याचे माझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही लग्न करणार आहोत.”

“मीरा येडी आहेस की खुळी आहेस तू? अगं काय चाललंय तुझं? इतक चांगलं स्थळ आलं तुझ्यासाठी, सुखी राहशील, राणी सारखं संसार करशील त्या घरात आणि हे इथे गरिबीत वाढशील त्या राधे संग. काय करतो ग तो?”

“काही करत नाही आई, करेल ना ग काहीतरी.” 
“हे बघ मीरा, मी तुला आधीच सांगून ठेवते. लग्न होईल तर तुझं समीर साहेबांशीच होईल, नाहीतर होणार नाही..

“अग पण आई..”

“मीरा मी जसं म्हणेल तसंच होईल, मी शब्द दिलाय समीर साहेबांना त्याच्यामुळे तुला त्यांच्यांशी लग्न करावंच लागेल आणि हे बघ तू त्यांच्याशी लग्न करशील ना तर ते शामाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलणार आहेत.”

“आता हे काय नवीन आहे म्हणजे तुम्हाला शामाचे शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून विकायला चाललीस की काय?

“मीरा जास्त चुरुचुरू जीभ चालवू नकोस,

ती  बोलली,


“ हे बघ मीरा मी तुला पुन्हा सांगते. तुझं जर त्यांच्याशी लग्न झालं तर ते शामाच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च उचलनार आहेत, तिच्या लग्नापर्यंतचा सगळा खर्च ते करतील ते असं बोलले.”

क्रमश:

🎭 Series Post

View all