एका कानाने ऐकावे,गरजेचं नाही ते दुसऱ्या कानाने सोडून द्यावे

story tells that Avoid unnecessary advices and always listen to your heart

"अगं सीझर आहे ना तुझं?मग भात खाऊ नको..टाके खराब होतात,बाळंतिनीने पातळच खावं,फक्त आमटी खात जा,हे फळ नको खाऊ,ती भाजी नको खाऊ,बाळाला दही,ताक नको देऊ इत्यादी" अशा भरमसाट सूचनांचा भडिमार निशावर गेल्या सहा महिन्यांपासून फोनवर सुरू होता.पहिलंच बाळंतपण त्यात सीझर,परदेशी राहत असल्यामुळे कुणाची मदत नाही की कुणा मोठ्या व्यक्तीचा आधार नाही.इतक्या सूचना आणि त्याही परस्परविरोधी,काय करावं सुचत नव्हतं.डॉक्टरने तर असं काहीच सांगितलं नव्हतं उलट बाळंतपणात झालेली झीज भरून निघण्यासाठी आणि बाळालाही सगळी पोषक तत्व मिळावी म्हणून समतोल आहार,फळं,भाज्या,कडधान्य सगळंच खायला हवं...शेवटी तिने ठरवलं,"ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे"आणि देवानेही दोन कान त्यासाठीच दिलेत बहुदा,एका कानाने ऐकावे,गरजेचं नाही ते दुसऱ्या कानाने सोडून द्यावे'...