Jan 26, 2022
नारीवादी

प्रेरणा The Inspiration

Read Later
प्रेरणा The Inspiration
प्रेरणा The Inspiration
प्राची रडतच बेडरूम मध्ये शिरली आणि दरवाजा लावून घेतला. बेड वर स्वतःला झोकून दिले .. डोळ्यांतून सतत ओघळणारे पाणी इतके होते कि उशी भिजली .मन दुखलं होते पण कोणी ? स्वतःशीच विचार करू लागली ह्यात माझी काय चूक ?मी काय करू ? मी प्रयत्न करत नाहीये का ? त्रास मला होत नाहीये का ? थकले आता नको वाटतंय हे जीवन .असे वाटतंय हे असले जीवन जगण्यापेक्षा मरण आलेले बरें .
थोड्याच वेळापूर्वी प्राचीला ऑफिस मध्ये एम्प्लॉयी ऑफ द इअर चा ऍवॉर्ड मिळाला होता .. ऑफिस मध्ये येता जाता सर्व जण तिचे आणि तिच्या कामाचे कौतुक करत होते बॉस कलीग सर्वच जण तिला ऍप्रिशिएट करत होते .. ती पण आनंदी होती .. आपल्या केलेल्या कामाची कोणी अशी पोच पावती दिली .. कौतुक केले कि काहीतरी अजून छान करावेसे वाटते..
प्राचीने फेसबुक , इंस्टाग्राम , व्हाट्सअँपला स्टेटस ठेवले होते त्यामुळे सोशल मीडिया वरही आज तिला सगळे काँग्रॅच्युलेशन करत होते आणि ती सर्वांना थँक यु थँक यु असे टाकत होती ..
घरी आली तर आल्या आल्या तिला तिच्या घरातल्यांनी टोमणे मारायला सुरुवात केली .. ५ वर्ष झाली लग्नाला .. काय करायचाय हा असला अवॉर्ड .. संसाराचं बघा कसे मातेरं केलंय .. ५ वर्ष झाली घरात पाळणा हलत नाहीये .. आम्ही किती वाट बघायची .. एक नातवंड पण नाही देऊ शकत तू ..
“निदान आज तरी माझे कौतुक करायचं होते .. इतकी साधी अपेक्षा होती तिची .. टोमणे मारायला बाकी रोज आहेच ना .. आज काहीतरी वेगळा होता माझ्या आयुष्यात “असे प्रति उत्तर देऊन ती रागानेच बेडरूम मधे जाऊन रडत होती
बराच वेळ झाला बाहेर आलीच नाही म्हणून बाहेरच्यांनी दरवाजा जोर जोरात ठोकवायला सुरुवात केली .. तरी ती दरवाजा उघडत नव्हती .. शेवटी धाकट्या दिराने धक्के देऊन देऊन दार उघडले तर प्राची स्टुलावर उभी होती आणि नको ते करण्याच्या विचारात होती .
दिराने तिला खाली उतरवले
सुजय " वहिनी !! काय ग हे .. हि तुझ्या कडून अपेक्षा नव्हती .. तू का स्वतःला कमी समजतेय ."
प्राची शून्यातच होती .. स्कार्फ घेतला तोंडाला बांधला आणि तशीच घराच्या बाहेर पडली .. बेडवर बाजूला एक चिठ्ठी सुजय ला दिसली
प्राचीने एक चिठ्ठी लिहिली होती
"माझ्या मृत्यूला कोणालाच जवाबदार धरू नये .. अत्यंत विचारान्ती मी घेतलेला हा निर्णय आहे "
सुजयने हि चिठ्ठी घरातल्यांना दाखवली
सुजय " बघितलेत ... वहिनी जर वाईट असती ना तर ह्यात लिहू शकली असती तुम्ही तिच्याशी कसे वागताय .. आणि तिने जर तुमच्या विरुद्ध यात काही लिहिले असते ना तर या वयात खडी फ़ोडायलाच जायला लागले असते .. आज तिला तिच्या कंपनीत मोठा अवॉर्ड मिळाला निदान आज तरी तीचे कौतुक करायचे होते .. खरं खरं नाही खोटे खोटे तरी .. इतका राग तिचा येण्या मागे कारण काय तर तुमच्या सो कॉल्ड घराण्याला वारस नाही देऊ शकत ती म्हणून .. आणि दोष तुमच्या मुलात असला तर ."
सुजय " हे सगळे बघून ना मी तर ठरवलंय कि मी लग्नच नाही करणार .. कशावरून माझ्या बायकोला हाच त्रास मनस्ताप होणार नाही "
तिथेच बाजूला प्राचीची पर्स होती .. मोबाईल होता .. ती काहीच न घेता घरातून बाहेर पडली होती .. कुणीकडे गेली असेल? .. तिचे लक्ष ठिकाणावर नव्हते आज ..
सुजयने त्याच्या भावाला म्हणजे सागरला फोन केला आणि घरात काय घडले ते सगळे सांगितले
सागरने शांतपणे ऐकून घेतले काहीच न बोलता फोन ठेवून दिला .. सख्ख्या मोठ्या भावाची अशी शांत प्रतिक्रिया पाहून तो हि आश्यर्यचकित झाला.
तिथेच प्राचीचा मोबाईल त्याने हातात घेतला तर त्यात सागरचा मेसेज प्राचीला आला होता " डिवोर्स पेपर्स सबमिट झालेत .. म्युचल मध्ये घेतलेस तर जास्त त्रास नाही होणार आणि लवकर प्रोसिजर पूर्ण होईल . म्हणजे मी आणि ज्योती लग्न करू ."
सुजयला प्राचीने हे सगळे का केले याचा रेफरन्स आता लागला होता ..
सुजय त्याची गाडी काढून बाहेर गेला .. आसपास वहिनी कुठे दिसतेय का शोधून आला .. पण ती त्याला सापडलीच नाही .
------------------------------
पाच वर्षां नंतर
सुजयचे लग्न झाले.. त्याने कोर्ट मॅरेज केले आणि नम्रताला घरी न घेऊन जाता आधीच सेपरेट झाला होता .सुखाने आनंदाने दोघांचा संसार सुरु होता . सुजयची बदली बंगलोरला झाली म्हणून दोघे गेल्याच आठवड्यात बंगलोरला आले .. कंपनीने छान मोठ्या सोसायटीत फ्लॅट दिला होता.
सुजय आणि नम्रता संध्याकाळी जवळच्या गार्डन मध्ये वॉकला गेले होते तर समोरचे चित्र बघून तो स्तब्ध झाला.
प्राची एकदम छान ,प्रसन्न, आनंदी दिसत होती .मस्त मोकळे सोडलेले चमकदार केस ,मोत्यांसारखे चमकणारे शुभ्र दात ,आनंदी ,मोहक .. सुंदर डोळे आणि तिच्या बरोबर खेळणारी एक छोटीसी कुरळ्या केसांची ,गोरीपान परी , इतकी क्युट होती तिची मुलगी .. त्या मुली बरोबर खेळणाऱ्या प्राचीला बघणे म्हणजे आनंदाचा झरा अंगावर पडावा इतके छान वाटतं होते . कसली हि तमा , टेन्शन नव्हतं तिला .. देवाने सगळी सुखं तिच्या पायाशी आज घातली होती ..
सुजयला तिला असे खुशीत, आनंदात बघून खूप छान वाटले .. आपली वहिनी जीने अत्यन्त हलाखीचे दिवस काढलेले त्याने स्वतः पाहिले होते .. त्याला राहवले नाही आणि तो धावतच तिच्या जवळ गेला
सुजय " वहिनी !! "
प्राची ने पटकन त्याच्याकडे बघितले
प्राची " सुजय .. प्लिज कॉल मी प्राची मी आता तुझी वहिनी नाहीये "
सुजय " हो .. सॉरी .. पण तू मोठी आहेस माझ्या पेक्षा .. मी ताई म्हणतो मग तुला चालेल का ?"
प्राची काहीच बोलली नाही
सुजय " हि माझी बायको नम्रता "
नम्रता " नमस्कार व.. " ती वहिनी बोलताना थांबली.
नम्रता " नमस्कार प्राची ताई .. सुजयने मला सगळे सांगितलंय "
सुजय " तुला असे इथे बघून खरंच खूप आनंद झालाय मला .. खूप काळजी लागून राहिली होती मनात .. वाटायचं वहिनी त्या दिवसा नंतर दिसलीच नाही .. कुठे असेल ? कशी असेल ? जिवंत असेल कि नसेल ?"
प्राची " मी तिथून बाहेर पडले हे खूप चांगले झाले .. माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता तो .. त्या दिवशी रागातच घरातून बाहेर पडले .जायला रस्ता नव्हता . खिशात पैसे नव्हते .मनात दुःखा शिवाय काही नव्हते . सासर नव्हते .माहेर नव्हत . हक्काचं म्हणून खांदा द्यायला पण कोणी नव्हते . बराच वेळ गार्डनच्या बाहेरच्या बाकावर बसून राहिले .. बाकावर मी एकटीच बसले होते पण माझ्या सोबत होते माझे दुःख .. माझे अश्रू जे कि माझी अजिबातच साथ सोडत नव्हते . बाजूला एक भजी वाली बाई होती .. सहज लक्ष गेले तिच्याकडे .एकटी बाई रात्री भजी पावची गाडी चालवत होती . तीचं भजी बनवत होती .. तीचं भांडी घासत होती .. सगळ्या प्रकारची लोकं तिच्या आजू बाजूला होती .मी जेवढी घाबरले होते कदाचित ती सुद्धा मनातून घाबरत असेल का असा विचार मनात आला आणि मी तिच्याकडे गेले .. मी न मागता मला एक भजी पावाची प्लेट तिने मला खायला दिली ..
मी म्हटले "माझ्याकडे पैसे नाहीयेत .."
ती म्हणाली " आज तुम्ही इथे बसला होतात म्हणून मनाला खूप आधार वाटला .. असे वाटले कोणीतरी माझ्या बरोबर बाई माणूस आहे .असे वाटले मी या जगात एकटी नाहीये .. थोडी कमी भीती वाटली "
घळघळ पाणीच आले माझ्या डोळ्यांतून
भजीवाली " नवरा मरून दोन वर्ष झालीत .. दोन लहान पोरं आहेत .. शिक्षण नाही .. त्यामुळे नोकरी नाही . मग टाकली भजीपावची गाडी .चालवते एकटीचा संसार "
मी मनात विचार करू लागले " मी तर शिकलेली आहे . माझ्या अकाउंट ला माझे जीवन व्यतीथ होण्यासाठी पैसे आहेत . चांगल्या पगाराची नोकरी आहे .. देवाने तर मला मालामाल केलंय .. दुसऱ्याचे दुःख बघितले कि आपली परिस्थिती जास्त चांगली आहे हे लगेच कळते तसेच झाले मला .. "
मी भजी पाव खाल्ला आणि मनात आलेली नकारात्मक भावना कुठंतरी गायब झाली आणि मला जीवन जगायला जणू प्रेरणाच मिळाली ..
तिथून चालत मी माझ्या मैत्रिणीकडे गेले . दोन चार दिवस तिच्याकडेच राहिले आणि ऑफिस मधून बदली मागून घेतली . ऑफिस ने मला मोठ्या पदावर बंगलोरला बदली दिली ..
बंगलोरला येण्या आधी त्या भजी वालीला भेटायला गेले .. तिला पैसे दिले . तिच्या पोरांना खूप सारा खाऊ नेला .. तिला सांगितले कि तू माझ्या जीवनाचे प्रेरणा स्थान आहेस .. तुझ्या मुळे पुन्हा नव्याने सुरुवात करायची इच्छा झालीय .अजूनहि ती माझ्या संपर्कात आहे .. ती तिची लढाई लढतेय .. मी माझी .”

सुजय, नम्रता , प्राची आणि तिची मुलगी बोलता बोलता समोरच्या कॉफी शॉप मध्ये बसले आणि बोलत होते .. प्राची किती चांगली आई आहे हे त्या दोघी मायलेकी कडे बघूनच कळत होते ..
सुजय " इकडे आल्यावर दुसरे लग्न केलेस का ?"
प्राची " एकदा त्या वनवासातून गेल्यावर पुन्हा त्याच आगीत उडी मारायची माझी तरी इच्छा झाली नाही आणि मला गरज पण पडली नाही "
सुजयने प्रश्नात्मक चेहरा करून त्या छोट्या परी कडे बघितले ..
नम्रताने त्याला असे काही विचारू नकोस कि तिला दुःख होईल असे डोळ्यांतूनच खुणावले
प्राचीने बाजूला बसलेल्या परीच्या तोंडाला लागलेल चॉकलेट टिशूने अलगद पुसले ..
प्राची " हि माझी मुलगी .. परू .. "
प्राची " से हाय परू .."
परू " ममा .. कॅन आय गो ऑन दयाट सी सॉ .. " समोरच असलेल्या सी सॉ कडे बघूनच ती म्हणाली
प्राची " ओके .. गो .. बी केअरफूल बेबी "
परु " येस मॉम " आणि इवल्याश्या डोळ्यांनी हसत ती खेळायला गेली
सुजयला मात्र जाणून घ्यायचे होते हे त्याच्या कडे बघूनच कळत होते
प्राची " सुजय तुला माहितेय त्या भजी वालीने मला एक शिकवलं कि आपल्याकडे काहीतरी कमी आहे म्हणून त्यावर रडत नाही बसायचं .. त्यावर मात करायची.. माझ्या कडे कमी एकच होती ती म्हणजे मी बहुतेक कधीच आई नाही बनू शकेल आणि त्या वर मी मात केली .. मी जिंकले .. मी आई झाले .. परुच्या तोंडातून मम्मा ऐकले ना कि जीव शांत होतो माझा ..
सुजय " ते दिसतच आहे .. आणि तू प्रूव्ह केलेस कि तू जितकी माणूस म्हणून चांगली आहेस .. तितकीच तू चांगली बायको होतीस , सून होतीस , वहिनी होतीस .. तितकीच चांगली आई आहेस "
नम्रता " खूप गोड आहे परू .. तिच्याकडे बघितल्यावरच सगळी दुःख उडून जात असतील .. हो ना "
प्राची " खरं आहे .. मी माझा एकांत .. माझं कमी पण सगळे विसरून जाते तिच्या बरोबर असताना मला मी संपूर्ण झाल्या सारखं वाटतं "
सुजय " कोण आहे तुझा लाईफ पार्टनर .. तो कसा आहे ? "
प्राची " आय एम ऑल अलोन .. अँड स्टील माय फॅमिली इज कंप्लिट "
सुजय " प्राची ताई प्लिज सांग ना .. नीट "
प्राची " अरे परु इज अडोप्टेड चाईल्ड .. "
सुजय " व्हॉट ?"
प्राची " येस .. त्या भजी वालीने मला अजून एक शिकवलं .. मी तिथे असल्याचा फायदा तिला झाला होता .. मी बसले होते कारण मला कुठेच जायला डेस्टिनेशन नव्हते .. पण माझ्या तिथे असल्याने तिला थोडा वेळ का होईना आधार वाटला होता .. तसाच आज अनाथ आश्रमात अनेक अशी मुलं आहेत त्यांना आधाराची गरज आहे .. माझ्या असण्याचा असाच कोणाला तरी गरज असलेल्याला फायदा झाला तर ...असा विचार करून मी मुल दत्तच घ्यायचं ठरवलं ..
सुजय आणि नम्रता अवाक होऊन तिच्याक बघत बसले.
प्राची " त्या अनाथ आश्रमात परू एकेकाळी सगळ्यांत जास्त रडणारे बाळ होते .. मी गेले तेव्हा तिथला कर्मचारी मला हसणारी खेळणारी मुलं दाखवत होता .. पण माझा जीव त्या पाळण्यात री.... री ... रडणाऱ्या.. आपल्या आईच्या मायेच्या उबे साठी रडणाऱ्या बाळात अडकले .. आणि लगेच तिला दत्तक घेऊन टाकले .. सुरुवातीला खूप रडायची .. इतकी कि मला रात्र रात्र झोपून नाही दिले तिने .. पण जेव्हा तिला माझी ममता समजली तेव्हा तिला माझ्यात मम्मा सापडली .. "
समोर लांबूनच परु हात करत हसत होती .. खिदळत होती ..
नम्रता " ताई .. हॅट्स ऑफ टू यु .. खरंच खूप अभिमान वाटतोय तुझा .. ग्रेट .. किती छान विचार आहेत तुझे "
सुजय " खरंच .. सिम्पली ग्रेट आहेस.. लिटरली एक दिवस आयुष्याला कंटाळली होतीस आज एका निराधाराला आधार दिला आहेस .. तिचे लाईफ बनवून टाकलेस .. एका अनाथ मुलीला स्वतःचे घर दिले .. तिला आई दिलीस .. प्रेम दिलीस .. माया दिलीस .. "
सगळे एकमेकांना बाय करून निघाले आपापल्या घरी .
निघताना सुजय " हे परू.. बाय .. टेक केअर बेटा "
परू " बाय अंकल .. बाय आंटी "
नम्रता "प्राची ताई .. नक्की नाव काय ठेवलं आहेस हीचं ?"
प्राची " परू.. बेटा टेल युअर नेम "
परू " माय नेम इज प्रेरणा प्राची *************"
प्राची " व्हेरी गुड .. " आणि दोघींनी एकमेकींना हायफाय दिले
नम्रता " खूप छान नावं आहे .. "
प्राची " सुजय .. तुला माहितेय हे नाव आणखी कोणाचं आहे ?"
सुजय ने मान हलवून नकार दिला
प्राची "त्या भजी वाल्या बाईचं "
प्रेरणा .. एका भजीवाल्या .. न शिकलेल्या साधारण काम करणाऱ्या बाई कडून प्राची ला प्रेरणा मिळाली होती आणि हीच प्रेरणा कायम मनात तेवत राहण्यासाठी तिने तिच्या मुलीचे नाव प्रेरणा ठेवले होते ..
नम्रता ने पटकन तिला एक मिठीच मारली " आज तुम्ही माझ्या आयुष्याची प्रेरणा झाला आहात .. यु आर ट्रूली फायटर "

समाप्त !!
© सौ. शीतल महेश माने

कथा काल्पनिक आहे .. कशी वाटली हि छोटीशी प्रेरणादायी कथा ..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now