प्रेमवीर भाग 8 (अंतिम भाग)

Short lovestory

 संगीता एक दिवस वीर ने दिलेला फोन नंबर ट्राय करते. फोनची रिंग जाते.

संगीता-"हॅलो, वीर....."तिकडून आवाज येतो "आपण कोण?"संगीता बोलते मी संगीता आहे.

तिकडून वैशू बोलत असते."अगं संगीता बोल ना कशी आहेस? मी वैशू बोलते आहे. वीर घरी नाही आहेत बाहेर गेले आहेत."

संगीता-"हॅलो वैशू. मी बरी आहे. विरणे नंबर दिलेला म्हणून फोन लावून बघितला."

वैशू-"हो मला विरणे सांगितले. कुठे असतेस तू आज काल? कुठे नोकरी करते?"

संगीता-"मी एका अंध मुलांच्या शाळेमध्ये संगीत शिक्षिका आहे."

वैशु-अरे वा! छान मी आणि वीर येऊ तुला भेटायला कधी.

वीर घरी आल्यानंतर वैशू ने संगीताचा फोन आल्या बद्दल सांगितले. वैशू विरला म्हणाली आपण दोघं संगीता ला भेटायला जाऊ. तिला मदत करू. आणि ती ज्या अंध शाळेमध्ये आहे त्या शाळेला ही मदत करू. वीर ला वैशू ची ही कल्पना आवडली..

      विर आणि वैशू संगीताच्या शाळेला भेट देतात. शाळेला मदत करतात. वैशू संगीता ला भेटते. संगीता वैशू ला,"तुम्ही मला इकडे भेटायला आला. मला खूप छान वाटले. परंतु एक प्रश्न माझ्या मनाला भेडसावतो आहे की तुला माझा राग नाही आला का? तुला सर्व गोष्टी माहीतच असतील."

वैशू संगीताला,"हो मला सर्व गोष्टींशी कल्पना आहे. परंतु, जे नशिबात असते ते घडते. याबाबत आपण कोणीही काहीही करू शकत नाही नाही. तुला काही मदत हवी असेल ती आम्ही करू."

संगीताला ही वैशू चा स्वभाव खूप आवडतो. दोगीही चांगल्या मैत्रीण होतात.

   काही वर्षांनंतर वीर आणि वैशू ला एक मुलगा होतो. एक मुलगा आणि एक मुलगी असे चौकटी परिवार त्यांचा तयार होतो. दोघा मुलांच्या संगोपनात त्यांचा बराच वेळ जातो. वेळोवेळी वीर आणि वैशू एकमेकांना समजून घेतात. मुलं मोठी होतात.

     रस्त्यांची मला उच्चशिक्षित आहेत. वीर आणि वैशू चा संसार सुखाचा चालू आहे. म्हणून आयुष्यात सुख आणि दुःख चालूच असतात. त्याला सामोरे जा.

      जेव्हा संगीताने वीर ला सोडून दिले आणि वीर ला हत्या करावी वाटली त्यावेळी वेळेस जर त्याने असे केले असते तर आज तो या सुखी जीवनाला मुकला असता.

      किंवा संगीताची परत भेट झाली तेव्हा पूर्ववैमनस्यातून विरणे संगीताला जर काही हानी पोहोचवली असती तर विर आणि संगीता दोघांचाही संसार उद्ध्वस्त झाला असता. दोघांची मुले ही पोरकी झाली असती.

       म्हणून प्रेम करा. प्रेमभंग झाल्यावर त्यातून सावरा. नक्कीच आयुष्यात पुढे काही तरी चांगले लिहिलेले असेल.

      गोष्ट सत्य घटनेवर आधारित आहे.

        

🎭 Series Post

View all