Login

प्रेमवीर भाग 7

Short lovestory

संगीताने विरला बघितले. ती एकदमच चालत त्याच्या जवळ गेली. वीर ने तिला बघून पाठ फिरवली.

संगीता विरला," वीर.... आपली भेट अशी होईल असा कधी वाटलं नव्हतं. वीर मला माफ कर. मला तुझ्याशी लग्नाच्या आधी सर्व बोलायचं होतं. परंतु तशी वेळच आली नाही. बाळू ने मला त्याच्या जाळ्यात असे ओढली की मला काही समजले नाही."

वीर संगीताला- "संगीता आता आपण बरेच पुढे आलो आहोत. माझा एक सुखी संसार आहे. मी आता सगळं विसरलो आहे"

संगीता विरला- "मला आनंद आहे तुझा संसार सुखी आहे. कारण माझ्या एका चुकीमुळे माझं जीवन खूप खराब झाले आहे. बाळू मला खूप त्रास देतो. मारहाण करतो. कशीबशी नोकरीला लागली.त्यातून जे पैसे येतात त्यात कसा तरी घर चालवते. उरलेले पैसे बाळू दारू मध्ये उडावतो. 2 मुलं आहेत माझी. आता मला कोणाचाच आधार राहिला नाही.माझ्या चुकीमुळे आई आणि ताई सुद्धा माझ्या शी आता बोलत नाही."

विरला हे ऐकून थोडे वाईट वाटते. तो संगीता ला त्याचा फोन नंबर देतो आणि सांगतो तुला काही अडचण असेल तर मला सांग. मित्र म्हणून मी नेहमी तुझ्या मदतीला असेल. आणि वीर निघून जातो.

     वीर परत त्याच्या घरी जातो. वैशु ला सर्व हकीकत सांगतो. कारण त्याला वैशू पासून काही लपवायचे नसते. त्याला माहित नसते की आता वैशू काय प्रतिक्रिया देईल? परंतु, वैशू ची प्रतिक्रिया ऐकून त्याला आनंद होतो.

   वैशू म्हणते मला संगीताशी काहीही तक्रार नाही. कारण आज तिच्यामुळेच मला इतका चांगला जोडीदार मिळाला. जर तिला खरच मदतीची गरज असेल तर आपण दोघं मिळून तिला मदत करू. माणुसकीच्या नात्याने एवढं तर आपण करू शकतो. हे ऐकून वीर आधी तर वैशू च्या प्रेमात असतोच तो अजून तिच्या प्रेमात पडतो.

      क्रमशः.............

🎭 Series Post

View all