वीर व वैशू चा साखरपुडा पार पडला. त्याने वैशू ला जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वैशू अत्यंत कोमल स्वभावाची. अबोल होती. त्याला तिचा स्वभाव आवडला. विरने वैशू ला संगीता बाबत सर्व हकीकत सांगितली. वैशू ने सर्व हकीकत ऐकली. ती त्याला म्हणाली, तुमची यात काही एक चूक नाही. मी तुम्हाला वचन देते की, मी आयुष्यात तुम्हाला कधी दुखावणार नाही.
असेच काही दिवस जातात. वीर आणि वैशू चे लग्न होते. वीरला एक चांगली नोकरी भेटते. तो एका मोठ्या कॉलेजला प्रोफेसर बनतो. वैशू ने ही चांगले शिक्षण घेतलेले असते. तीही नोकरी करण्याची इच्छा वीर कडे व्यक्त करते. विरही तीला पाठिंबा देतो. वैशू ला शिक्षिकेचे नोकरी भेटते.
दोघांचा सुखाचा संसार चालू असतो. काही वर्षांत दोघांच्या या संसाररूपी वेलीवर एक फूल उमलते. त्यांच्या घरी एका कण्येचा जन्म होतो. तिघांचा जीवन हसत खेळत मजेत जात असते.
एक दिवस वीर कामानिमित्य बाहेरगावी गेलेला असतो. तो त्याच्या कार मधून उतरत असतो. तेवढ्यात समोरच्या एका रिक्षांमधून संगीता त्याला उतरताना दिसते. तो संगीताला आणि संगीता त्याला बघते. दोघांची एकच नजरानजर होते.
वीर आणि संगीता आता एकमेकांना काय बोलतात? बघूया पुढच्या भागात.
क्रमशः..............
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा