Jan 27, 2022
प्रेम

प्रेमवीर 2

Read Later
प्रेमवीर 2

जेव्हा वीर आईला संगीताबद्दल सांगतो, तेव्हा आई विरवर थोडी नाराज होते, चिडते. ती त्याला समजावते की, मी तुझ्यासाठी एक छान मुलगी बघितली आहे. ती दिसावयास सुंदर तर आहेच परंतु तिचं घरदार सर्वच गोष्टी उत्तम आहे. ते स्थळ तुझ्यासाठी योग्य आहे. पण पण वीर आईला सांगतो,"आई, ती मुलगी कितीही चांगली असली तरी माझं तर संगीतावर प्रेम आहे ना."

आईही मग विरला समजून घेते.असेच काही दिवस जातात. या काळामध्ये वीर ची आई खुप आजारी पडते. वीर च्या आईला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराने ग्रासलेले असते. त्या काळात कॅन्सरवर योग्य उपचार नसल्याने आईचा आजार अजून बळावतो. इतका की तो शेवटच्या स्टेज पर्यंत पोहोचतो. आईला मुंबईला उपचारासाठी नेण्यात येते. परंतु, बराच उपचार घेतल्यानंतर ही डॉक्टरांनी सांगितले की, आता हा आजार बरा होऊ शकत नाही. आईकडे आता आता काही दिवसांचाच कालावधी आहे. तुम्ही त्यांना घरी घेऊन जा. असं विरला व त्याच्या घरच्यांना सांगितलं. या परिस्थितीत वीर आतून बराच तुटून गेलेला असतो. या परिस्थितीत संगीताही विरला मानसिक आधार देते.

        त्यानंतर आईला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरतात आणि एक दिवस आई सर्वांना सोडून हे जग सोडून परत नाही येणार वाटेवर चालली जाते. विर तर पूर्णपणे तुटून गेलेला असतो. कारण वीर आईच्या खूप जवळ असतो.

     नंतर घरातली कोणी व्यक्ती वारल्यानंतर तीन वर्ष लग्न करत नाही अशी प्रथा आहे. म्हणून घरचे एक वर्षाच्या आत वीर आणि संगीताचं लग्न करावयाच ठरवतात. दुःखामध्ये सुद्धा सर्वांना थोडा आनंद होतो. लग्नाच्या तयारीला सुरुवात होते.

   वीर आणि संगीताच्या लग्नाची तयारी सुरू होते. पत्रिका छापल्या जातात. चि.सौ.का.संगीता आणि चि. वीर यांचा विवाह संपन्न होणार असतो. सगळ्या नातेवाईकांमध्ये पत्रिका वाटल्या जातात. सगळ्यांना लग्नाचे आग्रहाचे आमंत्रण मिळते. अशीच वीर आणि संगीताच्या लग्नाची पत्रिका ठाकूर सरांच्या घरी पण येते. ठाकूर सरांची मुलगी वैशू आनंदित होते.

 वैशू तिच्या आईला म्हणते,"आई किती दिवस झाले आपण कुठेच नाही गेलो आणि मी आपल्या समाजातल एकही लग्न नाही बघितलं अजून पर्यंत. आपण जायचं का?"

त्यावर सर्व घरचेही लग्नाला जायचं ठरवतात.

      तिकडे वीरची वरात निघते. त्याच्या गावावरून संगीताच्या गावाकडे. हळदीचा प्रोग्राम होतो. आता दुसऱ्या दिवशी लग्न होणार असते. वीर खूप आनंदात असतो. सगळे हळदीचा समारंभ संपवून बसलेले असतात. तेवढ्यात एक मुलगा धावतच वर पाहुण्या जवळ येतो. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत असतो तो. वीर त्याला विचारतो,"काय रे काय झालं? तू इतका का घाबरला?"

त्यावर तो मुलगा धापा टाकत, घाबरून,"दादा, नवरी पळून गेली." वीर च्या पायाखालची जमीनच सरकते. त्याला एकदम धक्का बसतो. "काय??????????????"

         सगळे एकदम अवाक् होतात. वीरचे वडील, भाऊ संगीता च्या घरी जातात. संगीताची आई रडत असते आणि संगीताची मोठी बहीण जी वीरची वहिनी असते. तिला तर काय करावं? काय बोलावं काहीच सुचत नसते.

वीर वहिनीला-"वहिनी सांगा ना संगीता कुठेय? कसं काय ती अशी निघून गेली?"

      वहिनीला तर काहीच सुचत नसते. तीही रडायला लागते. वहिनी विरला,"भाऊजी, मला काहीच माहित नाही. संगीता काहीही न सांगता गेलीये."

      वीर संगीताच्या मैत्रिणीकडे जाते. तिला विचारतो,"सांग, तुला माहिती आहे का? संगीता कुठे आहे?" तेव्हा ती विरला सांगते,"वीर, संगीता बाळू सोबत पळून गेली. आणि ते दोघे लग्न करणार आहे."

वीरला हा पण एक मोठा धक्का असतो."काय!!!!!!!संगीताने माझ्यासोबत असं का केलं? जर तिला माझ्यासोबत लग्न नव्हतं करायचं तर तिने मला सांगायचं होतं. मला असं न सांगता का गेली ती? माझ्या सगळ्या परिवाराची अशी बदनामी तिला का करावी वाटली?"

वीर खूप रडतो. वीर ला वाटतच नव्हते की संगीता असं करू शकते. म्हणून तो तिला शोधायला निघतो. वीर बस स्टैंड वर गेला. रेल्वे स्टेशन वर गेला. सगळीकडे तिला शोधले. ती कुठेच नव्हती.

       वीर हताश झाला. निराश झाला. त्याला हे जीवन नकोसे वाटू लागले. त्याला वाटले की आता आत्महत्या करून घ्यावे तेव्हाच आपल्याला शांती मिळेल.

  पुढे काय होते बघूया पुढच्या भागात........

   क्रमशः...........

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now