प्रेमस्पर्श २१

Priya Fell In Love With Umesh?


गेल्याभागात आपण पाहिले की प्रिया आणि उमेश कॉलेजमध्ये भेटतात.प्रिया स्वतःच्या आयुष्यात काय घडले सांगते.. तिचा नवरा आणि मुलगा दोघेही जग सोडून जातात..ती डिप्रेशन मध्ये जाते..नंतर आई वडील तीला माहेरी आणतात..वडीलांना तिच्यासाठी फार वाईट वाटते.प्रिया रडु लागते..पुढे पाहू..


प्रिया:"उमेश,एक दिवस आई वडिलांना उठवायला गेली ..ते काहीच प्रतिसाद देत न्हवते.डॉक्टरांना बोलावले तेव्हा कळले की ते रात्रीच अटेक येवून गेले.आम्ही हादरलो .माझ्या मनाचा आक्रोश होत होता..नंतर असं वाटलं माझ्या टेंशन मुळेच वडील गेले.मीच कारण होती त्यांच्या मृत्यूपाठी .असं वाटलं मीच जीव घेतला त्यांचा. मी अजून डिप्रेशन मध्ये गेले..आईसुद्धा पार कोलमडून गेली..बघ ना उमेश नियतीचा फेरा किती वाईट ना ?काय होईल सांगता येत नाही..खूप काही गमावलं.. खूप काही गमावलं उमेश मी .असं म्हणत ती रडु लागली..

उमेशच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या..थोड्या वेळाने प्रिया शांत झाली पण उमेश रडतच होता...

प्रिया पुढे बोलू लागली:"उमेश,आम्ही थोड्या दिवसापूर्वी पून्हा गाव सोडून येथे राहायला आलो..काही वर्षांपूर्वी दादाने लग्न केले ..त्याचाच मुलगा होता ज्याला मी अमोलच्या लग्नात आणले.जेव्हा मला समजलं की राधाचं लग्न अमोलशी होत आहे तेव्हा मी ठरवलं की मी नक्की लग्नाला जाणार..आता आईसुद्धा बाबांच्या आठवणीत रडते .तिलाही सावरण्याचा प्रयत्न करते आहे..तीचं मन रमावं म्हणून जुन्या ओळखीच्या माणसात तिला घेऊन जाते.तेवढीच ती मोकळी होते...

उमेश बघ ना किती सुंदर होतं माझं आयुष्य किती स्वप्न पाहिली होती आणि काय होऊन बसलं.. रात्रभर झोपही लागत नाही..काही तरी विचार डोक्यात घोळत राहतात..


उमेश:"मला वाटलंच होतं प्रिया,तुझं अचानक लग्न होण्यापाठी काही तरी कारण असणार.. त्याशिवाय तू लग्नाला तयार झाली नसणार..
अमोल आणि मी खूप प्रयत्न केले तुझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा पण झाला नाही..देवाकडे प्रार्थना करत होतो की तू जिथंही असशील तिथे सुखी राहावी पण आज हे सर्व ऐकून फार वाईट वाटलं.. हे असे घडायला नको होते...


प्रिया:"उमेश,आपल्या हातात काहीच नसतं.. सर्वच आधीपासून ठरलेलं असतं .जे जे घडणार ते वाट्याला येते आणि आपण मात्र वाईट प्रसंग आला की पुढे नशिबात चांगले होईल म्हणून आशावादी राहतो.उमेश आता माझ्या आयुष्याकडून सर्व इच्छा आकांक्षा संपल्या आहेत.. आता भावाच्या लहान मुलात मन रमवते...

उमेश:"प्रिया,असा आशावाद सोडू नकोस..कदाचित पुढे आयुष्यात तुझं नक्की चांगलं काही होईल.."

प्रिया:"उमेश,आता इतकं सोसलं आहे की ,स्वप्न पहायची भीती वाटते..पुढे सहन करायची ताकद नाही .आता स्वप्न नकोच वाटतात उमेश.. स्वप्न पाहून उपयोग तरी काय ?स्वप्न पूर्ण होत नाही ..माझी तर नाहीच नाही..

तुला, अमोलला, राधाला पाहिले आणि जुन्या दिवसात रमले. थोड्या वेळ का होईना दुःख विसरले मी..थँक्स उमेश तू भेटायला आलास..खूप खूप बरं वाटलं.


उमेश:"काय ,प्रिया तू मला थँक्स बोलून परकं करू नकोस"



प्रियाला आईचा फोन आला..

प्रिया:"बरं, चल उमेश भेटू पून्हा केव्हातरी .आई बोलवते आहे"

उमेशला अजून बोलायचे होते पण प्रियाला जावे लागणार होते..

प्रिया निघून गेली..


उमेश फार उदास होऊन घरी आला..

आईने त्याचा चेहरा पाहिला आणि विचारले.."उमेश,किती उदास झाला ??

काय झाले?


उमेश:"आई ,मी प्रियाला भेटून आलो...काय होऊन बसले तिच्या आयुष्यात..


आई:"हो हो आपली प्रिया..तुला सांगायचे राहून गेले. तिच्या आईने सर्वकाही सांगितले त्या दिवशी पण गावाला जाण्याच्या नादात राहून गेले.तुला काही सांगितलेच नाही...किती वाईट झाले प्रियासोबत.. किती चांगली ,गुणी मुलगी आणि असे व्हावे ...खरंच फार वाईट झाले....वयच काय तिचे ??..आणि ह्या कमी वयात असं व्हावे..?


तेवढ्यात बाबा आले ..

आईने प्रियाविषयी सर्वकाही सांगितले...

त्यांनाही फार वाईट वाटले...

उमेशच्या पटकन तोंडातून निघाले..:"आई बाबा ज्या मुलीवर मी मनापासून प्रेम केले ती प्रियाच आहे.मला प्रियाशी लग्न करायचे आहे."


हे ऐकून आई बाबा दोघेही चकित झाले..

आई:"उमेश,काय बोलतो आहेस तू?

उमेश पुन्हा भानावर आला..

त्याची त्याला कळलं नाही की तो काय बोलून गेला..

आई :" उमेश,तुला प्रियासोबत लग्न करायचे आहे???

उमेशने आईच्या डोळयात डोळे घालून बोलायला सुरुवात केली..

शेवटी प्रियाला सर्वस्व मानले होते..त्याला जरा दडपण आले होते पण त्यापेक्षाही त्याला प्रियाचा चेहरा समोर दिसत होता..त्याने धाडस केले..पुढे म्हणू लागला:"हो आई बाबा,मला प्रियाशीच लग्न करायचे आहे..तीच हवी आहे मला माझ्या आयुष्यात..तिला सोडून मी कोणा दुसऱ्या मुलीचा विचार केला नाही....आणि करणारही नाही"


आईला ह्या वक्तव्यावर फार राग आला..तिने उमेशच्या कानाखाली मारली आणि म्हणाली:"उमेश,प्रिया विधवा आहे आणि तू आमचा एकुलता एक मुलगा आहे.मान्य आहे प्रियाच्या आयुश्यात जे घडले ते वाईट घडलं..त्याचे दुःख आहे पण म्हणून तू तिच्याशी लग्न करायला निघालास??


उमेश:"आई ,तिच्या सोबत घडलं म्हणून मी लग्न नाही करत.मला तिच्यासोबतच लग्न करायचे होते आई..मी नेहमी तिची स्वप्न पाहिली...एकदा मी माझ्या पायावर उभं राहिलो की मी सांगणारच होतो तुम्हाला पण त्याआधीच तिचे लग्न झाले आणि तिचे असे झाले..आई माझ्या नजरेत ती विधवा नाही..ती फक्त आणि फक्त प्रिया आहे..ती प्रिया जी माझ्या आयुष्यात हवी आहे.तीच मुलगी आहे जिच्यावर मी नेहमीच प्रेम करत आलो आहे..


बाबा:"उमेश,थोडा विचार कर बाळा"..


उमेश:"बाबा,इतके वर्ष फक्त विचारच करतो आहे ..पण आता कृती करण्याची वेळ आली आहे बाबा..बाबा तुम्ही म्हणाले होता ना की कोणती मुलगी आवडते आणि तेव्हा मी म्हणालो होतो वेळ आल्यावर सांगेन....बाबा आली ती वेळ..बाबा मी प्रियाला दुःखी पाहू शकत नाही.लग्न करणार तर तिच्यासोबतच करणार.... नाही तर मी लग्नच करणार नाही..


आई कणखर आवाजात म्हणाली:"चालेल,तू लग्न नाही केलेस तरी चालेल पण मी तुझं लग्न प्रियाशी होऊ देणार नाही"..


उमेश काही न बोलता निघून गेला...


आई बाबांशी बोलू लागली..

आई:"पाहिलं ह्या पोराचं खूळ,काय मोकळीक दिली की हा असा वागायला लागला..बघितलं काय बोलून गेला..लग्न करेन तर प्रियाशीच..... त्याला कळायला हवे,प्रियाशी लग्न करणे योग्य नाही..त्याला चांगल्या मुली मिळू शकतात..


बाबा:"थोडा वेळ जाऊ दे .आपण त्याला विश्वासात घेऊन शांत करू"

आई:"माझं तर डोकचं चालेना".....किती स्वप्न पाहिली होती उमेशसाठी आणि ह्याच्या डोक्यात आता कसलं खूळ देवाला माहीत"


उमेशचा निर्णय ठाम होता...त्याने अमोलला फोन करून प्रियाविषयी सर्व सांगितले.
अमोलला धक्का बसला..

तो म्हणाला:"आपल्या प्रियाबरोबर हे असे व्हावे,विश्वास बसत नाही"


उमेश:"मलाही विश्वास बसला नाही..अमोल,मी आज आई बाबांना सांगितले की लग्न करणार तर प्रियाशी "

अमोल:"काय ,तू सांगितले??


उमेश:"हो ,सांगितले...

अमोल:"काय म्हणाले आई बाबा?

उमेश:"माझा निर्णय दोघांना आवडला नाही "

अमोल:"सहाजिकच आहे,पण उमेश तुला वाटत नाही का तू खूप घाई केली आई बाबांना सांगण्याची??

उमेश:"नाही अमोल,मी सांगितले ते बरे केले..कारण मी प्रियाला आता असा दुःखी पाहू शकत नाही.तिच्या आयुष्यात पुन्हा सुखाचे रंग भरायचे आहे मला.लवकरात लवकर....


अमोल:"तू प्रियाला सांगीतले हे?ती तयार आहे??


उमेश:"नाही,लग्ना बाबतीत मी काही सांगितले नाही...लवकरच तिच्याशी मी बोलणार आहे"


अमोल:"उमेश,मला वाटतं तू सर्वात आधी तिच्याशी बोलावं.तिच्या मनात तुझ्याविषयी काय आहे जे जाणून घेणे महत्वाचे..तू आई बाबांना सांगितले पण जर का तिला लग्न नको असेल तर??"


उमेश:"मी आजच बोलतो तिच्याशी"


उमेशने फोन ठेवला..


उमेश विचारात पडला..अमोल बोलत होता त्याच्यात तथ्य तर होते..प्रिया लग्न तर करेल ना माझ्याशी?

अजून वेगवेगळे विचार येण्याआधी त्याने लगेच प्रियाला फोन लावला

उमेश:"प्रिया,मला उद्या पुन्हा भेटशील?

प्रिया:"उमेश,आपण आजच भेटलो.काय काम आहे??

उमेश:"मला महत्वाचे बोलायचे आहे"


प्रिया:"चालेल भेटू उद्या"


उमेशने मनाशीच निर्धार केला...उद्या प्रियाला मनातलं बोलून मोकळं व्हायचे..


सकाळीच तो कॉलेजला गेला..

आईला संशय आला तिला वाटलंच आज उमेश नक्की प्रियाला भेटायला जात असेल म्हणून ती त्याचा पाठलाग करू लागली...

आज प्रिया आधीच आली होती..

उमेश प्रियाजवळ गेला..

पाठून आई दोघांना ,लपून पहात होती


प्रिया:"काय बोलायचे होते उमेश??

उमेश:"प्रिया ,लग्न करशील माझ्याशी??

प्रिया:"काय??

उमेश:"हो प्रिया,तू मला आवडते आणि मला लग्न करायचे आहे"


प्रिया दोन मिनिटं शांत बसली..

प्रिया:"उमेश,काहीही बोलतो तू..हे बोलण्या आधी विचार तर करायचा..तू माझा फक्त मित्र आहेस आणि माझ्यासाठी चांगला मित्रच राहणार...प्रेम तर मी माझ्या नवऱ्यावर केले..तो ह्या जगात नाही..तू माझा फक्त मित्र आहेस .मला वाटलं होतं तू मला समजून घेशील....पण तू तर..

उमेश:"प्रिया,तू कधीच प्रेम केले नाही माझ्यावर??

प्रिया:"एक मित्र म्हणून नेहमी माझ्यासाठी खास होता पण तुला त्या नजरेने कधीच पाहिले नाही.तुझ्याकडून ही अपेक्षा न्हवती उमेश..उमेश ह्यापुढे पुन्हा कधी भेटू नकोस...


प्रिया निघू लागली..

उमेशने तिचा हात पकडला..

"प्रिया,प्लिज अशी जाऊ नकोस.....

प्रिया त्याला न बघताच निघून गेली..

उमेश रडु लागला..


प्रियाने एकदाही पाठी वळून पाहिले नाही..


त्याचे डोकं बधिर झाले..


पाठून हा सर्व प्रकार आई पाहत होती..प्रियाच्या उत्तराने आई सुखावली..

तिला हेच हवं होतं..

आई निघून गेली..


उमेश मात्र आज खऱ्या अर्थाने तुटून गेला..

ज्या प्रियावर इतकं प्रेम केले आज कळलं होतं की ती त्याच्यावर प्रेम करतच नाही..मग का इतक्या दिवस वेडापिसा झालो मी ?काय करत होतो मी ??

त्याने अमोलला फोन लावला..


उमेशच्या रडण्याचा आवाज ऐकून

अमोल म्हणाला:"उमेश काय झाले??का रडतो आहे"


उमेश:"अमोल,प्रियाने माझ्यावर प्रेम केलंच नाही"


अमोल:"काय?

उमेश:"हो ,अमोल..हो ..हेच खरं आहे..


उमेश खूप रडत होता..

अमोल त्याला म्हणाला:"थांब मी येतो तुला भेटायला"

अमोल लगेच उमेशला भेटायला आला..


अमोलला पाहताच त्याने अमोलला मिठी मारली.."अमोल,ती माझ्यावर प्रेम करत नाही,मीच वेडा होतो अमोल मीच वेडा ..

अमोल:"उमेश,प्लिज शांत हो"


उमेश:"कसा शांत होऊ ?ज्या प्रियावर मी लहानपणापासून प्रेम केले ती म्हणते की तू माझा चांगला मित्र आहे..अमोल तुला खरंच नाही कळणार मला खूप त्रास होत आहे रे ..

अमोल फक्त उमेशचं ऐकून घेत होता..कोणत्या शब्दात त्याचे सांत्वन करावे हे त्यालाही कळेनासे झाले..

उमेश अगतिकपने अमोलला पाहत होता आणि उमेशची अशी अवस्था पाहून अमोलच्या पोटात खड्डा पडला होता...


क्रमशः

तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या..आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि मला फॉलो जरूर करा.
©®अश्विनी ओगले..




🎭 Series Post

View all