प्रेमस्पर्श भाग ११

Love Transform Life
गेल्याभागात आपण पाहिले की अमोलच्या बहिणीची कहाणी ऐकून उमेशला वेगळीच प्रेरणा मिळाली..संपूर्ण उद्धवस्त होऊनसुद्धा तीने स्वतःला सावरलं आणि इतरांचा आधार बनली....त्यामुळे उमेशला वेगळीच प्रेरणा मिळाली....त्यालाही आता अंधारात एक कवडसा दिसला....त्याने आता स्वतःच्या स्वप्नांवर लक्ष देण्याचा निश्चय केला..पाहू पुढे....


उमेशचे डिग्रीचे शेवटचे वर्ष राहिले होते... आता पर्यंत त्याचे लक्ष हटले होते पण आता योग्य वेळी त्याला एक संजीवनी मिळाली होती...वर्षभर त्याने खूप मेहनत केली ...दिवसाचे १६ तास अभ्यास करत होता..प्रचंड मेहनत घेत होता..इतका मग्न झाला अभ्यासात तहान भूक सर्वच विसरला... डोक्यात आता फक्त आणि फक्त चांगल्या गुणांनी शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला होता..आयुष्यात कधी न्हवे ती इतकी मेहनत घेऊ लागला...

परीक्षेचे दिवस जवळ आले तेव्हा तर अगदी रात्री तीन वाजेपर्यंत अभ्यास करू लागला...एक दिवस असाच रात्री अभ्यास करत होता. त्याच्या आईला अचानक जाग आली .उमेशच्या रूमची लाईट चालूच होती ...ते पाहून ती उमेशच्या रूममध्ये गेली....उमेश अभ्यासात इतका मग्न होता की त्याला आई आपल्या बाजूला कधी येऊन उभी राहिली हे सुद्धा कळलं नाही...आईने त्याच्या पाठीवर हात ठेवला तेव्हा तो भानावर आला...

"झोपली नाही आई तू अजून?"आईकडे पहात उमेश म्हणाला...


"हे तर मीच विचारायला आली आहे..उमेश तीन वाजले किती अभ्यास करणार बाळा.....?झोप आता ..शरीराला थोडा तरी आराम दे..सकाळी पुन्हा सहाचा अलार्म लावतोस..कशी झोप पूर्ण होणार?अपूर्ण झोप झाली तर शरीरावर परिणाम होईल ..तू आता झोप बघू"


उमेश:"कधी तीन वाजले कळलंच नाही आई ..sorry हा आई ...आई आता परीक्षा जवळ येते आहे म्हणून थोडा जास्त अभ्यास करतो..."


आई:"उमेश आताच नाही हा..मी बघते आहे वर्ष झाले तू अगदी अभ्यासात रमून गेला आहेस...तसं तुझं शेवटचं वर्ष आहे मेहनत ही घ्यायलाच हवी पण तू इतका गुंतला आहेस की स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही.....

टेबलवर दुधाचा ग्लास भरला होता..

ते पाहून आई म्हणाली"तू तहान भूक सर्वच विसरलास उमेश..हेच बघ तुझ्यासाठी दुधाचा ग्लास ठेवला होता तो तसाच पूर्ण भरलेला आहे ..ह्याचा अर्थ तू दूध प्यायला नाहीस"


उमेश:"सॉरी आई विसरलो मी"....

आई:"बरं ,आता लाईट बंद कर आणि झोपून जा ..हो आणि उद्यापासून वेळेवर झोपत जा.आरोग्य चांगले असेल तर सर्व गोष्टी आपण करू शकतो ..बरोबर ना ??

उमेश:"हो आई,लगेच पाच मिनिटात झोपतो..हा एक शेवटचा प्रश्न राहिला आहे तो सोडवतो "

आई:"बरं मग मी बसते इथेच तुझा शेवटचा प्रश्न सोडवेपर्यंत.... तुझा काही भरोसा नाही रात्रभर जागशील...."


उमेश:"आई तू खरंच ऐकणार नाही..बरं मी झोपतो ..माझ्यामुळे तुझी झोपमोड नको ….."


आईने रूमची लाईट बंद केली आणि निघून गेली..


उमेश झोपी गेला......


परीक्षेचा दिवस उजाडला..

उमेशने आई वडिलांचे आशीर्वाद घेतले आणि निघून गेला...


उमेशचा पहिला पेपर खूप छान गेला ..सर्व प्रश्नांची उत्तर अचूक दिले....


त्याने अमोलला फोन करून पेपर छान गेल्याचे सांगितले..

घरी आल्यावर आई बाबांनाही सांगितले...

उमेशच्या चेहऱ्यावरचा असीम आनंद पाहून आई बाबा सुखावले..…..


कधी एकदाचे पेपर संपतात असे झाले होते...

त्याने Mba करण्याचा निर्णय घेतला होता..अगदी त्याची पूर्वतयारीही त्याने आधीच सुरू केली होती.....

एकही सेकंद इथे तिथे वाया जाऊ नये म्हणून पुरेपूर प्रयत्न करत होता....


बघता बघता सर्व पेपर झाले..उमेशने मन लावून अभ्यास केल्यामुळे सर्वच पेपर छान सोडवले...


आता तो निकाल कधी येतो त्याची आतुरतेने वाट पाहू लागला...

आता फावल्यावेळेत तो Mba ची पुस्तकं चाळू लागला.….आता त्यातही रमला....


उमेशला जणू अभ्यासाचे व्यसन लागले होते..पुस्तकांच्या बाहेरही हे जग आहे जणू विसरून गेला होता.....


उमेशने काही पुस्तक पलंगाखाली ठेवली होती ..त्यात त्याला एक पुस्तक हवे होते म्हणून तो शोधू लागला..एक एक करून पुस्तक बाहेर काढत असताना त्याला एक पिशवी दिसली ..त्याने कुतूहलाने ती पिशवी काढली ..पिशवीमध्ये पाहिले तर त्याचे मन पुन्हा प्रियाच्या आठवणीने भरून आले..खास कारण होते मन भरून येण्याचे ..त्या पिशवीमध्ये उमेशने काही वर्षांपूर्वी पहिल्या पगारातून प्रियासाठी गिफ्ट आणले होते ते होते..

त्याने गिफ्ट हातात घेतले आणि किती तरी दिवसाने प्रियाच्या आठवणीने कंठ दाटून आला..त्या गिफ्टकडे पाहून हितगुज करू लागला"कुठे गेलीस प्रिया??न सांगता कुठे गेलीस?किती प्रयत्न करतो आहे तुला विसरण्याचा पण आज पुन्हा तुझी आठवण आली ..आज पुन्हा मन भरून आले..तुझी कमतरता कधीच पूर्ण होऊ शकत नाही प्रिया....कधीच पूर्ण होऊ शकत नाही..तुला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी मनाच्या कोपऱ्यात एक जागा अशी आहे तिथे तुझं स्थान अढळ आहे..

किती वेडा आहे ना प्रिया मी ..खरंच वेडाच म्हणायला हवं..कधी तुझ्याकडे व्यक्त तर झालो नाही आणि आता तू आयुष्यात नाही तर तुझ्या आठवणीत झुरतो आहे...

प्रिया खूप मुश्किलने स्वतःला सावरलं आहे ..आता परत गतकाळाचं दुःख घेऊन जगायचे नाही...

त्याने ते गिफ्ट पुन्हा पिशवीत ठेवले आणि कपाटात लॉकरमध्ये ठेवून दिले...

"प्रिया माहीत नाही तू मला भेटशील की नाही ...? पण हे तुझ्यासाठी मी माझ्या पहिल्या पगारातून घेतलेलं गिफ्ट खूप प्रिय आहे माझ्यासाठी.ह्या गिफ्टवर फक्त तुझाच अधिकार आहे..हे मी नेहमीच जपून ठेवणार आहे..हे गिफ्ट मला तू जवळ असल्याची आणि तू कधी तरी पुन्हा भेटशील ह्याची ग्वाही देत राहील....

उमेशने त्याला जी पुस्तकं हवी होती ती घेतली आणि पुन्हा अभ्यासात मग्न झाला.....

तेवढ्यात अमोल आला..

अमोलला पाहून उमेश फार खुश झाला ...

उमेशचा चेहरा पाहून तो उमेशला म्हणाला"उमेश पुन्हा प्रियाच्या आठवणीत रमला वाटतं"

उमेश:"नाही नाही ते मी आपलं ....

अमोल:"please उमेश मला तू खोटं बोलू नकोस तुझा चेहरा स्पष्ट सांगतो आहे"

उमेशने मान खाली घातली आणि म्हणाला "तू तर मनकवडा आहेस,तुझ्या पासून काही लपून राहूच शकत नाही"..


अमोल:"चल आता सांग बरं काय झाले ??

उमेश:"अमोल तुला आठवतंय मी माझ्या पहिल्या पगारातुन तुला आणि प्रियाला भेट घेतली होती"

अमोल:"हो आठवतंय"

उमेश:"तुला तर भेट दिली पण तुला तर माहीत आहे प्रियाला देऊ शकलो नाही.ती भेट मी ह्या पलंगाखाली ठेवली होती आणि आज मला सापडली.....तीच भेट पाहून पुन्हा सगळं पाठचं आठवलं...


अमोल:"असं होय..कुठे ठेवलीस मग भेट...?

उमेश:"ठेवून दिली आता कपाटात अगदी लॉक करून"


अमोल:"ते बरं केलेस, नाही तर जेव्हा जेव्हा पाहशील तेव्हा तेव्हा असाच उदास होशील"..नाही तर एक काम कर उमेश ते गिफ्ट मला दे मी जपून ठेवतो ..तुझ्या सहवासात राहिले तर तू असाच उदास होत राहशील.....


असे अमोलने म्हणताच..

उमेश त्याला लगेच म्हणाला"नाही नाही हे गिफ्ट माझ्याकडेच राहणार... ती भेटल्यावर देईन मी तिला"..


अमोल:"मानलं उमेश खरंच तुझ्या खऱ्या प्रेमाला.. प्रियाचा काहीच पत्ता नाही पण तुला अजूनही पूर्ण विश्वास आहे की ती कधीतरी भेटेल तुला..खरंच देवाकडे हात जोडून मनापासून प्रार्थना करतो खरंच एकदा तरी तुमच्या दोघांची भेट व्हावी...

उमेशचा चेहरा पडला होता...


तेवढ्यात उमेशची आई आली आणि म्हणाली
"काय गप्पा चालू आहेत तुम्हा मित्रांच्या.आणि काय झाले उमेश ?तुझा चेहरा का उतरला आहे?


अमोल:काकू जरा मीच दोन चार सुनावले त्याला..अजिबात भेटायला मागत नाही हल्ली हा .. खूप दिवस झाले मीसुद्धा कॉलेजच्या मित्रांना भेटलो नाही तेच उमेशला सांगत होतो . आपण जाऊया सगळे येतील तर बरे होईल..सर्वांची भेट होऊ दे हेच बोलत होतो मी..पण त्याला जरा खडे बोल सुनावले ना म्हणून तोंड पाडून बसला आहे"..

हे असे बोलून अमोलने वेळ मारून नेहली.... तसा अमोल हुशारच होता बोलण्यात अगदी पटाईत....कुठे काय बोलायचे आहे ..परिस्थिती कशी हाताळायची आहे ह्यात चांगलाच पारंगत होता...

आई:"बरं झालं बोललास..हो आणि घेऊन घेऊन जा .. आता वर्षभर इतका अभ्यास केला परीक्षाही मस्त झाली म्हणतोय आणि आता सुट्टीत थोडा आराम करायचा फिरायला जायचं तर पुन्हा पुस्तकात डोकं खुपसून बसला आहे..काय ह्या उमेशचे चालू आहे मला काहीच कळेना..जेव्हा बघावं तेव्हा आता अभ्यास अभ्यास अभ्यास.तूच काय ते करू शकतोस"

अमोल:"तुम्ही काही काळजी करू नका काकू ह्याचं काय करायचे ते मी चांगलं बघतो.....हल्ली मला एक फोन करत नाही..मी तर ह्याचा बालपणीचा मित्र तरीसुद्धा मला विसरला....अभ्यासात इतका गुंतला की मित्राला विसरला.

उमेशने अमोलकडे आश्चर्यचकीत होऊन पाहिले तर अमोलने डोळे मिचकवले.. खरं तर उमेश आणि अमोलचे बोलणे होत राहायचे.. कधी अमोल फोन करायचा तर कधी उमेश"....


अमोल पुन्हा बोलू लागला"काकू आता उमेशची केस माझ्याकडे सोपवा ..लवकरात लवकर मी solve करतो..मी आलो आहे ना तर आता तुम्ही अजिबात काळजी करू नका हो फक्त ते आपले कांदे पोहे मस्त करुन आणा..किती दिवस झाले तुमच्या हातचे कांदे पोहे खाल्ले नाही..लवकर आणा काकू. आता काही मला रहावत नाही"


उमेशची आई मिश्कीलपणे हसली म्हणली"होय रे बाळा किती दिवस झाले तुला काही माझ्या हातचं काही करून घातले नाही....लगेच आणते बघ...तुमच्या चालू दे गप्पा..

पुन्हा अमोलने काकुला आवाज दिला आणि म्हणाला "काकू तो आपला स्पेशल आल्याचा चहा पण"


उमेशची आई:"हो बाळा देते आल्याचा चाहासुद्धा"

अमोल:"लव यु काकू"

उमेशची आई हसली आणि निघून गेली...



उमेशने अमोलचा कान पिळला आणि म्हणाला"काय रे आईशी खोटं बोलतो, मी फोन करत नाही???


अमोल:"हे घ्या आता ज्याच करावं भलं तो म्हणतो माझंच खरं\""..


उमेश:"काय भलं केलेस माझं??

अमोल:"एक तर प्रियाच्या आठवणीत उदास होऊन तोंड पाडून बसला आणि तेवढ्यात काकू आल्या..उलट तू माझे आभार मानायला हवे तर माझाच कान पिळलास"कानाला हात लावत अमोल म्हणाला..

उमेश:"तू ना अमोल खरंच एक्सपर्ट आहेस ह्याबाबतीत..कसं रे तुझं इतकं डोकं फास्ट चालतं ते अजूनही माझ्यासाठी मोठं कोडं आहे......बरं बाकी काय बोलतोस...... आज असा अचानक आलास .फोन नाही मेसेज नाही? ..

अमोल:"मित्राला भेटायला काही कारण लागतं का ..टपकलो असाच...कामाच्या व्यापात वेळ मिळत नाही म्हंटल आज तुला भेटून गप्पा माराव्यात.."

उमेश:"बरं केलंस आलास..तुला बघून खूप छान वाटलं"........


अमोल:"काय साहेब परीक्षा एकदम मस्त गेली की तुमची"

उमेश:"हो ,एकदम छान पेपर गेले"

अमोल:"यंदा तूच टॉपर हे नक्की"

उमेश:"बघू कसा येतो आहे रिसल्ट"

अमोल:"बघू काय बघू..मी म्हणतोय ना तू टॉप करणार कॉलेजमध्ये"..

तसं झालं तर बरं होईल...अमोल मी Mba करण्याचा विचार केला आहे..

अमोल:"उमेश खूप बरं वाटलं तुला आज पाहून.तू आता तुझी ध्येय ठरवत आहे.स्वप्न पूर्ण करत आहेस.मला खूप चिंता वाटत होती तुझी पण आता मात्र सर्व चिंता मिटली…...खरंच तू स्वतःला सावरलं... असाच पुढे जा..खूप यशस्वी हो .. उंच अशी पुन्हा तू भरारी घे. तुझी सर्व स्वप्न साकार होवो...

अमोल आणि उमेश दोघांनी एकमेकांना मिठी मारली...

थोड्या वेळाने उमेशची आई पोहे घेऊन आली


दोघांनी पोह्यावर ताव मारला...

उमेश आणि अमोलला एकत्र खुश पाहून उमेशची आईसुद्धा खुश झाली.......


अमोल जाताजाता म्हणाला"उमेश पिकनिक विसरू नको आपली..भेटायचे आहे सर्वांनी".....


उमेश मिश्किल हसला आणि मान डोलवली...


क्रमशः

वाचकहो तुमच्या कंमेंट लिखाणासाठी नेहमीच प्रेरणा देतात....आजचा भाग आवडला असेल तर नक्की कंमेंट मध्ये सांगा..आणि पोस्ट लाईक, शेअर करायला विसरू नका..मला फॉलो जरूर करा..
©®अश्विनी ओगले...






🎭 Series Post

View all