प्रेमस्पर्श

Love Transform us Into New One
कथा खऱ्या प्रेमाची. प्रेम हेच सर्वस्व असतं हे ज्याच्या मनाला सर्वस्वी उमगलं त्या मनाला भिडणारी एक काल्पनिक कथा ..प्रेमाशिवाय आयुष्य म्हणजे ह्रदयाशिवाय शरीर नाही का ?भावनांचा कल्लोळ ,आयुष्यात प्रत्येक वळणावर वेगवगळे अनुभव माणसाला प्रगल्भ बनवतात .प्रत्येक माणूस कधी ना कधी प्रेमात पडतोच..खऱ्या प्रेमात..खरं प्रेम स्वतःचे अस्तित्व विसरायला लावते...तर तेच प्रेम स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला भागही पाडते... खरं प्रेम शिंपल्यात मोती मिळावं असंच असतं.. खूप मौल्यवान असते..प्रेमाचा परिस्पर्श ज्या व्यक्तीच्या मनाला होतो त्या व्यक्तीचे आयुष्य सोनेरी होऊन जाते .खरे प्रेम आयुष्याला अर्थपूर्ण बनवते..

ही कथा आहे उमेश आणि प्रियाची....उमेश आणि प्रिया आपल्या कथेचे नायक आणि नायिका आहे...एकमेकांवर मनापासून प्रेम करणारी ही निर्मळ मनाची गोड जोडी.

उमेश प्रियाची एक झलक पाहण्यासाठी वेडापिसा होत असे..जेव्हा ती दिसत असे तेव्हा कुठे उमेशच्या जीवात जीव येत असे..तिला पाहूनच त्याची धडधड वाढत असे.. प्रिया जवळ असताना वेगळीच सकारातमक्ता त्याला जाणवत असे...त्याची प्रत्येक सकाळ तिच्या विचाराने सुरू होत ,तिची भेट ,तिचे हास्य ,तिची बडबड ,तिचा प्रत्येक शब्द हा मनाच्या कोपऱ्यात साठवत असे..दिवसाचा शेवटही तिच्या स्वप्नात रमण्यात होत असे.. प्रेम ह्या शब्दाचा खराखुरा अर्थ कळण्याआधीच तो जगू लागला प्रेमाच्या विश्वात.त्याच्या प्रेमाचे विश्व फार लहान होते..आई वडील तो आणि भविष्यात प्रिया बायको म्हणून त्याच्या आयुष्यात राजकुमारी.प्रिया नेहमी आनंदित राहावी, खुश राहावी ह्याचाच विचार करणारा हा अवलिया होता.. प्रेमात आकंठ बुडावं आणि फक्त त्यात तरंगाव असा हा उमेश... ह्यापलीकडे त्याचे विश्वच न्हवते.एकच विश्व होते त्याचे प्रेमाचे आणि त्यातच त्याला समरस व्हायला आवडायचे..प्रियासोबत असताना अश्या विश्वात रममाण व्हायचा जिथे त्याचे मन प्रफुल्लित होत असे..


प्रिया म्हणजे त्याचा श्वास, त्याचा ध्यास..प्रिया म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व.आयुष्यात घडणारं सुख दुःख सर्वात आधी प्रियासोबत व्यक्त करायचा..जिथे तिथे फक्त त्याला प्रियाच दिसत असायची...एकच विश्व त्याने डोळ्यात साठवलेलं.. मनात अगदी तिच्याविषयी प्रेम तुडुंब भरलं होतं.. तिलाही जाणवत असेल असे अनेकदा वाटत होते पण तरीही अव्यक्त राहावं त्याला त्यात वेगळं सुख..ती सोबती असणे हे त्याच्यासाठी स्वर्गसुखापेक्षाही कमी न्हवतेच..

पहिल्यांदा पाहिलं होतं त्याने प्रियाला जेव्हा ती पाच वर्षाची असताना वर्गाच्या बाहेर नाकातून वाहणारा शेंबूड पुसत होती..मीचीमीची डोळे करीत सगळा वर्ग पहात होती..घाबरली होती .गांगरली होती.पहिलाच दिवस होता..नवीन शाळा,नवीन वर्ग, नवीन शिक्षिका आणि सर्व चेहरेही नवीनच होते... तिचं रडणं थांबायचे नावच घेत न्हवते...तिला पाहून उमेशला खूप दया आली.मॅडमनी प्रियाला जवळ घेऊन समजावले.ती तात्पुरती गप्प बसली पण पुन्हा मधून मधून हुंदके देत होती... मधली सुट्टी झाली सर्व मुले स्वतःचा जेवणाचा डबा खाऊ लागली पण प्रिया मात्र तशीच हुंदके देत बसली होती ..उमेश तिच्या जवळ गेला आणि तिच्या बाजुला बसला.रडू नको म्हणत त्याने स्वतःचा रुमाल दिला....

त्याला पाहून प्रिया पुन्हा रडु लागली..उमेशने प्रियाला चॉकलेट आणले.. चॉकलेट पाहून प्रिया फार खुश झाली.त्या क्षणी दोघांची गट्टी जमली ती नेहमीसाठी ..प्रियाला आता असा मित्र मिळाला होता जो नेहमी तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवत असे.आता शाळेत येण्यासाठी तिची घाई असे.. कधी एकदाची उमेशला पाहते असे होत.उमेशचेही काही त्याहून वेगळे न्हवते तोसुद्धा प्रियाची चातकासारखी वाट पाहत असायचा..उमेशची आई आणि प्रियाची आई दोघी मैत्रिणी झाल्या.दोघीही सुख दुःखाच्या गोष्टी सांगू लागल्या..मुलांना शाळेत सोडायला घ्यायला आल्या की त्यांच्या गप्पा रंगत.त्या दोघींच्या गप्पा तासनतास चालत आणि उमेश आणि प्रिया खेळण्यात रमून जात.शाळेच्या भोवती अनेक झाडे होती...प्रियाला फुलं खूप आवडायची... उमेश रोज प्रियासाठी फुलं गोळा करायचा.रोजचाच दिनक्रम.लाल, पिवळी, सफेद विविध रंगाची फुलं पाहून प्रिया खुश होत आणि तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून उमेश .

प्रियाला माहीत होते की उमेशला तिच्या आईच्या हातचा गाजरचा हलवा आवडतो म्हणून तीसुद्धा आईला हट्ट करून हलवा बनवायला सांगत असे..आईसुद्धा तिच्या आवडीचे जेवन देत असे..शाळेत गेल्यावर ती स्वतःचा डब्बा उमेशला देत आणि उमेशही आवडीने तो खात असे.एकमेकांच्या आवडी जपणारी ती मैत्री होती..एक सहजता आली होती त्या नात्यात..बालपण ते अश्या ऋणानुबंधात गुंफत चालले होते ते बंध फक्त हवेहवेसे वाटत होते...



बालपणाचा काळच सुखाचा..ते दोघेही त्यांच्या विश्वात रमलेले असायचे.एकमेकांना समजून घेऊ लागले होते.



एक दिवस वर्गातल्या एका मुलाने प्रियाला मुद्दामून चिडवले ते पाहून उमेशला इतका राग आला की त्याने रागाच्या भरात त्या मुलाचे दप्तरच खिडकीतून बाहेर फेकून दिले.ही बाब बाईंना कळताच उमेशच्या आईला तातडीने बोलवले. मुलाचा असा पराक्रम ऐकून आई नाराज झाली..आईचा दुःखी झालेला चेहरा पाहून उमेशने आईला पुन्हा असे काही करणार नाही कबुल केले..उमेश असाच होता दुसऱ्याच्या मनाचा विचार करणारा..त्याच्या माणसांची मन जपणारा.वरवर कधी व्यक्त होत नसला तरीसुद्धा आपली माणसं खुश रहावी बस हाच विचार करणारा..


..प्रियाही अशीच होती उमेशला कोणी काही बोललं की तिलाही खपत नसे..एकदा असंच खेळत असताना एका मुलाने उमेशला धक्का दिला .तोल जाऊन उमेश खाली पडला..उमेशच्या हाताला खरचटलं... ते पाहून प्रियाला इतका राग आलाय की तिने त्या मुलाच्या अंगावर जोरात दगड भिरकावला..नशीब त्या मुलाने पळ काढला नाही तर दगड डोक्यातच बसला असता..

दोघांचेही नेहमी असेच असायचे.. ठेच एकाला लागली की त्रास दुसऱ्याला होत असे.हेवा वाटावा अशी मैत्री..एकमेकांसाठी तुटून पडणाऱ्या अश्या मैत्रीचे सर्वाना कौतुकही वाटत असे..


असाच एक त्याचा खास मित्र होता अमोल जो नेहमीच त्याची सावली बनून राहत होता..अमोलचाही स्वभाव अगदी उमेशसारखाच होता..माणसं जपणारा.सर्वाना आपलंसं करणारा..दोघेही जीवाला जीव देत असे..



उमेशचे मन कसे आहे हे अमोल चांगलाच ओळखून होता.उमेशला प्रिया किती आवडते हे सुद्धा तो जाणून होता. अमोलला उमेशचे प्रियाविषयी ओसंडून वाहणारे प्रेम त्याच्या डोळ्यात स्पष्ट जाणवायचे.अमोल ,उमेश आणि प्रिया ह्यांची मैत्री जणू आदर्श होती.एकमेकांच्या मदतीला धावून जाणारे असेच हे तिघे.तिघेही नेहमी एकत्रच असायचे.मैत्रीचे त्रिकुट..


जसजसे दिवस पुढे जात होते तसतसे उमेश आणि प्रियाचे मैत्रीचे बंध घट्ट होत होते.मैत्रीचे कसले अगदी प्रेमाचे जे अजूनही जणू अव्यक्तच होते.आणि त्याला जवळून अगदी जवळून अनुभवत होता अमोल...बघता बघता दहावी कशी झाली कळले नाही..उमेश,अमोल प्रिया चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले.
एकाच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून तिघांची धडपड चालू होती .झालेही तसेच चांगल्या नामांकीत कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाले...


प्रिया दिसायला देखणी असल्याने कॉलेजमध्ये अनेक मुलं तिच्या पाठी पडत.चेहऱ्यावर नेहमी स्मित हास्य..डोळ्यात वेगळी चमक ..तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज होते ते सर्वाना आकर्षीत करत.. अगदी नितळ मनाची प्रिया सर्वांच्या मनात घर करून जात..मैत्रिणींचा ताफा बराच होता पण खास मित्र एकच तो म्हणजे उमेश .कोणत्याही मुलाला तो प्रियापाशी भटकू देत नसे.प्रिया फक्त माझीच आहे फक्त माझी राहणार हेच मनोमन म्हणत असे..एखादा हॅन्डसम मुलगा दिसला की उमेशचा जीव वर खाली होत असे..त्याच्या मनाची अवस्था अमोलला चांगलीच ठाऊक होती. न राहून अमोल एक दिवस त्याला म्हणालाच

अमोल:"उमेश तू प्रियावर इतकं मनापासून प्रेम करतो..तू सांगत का नाहीस तिला?एकदाच सांगून मोकळा हो ना म्हणजे तुझंही टेंशन संपेल आणि माझेही...


उमेश:"प्रेम आहे सांगायची गरज असते का अम्या??ते तर मनाची भावना मनाला कळते ना..माझं मन हेच म्हणतं की ती होच म्हणणार ....प्रिया फक्त माझीच आहे ..ती माझीच होणार...तू पण तर बघतोस ना आमचं नातं कसं आहे. नकळत तिच्याकडे ओढला गेलो .प्रिया फक्त आणि फक्त माझ्यासाठीच बनली आहे..माझं सर्वस्व आहे प्रिया...अव्यक्त प्रेम आमचे ह्याचेही वगेळेच सुख आहे..कबूल तर मलाही करायचे आहे की माझं किती प्रेम आहे..आतासाठी ती माझ्यासोबत आहे हेच पुरेसे आहे


अमोल:"उमेश ,पण हे असे किती दिवस चालू राहणार. एक ना एक दिवस व्यक्त तर व्हावेच लागणार तुला"...


उमेश:"अमोल ,मलाही व्यक्त व्हायचे आहे फक्त एकदा स्वतःच्या पायावर उभा राहिलो की बस्स त्या दिवशी प्रियाला लग्नासाठी मागणी घालणार..सर्व सुख तिच्या पायापाशी असणार...आता माझं अस्तित्व काहीच नाही..माझे वडील करोडो रुपये कमवत असले तरीसुद्धा माझे एक स्वप्न आहे की मला स्वतःच्या कष्टाने माझं सुंदर भविष्य घडवायचे आहे आणि त्या भविष्यात मला प्रियाची साथ हवी आहे .तिची सोबत मला शेवटच्या श्वासापर्यंत हवी आहे..मला फक्त तिचं प्रेम हवं बस बाकी काही नको अमोल..प्रिया माझा श्वास आहे आणि तिची सोबत म्हणजे माझ्या जगण्याचा ध्यास आहे..

अमोलने उमेशच्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाला"उमेश खूप अशिक पाहिले आजवर पण तूझ्यासारखा नाही..किती प्रेम करतोस प्रियावर तू .खरं प्रेम समजून घ्यावं तर फक्त तुझ्या डोळ्यात बघावं.किती निःस्वार्थ प्रेम आहे तुझे.असे प्रेम दुर्मिळच..तुझं प्रियावर असलेलं प्रेम प्रियासाठी म्हणजे कस्तुरी आहे डोळ्याने न दिसणारं पण सतत अवतीभवती दरवळणारं वेड लावणारं...

अमोलने उमेशचा हात धरला आणि डोळ्यात डोळे घालून म्हणाला "उमेश प्रियाचेही तुझ्यावर प्रेम आहे का मित्रा???

उमेश:"हे काय विचरायची गोष्ट आहे का..ऑफकोर्स तीसुद्धा मझ्यावर प्रेम करत असणारच..प्रेमाचं दुसरं नाव म्हणजे विश्वास,आधार, सहवास नाही का?आमच्या नात्यात हे सर्व आहे..


अमोल:"बात मै दम है बॉस, प्रिया तुझीच होणार हे मात्र नक्की..."
लवकरात लवकर स्वतःच्या पायावर उभा राहा आणि प्रियाला लग्नासाठी मागणी घाल"..

उमेश\""त्या दिवसाची मी आतुरतेने वाट पहात आहे"..




क्रमशः

©®अश्विनी ओगले..कथा आवडल्यास लाईक, शेअर, कंमेंट जरूर करा...मला फॉलो करायला विसरू नका...







🎭 Series Post

View all