Oct 16, 2021
प्रेम

प्रेमस्पर्श भाग ४

Read Later
प्रेमस्पर्श भाग ४
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
अमोलच्या आईची तब्येत आता सुधरत चालली होती... लवकरच हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले.अमोलने आता शिकत असतानाच जॉब शोधला.. वयोमानानुसार आईची अवस्था बघून अमोलने आईला घरी राहण्यास सांगितले..त्यामुळे आता अमोल आता विद्यापीठातून शिक्षण घेणार होता..
अमोल आता कॉलेजला येणार न्हवता..त्याने डिस्टन्स लर्निंग करण्याचा विचार केला ..


एक दिवस तो कॉलेजला काही सर्टिफिकेट घेण्यासाठी आला..

उमेश:"अमोल,हल्ली तू कॉलेजला येत नाहीस..??आईची तब्येत बरी आहे ना....


अमोल:"उमेश तुला तर माहीत आहे ना आईची तब्येत कशी आहे?? आणि आता ह्या वयात तिला मी काही काम करू देणार नाही ..म्हणून ठरवलंय की शिक्षणासोबतच कामही करायचे..म्हणून मी एका ठिकाणी काम शोधलं आहे..तिथेच मी जातो.. सॉरी हा उमेश काल कामात असल्यामुळे मी तुझा फोनसुद्धा घेऊ शकलो नाही....नवीनच रुजू झालो आहे ..त्यामुळे मी माझं बेस्ट देण्याचा प्रयत्न करतो आहे..शक्य होईल तेवढं मी प्रयत्न करतो कामात असल्यावर कामाकडे लक्ष देण्याचा..घरी गेल्यावर घरातली कामं, आवरा आवर,जेवन सगळं करतो..कधी कधी मोबाईल कुठे असतो तेही कळत नाही..आई मला नको करू म्हणते पण आता मी तिचे काही ऐकणार नाही..हळूहळू जमायला लागले आहे....


उमेश:"जमेल का तुला..शिक्षणावर लक्ष देता येईल ना??

अमोल:"उमेश,आता जमेल किंवा नाही हा प्रश्नच नाही..जमवून घ्यावे लागेल..आता मी आईला काम करू देणार नाही..आजवर खूप केलं आणि आता माझी वेळ आहे..मला थोडं जड जातंय शिक्षण,नोकरी सोबत करताना ..खूप ओढाताण होत आहे..मी रात्रीचा जागून अभ्यास करतो..मला माहित आहे मी माझं लक्ष्य पूर्ण करणार..थोडा त्रास झाला तरी चालेल पण मी सर्व जबाबदारी घेण्याचे मनोमन ठरवलं आहे.....


उमेश:"ग्रेट आहेस अमोल तू ,तुझ्या विचारांना खरंच मनापासून सलाम..मी स्वतःला नाशिबवान समजतो की मला तुझ्यासारखा मित्र मिळाला......


अमोल:असं काही नाही रे उमेश..ग्रेट वैगेरे.परिस्थिती आली की माणूस स्वतःला तसा बनवतो..कोणती शक्ती येते माहीत नाही पण एक मनाशी ठरवलं आहे की हातपाय गाळून गर्भगळीत होणार नाही....मी हार मानली तर आईने कोणाकडे बघायचे.म्हणून ठरवलंय तटस्थ राहणार.. आणि उमेश मनापासून सांगतो एक गोष्ट आयुष्याने शिकवलं कितीही कशीही वाईट परिस्थिती येऊ दे पण जर का मनोबल दृढ असेल तर माणूस कठीणातल्या कठीण प्रसंगावर मात करतो.. बघ ना आईला अटेक आला तेव्हा मी पूर्ण कोलमडलो होतो काहीच सुचत न्हवते ..किती तरी रात्र मी रडून काढली आईला कळू न देता ..मनात घाणेरडे विचार येत होते आईला पुन्हा काही झाले तर ..पण हळू हळु कोणती शक्ती आली माहीत नाही ..मन स्थिर होऊ लागले..नंतर स्वतःमध्ये विश्वास आला की मी करू शकतो..खरंच करू शकतो..मला कधी वाटलं न्हवतं की मी ह्या परिस्थितीला असा सामोरे जाईन पण गेलो.कधी काय होईल सांगता येत नाही....आता बस स्वतःच्या पायावर असं उभं राहायचे आहे की कोणासमोर हात पसरायची वेळ येऊ द्यायची नाही.. हो आणि अजून एक पैसा कमावणार ते योग्य मार्गाने हे मी मनाशी पक्क केले आहे...त्यासाठी मला खूप मेहनत करायची आहे.मेहनतीची कास धरायची आहे....हेच आयुष्यात आहे आता...


असे बोलत असताना अमोलचे लक्ष घड्याळाकडे गेले....

"ओहह, उमेश माझी ट्रेन मिस होईल उशीर झाला तर बॉस ओरडले चल निघतो मी"....

असे म्हणत अमोलने खांद्यावरची बेग घट्ट पकडली आणि पळत सुटला..

अमोलच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत असताना कधी उमेशचे डोळे काठोकाठ भरले कळलंच नाही..

काल परवा पर्यंत सोबतीला असणारा अमोल..टिंगल टवाळ्या करत कॉलेज कॅम्पसची आपल्यासोबत सैर करणारा अमोल आता आपल्या सोबत नसणार ह्या विचाराने खिन्न झाला..खूप खिन्न झाला...


पाठून प्रिया आली...

प्रिया:"अमोल कुठे आहे?

उमेश:"गेला तो त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता".

प्रिया:"असा काय हा?मला न भेटताच निघून गेला..येऊ दे त्याला उद्या मग चांगली बघते"..


उमेश:प्रिया अमोल आता कॉलेजला येणार नाही..


प्रिया ::"काय ?"

उमेश:"हो प्रिया आता तो कॉलेज सोडतोय तो डिस्टन्स लर्निंग करणार आहे"..


प्रिया:"का पण असे एकाएकी??".

उमेश:"प्रिया अमोलने घराची सर्व जबाबदारी घेतली आहे,आईला आराम द्यायचा आहे..म्हणून हा खटाटोप....

प्रिया:"उमेश खरंच की काय ??

उमेश:"हो प्रिया जे काही अमोल मला म्हणाला तेच सांगतो आहे..मला असे वाटते प्रिया आधीच ह्या वयात जबाबदारीच्या ओझ्याखाली तो दबला आहे...हाच अमोल मुक्त बागडणारा कॉलेजचे दिवस परत येत नाही म्हणणारा..एन्जॉय करू म्हणणारा खूप बदलला आहे..आपण त्याला मदत नाही करू शकत कमीत कमी त्याला समजून घेणे गरजेचे आहे.आपण त्याला मानसिक आधार देणे गरजेचे आहे...

प्रिया:"उमेश,काय हे झाले सगळं अचानक... अमोलवर असा दुःखाचा डोंगर कोसळावा".


उमेश:"प्रिया ,हा डोंगर आपला अमोल सहज पार करेल बघ.. खूप हिम्मतवान आहे...वडिलांचं छत्र नाही.अचानक आलेलं आईचं आजारपण ह्या सर्वातून तो फार कुशलतेने मार्ग काढतो आहे ..बघ तो नक्कीच एक दिवस मोठा माणूस बनेल....मला पूर्ण विश्वास आहे अमोलवर..


प्रिया:"तुझं म्हणणं बरोबर आहे उमेश ...अमोल सगळे प्रॉब्लेम solve करेल पण आता तो आपल्या सोबत नसणार.... ह्याची मला खंत वाटते..


प्रिया चेहरा पाडून बसली होती...

उमेश:"प्रिया,मालाही वाईट वाटतं आहे पण अमोलला दुसरा पर्यायपण नाही ना.तो तरी काय करणार??"..

प्रिया:"चल घरी जाऊया,आईंने आज लवकर बोलावले आहे "

उमेश:"चल"


नेहमी अमोल ,प्रिया आणि उमेश तिघांची जोडी आता मात्र अमोलच्या जाण्याने विखुरली होती..


उमेश चेहरा पाडूनच घरी आला..भले त्याने कॉलेजमध्ये प्रियाला समजूत घातली होती पण ह्यापुढे अमोल आपल्यासोबत नसणार ह्या विचाराने उमेशचे मन कासावीस झाले होते..


आई:"उमेश बेटा तू फ्रेश हो तुला खायला देते".

उमेश स्वतःच्या तंद्रीत होता..

आई:"उमेश लक्ष कुठे आहे "..

उमेश कुठेतरी एकटक पहात होता..

वडील पेपर वाचत बसले होते.. त्यांनीही उमेशला आवाज दिला पण उमेश काहीच बोलत न्हवता..

आई जवळ गेली ..

त्याला विचारले.."उमेश लक्ष कुठे आहे?जेवायला देते फ्रेश हो"....

उमेश:नको आई भूक नाही म्हणत रूमवर निघून गेला..


पाठोपाठ बाबाही रूमवर आले..
उमेश बाथरूमममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला...


बाबा त्याची वाट पहात बेडवर बसून होते..एकाएकी उमेशचा जोरजोरात रडण्याचा आवाज येऊ लागला..बाबा समजून चुकले की नक्कीच काहीतरी बिनसलं आहे....

थोड्या वेळाने उमेश बाहेर आला..डोळे लाल झाले होते...त्याने बाबांना पाहिले तसे त्याला अजून गहिरवरून आले..

वडील:"उमेश काय झाले इतकं का रडतो आहे??


बाबांना पकडून तो अजून ढसाढसा रडु लागला


उमेश:"बाबा ,अमोल कॉलेजला येऊ शकणार नाही .

बाबा:"का नाही येणार तो??
उमेश:"तो आता जॉब करतो ..आई आजारी पडल्यापासून त्याने सर्व जबाबदारी घेतली आहे...


बाबा:"फारच गुणी मुलगा आहे अमोल"..

उमेश:"तो खूपच चांगला मित्र आहे माझा,आणि आता मला त्याचा सहवास काही लाभणार नाही ह्या विचाराने दुःख होत आहे"

उमेशचे बाबा उसासा टाकत बोलले "जर का आपण असे केले आपणच अमोलचे शिक्षण होईपर्यंत त्याला मदत केली तर ??

डोळे विस्फारून तो बाबाकडे पाहू लागला
खरंच बाबा हे तर माझ्या डोक्यात आले नाही....मी त्याला आताच्या आता फोन करतो आणि विचारतो......
उमेश आता मात्र रडता रडतच हसू लागला होता ..त्याने
अमोलला फोन केला .रिंग जात होती पण अमोलने काही फोन उचलला नाही..

उमेश:"अमोल बहुतेक कामात आहे,मी रात्री त्याच्या घरी जातो आणि मग सांगतो त्याला....उमेशने बाबांच्या गळ्यात घट्ट मिठी मारली...

आईला हाक दिली आणि म्हणाला "आई लवकर काही तरी दे खायला ,खूप भूक लागली आहे"..

आईनेही त्याचे जेवणाचे ताट वाढले आणि बाजूला बसली....

आई :"काय उमेश भूक नाही म्हणून निघून गेला आणि आता बरी पटकन भूक लागली"?

उमेश:"ते असंच आई"

आई :"परीक्षा कधी आहे ??"

उमेश:"पंधरा दिवस बाकी आहे "

आई:"परीक्षेचं टेंशन तर नाही ना घेतलंस??

उमेश:"नाही आई ...त्याचं अजिबात टेंशन नाही...माझी सर्व तयारी झाली आहे फक्त रिविजन बाकी आहे"..

आई:"ग्रेट ,माय बॉय"....

उमेश:"लव यु आई"

आई:"लव यु टू बेटा".....

पाठून त्याचे बाबा आले आणि म्हणाले"फक्त आईला लव यु आणि बाबाला नाही का??

उमेश:"बाबा तुम्हाला तर लव यु आणि बिग थँक्स".....

आई :"बाबाला थँक्स??

बाबा:"हो ते आमचं सिक्रेट आहे"....
बाबा डोळे मिचकावतच बोलले...

आई:"तुम्ही दोघेही भरपूर सीक्रेट ठेवता माझ्यापासून लपवून".....

उमेश:"इतकं काही नाही गं..

आई :"बरं ,असू दे गंमत केली".......


उमेश पुन्हा रूमवर निघून गेला......

आईला जरा आता बरे वाटले.....

आल्यापासून चेहरा पाडून बसला होता.धड बोलतसुद्धा न्हवता...वडील आणि मुलामध्ये संभाषण झाले आणि पुन्हा उमेशचा चेहरा खुलला होता हेच आईसाठी पुरेसे होते..

आई बोलू लागली"मला आपल्या उमेशची काळजी लागून राहते .नेहमी स्वतःला त्रास करून घेतो..इतका नाराज होतो की काही विचारू नका.कसं व्हायचं ह्याचे पुढे देवाला माहीत"..
सुरज :"अगं सुधा आपला उमेश आहेच असा सर्वानी खुश, आनंदी ,समाधानी रहावं हीच त्यांची अपेक्षा ..त्याच्या जवळची माणसं दुखी, निराश झालेली त्याला बघवत नाही..हीच तर खरं माणूस असल्याची निशाणी आहे..."

सुधा:"तुमचं म्हणणं बरोबर आहे,पण हा मुलगा स्वतःला इतका त्रास करून घेतो की त्याला बाकीचे काहीच दिसत नाही... तुम्हाला आठवतं का शाळेत एकदा त्याच्या कोणत्या मित्राने डबा आणला न्हवता तेव्हा ह्याने स्वतःचा जेवणाचा डबा दिला होता....

सुरज:"हो आठवतं आहे"

सुधा"पुढे माहीत आहे ना काय झाले???

सुरज:"नाही गं विसरलो"

सुधा:"स्वतःच्या हाताने त्या मुलाला भरवले...त्यानादात त्याने स्वतः एकही घास खाल्ला नाही..शाळेतून घरी येताना रस्त्यात चक्कर येऊन पडला.नशीब तेव्हा अमोल होता कसंबसं त्याने घरी आणलं....


सुरज:"खरंय सुधा,कधी कधी उमेश असा वागतो की त्याला स्वतःच्या अस्तित्वाचे भान राहात नाही"...अल्लड वय आहे सुधरेल हळूहळू हळुहळू.....
सुधाच्या डोळ्यात पाणी आले...

डोळे पुसत ती म्हणाली.."इतकंही नको असं ह्याने वागायला की स्वतःला त्रास होईल"


सुरज:"नाही वागणार असं, एकदा लग्न झालं संसारात रमला की समजेल त्याला कसे वागायचे ते"...

सुधा:"हो खरंय ,म्हणून मी एक विचार केला आहे"...

सुरज:"काय विचार केला आहेस सुधा??

सुधा:"वेळ आल्यावर नक्की सांगेन"..


सुरज:"बरं, मी त्या वेळेची वाट पाहतो"..पण आता आम्हालाही भूक लागली आहे जेवण दिलं तर बरं होईल राणीसरकार"..


सुधा:"सॉरी हा उमेशच्या नादात मी तुमचं ताटच वाढले नाही,लगेच देते."...

सुरज:"तसंही उमेश झाल्यापासून मला पूर्णपणे विसरून गेला आहात तुम्ही"..चिडवण्याच्या स्वरात सुधाला म्हणाले...

सुधा:"तुमचं आपलं काहीतरीच "....

रात्र झाली....उमेशने अमोलच्या घरी गेला.....

अमोल जेवणाच्या तयारीत गुंतला होता..

अमोलच्या आईची उमेशने विचारपूस केली..

अमोलची आई उमेशला सांगू लागली..."उमेश आता तूच सांग ह्याला काही तरी...किती जीवाची आबदा करतो आहे ...मी त्याला म्हणते आहे नोकरी करते तर स्वतःच सगळं करायला बघतो आहे..मला काहीच झालं नाही मी ठणठणीत आहे"..


अमोल:"आई तू शांत राहा...मी तुला म्हणालो ना ह्याच्यापुढे तू काहीच काम करणार नाही...हे ठरलंय आता ह्याच्यापुढे मला ह्या विषयावर चर्चा अजिबात नको..

अमोल पुढे बोलू लागला...

"उमेश आज तू जेवल्याशिवाय जायचे नाही..

अमोल:"हो तर ,तुझ्या हाताची चव तर घ्यावीच लागेल ना".....


उमेशनेही अमोलला स्वयंपाकाला मदत केली...

उमेश:"अमोल चांगलाच स्वयंपाक बनवायला शिकलास की तू"..

अमोल:"थँक्स उमेश"...

उमेश आणि अमोल गप्पा मारत बसले होते....

अमोलची आई झोपून गेली..

उमेशने विषय काढला..

उमेश:"अमोल ,मी आज बाबांशी बोललो..तुझी परिस्थिती सांगितली तर ते म्हणाले तुझा सर्व खर्च ते उचलतील तू पुन्हा कॉलेजला येऊ शकतो".....


अमोल:"उमेश,तू माझ्यासाठी तुझ्या बाबांशी बोलला ..त्यासाठी थँक्स अ लॉट पण उमेश मला खरंच मदत नको आहे ..मी सक्षम आहे सर्व करायला..एकदा का जर कुबड्या घेऊन चालायची सवय लागली की ,तशीच सवय होऊन जाईल"..

अमोल बोलत असताना उठला त्याने कपाटातून एक पैश्याचे पॉकेट काढले आणि उमेशला दाखवत म्हणाला"हे बघ उमेश माझी पहिली कमाई..आज माझ्या मेहनतीचे पैसे हातात आले तेव्हा खूप आनंद झाला..माझ्या मेहनतीचे चीज झाले...ह्याचा आनंद काही औरच आहे"...


उमेश निशब्द झाला……आता काय बोलावं त्यालाच सुचेना..


अमोलने दोन गिफ्ट आणले होते .

दोन गिफ्ट अमोलच्या हातात देत म्हणाला.."उमेश एक तुझ्यासाठी आणि एक प्रियासाठी..माझ्या पहिल्या कमाईतून तुला आणि प्रियासाठी आणले आहे"....


उमेश:"धन्यवाद अमोल, खरंच आता काय बोलावं मला शब्द सुचत नाही...हो पण एक लक्षात ठेव कधी गरज पडली तर मी नेहमीच तुझ्यासोबतीला आहे......


अमोल:"तुलाही एक प्रॉमिस करावं लागेल

उमेश:"कोणतं प्रॉमिस ??

अमोल:"मी तुला अनेक वर्षांपासून ओळखतो... तू माझा खासमखास मित्र आहे...मला माहित आहे माझ्या आयुष्यातल्या ह्या प्रसंगामुळे तू खूप दुःखी कष्टी झाला आहेस....आणि हे सुद्धा माहीत आहे तू मला समोर दाखवत नसला तरी तुझ्या डोळ्यात माझी काळजी दिसते .तू माझ्या पेक्षाही अस्वस्थ झाला आहेस उमेश....उमेश मी खरंच सावरलो आहे ..तू आता स्वतःला त्रास नको करून घेऊस...आता येणाऱ्या परीक्षेत तुला नेहमीप्रमाणे टॉप करायचे आहे..आणि मी जरी कॉलेजला येत नसलो तरी आपण बाहेर भेटतच राहू.. चल प्रॉमिस कर उमेश तू आता पूर्ण अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार आहेस......


उमेश भरलेल्या डोळ्यानी अमोलला पहात होता.... त्याने अमोलला वचन दिले.. मी नक्की अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार....


हो पण तुला पण एक प्रॉमिस करायचे आहे

अमोल:"बोल काय प्रॉमिस?

उमेश:"तुला तुझ्या तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे आणि शिक्षण पूर्ण करायचे आहे...हो आणि मला प्रियाला भेटत राहायचे आहे...

अमोलचा आता मात्र कंठ दाटून आला होता....दोघांनी मिठी मारली....... दुरव्याने घट्ट मैत्रीची वीण सहजा सहजी सैल थोडीच होणार होती...

अमोलने तर मित्राची मदत घेतली न्हवती उलट स्वकमाईच्या सुखात तो आनंद शोधत होता...
शिंपल्यात सापडावा मोती तशीच उमेश आणि अमोलची दुर्मीळ मैत्री.

क्रमश:

अश्विनी ओगले..कथा आवडल्यास जरूर लाईक ,शेअर करा..मला फॉलो करायला विसरू नका...

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

अश्विनी ओगले

Blogger

Love life Enjoying every second of life Now enjoying as a blogger ✍️ Love to share my experience through writing and touch the soul through writing from❤️ Finding me in new way..