प्रेमस्पर्श भाग २५ शेवट

True Love Always Win
गेल्या भागात आपण पाहिले की अमोल उमेशला आई बाबांसाठी प्रियाच्या आठवणीत बाहेर पड आणि नवीन आयुष्याला सुरवात कर सांगतो... उमेश आई बाबांसाठी विचार करतो आणि स्वतःमध्ये बदल करायच ठरवतो.. उमेश आई बाबांना घेऊन अलिबागला जातो..तिथेही प्रियाच्या आठवणीत रमतो..प्रियाचा जुना कॉलेजचा फोटो पाहत असतो तोच त्याच्या पाठी कोणीतरी हात ठेवतो.. आता पाहू पुढे...

उमेश पाठी वळून पाहतो तर हेतल आणि सानवी उभी असते...

उमेश:"हेतल, तू आणि सानवी इथे???

हेतल:"हो उमेश..खूप दिवस झाले मी आणि सानवी बाहेर फिरायला आलो न्हवतो म्हणून आम्ही इथे आलो ..पण तू इथे एकटाच??

उमेश:"मी आई बाबासोबत आलो आहे"


दुरूनच आई बाबांकडे हात तो दाखवतो.…..

उमेशच्या आईचे लक्ष जाते...

आई बाबांना म्हणते:"अहो ते बघा उमेश त्या मुलीशी बोलतो आहे,कोण आहे ती??

बाबाही निरखून पाहतात... हिला मी पण ओळखत नाही..

सानवी हेतलला हळूच कानात म्हणते अगं सासू सासर्यांचे दर्शन लांबूनच घेणार का???

हेतल लाजते...उमेशला बोलते:"काय हे उमेश मैत्रिणींशी ओळख दुरूनच करतो आहेस"..

हेतल सानवीकडे पाहत डोळे मिचकावते..

उमेश:"ओहह, सॉरी चल ओळख करून देतो"..

उमेश हेतलला आई बाबांपाशी घेऊन जातो...

उमेश:"आई बाबा ही हेतल आमच्या ऑफिसमध्ये काम करते"

हेतल:"हो आणि मी उमेशची नव्याने मैत्रीणही बरं का काका काकी....


आई:"छान छान….


आई हेतलची चौकशी करू लागते..


आई:"कुठे राहतेस बाळा??

हेतल:"मी इथेच अंधेरीला..माझ्या मैत्रिणीसोबत...ही माझी मैत्रीण सानवी..

सानवी:"नमस्कार काकू"

आई:"नमस्कार"

आई हेतलकडे पाहून पुन्हा बोलू लागते...:"आई बाबा कुठे असतात??


हेतल :"आई आणि बाबा दोघेही आता नाहीत"


आई:"ओहहह"


हेतलच्या डोळ्यात टचकन पाणी येते..

आई:"हेतल ,कधी घरी ये उमेशसोबत"

उमेशलाही माहीत न्हवतं की हेतलला आई आणि वडील दोघेही नाही...त्यालाही ऐकून वाईट वाटले.....

हेतल:"हो काकू नक्की येईल,बरं काकू येते मी..
उमेश कधीपर्यंत आहेस तू इथे??


उमेश:"मी उद्या संध्याकाळी निघेल"

सानवी:"हो आम्ही सुद्धा उद्या संध्याकाळी निघू....आपण एकत्रच जाऊया का??

उमेश:"हो चालेल ना"

सानवी:"ok"

हेतल:"बाय उमेश भेटू उद्या".....


दोघीही निघून जातात

उमेश पुन्हा प्रियाचे फोटो पाहू लागतो....


आई:"पाहिलं का किती गोड मुलगी आहे"


बाबा:"हो खरंच गोड आहे हेतल"


आई:"आई बाबा दोघेही नाही तिला..ती एकटीच आहे ..फार वाईट वाटलं ऐकून..मी काय म्हणते मला वाटतं उमेशमध्ये जो बदल झाला आहे तो हेतलमुळे की काय??

वडील:"हो मलाही तेच वाटतं आहे.असं अचानक उमेशमध्ये बदल..हो आणि आताच हेतलची आणि त्याची मैत्री झाली आहे...


आई:"हो बरोबर, हेतलशी मैत्री झाली म्हणून उमेश आता पहिल्यासारखा वागू लागला आहे"


वडील:"मैत्री नाही गं ,मला वाटतं त्याला हेतल आवडते"


आई:"हो मलाही तेच वाटतं"


वडील:"मग आता पुढे काय विचार??

आई:"तुम्हाला माहीत आहे माझ्या मनात काय आहे"?


वडील:"हो हो कळलं मला..हेतलला सून बनवण्याचा विचार झाला की काय पक्का??

आई:"एकदम बरोबर बोललात"


वडील:"मलाही हेतल सून म्हणून पसंत आहे"


आई:"मग बोलूया का उमेशशी??

वडील:"नको,लगेच घाई नको..जरा थांब...

आई:"बरं चालेल पण एक मात्र हेतलच सून म्हणून आपल्या घरी येणार..इतके वर्ष उदास ,हताश उमेशला तिने बदललं ..नक्कीच ती उमेशचे आयुष्य सुंदर करेल.....


वडील:"खरंय तुझं म्हणणं...उमेश मध्ये आलेला बदल हा हेतल मुळेच आहे...

आई:"खूप शहाणा आहे हा उमेश...तरी म्हंटल असा अचानक अलिबागचा प्लॅन का केला..त्याने आणि हेतलने केला असेल हा प्लान..तुम्हाला काय वाटतं?

वडील:"मला असं वाटतं जे काही होतंय ते चांगल्यासाठी होतंय"...

आई:"ते ही म्हणणं बरोबरच आहे म्हणा"



उमेशच्या आई वडिलांचा गैरसमज झाला होता......खरं तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला असे झाले होते..उमेशमध्ये बदल केवळ अमोलमुळे झाला होता..आई बाबाच्या खुशीसाठी तयार झाला होता..पण झालं भलतंच... आई वडिलांचा गैरसमज झाला की हेतलच्या प्रेमामुळे तो सावरला"....


दिवस कधी सरला कळलंच नाही...
जेवन झाल्यावर उमेश, आई बाबा झोपी गेले....

रात्री दिड वाजता कोणीतरी दरवाजा ठोकला...उमेशला जाग आली...

आई बाबाही उठले..

आई:"रात्रीचे दिड वाजले कोण असेल बरं ??

बाबा:"थांब बघतो मी"

उमेश:"बाबा,तुम्ही नका जाऊ थांबा मी पाहतो कोन आहे?

उमेशने दार उघडलं ..
पाहतो तर अमोल आणि राधा आले होते....

अमोलच्या हातात केक होता..

उमेश:"अमोल हे काय सरप्राईज?असा अचानक ..इतक्या रात्री??


अमोल:"हो सरप्राईज..तू विसरला पण मी नाही"


उमेश:"काय विसरलो"


अमोल:"उमेश,वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा"

उमेश:"अरे हो रे मी खरंच विसरलो"

राधा:"happy birthday umesh"

उमेश:"थँक्स राधा"


आई:"खरंच अमोल खरंच सच्चा दोस्त आहेस..माझ्या आधी तूच शुभेच्छा दिल्यास"


अमोल:"असा कसा पाठी राहील मी??

बाबा:"एक मात्र आहे अमोल,सर्वात आधी जर वाढदिवसाला कोणी उमेशला शुभेच्छा देत असेल तर तो तूच आहे"


उमेश:.. खरंतर ह्यावेळी मीच माझा वाढदिवस विसरलो...अमोल तू मात्र लक्षात ठेवला..


अमोल:"कसा विसरेन तुझा वाढदिवस..तू खूप खास आहेस माझ्यासाठी..बरं चल हा केक कापून घे"....


उमेशने केक कापला..
सर्वाना भरवला...

अमोल:"बरं,उमेश मी आणि राधाने बाजूलाच रूम बुक केली आहे.....आता झोपुया..उद्या मस्त एन्जॉय करूया....

उमेश:"चालेल.. चल गुड नाईट.. पुन्हा एकदा थँक्स"


अमोल आणि राधा निघून गेले..

अमोलच्या येण्याने उमेश खूप खुश झाला..


सकाळ झाली..

उमेश आणि अमोल दोघेही समुद्रकिनारी फिरायला गेले..दोघांच्या गप्पा चालत असताना हेतल आली.तिने उमेशला आवाज दिला..


अमोलने ईशाऱ्याने उमेशला विचारले कोण आहे ही..


उमेश:"हीच ती हेतल"


हेतल जवळ आली..

उमेशने अमोलची ओळख करून दिली..
अमोल मुद्दामून म्हणाला:"मग हेतलला पण दुपारी बोलावुया का ?आज तुझा खास दिवस ना उमेश ?

हेतल:"काय खास आहे आज?"


अमोल:"आज उमेशचा वाढदिवस आहे"

हेतल:"ओहह, happy birthday umesh"
तिने हात मिळवला...

अमोलला हेतलच्या डोळ्यात उमेशसाठी प्रेम दिसतच होतं..

हेतलला पाहताक्षणी उमेशसाठी ती आवडली...त्याने डोक्यात प्लॅन करायला सुरू केले..

अमोल:"बरोबर एक वाजता ये हेतल इथे किनारा रिसॉर्ट आहे तिथेच आहोत आम्ही."

हेतल खूप खुश झाली..

हेतल:"हो नक्की येईल मी"

हेतल निघून गेली..


अमोल:"उमेश,हेतल खरंच तुझ्यावर प्रेम करते ....


उमेश:"माहीत नाही ,ते सोड बाकी अजून काय बोलतो??

अमोल:"ते सोड काय???हेतलचा गंभीरपणे विचार कर....बघितलं ती किती खुश झाली ??

उमेश:"अमोल,सध्या तरी ती माझ्यासाठी मैत्रीण आहे..बस बाकी काही नाही..


अमोल:"पुढे विचार केलास तर बायकोही होऊ शकते"


उमेश:"अमोल ,प्लिज हा टॉपिक नको...

अमोल:"बरं ठीक आहे birthday boy... हा विषय आज नाही"

दोघेही गप्पात गुंतले....


दुपारी रिसॉर्टवर हेतल आली.....

सर्वांनी मिळून उमेशचा वाढदिवस चांगलाच सेलिब्रेट केला....

उमेशची आई तर सतत हेतलला पहात होती...


अमोलसुद्धा हेतलच्या चेहऱ्यावरचे हावभाव पहात होता..


हेतलने उमेशला छान गिफ्ट आणले होते...


उमेशच्या आईला औक्षण करत असताना पाहून हेतल भावुक झाली...

तिची आईसुद्धा अशीच औक्षण करायची....

ती कोपऱ्यात जाऊन बसली..

सानवी ला समजलं .....

सानवी जाऊन तिच्यासोबत बसली..

लांबूनच अमोल सर्व पहात होता..

आता त्याला खात्री पटली होती..हेतलच उमेशसाठी योग्य मुलगी आहे...त्याच्यासारखीच हळवी.. भावनिक..


मनात निश्चय केला आता उमेशच मन काहीही करून वळवायचा..


बघता बघता संध्याकाळ झाली..


सगळे एकत्र घरी निघाले....


हेतलचे घर जवळ आले आणि तिने आणि सानवीने निरोप घेतला..


हेतल आई बाबाच्या पाया पडली..

आईने तिला आवर्जून घरी बोलवले....

दोघीही निघून गेल्या..


पाच मिनिटांवर घर जवळ होते..अचानकपणे समोरून ट्रक आली आणि उमेशच्या गाडीवर आदळला..मोठा अपघात झाला...

उमेशच्या डोक्याला जबर मार लागला.उमेश बेशुद्ध झाला होता..खूप रक्त वाहत होते.आई बाबांनाही लागले होते...उमेश बेशुद्ध झाला हे पाहून आई बाबाही जागच्या जागी बसले ..हात पाय गार पडले..

अमोलची कार पाठी होती ..अमोल पटकन गाडीतून उतरला ...

तोपर्यंत आजूबाजूला गर्दी जमली होती..
त्या गर्दीत प्रियासुद्धा होती..तिने जवळ येऊन पाहिले तर उमेशचा अपघात झाला होता.

उमेशला ह्या अवस्थेत पाहून प्रिया जोरजोरात रडु लागली.ओरडू लागली:"उमेश काय झाले तुला ??उमेश उमेश डोळे उघड.तिने त्याचे डोके मांडीवर ठेवले..पदराने त्याचे रक्त पुसू लागली.त्याच्या डोक्यावरून हात फिरवून त्याला उठ म्हणत होती..प्रियाची तगमग उमेशचे आई बाबा अमोल राधा सर्व पहात होते...


त्यातही धाडस करून तिने स्वतःला सावरलं.. अमोलला तिने मदत केली...हॉस्पिटलला जाईपर्यंत ती रडत होती..म्हणत होती:"उमेश, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत उमेश.प्लिज उमेश डोळे उघड.....सतत त्याचे वाहणारे रक्त पुसत होती....त्याच्या छातीवर डोकं ठेवून ती रडत होती....तिला काहीच काहीच सुचत न्हवतं..भान हरपून ती फक्त आणि फक्त उमेशला पहात होती....


मन सुन्न करणारा तो क्षण होता....


उमेशला डॉक्टरांनी आत नेहले..
प्रिया फक्त रडत होती फक्त रडत होती.....अमोल आला..

अमोल:"शांत हो प्रिया...काही होणार नाही उमेशला...


प्रिया:"कशी शांत होऊ अमोल मी ..किती त्रास दिला मी त्याला..किती प्रेम करत आला तो माझ्यावर..आणि मी ..मी काय केले माहीत आहे त्याला दुःख दिले....


अमोल:"का प्रिया का असे केले तू??जर तुला माहीत होतं उमेशला तू आवडते.. तो प्रेम करतो??मग का अशी वागली...?


प्रिया:"माझं आयुष्य उध्वस्त झालं होतं अमोल..आणि उमेशला माझ्यासारख्या विधवेशी लग्न नको..त्याचे आयुष्य मला बरबाद करायचे न्हवते म्हणून हे केले...त्याने चांगली मुलगी बघून लग्न करावं हीच इच्छा होती माझी..

पाठून उमेशचे आई वडील सर्व ऐकत होते...


प्रिया:"अमोल,मीसुद्धा खूप प्रेम केले उमेशवर.. त्याच्यासोबत संसार करायचे स्वप्न पाहिले...तो एकदिवस जरी नजरेआड झाला तरी अस्वस्थ होत होती पण माझ्या नशीबी काय होऊन बसले...खूप सहन केलं अमोल मी ...उमेश किती रडला होता माझ्यासमोर .मी विधवा असूनसुद्धा त्याने लग्नाचा हात पुढे केला..मला माहीत होते त्याने मी विधवा आहे म्हणून हा हात पुढे केला नाही तर त्याचा प्रेमाने मला स्वीकारले होते पण मलाच त्याच्या आयुश्यात माझी सावली नको होती...मला भीती वाटत होती की मी जर त्याच्या आयुष्यात गेले तर अजून काहीतरी अनर्थ घडेल म्हणून मी मनावर दगड ठेवून त्याला झिडकारले...म्हणून सर्व केले..


पाठून उमेशची आई आली ..


प्रियाशी बोलू लागली..

:पोरी माफ कर मला..मी खूप चिडले होते जेव्हा उमेशने तुझ्याशी लग्न करायचे म्हंटले होते....पण आज जेव्हा उमेशची अवस्था पाहून आम्ही हात पाय गाळून बसलो तेव्हा तुझी अवस्था पाहिली.. तुझं प्रेम पाहिलं उमेशविषयी.... मला खरंच माफ कर.....मी हात जोडते तुझ्यासमोर..

प्रिया उमेशच्या आईच्या गळ्यात पडून खूप रडली....


डॉक्टर बाहेर आले..उमेश शुद्धीवर आल्याचे सांगितले..


प्रिया पळतच उमेशला बघायला गेली..

प्रिया ला पाहून खुश झाला...प्रिया जाऊन त्याच्या जवळ बसली..


प्रिया:"उमेश,सॉरी उमेश..खूप वाईट वागले ..माझा बालमित्र तू ..माझ्या हास्यासाठी काहीही करणारा तू .तुझं मन समजूनही किती विचित्र वागले..



उमेशच्या आनंदाला सीमा उरली न्हवती..अश्रू वाहत होते....


पाठून आई,बाब आणि अमोलही आले..


आई पुढे आली..तिने प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवला..


तिचा हात हातात घेतला आणि उमेशच्या हातात दिला म्हणली:"लग्न करशील प्रिया उमेशसोबत"?


प्रियाने होकाररार्थक मान हलवली..

उमेशला वाढदिवसाची खूप छान भेट मिळाली होती ..आई बाबांनी प्रियाला स्वीकारले होते...

सर्वांच्या डोळ्यात पाणी होते...कारण उमेश आणि प्रियाच्या अतूट प्रेमाने सर्वाना हळवं केले होते......

उमेशच्या आईने प्रियाच्या आईला फोन लावला..उमेशसोबत प्रियाचे लग्न लावण्याबाबत विचारलं..

प्रियाची आईही खुश झाली.मुलीचा संसार पुन्हा सुरू होईल ह्या भावनेने आईनेही संमती दिली..


खास लक्ष्मीपूजनचा मुहूर्त पाहून उमेशच्या आईने लग्नाचा दिवस ठरवला..


उमेशची प्रिया लक्ष्मीपूजनाच्या दिवशी माप ओलांडून आली होती..स्वप्न सत्यात उतरले होते...


उमेशच्या खऱ्या प्रेमाचा विजय झाला होता.....त्याचे प्रेम प्रिया कसं का होईना त्याच्या आयुष्यात आली होती..


हो आपली हेतल राहिली ना...तिला जेव्हा कळलं की उमेशचं लग्न प्रियाशी झालं तेव्हा तिला वाईट न वाटता आनंद झाला...कारण ती अश्या माणसाच्या प्रेमात पडली होती जो सच्चा होता ...अमोलकडून उमेशची खरी कहाणी ऐकल्यावर उमेशविषयी आदर कैकपटीने वाढला होता...असो तिच्या स्वप्नातला राजकुमार नक्की भेटेल.....

तर उमेश आणि प्रिया ह्यांची पहिली रात्र होती..


उमेश प्रियाचा हात घट्ट पकडून बसला होता.तिच्या डोळ्यात पाहत होता.त्याला अजूनही विश्वास बसत न्हवता की प्रिया त्याच्या आयुष्यात अर्धांगिनी म्हणून आली आहे...


उमेश:"प्रिया,तू खरंच माझ्याशी लग्न केले.मला अजूनही स्वप्न वाटतंय"


प्रिया:"उमेश,तुझं प्रेम इतकं खरं होतं की मी खूप प्रयत्न करूनही,तुझ्याकडे दुर्लक्ष ककरूनही तुझ्याकडे ओढले गेले..उमेश त्या दिवशी तुला रक्ताच्या थारोळ्यात पाहिले आणि माझा जीव गेला रे.असं वाटलं सर्वच संपलं.. तूच तर होतास माझ्या जगण्याचा आधार..तुला नाही म्हणताना तुला दूर लोटताना खूप त्रास झाला...चीड येत होती माझी ..जो मला प्रेम करत होता त्याचाच मी द्वेष करत होते....मला करावं लागत होतं...... सॉरी उमेश..


उमेश:"बरं झालं प्रिया माझा अपघात झाला"


प्रिया:"उमेश,हे काय बोलतो आहेस ,असं काही बोलू नकोस?? उमेशच्या ओठावर हात ठेवला..

उमेशने तिचा हात हातात घट्ट पकडला आणि बोलू लागला.."माझा अपघात झाला आणि तुझं मनातलं प्रेम बाहेर आलं...किती वाट पाहिली प्रिया मी तुझी..वेडा झालो होतो ...काहीच सुचत न्हवतं..कसा जगलो तुझ्याशिवाय माहीत आहे...प्रिया वचन दे आता तू मला सोडून जाणार नाही."

प्रिया:"हो दिले वचन"


उमेशला काहीतरी आठवले..

तो उठला.कपाटापाशी गेला..

कपाटातून काही तरी काढले..गिफ्ट होते..


उमेश:"हे घे प्रिया"


प्रिया:"काय आहे ?

उमेश:"गिफ्ट आहे"

प्रिया:"ओहह तू लग्नाच्या पहिल्या रात्रीसाठी गिफ्ट घेतले"


उमेश:"प्रिया हे गिफ्ट तुझ्यासाठी मी माझ्या पहिल्या पगारातून घेतले होते .तुला दयायचे होते....तुझं लग्न झालं..हे गिफ्ट असंच राहिले.. कित्येक वर्षापासून हे असेच ठेवले जपून.मला आशा होती तू भेटशील..आणि बघ तो दिवस आला"


हे ऐकून प्रिया भावुक झाली..


प्रियाने गिफ्ट उघडलं..

त्याच्यात अंगठी होती..


ती रडु लागली..

उमेशने प्रियाच्या हातात अंगठी घातली ..म्हणाला:"WILL YOU MARRY ME?


प्रिया प्रश्नःर्थक चेहऱ्याने पाहू लागली..

पुढे उमेश म्हणाला..:"प्रिया ही अंगठी देऊन तुला हेच म्हणायचे होते तेव्हा"


प्रियाने उमेशला घट्ट पकडले.. आणि दोघांच्या अश्रूंचा बांध फुटला....

उमेश आणि प्रियाच्या संसाराला सुरवात झाली होती.....वर्षभरातच चिमुकल्या पाहुण्याचे स्वागत झाले...प्रियाने मुलाला जन्म दिला होता..त्या चिमुकल्याच्या स्पर्शाने उमेश आणि प्रिया आई बाबा होण्याचे सुख अनुभवत होते.उमेशचे आई बाबा आजी आजोबा होण्याचे सुख..उमेशचे कुटुंब प्रेमाच्या स्पर्शाने न्हाऊन निघाले होते.....


वाचकहो उमेश आणि प्रियाच्या प्रेमाच्या स्पर्शाने नक्कीच तुमच्याही अंगावर शहारे आलेच असतील ना ??

ही होती कथा प्रेमस्पर्शाची.... कथा प्रेमाची ..प्रेमाला सर्वस्व मानणाऱ्या खऱ्या मनाची...


वाचकहो प्रेमस्पर्श कथा लिहिताना मी सुद्धा अंतर्मुख झाले.माझेही अनेकदा डोळे पाणावले.. उमेश,प्रिया ,अमोल,राधा,उमेशचे आई बाबा सर्व पात्र खरंतर माझ्या कल्पनेच्या जगातली होती .हो पण असे भरपूर उमेश आणि प्रिया वास्तववादी जगात असतात हे आपण पाहतो...प्रेम ही पवित्र भावना आहे..नशीबवान असतात ते लोक ज्यांना स्वतःच खरं प्रेम मिळतं... अंत भला तो सब भला ...कधी कधी अंत होण्यास उशीर लागतो जसा आपल्या कथेत झाला..उमेश फक्त वाट पाहात होता..शेवटी अमोलनेही त्याला सल्ला दिला पण शेवटी एका प्रसंगाने उमेशच्या आई बाबांचे डोळे उघडले..त्यांनीच प्रियाला सून म्हणून घरी आणले.. तुम्ही वाचकांनी भरभरुन प्रेम दिले,कंमेंट दिली त्यासाठी तुमचे मनस्वी आभार..तुमच्या कंमेंट वाचून लिखानाचा उत्साह हा द्विगुणित होतच राहिला..पुढेही राहील....असेच प्रेम राहू द्या...


तुम्हा सर्वाना आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा..तुमच्या जीवनात सुख, समृद्धी ,भरभराट येवो हीच सदिच्छा.....तुमचेही आयुष्य प्रेमस्पर्शाने व्यापून जावो हीच प्रेममय शुभेच्छा...


कथेला निरोप देताना मन भरून आले आहे..पण लवकरच नवीन कथेसोबत तुमच्या भेटीला येईल....जाता जाता शेवटी कशी वाटली प्रेमस्पर्शाची कथा कंमेंटमध्ये सांगायला विसरू नका..हो आणि असेच प्रेम राहू द्या.

©®अश्विनी ओगले..

कथा आवडल्यास नक्की मला फॉलो करा..कथा शेअर, लाईक हो आणि आठवणीने कंमेंट करा....धन्यवाद....पुन्हा भेटू....











🎭 Series Post

View all