प्रेमस्पर्श भाग २४

Love Change Life


गेल्या भागात आपण पाहिले की उमेश हेतलविषयी अमोलला सांगतो..मनात मैत्री नसताना मैत्री केली..अमोल उमेशला नव्याने सुरवात करायला सांगतो..उमेश त्यावर म्हणतो "प्रियाची जागा तो कोणालाही देऊ शकत नाही...अमोल त्याला आई वडिलांना काय वाटेल जर तू असंच करत राहिलास तर ?असे विचारतो..उमेश निशब्द होतो..

आता पाहू पुढे...

उमेश शांत बसतो..

अमोल पुढे बोलू लागतो.:"उमेश,आतापर्यंत मी प्रियासाठी तुझी तळमळ पहिली.मान्य आहे की तुझं प्रेम आहे तिच्यावर.. खरं प्रेम केलंस तू प्रियावर.. पण उमेश तू आता सत्य परिस्थिती का स्वीकारत नाही??काय अवस्था करून घेतली आहेस?कसा होता ?काय झाला??.तुला समजतंय का उमेश प्रिया आणि तुझे रस्ते बदलले आहे..प्रियाने स्वतःचा रस्ता निवडला आहे..कुठवर खोटी आशा बाळगणार आहे??इतके वर्ष तीची वाट पाहिली .तिची आपल्याला परिस्थिती कळली ??प्रिया तिच्या आयुष्यात दुःखी जरी असली तरीसुद्धा तिने मान्य केले आहे..तुला कळत कसं नाही उमेश की तिला पुन्हा लग्न करायचे नाही..प्रिया तुला avoide करते आहे...


उमेश तू खरंच स्वार्थी झाला आहेस आता..नेहमी दुसऱ्याचा विचार करणारा तू आता मात्र खूप स्वार्थी झाला..वाटलं न्हवतं उमेश तू असा वागशील?..फक्त एकतर्फी विचार करतो आहेस..एकतर्फी .....


उमेश,तुला संगणार न्हवतो पण आता सांगतो..मला तुझ्या आई बाबांचे नेहमी फोन येतात..का माहितीये??तुझ्यासाठी...त्यांना माहीत आहे मी तुझा चांगला मित्र आहे मीच तुला समजवू शकतो... आई तर फोनवर नेहमी रडते आणि सांगते मला:"उमेशला सांग प्रियाला विसर आणि पुढचं आयुष्य बघ..उमेशला पहावत नाही ह्या अवस्थेत....त्रास होतो...उमेश पहिल्यासारखा राहिला नाही. नेहमी शांत असतो.जास्त बोलत नाही...त्याला पाहून आम्हा दोघांना त्रास होतो..आमचा जीव तुटतो"


हे ऐकताच उमेशचे डोळे चमकले..


अमोल पुढे बोलू लागला..:"शॉक बसला ना ऐकून..मलाही वाईट वाटतं ..तू त्यांचा जरा तरी विचार करतो आहेस का उमेश??मी नेहमी त्यांचं सांत्वन करतो..तुझी बाजू घेतो..त्यांना म्हणतो उमेशला थोडा वेळ द्या,तो सर्व विसरले, पहिल्यासारखा वागेल...मी त्यांना फक्त खोटी आशा दाखवतो.... उमेश तू खरंच सांग मला तू असाच आयुष्यभर राहणार आहेस का??उमेश हे जे तुझं वागणं आहे त्यामुळे आई बाबा दुखवत आहेत.. तू त्यांच्या जागी राहून विचार कर त्यांना कसं वाटत असणार??एकुलता एक मुलगा तू ..खूप साऱ्या अपेक्षा आहेत त्यांच्या..खरंच तुला त्यांची अशी अवस्था दिसत नाही का ???का दिसून नसल्या सारखा करतो आहेस..प्लिज उमेश प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते..अजूनही वेळ गेली नाही..पुढे जावून त्रास होण्यापेक्षा तू स्वतःला आता लवकरात लवकर सावर आणि आयुश्यात पुढे बघ...प्लिज उमेश... अमोल अगदी काकुळतीला येऊन बोलत होता....

अमोल आता शांत बसला..

उमेश:"अमोल,खरंच रे स्वार्थी झालो मी ..आई बाबांचा काहीच विचार केला नाही.....खरंच मी स्वार्थी झालो.... अमोल मी पहिल्यासारखा खुश राहण्याचा प्रयत्न करेन...


अमोल:"उमेश, तू मला वचन दे ..तू आता प्रियाचा विचार करणार नाही.."


उमेश:"हे कसं शक्य आहे?"

अमोल:"तुला हे करावंच लागणार,तिच्या आठवणीपासून दूर गेल्याशिवाय तू आनंदीत राहू शकत नाही"


उमेश:"तिच्या आठवणी आहेत म्हणून तर जगतोय

अमोल:उमेश,मी कोणत्या भाषेत तुला समजावू...?तुला जर असेच वागायचे असेल तर तुझ्याशी मी ह्यापुढे बोलणार नाही...तुला सांगून मी माझी तोंडाची वाफ का वाया घालवू??जाऊ दे तू रड आपला प्रियाच्या आठवणीत.. तुला काय घेणं देणं आहे आई बाबांशी..त्यांना होऊ दे त्रास तुला काय फरक पडणार नाही.. तुझं आयुष्य महत्वाचे, प्रिया महत्वाची तिचं प्रेम महत्वाचे.. आई बाबांचं प्रेम काहीच नाही ना?त्यांच्या भावना काहीच नाही...तू बरोबर आहेस ..तू असाच वाग..ह्यापुढे मी तुला काहीच काहीच बोलणार नाही....

अमोल डोक्याला हात लावून बसला...

आज अमोल पहिल्यांदा उमेशशी कठोरपणे बोलला होता.....


उमेश:"प्लिज अमोल,तू तरी असा वागू नकोस.एकच तू आहेस ज्याच्याशी मी मन मोकळं करतो...तू असं बोलू नकोस अमोल.….तुझ्याशिवाय मला कोण समजून घेणार.??

अमोल जरा शांत झाला..भावनेच्या भरात खूप काही बोलून गेला .उमेश अगदी काकुळतीला आला..अमोलला त्याची दया आली..अमोल भानावर आला..


अमोल:"उमेश, मी तुझी मनापासून माफी मागतो.खरंच सॉरी ..मी भावनेच्या भरात तोंडाला येईल ते बोललो.. तुझ्याशी फटकळपणे वागलो... हो पण जेसुद्धा बोललो ते उमेश ,फक्त आणि फक्त तुझ्या भल्यासाठी... उमेश मी तुझा मित्र असून तुझी अवस्था पाहू शकत नाही तर आई बाबांची काय अवस्था होत असेल?नेहमी उदास असतो.हसत नाहीस..बोलत नाहीस..कोणाबरोबर मिसळत नाही....प्लिज उमेश असं नको वागू रे खूप जीव तुटतो तुला बघून....


उमेश:"अमोल,किती नशीबवान आहे मी की तुझ्यासारखा मित्र मला आहे.....अमोल,मी खरंच प्रयत्न करेल ..तुझ्यासाठी, आई बाबांसाठी.. जर माझ्या वागण्यामुळे तुम्ही डिस्ट्रुब होत आहात तर मी पूर्ण प्रयत्न करेन...."


अमोल:"खरंच उमेश??

उमेश:"हो खरंच"

अमोल:"मला माझा जुना मित्र हवा आहे थट्टा मस्करी करणारा.. खरंच तो उमेश हवा आहे..



उमेश तर बोलून गेला मी प्रयत्न करेन पण प्रियाचं स्थान मनात इतकं खोलवर होतं की त्याला असं सहजासहजी काढून टाकता येणार न्हवतं..पण त्याने ठरवलं प्रियाला मनात जपायचे आणि आपल्या आई बाबांसाठी ,मित्रासाठी आता आपलं वागणं बदलायचे.....


उमेश घरी गेला...

आई अशीच बसली होती....


उमेश आल्यावर सरळ रूमवर निघून जायचा..पण आज चक्क तो आई जवळ बसला..


आई:"उमेश,काही हवं आहे का??

उमेश:"आई काही नाही गं असंच बसलो..बाबा अजून आले नाही ??


आई:"नाही,आज उशीर होणार आहे"..


किती दिवसाने उमेश आईशी गप्पा मारू लागला होता..

आईलाही बरं वाटलं....


उमेश:"आई मी विचार करत होतो उद्या आणि परवा सुट्टी आहे तर तू ,मी आणि बाबा अलिबागला जाऊया का?"
हे ऐकताच आई प्रसन्न मुद्रेने त्याला पाहू लागली.....


क्षणाचाही विलंब न करता ती पटकन हो म्हणाली...

तिने उमेशच्या डोक्यावरून हात फिरवला...


उमेश आईच्या कुशीत डोळे मिटून पडला..

खरं तर तो आईला मनातल्या मनात सॉरी म्हणत होता...

किती महिने झाले तो अगदी तुटकपणे वागत होता..

तेवढ्यात बाबा आले.

उमेश किती दिवसाने आईच्या कुशीत झोपला होता.ते पाहून त्यांनाही आनंद झाला..त्यांचेही डोळे पाणावले

बाबा:"आज काय खास??आई आणि मुलाचं प्रेम अगदी उतू चाललं आहे??

उमेश उठून बसला..

बाबांना म्हणू लागला..
:"बाबा,उद्या आपण तिघेही अलिबागला जात आहोत"


बाबा:"मला काम आहे उद्या"

तितक्यात आई म्हणाली:"काय हो किती दिवस झाले आपण तिघे फिरायला गेलो नाही..चला ना जाऊन येऊया.. दोन दिवसांचा तर प्रश्न आहे"


बाबा:"बरं बाबा आता वरून ऑर्डर आली म्हंटल्यावर यावच लागेल."


आई आणि उमेश दोघेही हसू लागले..

किती दिवसाने उमेश खळखळून हसला होता...आई बाबा दोघेही सुखावले..

उमेश:"बरं, आई मी झोपतो लवकर ..उद्या उठून मी packing करेन"


आई:"बरं जा झोप जा"


उमेश गेला..

बाबा आईशी बोलू लागले..

बाबा:"काय हा चमत्कार झाला??उमेश IS BACK??

आई:"हो बघा ना आल्या आल्या म्हणाला आपण अलिबागला जाऊया.पण खूप छान वाटलं हो ..उमेश,किती दिवसाने पहिल्यासारखा बोलला बघा ना..नाही तर तोंडातून एक शब्दसुद्धा बाहेर काढत नाही"


बाबा:"हो किती दिवस झाले त्याचा आवाज सुद्धा ऐकला न्हवता...पण हा चमत्कार कसा झाला बरं??

आई:"ते काही माहीत नाही पण जे पण झालं चांगलं झाले..माझा हरवलेला उमेश पुन्हा गवसला"


बाबा:"चेहऱ्यावर किती आनंद ओसंडून वाहत आहे"

आई:"हो का ??

बाबा:"हो तर"

आई:"तुमचाही आनंद काही कमी नाही हा.. डोळे भरून आले लगेच तुमचे"


बाबा चष्मा सावरत म्हणाले..


"अगं डोळ्यात कचरा गेला म्हणून"


आई:" खोटं बोलायला जमत नाही तर कशाला बोलता??"


आता बाब हसू लागले...


किती दिवसाने उमेशमुळे आई बाबा हसले होते... सर्व श्रेय जात होते अमोलला.अमोलने उमेशची चांगलीच कानउघडणी केली होती...त्यामुळेच तर त्याने विचार केला..म्हणून हा चमत्कार घडून आला होता...


आई बाबांच्या चेहऱ्यावर समाधान पाहून उमेशही सुखावला..रूमवर जाताच त्याने अमोलला फोन लावला.

उमेश:"अमोल,थँक्स मित्रा"

अमोल:"काय कशासाठी थँक्स??

उमेश:"आज किती तरी दिवसाने आई बाबा खुश झाले.."

अमोल:"ग्रेट ,मस्तच उमेश,म्हणजे मला माझा हरवलेला मित्र उमेश सापडला म्हणायचा"

उमेश:"हो तुझा मित्र तुझ्यामुळेच सापडला बघ"


अमोल:"हो हे क्रेडिट तर मी घेणारच बघ"


उमेश:"अमोल,उद्या मी आई आणि बाबा अलिबागला जाणार आहोत..तू पण येतोस का??

अमोल:"ग्रेट.. पण सॉरी रे मला जमणार नाही...मला पेंडिंग कामं आहेत ऑफिसमध्ये..आपण नंतर कधी तरी जाऊ...


उमेश:"बरं चालेल.चल उद्या लवकर उठायचे आहे..झोपतो आता"


अमोल:"बरं ठीक आहे...हो आणि थँक्स टू यु"


उमेश:"मला का बरं थँक्स??

अमोल:"तू माझा हरवलेला मित्र शोधून दिला त्यासाठी"


उमेश:"welcome sir"


अमोल आणि उमेश दोघेही हसू लागले..


अमोललासुद्धा समाधान वाटले..किती दिवसाने उमेश मनमोकळेपणाने बोलला..खरंच आधीचा उमेश परत आला..हो अमोलला इतकं माहीत होतं तो प्रियाला सहज विसरणार नाही पण आई बाबांच्या खुशीसाठी तो ह्यापुढे स्वतःला खुश ठेवणार होता..हेही कमी न्हवते..

चला कमीत कमी उमेशने सुरवात तर केली होती.


दुसऱ्या दिवशी सकाळीच उमेश,आई ,बाबा अलिबागला निघाले..

अलिबागच्या कुशीत आल्यावर उमेश अजून प्रसन्न झाला..निसर्ग सौन्दर्याची मुक्तहस्ते लयलूट तो न्याहाळत होता..अथांग समुद्र,एका रेषेत डोलणारी झाडं.. मुक्त विहार करणारे पक्षी...त्यात उमेश आई बाबांचे एकसे बढकर एक फोटो केमेऱ्यात कैद करत होता....


किती प्रसन्न वाटत होतं त्याला...किती दिवसाने मोकळा श्वास घेत होता....अचानक त्याला प्रियाची आठवण आली..प्रियाला सुद्धा समुद्र किनाऱ्यावर फिरणं खूप आवडायचे..फेसाळ लाटा,शुभ्र आकाश ,अंगाला स्पर्शून जाणारी थंडगार हवा. हे सगळंच तिला आवडायचं.. एकदा प्रिया,उमेश,आणि अमोल तिघे आले होते...किती धम्माल केली होती...किती गप्पा मारल्या होत्या...किती फोटो काढले होते..प्रियाला फोटो काढायची किती हौस होती..

सतत उमेशला वेगवगेळे फोटो काढायला लावायची.. तेव्हा उमेश तिला म्हणाला होता:"किती फोटो काढते, पुरे आता"


प्रिया तेव्हा म्हणाली होती:"हे आता काढलेले फोटोच आपल्यासाठी आठवणी असतात उमेश..जुने फोटो पाहिले की मन त्याकाळात रमतं.. सर्व आठवतं .हा खजिना मला खूप आवडतो जो आपण नेहमी आपल्यासोबत जपून ठेवू शकतो"


उमेशने लगेच तेव्हाचे फोटो शोधायला सुरवात केली..

निळ्या ड्रेसवर गॉगल घालून काढलेला प्रियाचा फोटो सापडला..तो त्यावरून हात फिरवू लागला..तोच त्याच्या पाठीवर कोणीतरी हात ठेवला....लगेच उमेशने फोन बंद करून खिश्यात ठेवला....


क्रमशः

तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या..आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि मला फॉलो जरूर करा.
©®अश्विनी ओगले..






🎭 Series Post

View all