प्रेमस्पर्श २३

Love Transform


गेल्याभागात आपण पाहिले की उमेश नोकरी करू लागला होता आणि तिथेच काम करणाऱ्या हेतलला तो आवडू लागला होता...उमेशला ह्याची कल्पना न्हवती. हेतल आता उमेश कधी एकदाचा तिचा होतो ह्याची वाट पहात होती..आता पाहू पुढे...


हेतल दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली..गेल्यावर तिची नजर उमेशला शोधत होती..उमेश अजून आलाच न्हवता..उमेश कधी एकदाचा येतो असे झाले..हेतल स्वतःच्या विचारात गर्क झाली..

ती विचार करू लागली "उमेशला सरळ सांगून टाकावे का की मी त्याच्यावर प्रेम करते??

तिची तिलाच हसू आले....किती घाई ती उमेशला आपलंसं करण्याची...?

तेवढ्यात उमेश आला आणि तिला हाक मारली..

उमेश:"हेतल,कशी आहेस??

हेतल:"उमेश,हो मी बरी आहे"

उमेश:"okay"

म्हणत तो निघून जात असताना तिने उमेशला आवाज दिला.....

हेतल:"उमेश, काल तू मला मदत केली त्यासाठी खूप thanks"

उमेश गालात हसला आणि निघून गेला..

हेतलला असं वाटत होतं की उमेशने स्वतःहून बोलावं..पण तो काही जास्त बोलत न्हवता..खरं तर तो कोणाशीच जास्त बोलायचा नाही.नेहमीच कामात गर्क राहायचा..

हेतलला कधी कधी उमेशचे वागणं पाहिले की प्रश्न पडायचा.."हा मदतीला येतो पण किती अबोल??ह्याला काय बोलू वाटतं की नाही..हेतल रोज काहीतरी बहाणे शोधायची..पण उमेश मात्र तिला बघत सुदधा न्हवता..

सानवी:"हेतल,काय मग तुझ्या प्रेमाची नाव कुठ पर्यंत आली??


हेतल:"सानू,काय गं कसली नाव??इथे उमेश मला ढुंकूनही बघत नाही ..त्याच्याशी किती वेळा बोलण्याचा प्रयत्न करते पण तो मात्र जास्त बोलत नाही...."

सानवी:"म्हणजे??


हेतल:"अगं तो खूपच अबोल आहे..ऑफिसमध्ये जास्त बोलत नाही ..वेळेवर येतो.वेळेवर निघून जातो..ना कोणाशी हाय हॅलो ना बाय.."


सानवी:"ओहह असं आहे ,मग तूला जास्त मेहनत घ्यावी लागेल.."


हेतल:"अगं मी खूप प्रयत्न करते गं पण तो खरंच मान वर करून बघतही नाही"


सानवी:"म्हणून तर म्हणाले मी जास्त मेहनत घ्यावी लागेल.....आधी तुला त्याचा स्वभाव, त्याची आवड सर्व काही जाणून घ्यावे लागेल....."


हेतल:"पण हे सर्व कसं होणार??

सानवी:"मैत्रीचा हात पुढे कर ..झालं मग तुझं काम"

हेतल:"तो करेल ना माझ्याशी मैत्री??"


सानवी:"का नाही करणार मैत्री,किती गोड आहेस तू..नक्की करेल मैत्री..बरं उद्या गेल्यावर मैत्रीचा हात तुला पुढे करायचा आहे हे लक्षात राहू दे ....


हेतल:"बरं मी प्रयत्न करते.."


सानवी:"तुला प्रयत्न नाही करायचा तर तुला उमेशबरोबर काहीही करून मैत्री करायचीच आहे"


हेतल:"ok, मी नक्की उमेशशी मैत्री करणार"


हेतल दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली..

जसं उमेशला पाहिले तसे ती त्याच्याकडे गेली.जितका आत्मविश्वास एकवटता येईल येईल तितका एकवटला आणि उमेशशी बोलू लागली..

हेतल:"उमेश,मला बोलायचे आहे तुझ्याशी"


उमेश:"बोल हेतल"

हेतल:"उमेश,माझ्याशी मैत्री करशील??

उमेश जरा शांत झाला....
उमेश:"हेतल,तू खरं तर छान व्यक्ती आहेस हो आणि तू मैत्रीसुध्दा छान निभावशील पण सॉरी हेतल मला मैत्री वैगेरे नाही जमणार खरंच सॉरी"


असे बोलताच हेतलचे मन भरून आले..डोळ्यात पाणी साचले..किती विश्वासाने मैत्रीचा हात पुढे केला होता..आणि हा सरळ नाही म्हणाला.


हळव्या मनाचा उमेश ..त्याने हेतलच्या डोळ्यात पाणी पाहिले तसे त्याला वाईट वाटले....त्याला आपल्यामुळे कोणी दुःखी झालेले पहावत न्हवते.. हेतलच्या डोळ्यात पाणी पाहून त्याला अगदी अपराधी असल्याचे वाटले.

तो पुन्हा बोलू लागला.."हेतल,अगं मस्करी केली मी ..तू तर रडायला लागली...

उमेशने हात पूढे केला म्हणाला:"फ्रेंडस"


हेतल फार खुश झाली....आता उमेशशी जवळीक साधण्यासाठी मैत्रीची पायरी तर गाठली..पुढे ती स्वप्न रंगवू लागली..

हेतल:"उमेश वाटलं न्हवतं की तू मस्करी पण करतो ..थोड्या वेळासाठी मी shock झाले.. एक मुलगी तुला मैत्रीचा हात स्वतःहून पुढे करते आहे आणि तू सरळ नाही कसा म्हणू शकतो..उमेश तुझी मस्करी करण्याची पद्धत फार वेगळीच आहे..खरंच मला वाटलं की तुला माझ्याशी मैत्री करायची नाही.. थँक्स माझी मैत्री स्वीकारल्या बद्दल. बरं, आज आपण कॉफी प्यायला जाऊया का??

उमेश विचारात पडला....

हेतल:"इतका काय विचार करतो आहेस??

उमेश:"आज नको,उद्या जाऊया ..आज भरपूर काम आहे"

हेतल:"बरं ठीक आहे"


हेतल मनोमन सुखावली..


उमेशला मात्र मैत्रीचे नवीन नातं स्वीकारायचे न्हवते तरीही हेतलच्या डोळयातील अश्रू पाहून त्याने स्वीकार केले..त्याला माहित न्हवते पुढे काय होणार होते पण तो अस्वस्थ झाला होता...मैत्री ,प्रेम जे सर्वस्व वाहिले होते ती फक्त प्रिया होती आणि तिची जागा कोणालाही देता येणार न्हवती.....

कामात त्याने मन वळवण्याचा प्रयत्न केला पण त्याचे मन लागेना...


त्याने अमोलला भेटूया म्हणून फोन केला..खूप दिवस झाले दोघांची भेट झाली न्हवती..

रात्री अमोलला बाहेर भेटला..

अमोल:"कसा आहेस उमेश?कसा चालू आहे जॉब??

उमेश:"हो रे आता कामात जम बसला आहे"


अमोल:"बाकी काय बोलतो??

उमेश:"सहज बोलावले तुला किती दिवस झाले भेटलो नाही आपण"

अमोल:"हो रे किती दिवसाने भेटलो आहे"


उमेश:"अमोल,खरं तर आज खूप बैचेनी झाली "

अमोल:"का बरं??

उमेश:"अमोल,मी ऑफिसच्या कामातच मन रमवतो..जास्त कोणाशी बोलत नाही रे..कोणाला गरज लागली तर मदत करतो.हो पण जास्त communication नसतंच .मला जास्त बोलायची इच्छा होत नाही रे..जे पण आहे तुझ्याकडे व्यक्त करतो.....मुळात मला एकटं राहायला आवडतं.. तुला खरं सांगायचं तर प्रियाच्या विचारात..म्हणून मला इच्छा होत नाही जास्त माणसात मिसळण्याची..बाकीचे ऑफिसमधले एकमेकांशी थट्टा मस्करी करतात पण मला नाही जमत..आणि तुला तर माहितीये माझ्या मनात नसेल तर मी काही जास्त कोणाशी बोलत नाही...आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी हेतल नाव आहे . ती त्या दिवशी रस्त्यात चक्कर येऊन पडली..मी तिला दवाखाण्यात नेहले.आता बरी आहे...आज ती आली आणि म्हणाली माझ्याशी मैत्री करशील का??मी नाही म्हणालो तर चक्क तीच्या डोळ्यात पाणी आले..तुला तर माहितीये कोणाला असा त्रास झाला तर मला आवडत नाही ..म्हणून मी लगेच माझा शब्द पालटला. मी तिला म्हणालो मी मस्करी केली.आपण फ्रेंडस म्हणून माझा हात पुढे केला...मी आज मनाविरुद्ध वागलो अमोल.म्हणून मला आज अगदी बैचेन झाल्यासारखे वाटते आहे..


अमोल:"उमेश,हेतल अशी अचानक येऊन तुझ्याशी मैत्री करते कदाचीत तू आवडत असावा असे काही असेल तर??

उमेश विचारात पडला..

उमेश:"अमोल,हेतल आणि माझ्या प्रेमात...?मी तर आताच जॉईन झालो आहे आणि हेतल माझ्या प्रेमात??

अमोल:"उमेश,तुझा स्वभाव असाच आहे जो कोणत्याही मुलीला आकर्षीत करेल,प्रेमात पाडेल...मुलीला कसला मुलगा आवडतो माहीत आहे "जो तिची काळजी करेल...तिला समजून घेईन"मुळात तुझा स्वभाव असाच आहे .तू सर्वांची काळजी करतोस.. सर्वांच्या मदतीला जातो... आणि हेतलला हीच गोष्ट आवडली असणार हे शंभर टक्के खरं आहे.."

उमेश:"हे जे तू म्हणतो आहे ते नसावं...मला असं वाटतं मी चूक केली मैत्री करून.."


अमोल:"उमेश तू अजिबात चूक केली नाही ..तू जे केले ते बरोबर केले"


उमेश:"काय म्हणतो आहे अमोल तू??

अमोल:"उमेश,प्लिज आता माझं लक्ष देऊन ऐक.. किती दिवस प्रियाच्या आठवणीत तू स्वतःचा वर्तमान आणि भविष्य दावणीला लावणार आहे???

उमेश:"मला समजत नाही अमोल ..तुला नक्की काय म्हणायचे आहे?"


अमोल:"उमेश,तुला आता मान्य करावे लागणार की प्रिया तुझ्या आयुष्यात येणार नाही..तू किती वर्षे वाट पाहणार आहे..तुला आता पुन्हा नव्याने सुरवात करावी लागेल..

उमेश:"नव्याने सुरवात म्हणजे नक्की काय अमोल"


अमोल:"उमेश,मला चुकीचं समजू नकोस.मी तुझ्या सर्व भावना समजतो.प्रिया तुझ्यासाठी काय आहे हे सुद्धा जाणतो..उमेश प्रियाने तिची वाट निवडली आहे ..ती आहे त्या परिस्थितीत जगते आहे..तिला दुसरं लग्न करायचे नाही"

उमेश:"इतक्या विश्वासाने कसं बोलू शकतो तू??

अमोल:"उमेश,प्रियाचे राधाशी बोलणं झालं तेव्हा तिनेच राधाला संगितले.. तिला लग्न करायचे नाही..जे ही आयुष्य आहे त्यात ती समाधानी आहे"


उमेश:"खरंच ,प्रिया असे म्हणाली??"

अमोल:"हो उमेश ती हेच म्हणाली..जेव्हा राधाने तुझं नाव घेतलं तेव्हा ती म्हणाली..

अमोल बोलता बोलता थांबला..
उमेश:"लवकर सांग अमोल ?माझं नाव घेतल्यावर काय म्हणाली प्रिया ??

अमोलचा चेहरा उतरला...

"ती म्हणाली मी कोणत्याही उमेशला ओळखत नाही"


उमेश:"काय ??प्रिया अशी म्हणाली??प्रिया मला ओळखत नाही......असं कशी बोलू शकते ती ..इतक्या सहज विसरली मला?तिच्या आयुष्यात माझं स्थान काहीच न्हवतं का??अमोल इतका वाईट आहे का रे मी ??मी काय गुन्हा केला ?प्रिया मला विसरली अमोल??माझ्या प्रेमाला माझा विसर पडला??

उमेशला फार वाईट वाटले....कंठ दाटुन आला..


अमोलने उमेशच्या खांद्यावर हात ठेवला....उमेश तू वाईट नाही रे..ही परिस्थिती वाईट आहे..प्रियासोबत जे कमी वयात झाले ते वाईट झाले. तू स्वतःला त्रास करून नको घेऊ..प्रियाच्या सुखासाठी तर तू नेहमी धडपडत राहिला. तिच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी खूप काही करायचा.मग तू वाईट कसा उमेश?तू खूप चांगला आहे मित्रा..तुझं मन खूप निर्मळ आहे...जी मुलगी तुझ्या आयुष्यात येईल ती नक्कीच भाग्यवान असणार....


उमेश:"नाही अमोल,माझ्या आयुष्यात प्रियाशिवाय मी कोणत्याही मुलीला जागा देऊ शकत नाही .प्रिया नाही तर कोणी नाही..जर प्रियाचा हट्ट आहे लग्न न करण्याचा तर मी सुद्धा लग्न करणार नाही..


अमोल:"उमेश,काय वेडेपणा लावला आहेस तू...तुला समजतंय का काय बोलतो आहेस.?आई बाबांचा विचार केला का?

उमेश आता मात्र निशब्द झाला…....

क्रमशः

तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या..आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि मला फॉलो जरूर करा.
©®अश्विनी ओगले..

🎭 Series Post

View all