प्रेमस्पर्श २२

Love Transform Life

गेल्या भागात आपण पाहिले की उमेश प्रियाचा भुतकाळ ऐकून हादरून जातो..त्या मनस्थितीत तो घरी आल्या आल्या आई वडिलांना मला प्रिया आवडते आणि मी प्रियाशीच लग्न करणार सांगतो..हे ऐकून आई बाबा खरं तर तयार होत नाही ..उमेश स्वतःच्या मतावर ठाम असतो .नंतर दुसऱ्या दिवशी तो प्रियाला लग्न करणार का माझ्याशी विचारतो पण प्रिया मात्र त्याला म्हणते "तू माझा फक्त मित्र आहे .त्या नजरेने कधी पाहिले नाही"असे म्हणते निघून जाते...उमेश अमोलला फोन लावून ढसाढसा रडतो..पाहू पुढे..

उमेश:"ज्या प्रियावर लहानपणापासून प्रेम केले तिच्या मनात माझ्याविषयी जराही प्रेम नाही अमोल..प्रिया म्हणाली प्रेम केले तिने पण नवऱ्यावर..तिचं प्रेम तिचा नवरा होता फक्त नवरा..मी नाही"


अमोल:"उमेश, प्लिज प्लिज सावर स्वतःला"


अमोलच्या डोळ्यात डोळे घालून उमेश हसला आणि म्हणाला .."अमोल,आतापर्यंत तर तेच करत राहिलो ना सावरत राहिलो..काय मिळालं मला?? इतकी वर्षं वेड्या सारखी वाट पाहिली मी तिची..तिच्या आठवणीतच जगलो ..कुठे असेल प्रिया ?कशी असेल?ह्या विचाराने जीव व्याकुळ होत राहिला..काल जेव्हा तिची अवस्था कळली तेव्हा मन सुन्न झाले रे..सर्व कसं भोगलं?माहीत नाही?अमोल आई बाबांना वाटलं मी दया दाखवून तिच्याशी लग्न करतो आहे पण तसं मुळीच मुळीच नाही..अमोल तुला तर माहीत आहे ना मला नेहमी तिच्याशीच लग्न करायचे होते?

बोलता बोलता उमेश थांबला...

विचार करू लागला..

अमोल:"उमेश काय झाले?कोणत्या विचारात गुंतला"

उमेश:"अमोल,असं तर नाही ना की प्रियाला वाटत असेल की तिचं असं झालं म्हणुन मी तिच्यावर उपकार करतो वैगेरे??

अमोल:"हो उमेश,तुझा doubt बरोबर आहे असं मला वाटतं..आणि हे सर्व आताच तिच्यासोबत घडून गेले आहे त्यामुळे ती आधीच डिप्रेशन मध्ये आहे .त्यामुळेच ती अस्थिर असावी..

उमेश:"मी काय करून बसलो अमोल..भावनेच्या भरात जराही मी डोक्याने विचार केला नाही.विचित्र वागलो. इतके.अमोल, प्रिया मला जाता जाता म्हणाली पुन्हा कधी भेटू नकोस....प्रिया माझ्यावर खूप खूप रागावली आहे"मला त्रास होतो आहे..मला कळत नाही काय करू..?


अमोल:"उमेश,तू तिच्या जागेवर उभा राहून बघ..मान्य आहे तिला राग आला आहे पण तिने खूप काही गमावलं आहे ..आता तिच्या आयुष्यात तिला बदल नको आहे.भूतकाळाने तिला इतके चटके दिले आहे की ती होरपळते आहे.. आपण ह्या क्षणाला तिला समजून घ्यायला हवे...आपण तिला समजून घेणार नाही तर कोण घेणार ??


उमेशने डोळे पुसले ..
बोलू लागला:"बरोबर बोलतो आहेस अमोल तू....आपणच समजून घ्यायला हवे...अमोल,प्रिया मला माफ करेल ना??ती माझ्याशी बोलेल ना?

अमोल:"उमेश,प्रियाचा राग हा काही क्षणांचा आहे..बघ ती तुलाच जवळचा मित्र मानते म्हणून तर तिने तुझ्याशी सर्व share केले..आणि हा राग नक्कीच काही दिवसाचा असणार बघ..ती लवकरच तुझ्याशी बोलेल.."

अमोलला उमेशच्या डोळ्यात पुन्हा आशा दिसली.....


इथे आईला कळून चुकले होते की प्रिया उमेशशी लग्न करणार नाही..तीसुद्धा खुश होती..

असेच दिवस जात होते..

एकाच शहरात असल्याने प्रिया आणि उमेश कुठे ना कुठे भेटायचे..... नजरा नजर झाली की प्रिया अस्वस्थ होऊन निघून जात पण उमेश मात्र तिच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रेम शोधत राहायचा..ती पाठी वळून बघेल ह्या आशेने तासनतास उभा राहायचा..तो वाट बघत होता प्रिया कधी बोलते ह्याची...


उमेशचे शिक्षण पूर्ण झाले चांगला निकाल लागला आणि त्याला लवकरच चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली..

उमेश आता कमावता झाला होता...उमेशचा स्वभाव चांगला तर होताच पण सर्वांच्या मदतीला धावून जाणं हा गुण सर्वाना आकर्षीत करत होता.प्रत्येकाच्या दुःखात उमेश सहभागी व्हायचा...


एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये काम करणारी त्याची कलीग हेतल रस्त्यातच चक्कर येवून पडली..पाठून उमेश येत होता..रस्त्यात गर्दी पाहिली म्हणून तो थांबला ..बघितले तर हेतल होती ..त्याने लगेच तिला दवाखाण्यात नेहले..हेतल शुद्धीवर आली तेव्हा तिला कळले की तिला उमेशनेच आणले होते...थोड्या वेळाने उमेश आला..तिची विचारपूस केली....

हेतल:"खूप खूप धन्यवाद उमेश"

उमेश:"त्याची गरज नाही हेतल..तू काळजी घे..हे घे खाऊन घे काहीतरी .तुझ्यासाठी मी इडली आणली आहे.हो आणि काही अजुन हवे असेल तर निःसंकोचपणे सांग.डॉक्टरांनी औषध दिले आहे ते आठवणीने घे"


हेतल खूप सुखावून गेली...किती तरी दिवसाने आज कोणीतरी तिची इतकी मनापासून काळजी घेत होते..


तेवढ्यात तिची मैत्रीण सानवी आली..


सानवी:"कशी आहेस हेतल??

हेतल:"हो गं बरी आहे आता..हा उमेश आमच्या ऑफिसमध्ये काम करतो ..उमेशनेच मला इथे आणलं"


उमेशकडे पाहून सानवी म्हणाली..:"थँक्स उमेश..खरंच तू हेतलच्या मदतीला धावून आला खरंच कौतुकास्पद आहे"


उमेश:"इतकं कौतुक करण्यासारखं काही नाही सानवी.मला जमेल तशी मदत करतो.खरं तर प्रत्येकाने केली पाहिजे"..बरं आता मी निघतो काही गरज लागली तर नक्की सांगा..


सानवी:"हो नक्कीच"


उमेश निघून गेला..

हेतल त्याला एकटक पहात होती....हेतलकडे पाहून सानवी म्हणाली:"काय मॅडम नक्की चक्कर आली होती का उमेश ला पाहून....


हेतल लटक्या रागातच म्हणाली..:"तू पण ना सानवी.....


सानवी:"तुला काय वाटतं मला काय माहीत नाही का??

हेतल:"काय माहित नाही??

सानवी:"हेच की उमेश तुला आवडतो ..तुझ्या डोळ्यात स्पष्ट दिसतंय मला त्याच्याविषयी प्रेम"


हेतल लाजली..

सानवी:"ऑफिसमधला आहे म्हणालीस ना??

हेतल:"हो गं आताच join झाला आहे..

सानवी:"तुला खूप आवडतो ना??
हेतल:"हो गं खूप आवडतो उमेश...तो तर perfect life partner आहे..... तो माझ्या आयुष्यात आला तर किती बरं होईल गं सानू"


सानवी:"तथास्तु बालिके"


दोघीही हसू लागल्या...


सानवी आणि हेतल ह्या दोघी चार वर्षांपासून room partner होत्या..हेतल ला स्वतःचं हक्काचं असं कोणी न्हवते..वडील ती लहान असताना वारले होते आणि आई सुद्धा गेल्यावर्षीच देवाघरी गेली..हेतल शांत राहू लागली होती.सानवीच होती जी तिला समजून घेत..तिचे दुःख वाटून घेण्याचा प्रयत्न करू लागली..हेतलला आता अशी व्यक्ती हवी होती तिला प्रेम देईन.. लहानपणापासून वडिलांचं छत्र हरवलं होतं.आईवर फिरणाऱ्या वासनेच्या नजरा..स्वतःला समाजापासून अलिप्त ठेवणाऱ्या आईचं दुःख पाहत आली.प्रत्येक टप्प्यावर तिला बाबा नसण्याची खंत जाणवत राहायची..घरातला कर्ता पुरुष नसला की घराचे छप्पर उडून जाण्यासारखेच आहे हे पावलोपावली जाणवत होते..


आईने वडिलांच्या नंतर नोकरी केली..हेतलला शिक्षण दिले ..तिच्या आईची इच्छा होती मी नाही कमीत कमी माझ्या मुलीने सुखी संसार करावा. तिचा सुखाचा संसार पाहीन आणि मगच डोळे मिटेन असेच नेहमी बोलत राहायची पण झालं भलतंच.. आई आजाराचे निम्मित होऊन देवाघरी गेली....


आज हेतलला आईची फार आठवण आली..सानवीकडे ती रडली..सानवी तिचे सांत्वन करत होती..

सानवी:"हेतल तू अशी रडली तर आईच्या आत्म्याला किती त्रास होईल माहीत आहे ना...??कशाला त्रास करून घेते??


हेतल:"सानू,आईची आज खरंच आठवण येते गं...का अशी मला सोडून गेली ती..?खूप एकटं एकटं वाटतं गं..तिच्याशिवाय जगणं नको वाटते.. तिने माझ्यासाठी किती स्वप्न पाहिली होती ..किती शांत वाटत होतं तिच्या कुशीत..माझ्या डोक्यावरून हात फिरवायची ,गोंजारायची तेव्हा खुप छान वाटायचे..तिला गच्च मिठीमारुन झोपायचे..कुठे शोधु ते हात?कुठे शोधू ते प्रेम???

सानवी:"आपल्या हातात आहे का ते हेतल??आईची सोबत तुला तिथपर्यंत होती गं राणी...तुला तिने शिक्षण दिले, स्वतःच्या पायावर उभे केले..खूप काही दिले तिने..आणि ती जरी सोबतीला नसली तरी तिचा आशीर्वाद तुझ्या पाठी आहे हे विसरू नको..हो आणि आईने मला तुझी जबाबदारी दिली आहे....आई एक दिवस मला म्हणाली होती.."माझ्या नंतर माझ्या हेतलची काळजी घे,तूच आहेस माझ्यानंतर तिची काळजी घ्यायला"

आणि आईने म्हंटल्या प्रमाणे मी तुझी काळजी घेणार आहे ...बरं चल तू औषध खाऊन घे..आणि प्लिज आता रडु नकोस..आधीच त्रास होतो आहे ना..


हेतल डोळे पुसत म्हणाली:"थँक्स ,सानू किती काळजी घेते गं माझी"

सानवी:"हो पण आता लवकरच ह्या जबाबदारीतून मी मुक्त होणार आहे"


हेतल:"म्हणजे?"

सानवी:"अगं राणी आता उमेशची होणार ना तू मग तुझी जबाबदारी उमेशकडे सोपवणार आहे"

हेतल:"सानू तू पण ना अजून कशात काहीच नाही आणि तू मला स्वप्न दाखवायला लागलीस"


सानवी:"स्वप्न बघितल्याशिवाय पूर्ण होत नाहीत dear हेतू"


हेतू विचारात गर्क झाली.....

सानवी:"काय मॅडम कुठे हरवलात?"


हेतल:"काही नाही"

सानवी:" काही नाही काय??ते मला माहित नाही ..आधी तू मला सांग हा काय विचार करते आहे ते ..स्पष्ट चेहऱ्यावर दिसते आहे??


हेतल:"सानू,खरंच सांगू का???


सानवी:"हो गं माझी आई सांग लवकर"

हेतल:"जेव्हा मला जाग आली तेव्हा उमेश आला..त्याने माझ्यासाठी इडलीसुद्धा आणली...तेव्हा अचानक मला त्याच्यात आईचा भास झाला.असं वाटलं जणू आईच माझ्या सोबतीला आहे...मला आवडतात म्हणून आई सर्रास इडली करायची..अगदी मला कधी राग आला तरी मला मनवायला आणि मी आजारी असले तरीसुद्धा इडली ठरलेलीच असायची...खूप छान वाटलं गं सानू आज....


सानवी:"बघ हेतल हेच काही तरी संकेत आहेत ज्याअर्थी आईचा भास होतो आहेस म्हणते ह्याचा अर्थ उमेश तुझ्या आयुष्यात नक्कीच येईल..हो आणि यावाच हीच मी प्रार्थना करते...म्हणजे माझ्या डोक्यावरचं ओझं तरी जाईल.. जरा डिवचत सानवी हेतलला म्हणाली..

हेतल:"काय गं सानू मी काय ओझं आहे का??


सानवी:"अगं डम्बो मस्करी केली गं...तुझ्याशिवाय माझं कधी पान हलतं का???
तू माझी बेस्ट फ्रेंड आहे...तू अपुन का लाईफ है मेरी जाण,तेरे बिना जिंदगी कुछ भी नही "


हेतल हसायला लागली....तिला पाहून सानवी..


हेतल:" सानू झाले तुझे डायलॉग सुरू,तू ना हे असं प्रायव्हेट कंपनीत जॉब करण्यापेक्षा कुठेतरी छान चित्रपटात काम करायला हवे होते.. म्हणजे तुझी हौस पूर्ण झाली असती..आणि तुझे असले भयंकर डायलॉग ऐकण्याची पाळी आली नसती.."


सानू:"बरोबर गं हेतल आता तू माझे डायलॉग कशाला ऐकशील ?आता तुला उमेशच्या प्रेमाचे गीत ऐकायचे असतील ना??


हेतल:"सानू तू पण ना"


सानू:"हो आता चल थोडा आराम कर ..मी डॉक्टरांशी बोलून येते"....

सानू डॉक्टरांशी बोलायला गेली...

इथे हेतल उमेशला आठवू लागली....

हेतलच्या डोळ्यात अनेक स्वप्न साठू लागले होते... उमेशच्या भूतकाळाची तिला पुसटशी कल्पनासुद्धा नव्हती...तिला फक्त इतकं माहीत होतं.. ती उमेशच्या प्रेमात पडली आहे...काहीही करून उमेशला मिळवायचे .....


क्रमशः.

तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या..आजचा भाग आवडल्यास लाईक, शेअर आणि मला फॉलो जरूर करा.
©®अश्विनी ओगले..








🎭 Series Post

View all