प्रेमस्पर्श भाग १०

Love Transform Life


गेल्याभागात पाहिले की उमेशला परीक्षेत kt लागते.. तेव्हा मात्र त्याचे आई वडील धीर देतात..आई त्याला उदासीचे कारण विचारते. तेव्हा तो अमोल आणि प्रिया दोघेही कॉलेजला नसल्याने पहिल्यासारखे मन लागत नाही हे सांगतो.. आई त्याला धीर देते आणि म्हणते "आपल्या दुःखद घटनांमुळे पूर्ण आयुष्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही"

आता पाहू पुढे...

उमेश आता स्वतःचे मन अभ्यासात रमवायला लागला..काहीही करून मनावर, भावनावर ताबा मिळवणं महत्वाचे हे त्याने जाणले होते....

कॉलेजच्या अभ्यासक्रमासोबतच तो विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागला.उमेशने वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि त्यात त्याला प्रथम पारितोषिक मिळाले .उमेशचे आई वडील आता उमेश पहिल्यासारखा होत असलेला पाहून निश्चित झाली...त्या काळात अमोलशी भेटीगाठी होता..त्याच्यासोबतही वेळ घालवू लागला.उमेशमध्ये झालेला बदल अमोलला सुखावून गेला..प्रिया अमोलसाठीही एक कोडं होऊन बसली होती..कशी असेल ,कुठे असेल हे त्यालाही जाणून घ्यायचे होते पण प्रियाकडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते..


एकदा अमोलनेच विषय काढला...

अमोल:"उमेश,प्रियाची काही खबर??

खूप दिवसाने प्रियाचे नाव ऐकताच अमोलला भरून आले पण ह्यावेळी मात्र उमेश जास्त बोलला नाही.त्याने लगेच दुसरा विषय काढला....

नेहमीच प्रियाविषयी भरभरून बोलणारा उमेश आज मात्र काहीच बोलला नाही म्हणुन उमेशला आश्चर्य वाटले...


तो पुन्हा उमेशच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला"उमेश तू प्रियावर रागावला आहेस का"?


उमेश:"नाही रे मी तिच्यावर का राग धरू?"


अमोल:"नेहमीच तिच्याविषयी भरभरून बोलायचास....आणि आज काहीच नाही..खरं तर मी तिचे नाव काढायला नको होते पण मलाही तिची आठवण अधूनमधून येते....आज सहज तिच्याबद्दल विचारावे वाटले.....sorry उमेश तुला वाईट वाटलं असेल तर"

उमेश:"सॉरी काय अमोल..असं काही नाही..तु मला त्रास देण्यासाठी प्रियाचे नाव नक्कीच काढलं नाहीस..हे मला चांगले माहीत आहे....अमोल प्रियावर राग येण्याचा प्रश्न येत नाही..प्रियावर मनापासून प्रेम केले आहे मी ...तिचे असे आयुष्यातून एकाएकी निघून जाणे मनाला चटका लावून गेले पण मला हे जरूर माहीत आहे तिची काहीतरी मजबुरी असणार..तिने मुद्दामून असे केलेच नसणार...प्रिया प्रत्येक नातं मनापासून निभावणारी होती,जपणारी होती..नात्याचं महत्व किती आहे हे तिला चांगलेच ठाऊक होते म्हणून तिच्यावर राग येण्यासारखे काहीच नाही....तू स्वतःच म्हणाला होता आठवतंय जेव्हा ती स्टेजवर आली तेव्हा ती माझ्याकडे पहात होती ..अर्थात तिच्यासाठी मी महत्वाचा होतो म्हणूनच तर ती मला बघत होती..पण मीच पाहिले नाही.तिला पाठी वळून कारण मला भीती वाटत होती तिला पाहण्याची हिम्मत झाली नाही..ज्याच्यावर मनापासून प्रेम केले त्या व्यक्तीला जेव्हा आपण दुसऱ्याचे होताना पाहतो तेव्हा खूप त्रास होतो.. देवाकडे हीच प्रार्थना हा दिवस कोणाच्याही वाट्याला नको....कोणाच्याही वाट्याला नको..देवाला हेच म्हणतो मी"माझी प्रिया जिथंही असेल तिथे सुखी राहू दे,तिच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहू दे.तिची सर्व स्वप्न साकार होवो....ती सुखी ,समाधानी राहो......

तुही तुझ्या परिस्थितीमुळे कॉलेजसोडून गेलास..तुमच्या दोघांची सवय होती मला अचानक असे झाल्याने माझं मन कशातच लागेना..मी तुला वचन दिले होते की मी अभ्यासाकडे लक्ष देईन पण अमोल काही केल्याने माझं कशातच मन लागेना....मी तुला सांगितले नाही मला kt लागली ...


अमोल:"खरं की काय उमेश ??.मला तर विश्वासच बसत नाही ...शाळेत तू कधीच एक नंबर हुकवला नाही आणि आता kt????


उमेश:"हो अमोल खरं तर खूप खचून गेलो होतो..कळतंच न्हवतं काय करावे..आई बाबांना मी दुखावलं.. त्यांनीच मला धीर दिला..आई म्हणाली एखाद्या घटनेमुळे संपूर्ण आयुष्यावर परिणाम करून घेणे चुकीचे आहे..तेव्हा खरंच जाणवलं की आता सावरण्याची गरज आहे....आता नाही तर कधी नाही..माझ्यासाठी नाही तर कमीत कमी आई वडिलांसाठी.. स्वतःमध्ये बदल करायचा.ज्या गोष्टीचा त्रास होतो आता त्याचा विचार अजिबात करायचा नाही..

मनाशी पक्क केले स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही....त्या दिशेने प्रयत्न करु लागलो..अभ्यासाकडे, छंदामध्ये मन रमवू लागलो..खूप त्रास झाला रे अमोल स्वतःला सावरताना ..प्रियाची आठवण येत नाही असा एकही दिवस जात नाही ..इतक्या वर्षाचा सहवास आणि आता बस एकटा पडलो....एकटेपणा घालवण्यासाठी प्रयत्न करतो आहे अमोल...प्रिया माझ्या आयुष्यातील दुखती नस आहे म्हणून मी जास्त विचार करत नाही..कारण विचार केला तर मी दुखीच होणार... मी दुःखी झालेलो आई वडिलांना बघवनार नाही,तुला बघवनार नाही कमीत कमी तुम्हा सर्वांसाठी मी आनंदी राहण्याचा प्रयन्त करतो आहे....


अमोल:"मी निशब्द झालो उमेश..किती समजूतदार झालास तू....तू जो निर्णय घेतला तो योग्यच आहे.स्वतःला सावरनं किंवा जुन्या आठवणीत स्वतःला त्रास करून घेणे ह्यातील सर्वोत्तम पर्याय म्हणजे स्वतःला सावरने होय आणि तू तेच करतो आहे..तू अगदी योग्य मार्ग निवडला आहेस बघ...आणि उमेश मनापासून सॉरी मीसुद्धा तुला हवा तसा वेळ देऊ शकलो नाही....

उमेश:"अमोल तू सॉरी नको म्हणुस उलट मीच सॉरी बोलायला हवे...तुसुद्धा इतक्या कठीण परिस्थितीतून जात होता आणि मी माझ्याच दुःखात होतो..उलट मीच तुझी माफी मागायची आहे अमोल....."


अमोल:"नको मित्रा सॉरी म्हणायची खरंच गरज नाही..आपल्या दोघांचा काळच असा होता म्हणायचा.....पण एक आहे उमेश ह्या कमी वयात आलेल्या अनुभवामुळे खूप काही शिकलो आपण...उगाच म्हणत नाही अनुभव हाच खरा शिक्षक. जे ज्ञान पुस्तकात मिळत नाही ते आपल्याला आयुष्यातल्या अनुभवातून मिळते...

उमेश:\"हो अमोल खरंच ह्या अनुभवाने खूप शहाणे केले..कधी कोणती गोष्ट होईल सांगता येत नाही म्हणून समोर परिस्थिती कशी जरी असली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी प्रत्येकाने करावी ..म्हणजे येणाऱ्या समस्येवर तोडगा काढता येतो...नाही का??


अमोल:"अगदी बरोबर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जाण्याची मनाची तयारी असावी"


उमेश:"आई कशी आहे..?खूप दिवस झाले त्यांची भेट झाली नाही"..


अमोल:"आई तर आता एकदम ठणठणीत झाली आहे . ती अधूनमधून तुझी आठवण काढते...

उमेश:"ताई कशी आहे?सावरली का ती ??


अमोल:"हो उमेश ताई सावरली आता..वेळ सगळ्यात उत्तम औषध आहे हे ताईकडे बघून कळतं..आता ताई पुन्हा कामाला जाऊ लागली आहे.तुला माहीत आहे का तिने आता एक घरसुद्धा घेतले आहे"


उमेश:"वा अभिनंदन ..खरंच खूप छान.....


अमोल:"हो रे अमोल आता हल्ली ती सामाजिक संस्थांना मदत सुद्धा करते.…अनाथ आश्रमात जाऊन ती तिथे सेवा करते.. स्वतःच्या सोबत ती आईलाही घेऊन जाते..दोघीही आता खुश राहतात..त्यांना पाहून बरं वाटतं....नाही तर काही महिन्यांपूर्वी कोसळून गेलो होतो ..मला सुचतच न्हवते काय करायचे.पण आता सर्व सुरळीत झाले...ताईमध्ये इतका आमूलाग्र बदल झालेला पाहून समाधान वाटतं.. ती पुन्हा आली होती तेव्हा तिला पाहिले तर अगदी पोटात खड्डा पडला होता कसं होईल?काय होईल?ती त्या परिस्थितीतून बाहेर पडेल की नाही खूप खूप विचार येत होते.. पण आता मात्र ती स्वतः सावरली आणि दुसर्यांनाही मदतीचा हात देते आहे..खूप खूप अभिमान वाटतो तिचा..तिला पाहून एक वेगळी ऊर्जा मिळते..

उमेश:"खरंच रे ताई ग्रेट आहे..अश्या परिस्थितीतून स्वतःला सावरलं आणि मदतीचा हात तिने पुढे केला...मला ऐकूनच खूप आनंद झाला आणि खरं सांगू का ताई एक उत्तम उदाहरण आहे खचलेल्या मनासाठी..

अमोल:"अगदी बरोबर,चल आता भेटू लवकरच ."

दोघांनी मिठी मारली निरोप घेतला.....


उमेशला ताईचे कार्य ऐकून फार कौतुक वाटू लागले..

तो घरी आला आणि आईला सांगू लागला....


ताईची कहाणी आईला सांगितली तेव्हा आई उमेशला म्हणाली.

"खरंच पोरगी खूप धीराची निघाली ,प्रेमात धोका झाला,कोसळली आणि आता अशी नव्याने उभी राहिली की सर्वाना आधार देऊ लागली..बघितलं अमोल प्रत्येक वेळ सारखी नसते... तिच्या आयुष्यात इतकी दुःखद घटना घडली की ती खचून गेली होती पण त्या एका घटनेचा परिणाम तिने पूर्ण आयुष्यावर होऊ दिला नाही......ह्यालाच म्हणतात आयुष्य.. पूर्णपणे तुटून गेल्यावरही नव्याने सुरवात करणे. नवीन पर्वास प्रारंभ करणे..... नशीब आपल्या सोबत प्रत्येक वेळी खेळत असते..असा फासा आयुश्यात टाकत असते की असं वाटतं आपण आता फक्त आपलीच हार आहे..आपण हरलो की निराश होतो नाराज होतो ..त्यालाच डिप्रेशन असे म्हणतात..पण तुला माहीत आहे आपण जर न थकता लढत राहिलो तर मात्र नशीब एक दिवस आपल्या हातात फासा देतो आणि मग विजय फक्त आपलाच असतो..तो विजय असा होतो की नशीब फक्त हातावर हात ठेवून बघत राहते...म्हणून आपण ठरवायचे काय करायचे.. हातावर हात ठेवून लढायचे की स्वतःवर विश्वास ठेवून मार्गक्रमण करत राहायचे..... हरलो म्हणून रडायचे नाही तर जिंकण्यासाठी पुन्हा त्वेषाने चवताळून उठायचे..मग विजय आपलाच होतो बाळा...


उमेश:"आई अगदी बरोबर म्हणालीस..तुझा शब्द नी शब्द प्रेरणा देणारा आहे..हरलो म्हणून गप्प मुळीच बसायचे नाही..


आईला आज किती दिवसाने उमेशच्या डोळयात चमक दिसली. ती फार खुश झाली...किती दिवसाने उमेश आईशी खुलुन बोलला होता ..आज त्याच्यात वेगळीच ऊर्जा दिसली..


अमोलच्या ताईची कहाणी ऐकूनच उमेशलाही मार्ग सापडला होता..उत्साह आला होता..खरं तर आपल्यापेक्षाही जगात दुःखी लोकं आहेत जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्याला आपली दुःखं नगण्य वाटू लागतात...तसेच उमेशचे झाले होते...अमोलच्या ताईच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली असताना देखील ती पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली ..फक्त उभी नाही राहिली तर इतरांना आधार देऊ लागली..ताई inspiration देऊन गेली.ताईच्या कहाणीने हरवलेला उमेश जणू पुन्हा उमगला होता..

मोकळा श्वास त्याने घेतला होता..


एक मात्र नक्की होते आता उमेश पुन्हा नव्याने आयुष्याची सुरवात करणार होता....पाठचं जरी विसरता येणार नसले तरीसुद्धा पुढे वाटचाल करण्याचं धैर्य त्याला आले होते..


आता आपली स्वप्न कशी पूर्ण करायची.. पुढे कशी प्रगती करायची ह्याचा गंभीरपणे विचार करू लागला...

आज अमोलच्या भेटीमुळे उमेशलाच जणू भेट मिळाली होती

दुःखाच्या ओझ्याखाली दबलेल्या आयुष्याने मोकळा श्वास घेतला होता... नव्याने तो जगू लागला होता....

क्रमशः

लेख अवडल्यास लाईक ,शेअर,कंमेंट करा..मला फॉलो करायला विसरू नका..©अश्विनी ओगले...

🎭 Series Post

View all