प्रेमरोग भाग 6

कथा एका अव्यक्त प्रेमाची.



।। प्रेमरोग ( भाग 6 समीर खान) ।।


असंही सागर आणि तिच्यात होतं तरी काय? कुठे दोघांनी प्रेमाची कबुली दिली होती एकमेकांना? दिली असती तरी या प्रेमाचं काय भविष्य होतं? चित्पावन ब्राम्हणांच्या घरी मांसमच्छी खाणार्‍या घरातली मुस्लिम मुलगी सुन म्हणून त्यांनी स्विकारली असती? या नात्याला काहीच भविष्य नव्हतंच मात्र मनाचं काय? प्रेम तर कुणावरही होउ शकतं ना?ठरवून प्रेम केलं जात नाहीच. ठरवून केलेलं प्रेम प्रेम असतं का? प्रेमाला कुठल्याच बंधनात बांधता येत नाहीच पण सामाजिक बंधनं? तहेजीब...संस्कृती? तिच्याकडे या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं नव्हतीच.

काकांनी आणलेलं स्थळ तसं पाहिलं तर सर्वतोपरी तिच्या दृष्टीने अगदी योग्य होतं. सुंदर, शिकलेला एकुलता एक कमावता खानदानी मुस्लिम मुलगा. अब्बु खूप खुश होते सबासाठी. आपली लाडकी लेक बोलता बोलता लग्नाला आली आणि तिचं लग्न इतक्या चांगल्या घरात ठरतंय यामुळे त्यांना आभाळ ठेंगणं झालं होतं.

" मुझे अभी शादी नही करनी अब्बु, मेरे जाॅब का काॅल लेटर आ चुका है. मुझे मेरा करीअर बनाना है अब्बु. प्लिज अब्बु मेरी शादी अभी ना कराए अब्बु. "

" पर बेटा..तुम समझ नही रही. ऐसे रिश्ते बार बार नही आते. समीर तुम्हारे लिहाज से हर तरह से काबिल लडका है. माशाल्लाह खुबसुरत है, सरकारी मुलाजीम है, खानदानी और उँचे घराणे से है. उनके हमारे बहोत पुराने तालुक्कात है बेटी, खुश रखेगा वो तुम्हे. "

" पर अब्बु..."

सबा ऐकत नाही पाहिल्यावर अब्बु एक मोठा सुस्कारा टाकत, कपाळावर जमा झालेला घाम पुसत तिथेच मटकन सोफ्यावर बसले. इतक्यात त्यांना कसलाच मानसिक त्रास सहन होत नसे. धावत जाऊन सबाने पाणी आणलं. इकडे अम्मीच्या डोळ्यातही गंगाजमूना वाहू लागल्या होत्या. बसलेल्या बापाच्या मांडीवर डोकं टेकवत सबा हमसून हमसून रडू लागली. नोकरीचा तर बहाणा होता खरंतर तिला लग्न करायचेच नव्हते.
सबाच्या डोक्यावर हात फिरवत अब्बु बोलू लागले,

" आज मै, तुम्हारी अम्मी, चाचाजान सब तुम्हारे साथ है बेटा. कल हम नही रहेंगे. कुरआन कहता है, हर जानदार चीज को मौत का मजा चखना है. जानती हो ना तुम. हमारे जाने के बाद तुम्हारा कोई अपना, तुम्हारा हमसफर भी तो होना चाहिए ना?अगर......"

" अब्बु ऽऽऽऽ " सबाने मध्येच त्यांच बोलणं थांबवत हंबरडा फोडला.

" लडके से एकबार मिललो, फिर आगे सोचेंगे क्या करना है?" अब्बुने कुठल्याच बाबतीत आजपर्यंत घरात कुणावरही जोरजबरदस्ती केली नव्हतीच. सबाला त्यांचा आग्रह टाळता आला नाही.

त्या रात्री दोघी मायलेकींचा संवाद झालाच. अम्मी मुद्दाम सबाच्या खोलीतच झोपली आणि बोलता बोलता तीने थेट मुद्दयालाच हात घातला.

" भूल जाओ उसे सबा. "

" किसकी बात कर रही हो अम्मी?"

" उसी की जिसकी याद मे तुम ये पागलपन करनेपर तुली हो. "

" आप क्या कह रही हो अम्मी..किसकी बात?ऐसा कुछ भी नही है. "

फिर ये क्या है सबा? हातातली चिठ्ठी दाखवत अम्मी बोलली. तीच चिठ्ठी जी सागरने दहावीच्या पेपरच्या वेळी आरतीकडे सबाला देण्यासाठी दिली होती. जी जिवापाड जपत सबाने ती अजून सांभाळून ठेवली होती.

" इस चिठ्ठी मे ऐसा कुछ भी नही लिखा है अम्मी. "

" वही तो मै भी बोल रही हूँ. इस चिठ्ठी मे ऐसा कुछ भी नही लिखा है. फिर क्यों तुमने इतने साल बाद तुमने सँभालकर रखी है ये चिठ्ठी? "

" बस ऐसे ही "

" मुझे सब पता है सबा. तुम्हे शादी करनी ही नही है. तुम एकतर्फा मोहब्बत मे गिरफ्तार हो चुकी हो सबा. रिहा करो खुद को इसमे से. जिस प्यार का अब तक इजहार ही ना हुआ हो ऐसे प्यार के लिए खुदकी जिंदगी तबाह करने के अलावा तुम्हे कुछ हासिल नही होगा. "

मनावरचं कितीतरी मोठं ओझं उतरलं होतं आज सबाच्या. अम्मीच्या कुशीत शिरून ती रडू लागली.

" ये बाते अब मेरी हद से परे है अम्मी, उसे भुलाना अब मेरे बस की बात नही. "

" इन बातो का हासिल कुछ नही है सबा. जितना रोना है रो लो. कल तुम्हे लडकेवालो के सामने अच्छे से पेश आना है. इस बात को इसी रात के अँधेरे मे एक राज बनाकर दफन कर दो. आखिर हमारे खानदान की इज्जत का सवाल है. "

अम्मीचे हे शेवटचे दोन निर्वाणीचे वाक्य सबाच्या मनात खोलवर जखम करून गेले. आलेल्या प्रसंगाला तोंड देण्याशिवाय आता पर्याय उरला नव्हताच. उद्या तिला मुलगा पहायला येणार होता. समीर. डाॅ. समीर. सागर चं नाव पुसून हे नाव मनमंदिरात वसवणं इतकं सोप्प होतं का? याची उत्तर येणारा काळच देणार होता.

क्रमशः

©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

🎭 Series Post

View all