Feb 23, 2024
अष्टपैलू लेखक महासंग्राम

प्रेमरोग भाग 3

Read Later
प्रेमरोग भाग 3


।। प्रेमरोग (भाग 3. समीर खान ) ।।


कुठे असेल तो?काय करत असेल?त्यांचं कुटुंब मुंबई ला निघून गेलय इतकच तिला ठाउक होतं आणि केवळ याचसाठी जेव्हा मुंबईच्या जाॅबची ऑफर आली तेव्हा तीने ती पटकन स्विकारली. मुंबईची धावपळ पसंत नसतानाही. याच एका आशेवर की या गर्दीत कधीतरी का होईना त्याचा चेहरा नजरेस दिसेल. तो भेटेल. सागर. सागर देशमुख.

\"उनकी\" आरजू मे \"इंतजार -ए-हद\" खत्म हुई जाती है....
ऊल्फत मे खुब लुटे हम "हद -ए-इंतेहा" भी टूट जाती है...
आये ना आये "वो"...
दिल -ए-बरबाद मे "याद" तो आती है...

याशिवाय अजून काय उरलं होतं तिच्या आयुष्यात? एक एक करून सगळेच तर सोडून गेले होते. जिवापाड प्रेम करणारे अब्बु, अम्मी. आपा दुसर्‍या शहरात. या प्रशस्त फ्लॅट मध्ये रहायला आल्यावर कमीतकमी अम्मीची तरी सोबत होती. तिची एकमेव इथली जिवलग सखी. प्रत्येक निर्णयात ठामपणे सोबत उभी राहणारी. तिच्या मनाची चलबिचल समजून घेणारी. करोना नामक राक्षसाने संपवलं तिच्या अम्मीला. अब्बु तर जुन्या घरात असतानाच सोडून गेलेले. अब्बु गेल्यावर मोडून पडलेली अम्मी तरीही वरवर स्वतःला अतिशय खंबीर भासवणारी. दोघी मायलेकी तासनतास बोलत बसायच्या.

" आपने कभी मोहब्बत की है अम्मी?"

" की है ना, तुम्हारे अब्बु से ".

" शौहर से मोहब्बत तो सबही करते है अम्मी. "

" इस खानदान मे जब ब्याह कर आइ तब मेरी उमर ही क्या थी?बारह साल. तेरी दादी ने बहोत सँभाला मुझे और उससे भी अच्छी बात ये के तुम्हारे अब्बु को तालीम, तरबीयत भी कमाल की दी थी उन्होने. "

" बारह साल? R u serious अम्मी? "

" तब ऐसेही होता था बेटी. "

" मतलब आपका और अब्बुका बचपन साथ मे ही बिता?"

" बेशक, कुछ ही साल तो बडे थे वो मुझसे. तुम्हारे दादा के सामने तो नही,पर दादी के सामने हमे कुछ रोक टोक नही थी धमाचौकडी की. मै छत तक भागती और वो मेरे पिछे भागते. हसी, ठिठौली. धम से आजाते और मुझे डरा देते. घंटो हमारी नोंकझोंक चलती. "

" मतलब आप दोनो बचपन के साथी थे?" सबाच्या डोळ्यात उत्सुकता दाटून येत असे. या आधी कितीही वेळा हा प्रश्न विचारला असला तरी .

" हाँ बाइ हाँ " अम्मी खळखळून हसायची.

" प्यार की पहली सिढी दोस्ती होती है ना अम्मी? " तिच्या या प्रश्नाचा रोख अम्मीला समजायचा तरीही ती सबाला तसं काहीच जाणवू द्यायची नाही.

प्रेमाची पहिली पायरी मैत्री जरूर असते पण यासोबतच आणखी एक गोष्ट गरजेची असते ते एकमेकांवर असणारा एकमेकांचा विश्वास. अम्मी नेहमीच सबाला समजावयाची. त्या दोघांच्या एकमेकांवर असणाऱ्या विश्वासाचे दाखले द्यायची आणि सबा त्यात रमून जायची.

विश्वास तर त्यालाही होताच ना माझ्यावर ? स्वतःपेक्षा कितीतरी जास्त. अगदी चामडी सोलवटून काढली त्याच्या वडिलांनी तरी सबा ला भेटणं चुकीचं नाही हा विश्वास.

"आऽह.. स्स स्स... "

" सागर्‍या, काय झालं? दाखव? काय झालं? "

"काही नाही गं , असच "

"ते काही नाही, शर्ट काढ "

"नको "

"मी बोलतेय ना शर्ट काढ "

"या खुदा, कुणी मारलं रे तुला? तुझ्या वडीलांनी ना? का? "

"काही नाही गं , अभ्यास नव्हता केला म्हणून.. "

"सपशेल खोटं, अभ्यास नेहमीच पुर्ण असतो तुझा, मला नको शिकवू, नायतर मीच जावून विचारते काकांना, थांब "

"सबा ऽऽऽ ,थांब गं सबा , सबा ऽऽऽ एवढं मारलं ते कमी आहे का??? "अनपेक्षितरित्या सागरच्या तोंडून त्याला मारण्याच्या कारणाचा ऊलगडा झाला.
सबा जागच्या जागीच थबकली , "काय ऽऽ ??"

"पुन्हा एकदा बोल सागर... "

"सबा तू पण ना... काहीच नाही जाऊदे... " म्हणत सागर घराकडे वळाला .त्यामागोमाग सबाही न रहावून आली. सबा आलेली सागरने पाहिलेच नाही. आत शिरताच सागरचे वडील त्याच्यावर खेकसले..

"चला, तर आता बारी इथवर आलीये की पट्टयाने सोलून काढूनही राजे ऐकायला तयार नाहीत. थांबा. आणखी थोडे दिवस.बंदोबस्त होईलच तुमचा. या असल्या \"मोहल्ल्यात \"रहाव लागतयं त्याचीच ही शिक्षा समजायची आणखी काय? "

"अहो, लहान आहेत हो मुलं " सागरची आई रडतच बोलली.

"छान, तुमचाच पाठींबा आहे म्हणा त्यांना त्याशिवाय का त्यांची हिम्मत होणार? आज लहान आहेत उद्या मोठी होतील मग काय.." फरफटतच आत नेत दार लावून घेतलं सागरच्या बाबांनी. आईचं ओरडणं कानावर येत राहीलं.

" दार उघडा बाबा ..आईला नका मारू..पुन्हा नाही होणार बाबा..पुन्हा नाही होणार. "

टपटप टपटप पडणारे त्याचे अश्रू.त्याला बघून हिचे झरणारे अश्रू.

विश्वास तर होताच. हा पुर्ण प्रसंग सबाला जसाच्या तसा स्मरणात होता.

क्रमशः

©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा आहे ?)

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Sameer Khan

Writer

मी समीर खान या टोपणनावाने लिहितो, लिहितो म्हणण्यापेक्षा व्यक्त होतो हे म्हणणे अधिक सोयिस्कर होईल.लिहिणे हा माझा छंद आहे आणि माझं लेखन वाचकांना आवडतं ही माझ्या साठी खूप मोठी गोष्ट आहे.

//