प्रेमरोग भाग 10 अंतिम भाग .

कथा एका अव्यक्त प्रेमाची.


।। प्रेमरोग (भाग 10 अंतिम भाग.समीर खान) ।।


सागर, आरती आणि समीरमध्ये नेमकं काय झालं? इतकंच काय तर सागर समीरला भेटला तो ही या लग्नात येतोय याबाबत कसलीच माहिती सबाला नव्हतीच. सबा याबाबत अनभिज्ञ होती.

हलक्या गुलाबी रंगाचा चुडीदार, बारीक वेलबुट्टीची जरदोजी कलाकुसरीची तलम ओढणी, मोकळे सोडलेले केस, मोत्यांचे नाजूक दागिने आणि साजेशी लिपस्टिक लावून सबा तयारही झाली होती.आरती तिला आश्चर्याने बघतच राहीली.

" क्या बात है सबा, आजभी तुम्हारे जलवे बरकरार है, कयामत लग रही हो " आरती सबाला चिडवत बोलली.

सबाने आरशात स्वतःला पाहिलं आणि पुन्हा एकदा त्याच्या आठवणीने डोळ्यात ढग दाटून आले. आपसूकच समीर आठवला आणि अश्रूंची जागा स्मितहास्याने घेतली.
पुढच्याच क्षणी तिने स्वतःला सावरलं. पुन्हा एकदा ओल्या डोळ्यांच्या कडा पुसत तीने आयलायनर लावला आणि दोघी घराबाहेर पडल्या.

लग्नाच्या गर्दीत अचानक सागरचं दर्शन सबाला झालं. क्षणभर ती अचंबित झाली. हा आपला भास की खरंच दिसतोय या दुविधेत ती हरवली. पुढच्याच क्षणी ती आकृती लाॅनकडे रवाना झालेली दिसली. त्याच्या मागोमाग सबाही चालती झाली. गर्दीत हरवलेला तो चेहरा शोधत असताना ती आतून खूप अस्वस्थ झाली. इतकी की तिचा जीव घाबराघुबरा झाला. चिंतातिरेकाने ती कोसळणार तोच पुढच्याच क्षणी एका मजबूत हातांच्या कुशीत ती विसावली.

" सबा ऽऽऽऽऽ सबा ऽऽऽऽऽऽ" समीरने तिला तोलून धरलं होतं. समीरच्या आवाजाने सबा भानावर आली. तोपर्यंत आरतीही तिथे आली होती. तिला कोल्ड्रिंक पाजत तिघेही खुर्च्यांवर बसले. सबा आता बर्‍यापैकी रिलॅक्स झाली होती. लांबून सागर हे सगळं पहात होता. आपण सबाच्या आयुष्यातलं दुःस्वप्न आहोत याची जाणीव त्याला झाली आणि तो चालता झाला. तो जात असतानाच एका हाताने त्याचा हात ओढत त्याला थांबवलं. तो हात समीरचा होता.

" कहाँ जा रहे हो सागर? अपनी सबा से बिना मिले?" तो काही बोलणार तोच आरती सबाला घेउन तिथे आली. सागरला समोर पाहताच सबाला प्रेम, राग, आपुलकी, संताप, माया सर्व भाव एकत्रितच दाटून आले. आपल्या बालमित्राला कडकडून मिठी मारून दोन गुद्दे त्याला टाकावे असे मनोमन तिला वाटून गेले. मात्र हे करण्यास ती धजावली नाही. समीरकडे पाहून ती थबकली. तो मात्र अगदी शांत वाटत होता.

" मिल लो सबा..अपने सागर से..." समीर हे बोलत तिथून निघून जाऊ लागला.

" तुम कही नही जा रहे समीर..समझे तुम? " सबाने समीरला तिथेच थोपवले.

पुढच्याच क्षणी तडाडकन चापट मारण्याचा आवाज आला. थोडावेळ काय झाले ते कुणालाच समजलं नाही. सबाने सागरला एक जोरदार थप्पड लगावला होता आणि पुढच्याच सेकंदाला ती सागरला मिठी मारून ओक्साबोक्सी रडू लागली. सागरही हतबल होऊन रडत होता. भावनावेग ओसरताच काहीच न बोलता ती माघारी फिरली आणि समीरचा हात धरत ऊभी राहीली.

" मुझे प्यार करना तुमने सिखाया सागर पर प्यार निभाना समीरने. बिना कुछ सोचेसमझे तुम मुझे छोडकर चले गये. चिठ्ठी लिखी भी तो उसमे भी एक लफ्ज का भी जिक्र तुमने नही किया सागर की, तुम मुझसे प्यार करते हो. उस एक चिठ्ठी के सहारे मै आज तक तुम्हारा ईंतजार करती रही. मेरे अम्मी, अब्बु तक को खो दिया मैने. किसी की पर्वा नही की. समीर को तक मैने आज तक हाँ नही की. मुझे बस एक आखरी बार तुमसे मिलने की ख्वाहीश थी. जो आज समीरने वो भी पुरी कर दी. तुम मेरा बिता हुआ कल थे सागर और बिता हुआ कल दोबारा पलट कर नही आता. समीर मेरा आज है. आज अगर मै समीर के साथ नही गयी तो ये मोहब्बत की तौहीन होगी सागर. मोहब्बत दो तरह की होती है, किसीको अपना बना लो या किसी का हो जाओ. तुमने मुझे अपना बनाया सागर पर समीर मेरा होकर रह गया और अगर आज मै ऊसे छोड दूँगी तो वो कहीका भी नही रहेगा. इस दुनिया का मोहब्बत से ऐतबार ही खत्म हो जायेगा. आज मै पुरी तरह से समीर की हो चुकी हूँ. सिर्फ समीर की. इसी बात के लिए मै रूकी हुयी थी की कब मेरा जमीर मुझे गवाही देगा? आज मेरे जमीर ने मुझे ये गवाही दे दी सागर. मै सिर्फ समीर की हूँ अब. "

समीरसाठी हे खूप अनपेक्षित होते. त्याच्या प्रेमाचा विजय झाला होता. सागर ला ही त्याची चुक कळून चुकली होती. पुढच्याच काही दिवसांमध्ये सबा आणि समीरने मिळून सागरच्या जिवनातल्या एकुण एक समस्यांचा तोडगा काढत त्याला पुनरुज्जीवन दिलं होतं. कितीही केलं तरी तो तिचा जिवलग मित्र अजूनही होताच.

यथावकाश समीर आणि सबाचा धुमधडाक्यात निकाह पार पडला आणि या विवाहसोहळ्यात सर्वात पुढे सागर होता. सागरची आई आवर्जून उपस्थित होती. त्यांच्या उपस्थितीत साक्षात अम्मीच उपस्थित आहे की काय याचा भास सबाला झाला. रूखसतीच्या वेळी तीने आईला कडकडून मिठी मारली. आईनेही आपल्या लाडक्या लेकीला भावपूर्ण निरोप दिला.
पुर्ण वातावरणात समाधानाचं भरतं आलं. सबा ऑफिशिअली मिसेस समीर खान झाली होती. सजवलेल्या कारच्या मागच्या बाजूस ठळक अक्षरात लिहीलं होतं.

" दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे. "

समाप्त.


©® समीर खान. (आपला बहुमूल्य अभिप्राय नक्की द्या कारण पुढच्या फेरीत प्रवेश मिळण्यासाठी हा अभिप्राय खूप महत्वाचा

🎭 Series Post

View all