प्रेमात बदलू आपण जरा जरा भाग 4.

Premat


निखिल आणि मृदुला दोघे छान दिसत होते..

मृदुला पुन्हा आत गेली आणि हिरव्या रंगाची पैठणी नेसून आली..त्यावर छान मोत्यांचे दागिने घालून आली...आंबोडा घातला ज्यावर मोगऱ्याचा एक गजरा तो त्या भोवती गुंढळला होता... पायात पैंजण ते ही मोत्याचे...हातात बांगड्या त्या ही मोत्याच्या...मधो मध हिरव्या बांगड्या... गळ्यात चिंचपेटी...कानात मोत्यांचे फुल...त्यात नारंगी खडा... टिकली ती ही मोत्यांची आणि त्या खाली एक खडा....ती आता खरी मराठी मुलगी वाटत होती...केस मोकळे सोडले होते.... केसांची साधी style केली होती...पदर मोकळा सोडला होता... एका बाजूने सगळे केस समोर घेतले होते जसे निखिलला आवडतात अगदी तसे... ओठावर हलकी गुलाबी रंगाची लिपस्टिक लावली होती...काजळ ही लावले होते... liner तर अगदी मृगनयनी style लावले होते... पण जरा हलके केले होते... अगदी तिने कॉलेजच्या फेर वेल च्या वेळी लावले होते तसे... आणि पुन्हा निखिल घायाळ झाला होता तिला बघून...आज ही तेच होणार होते हे नक्की...

आईने तिला आवाज दिला....

तसा निखिल ही उठला आणि सगळ्यांची परवानगी घेऊन म्हणाला ," तुमची जर काही हरकत नसेल तर मी माझ्या होणाऱ्या मंगेतर ला स्वतः बाहेर घेऊन येऊ शकतो का, मला तिला बाहेर घेऊन यायची खूप इच्छा आहे... मी तिला थोडे surprise देऊ इच्छितो... म्हणजे ती अपेक्षित करत असेल की ,काकू आत जातील आणि तिला बाहेर घेऊन येतील...पण तसे न करता मीच गेलो तर अजूनच तिला धक्का बसेल...मला पाहिल्यावर may be... जास्त आंनद होऊ शकतो...आणि तोच आंनद मला तिच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे....पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा तुम्ही सगळे मंडली लोक मला तिला भेटू द्याल..."

मृदुलाची आई...."नक्की जा आमची तुम्हाला फुल्ल permission आहे, मीच जाणार होते तिला समोर पोहे घेऊन यायला,पण असो...तुमची ही इच्छा आम्हाला मान्य आहे... तिचा आनंद जास्त महत्वाचा आहे आमच्यासाठी.. आणि फक्त तिलाच आनंद होईल असे ही नाही वाटत तुमच्या कडे बघून...तिला जितका आनंद होईल तितका तुम्हाला ही होणार ह्यात शंका नाही.... तुम्ही तिला बघायला आतुर आहात तितकी ती ही आहे...खास करून तिला पैठणी मध्ये बघायचे आहे, तिला ही तुम्हाला त्याच साडी मध्ये समोर यायचे आहे हे ठरले होते... मग वाट बघू नका,जा बिनधास्त तुम्ही आत... ती तिकडे तुमचीच वाट बघत असेल हे मला चांगलेच माहीत आहे... मी तर म्हणते तुम्ही surprise द्यायला जाल..आणि तुम्हीच surprise व्हाल...तशी मृदुला पक्की निखीलमय झालीय surprise देण्यात...आणि दुसरे म्हणजे तुम्ही आवड खूप जपतेय ती...आमची मृदुला स्वतःची जणू ओळ्खचं विसरली आहे जेव्हापासून ती तुमच्या घरची सून होणार आहे..आणि तुमची बायको होणार आहे.... "

निखिल आईच्या बोलण्याकडे लक्ष देत होता आणि त्यांच्या बदललेल्या हाव।भावाकडे ही त्याचे जणू लक्ष होतेच...त्याला जाणवले की मृदुलाच्या आईला आपली मुलगी इतकी निखिल मय होने इथपर्यंत ठीक आहे पण अगदी माहेरची ओळख..आणि आपल्या संस्कृतीची ओळख..तिचे बालपणापासून केलेले संस्कार हळूहळू विसरत आहे...ती इतकी ही बदलायला नको की आमची मृदुला आम्हाला च ओळखायला येणार नाही एका काळा नंतर...


आईने त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू सगळ्यांच्या नकळत पुसले होते,पण त्यांनी डोळे पुसले तेव्हा सगळ्यांनी ते पाहिले होते....तितक्यात निखिलच्या आईने त्यांना हाताशी धरून त्यांच्या जवळ बसवले...त्यांना डोळ्याने इशाऱ्याने खुणावले... तुमची मुलगी आमच्याकडे आली आहे ,म्हणजे तिची काळजी आम्ही अगदी तुमच्या सारखी घेऊ...तिकडे मृदुलाच्या बाबांना ही भरून आले होते... त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते.. नकळत दुसरीकडे तोंड केले आणि त्यांनी ही अश्रू पुसले... तसेच निखिल च्या बाबांनी त्यांना मागून हात ठेवून दिलासा दिला... तुमची लेक ही आमची ही लेक ...तइ आमच्या घरची लक्ष्मी आणि निखिल ची ती जबाबदारी...तिला सगळे सुख देऊ, तुमच्या इतके प्रेम देऊ...तिची ओळख जपू...

निखिल अजून ही त्याच्या समोर उभा होता,त्याला आता जाणवले होते,मृदुला एकुलती एक आहेच पण आई वडिलांची ती ओळख आहे, तीच त्यांचे सर्वस्व आहे...त्यांच्या घरातील एका मुलानंतर किती वर्षांनी चार भावात ,5 चुलत भावांची लाडकी बहीण आहे...म्हणून ती काळजाच्या अगदी जवळ आहे...लाडाची आहे...आईला,बाबाला,भावांना, काका काकू यांना तिच्या बद्दल खूप लळा आहे.... तिच्या असण्याने घर हस्ते,खेळते असते... घरात चैतन्य असते...बाकी काका,काकू, त्यांची मुलं इतर वेळी एकत्र नसतात पण मृदुला आली की ते सगळे वेळात वेळ काढून घरी जमतात...त्यांची छान मैफिल जमते...ठरलेल्या दिवशी हॉटेल मध्ये जातात... जितके दिवस असतील तितके दिवस मस्त गच्ची वर गप्पा टप्प्या, मौज मजा असते.. एक दिवस पिकनिक असतेच...आणि ह्या सगळ्यांची जाण मृदुला असते...मग आपण या सगळ्यांची जाण घेऊन जाणार आहोत ,म्हणजे सहाजिक आहे दुःख होणार...त्यात ती तिची ओळख विसरली तर काय ह्यांची प्रतिक्रिया असेल मी समजू शकतो...जे मला मुळीच पटणार नाही...मला मृदुला आपलीशी व्हावी असे नक्कीच वाटते पण तिची खरी ओळख बदलून नाही... मला ते मान्य नाही...प्रेमात बदल हवा पण सम्पूर्णतः नको...तिची ओळख तिचीच हवी... ती मला जशी आवडली होती त्या क्षणी अगदी तशीच... माझी मराठी मुलगी...


क्रमशः...

🎭 Series Post

View all