Jan 28, 2022
प्रेम

प्रेमाची हद

Read Later
प्रेमाची हद
प्रेमाची हद

भाग ...1

आज अर्जुन ची फुटबॉल ची मॅच होती.सकाळ पासून चार वेळा त्याला परम चा फोन येऊन गेला होता कॉलेज ला वेळेत ये म्हणून पणं आदत से मजबूर नेहमी सारखं आज ही अर्जुन चे डोळे लवकर उघडले नाहीत आणि त्याला उठायला उशीर च झाला म्हणून बाकीच्या सर्व कामांचे ही बारा वाजले होते .पटपट कस तरी आवरून त्याने आपली बाईक काढली व हाई स्पीड मध्येच कॉलेज कडे निघाला.

अर्जुन गुप्ता एका मिडल क्लास कुटुंबातील बावीस वर्षाचा तरणा ताठा मुलगा .बिकॉम् च्या शेवटच्या वर्षा चा विद्यार्थी होता पणं डिग्री नंतर पुढे काय करायचं ? हे तर त्याने इतक्या वर्षात अजून ही ठरवलं नव्हत. त्यांचे बाबा बँक मध्ये क्लार्क होते तर आई घर सांभाळायची आणि हा त्याचा एकुलता एक लाडका मुलगा.फुटबॉल चा चांगला खेळाडू होता .इतका चांगला खेळायचा की कॉलेज मधील फुटबॉल ची एक ही मॅच अर्जुन शिवाय होत नव्हती.दिसायला ही एखाद्या हिरो पेक्षा कमी नव्हता अर्जुन गोरापान ,उंच पुरा आणि खेळाडू असल्यामुळे कसलेली शरीर यष्टी .मुली तर त्याच्या फक्त एका नाजरे साठी तर्सायच्या म्हणून तर आस पासच्या इतर कॉलेज मध्ये ही अर्जुन प्रसिद्ध होता पणं अर्जुन मात्र मुलीनं पासून चार हात लांब च राहायचा.तो वाट पाहत होता त्याच्या ड्रीम गर्ल ची जी माहित नाही कुठे हरवली होती आणि कधी याच्या नजरें समोर येणार होती.

परम अर्जुन चा सर्वात जिगरी दोस्त होता.जेवढं अर्जुन ला ही स्वतः बद्दल माहिती नव्हती त्या ही पेक्षा जास्त परम त्याला ओळखत होता.अर्जुन कधी काय करेल हे तर परम चुटकी सरशी सांगत असायचा की ते ऐकून कधी कधी अर्जुन ही हैराण होत असे. परम ला चांगलच माहित होत की अर्जुन फुटबॉल चा चांगला खेळाडू आहे आणि या क्षेत्रात त्याचं करियर होऊ शकत पणं जेव्हा ही तो अर्जुन सोबत या विषयावर बोलायचा अर्जुन त्याच्या बोलण्याची चेष्टा करायचा व विषय टाळायचा.

अर्जुन स्पीड मध्ये कॉलेज कडे जात च होता की रस्त्यावर लागलेला सिग्नल कडे त्याचं लक्ष गेलं नाही आणि त्याने आपली गाडी समोरच्या उभ्या असलेल्या कार वर नेवून आदळली.

" अग आई ग! मेलो आता .आता इथे किती वेळ जातोय कोण जाणे ? आज तर मी काही कॉलेज ला पोहचेन अस वाटत नाही आज परम नक्की माझा जीव घेणार .अर्जुन आज तुझं काही खर नाही." अर्जुन स्वतः शिचं बडबड करत करत बाईक वरून उतरून त्या कार च्या दिशेने चालू लागला त्या कार वाल्याला सॉरी बोलायचं म्हणून पणं तेवढ्यात कार चा दरवाजा उघडला गेला आणि एक वीस एकवीस वर्षाची सुंदर तरुणी रागात ओरडतच अर्जुन कडे आली." ओ तुमचं डोक खराब आहे का?की डोळे फुटले आहेत ? समोर उभी असलेली कार तुम्हाला दिसत नाही का ? निदान सिग्नल तरी पाहायचा ना ? आले आणि आपली ही खटारा गाडी घातली माझ्या लाडकी वर.

" हे बघा मॅडम आय एम सॉरी मी थोडा घाईत होतो म्हणून चूक झाली . माफ करा." अर्जुन त्या मुलीला समजावत बोलला पणं अर्जुन च बोलणं ऐकून ती मुलगी जास्तच भडकली .

" हो हो साहेब .घाई तर फक्त तुम्हाला च आहे ना .तुम्ही तर ऑलिंपिक साठी रनिंग करत आहात आणि आम्ही सर्व मुर्खा सारखं इथे रोड वर थांबलोय होय ना ? अरे घाई आम्हाला पणं आहे पणं आम्ही तुमच्या सारखं दुसऱ्याच्या गाडी न वर आपल्या गाड्या आणुंन आदळत नाही.सॉरी वोरी ठेवा तुमच्या कडेच आणि मला माझ्या लाडकी च्या नुकसानाची भरपाई द्या अगोदर ."

जसं त्या मुली ने लाडकी बोललं अर्जुन ने इकडे तिकडे पाहत विचारल ," ही लाडकी कोण ? आणि मी काय बिघडवल आहे तिचं?"

समोरची मुलगी आपल्या दातावर दात घासत व आपल्या रागावर नियंत्रण ठेवत बोलली," अरे डोळे आहेत की टोमॅटो ? एवढी मोठी गाडी दिसत नाहीये का ? हीच तर आहे माझी लाडकी जिच्या वर तुम्ही तुमची खटारा आणून आपटली."

त्या मुलीने अर्जुन च्या बाईक कडे हात करत सांगितलं .त्याच्या बाईक ला ती मुलगी खटारा बोलत आहे हे पाहून अर्जुन रागातच तिच्या कडे पाहत बोलला," अरे चूक माझी आहे मान्य आहे पणं मी माफी मागितली ना ? आणि ही काय पद्धत झाली तुझी गाडी लाडकी आणि माझी बाईक खटारा? मॅडम असेल तुझी गाडी तुझी लाडकी पणं माझी बाईक पणं माझी शान आहे.उगाच माझ्या बाईक ला काही बोलून मला राग आणून देऊ नको."

" अरे वा ! चोरी ते चोरी आणि वरून सिना जोरी? ओहो हो..मी तर बोलेन च खटारा,खटारा ,खटारा ."ती मुलगी जास्तच चिडत मोठ्याने बोलू लागली .अर्जुन तर रागाने लालबुंद झाला होता.तो त्या मुली ला काही बोलणार इतक्यात त्याचा फोन वाजला त्याने फोन खिशातून बाहेर काढला पाहिला तर परम चा फोन होता तो फोन उचलून बोलू लागला," हो हो माहित आहे,आता तू डोकं खाऊ नकोस .अगोदरच माझं डोकं खराब झाल आहे. हो..हो येत आहे बस फक्त दहा मिनिट मध्ये..आता ठेव फोन ."

अर्जुन फोन वर बोलत होता आणि त्याच बोलणं ऐकून त्या मुली ने अर्जुन च्या गाडी जवळ जाऊन त्याच्या गाडी ची चावी आपल्या हातात घेतली अर्जुन ने ते पहिलं आणि तो रागातच तिच्या कडे पाहत बोलला," अरे ओ मॅडम ठोकर तुमच्या गाडीला लागली आहे तुमच्या डोक्याला नाही.ती माझ्या बाईक ची चावी आहे तुमच्या कार ची नाही.द्या माझी चावी मला." अर्जुन ने आपला हात पुढे केला पणं त्या मुलीने त्याच्या गाडी ची चावी परत दिली नाही उलट त्याच्या कडे रागात पाहत बोलली," अरे वा टक्कर मारून तसचं जायचा विचार करता ? अगोदर माझ्या नुकसानी ची भरपाई द्या."

अर्जुन त्या मुली ला समजावत बोलला," हे पहा आता मी सध्या घाईत आहे .तुमचं जे नुकसान झालं असेल ते आपण परत पाहू आता माझ्या गाडीची चावी द्या अगोदर मला उशीर होत आहे."

त्यांच्या दोघांच्या भांडणामुळे तिथे थोडी गर्दी जमा झाली होती.त्या मुलीने ट्रॅफिक हवलदार ला बोलावलं .तिने अर्जुन च्या बाईकची चावी त्या हवलदार जवळ दिली व अर्जुन ला ही त्याच्या हवाली करून तिने तिथून पळ काढला.तिने आपली गाडी मेघानंद कॉलेज जवळ थांबवली.तिथे तिची मैत्रीण पूजा तिची वाट पाहत होती.ती खाली उतरताच तिची मैत्रीण तिच्या जवळ येत थोड वैतागतच बोलली," विनी किती उशीर ? अग तुला दहा वाजता यायला सांगितल होत आणि तू आता इतक्या लेट आली आहेस?"

विनी सक्सेना नटखट,समजूतदार ,खूपच प्रेमळ , गोल चेहरा ,छोटंसं नाक ना जास्त लांब ना जास्त नकट तिच्या चेहऱ्याला शोभेल असं, स्माईल अशी की समोरचा पाहणारा नुसता तिच्या एका स्माईलवर फिदा होऊन जाईल.तिच्या कॉलेज मधले सगळे तिला आलिया भट्ट ची कॉपी म्हणून बोलवत असत.विनी श्रीमंत घराण्यातील होती पणं तिला आपल्या श्रीमंतीचा कधीच गर्व नव्हता पणं एखाद्या सोबत भांडली की स्वतः च च खर करून सोडत असे.विनी त्याचं शहरातील विद्यासागर कॉलेज मध्ये शिकत होती.तिची मैत्रीण पूजा कडून तिने अर्जुन बद्दल बरच ऐकलं होत आणि तिला फुटबॉल फार आवडायचा म्हणूनच ती आज मॅच पाहण्यासाठी पूजाच्या कॉलेज मध्ये आली होती.पूजा च बोलणं ऐकून विनी ने आपल्या हातातील घड्याळ सरळ केलं आणि बोलली," विचारू नकोस यार मी तर वेळेतच पोहचले असते पणं रस्त्यात एक बिनडोक भेटला होता. मूर्खा ने माझी गाडी ठोकली आणि वरून माझ्या सोबत च भांडत होता. मॅच संपेल म्हणून मी त्याच्या कडून पैसे ही न घेता त्याला ट्रॅफिक पोलिस कडे देऊन आले.ये पणं खूप उशीर झाला का ?"

पूजा हसतच बोलली ," विनी तू पणं ना ? अरे डोन्ट वरी काही उशीर झाला नाही .अजून तर अर्जुन ग्राउंड वर ही आला नाही चल जाऊ."

विनी खुश होत पूजा च्या मागे मागे गेली.कॉलेज च्या मागे एक मोठस प्ले ग्राउड होत . जिभे लॉन होत .फुटबॉल साठी वेगळच मैदान होत .प्रेक्षकांन च्या बसण्याची व्यवस्था ग्राउड वरच केली गेली होती .ग्राउंड वर सगळे खेळाडू आपले आपले स्पोर्ट कीट घालून तयार होते.काही कोच पणं होते पणं थोडास सिरियस वातावरण वाटत होत.पूजा आणि विनी दोघी ही एक सिट पकडुन बसल्या.तेवढ्यात एक मुलगा पळतच ग्राउंड वर आला.त्याचे कोच घड्याळात पाहून त्याला काही तरी बोलत होते जणु तो उशिरा आला म्हणून त्याला ओरडत असावेत आणि तो मात्र मान खाली घालून उभा होता.विनी ला फक्त त्याची पाठ दिसत होती.तेवढ्यात पूजा खुश होत बोलली," विनी आता मॅच सुरू होईल .अर्जुन आला."

विनी ने आपली नजर त्याच्या कडे वळवली .ती त्याला पाहण्यासाठी बेचैन होत होती. तेव्हा च तो पलटला आणि विनी मात्र त्याला पाहून शॉक झाली .ती आपले डोळे मोठे मोठे करून च त्याला पाहत होती.ती आपला चेहरा लपवण्यासाठी सिट खाली जाऊन बसली .पूजा तिच्या कडे पाहत बोलली," अग विनी तू खाली काय करतेय ? कभी पासून बोलत होतीस अर्जुन ला पाहायचं आहे ,अर्जुन ला पाहायचं आहे आणि आता तो समोर आहे तर तू खाली काय करतेस?"

विनी आपल्या डोक्यावर हात मारून घेत बोलली," पूजा मी याला पाहिलं आहे आणि ते ही चांगल च."

पूजा ला तिचं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं ,"विनी पणं तू कधी पाहिलं त्याला? तू तर आजच आमच्या कॉलेज मध्ये आली आहेस ना ? आणि जर तू अर्जुन ला अगोदर पासून च ओळखत होतीस तर माझं डोकं का खात होतीस इतके दिवस झाले?"

पूजा विनी कडे रागात पाहत होती.विनी आपले डोळे गोल फिरवत बोलली," अग माझी आई ,मी आज च त्याला भेटले .थोड्या वेळा पूर्वी सांगितलं होत ना मी रस्त्यात एक बिनडोक भेटला होता ? माझ्या गाडी ला ज्याने टक्कर मारली होती ? तो हाच अर्जुन होता."

तिचं बोलणं ऐकून पूजा पणं मोठे मोठे डोळे करून तिच्या कडे पाहत मोठ्याने च ओरडली ," काय ?"

क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now