Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग........

Read Later
प्रेमाचे रंग........

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

मी इरा पेज होल्डरचे मनापासून आभार मानते. ज्यांच्या मुळे मला कथा लिहायला एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. स्वतःच्या मनातील भावना कागदावर लिहून वाचायला खरंच सगळ्यांना आवडतात. या सगळ्या तुन मला माझ्याच प्रश्नांची उत्तर भेटत होती. आणि स्वतःशी ओळख स्वतःशीच वेगळी होत होती. हे सगळं आता असं लिहून देण्याचं कारण कि, मी गेल्या दोन महिन्या पासून कथा लिहत नाही आहे.      

मी प्रेमाचे रंग या कथेला सुरवात केली. तुमच्या सारख्या सुंदर वाचकांन कडुन कमी वेळेत खुप चांगला प्रतिसाथ मिळाला. त्या साठी मी मनापासुन खरंच सगळ्यांची आभारी आहे. मी कथा आगोदर लिहून ठेवली नव्हती. म्हणून कधी कधी इरा पेज वर अपलोड करायला थोडा उशीर होत असे. हे मला तुमच्या कंमेंट वरून कळत होत. तरी तुम्ही वाचक वर्गाने मला समजून घेतलं. 

प्रेमाचे रंग हि कथा माझ्या माईंड मध्ये सुरवाती पासून क्लिअर होती. या कथेची सुरवात आणि शेवट देखील. माझ्या स्वतःच्या काही अडचणी मुळे मला अर्ध्यातच थांबवावं लागलं. कथेतील सगळं माहित असून सुद्धा माझे शब्दच कागदावर उठतं नव्हते. हे असं आयुष्यात पहिल्यांदा झालं. मला लिहायचं आहे पण लिहता येत नाही. पूर्ण पणे स्टॉप झाले. मला हे सगळं असं तुम्हाला सांगायचं नव्हतं. पण हि कथा लिहण्याची जवाबदारी मी घेतली आहे. ती पूर्ण करता येत नव्हती. याच वाईट वाटतं आहे आणि हे असं अर्धवट सोडणं मला पटत सुद्धा नाही. तुमच्या जवळ हे बोलावसं वाटलं म्हणून हे लिहत आहे.  

पण वेळ हे सगळ्या गोष्टीवरच इलाज आहे. मला हा वेळ स्वतः साठी पाहिजे होता. म्हणून मी थोडा ब्रेक घेतला. प्रत्येक काम हे मनापासून करावं म्हणजे ते चांगल बरोबर पूर्ण होत. असे माझे वडील सांगत.

काही दिवसाने मी प्रेमाचे रंग याचे पुढील भाग पूर्ण लिहून अपलोड करेन. आता हि कथा तुम्ही विसरलात पण असणार ठाऊक आहे.  या पुढे याची मी काळजी घेईन.

आता हळू हळू सगळं नीट होत आहे. तरी सगळ्यानी स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. आयुष्य खरचं खूप सुंदर आहे. फक्त ती बघण्याची नजर प्रत्येकाकडे पाहिजे.....    

   

धन्यवाद......                            

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now