# प्रेमाचे रंग - भाग एकोणीस #

Love' and the way we express it, changes at every stage of life....
नमस्कार मित्रांनो,

सुनीता - आहो मघास पासून तुमचा फोन वाजत आहे. बघा तरी कोणाचा आहे. तुम्ही काय करत आहात....

दशरथ - हा बघतो.... हॅलो बोला पटेल साहेब.  

पटेल - सर थोड बोलायचं होत. तुम्ही तुमचे हॉल बुकिंग चे पैसे परत घ्या..

दशरथ - पटेल साहेब काय झालं.. लग्नाची सगळी तयारी झाली आहे... तुम्ही आता अस का बोलत आहात...

पटेल - अजुन तरी पक्की बातमी कळली नाही आहे. पण सोमवार पासून लॉक डाऊन होऊ शकतो...

दशरथ - लग्न तर होणारच. तुमच्या हॉल मध्ये आम्ही उद्या लग्न करू शकतो का? कमी लोकांच्या हजिरित मंगल कार्य होऊन जाईल....

पटेल - हो उद्या करू शकता.

दशरथ - मी मोहन जवळ बोलून घेतो. पटेल साहेब तुम्हाला कळवतो...

पटेल - ठीक आहे. सारो छे....

दशरथ यांना विचार करत बघून सुनीता विचारते...

सुनीता - आहो कोणाचा फोन होता.

दशरथ - थांब जरा सांगतो तुला सगळं.. आगोदर मोहन शी बोलून घेऊन दे.....

दशरथ मोहन यांना फोन करतात.

मोहन - बोल दशरथ

दशरथ - मोहन सिद्धिविनायक हॉल मधून पटेल ने कॉल केलेला. पुढील आठवड्यपासून बहुतेक सगळं बंद होऊ शकतो.. तर मग लग्नाचं कसं करायचं....

मोहन - सगळी तयारी झाली रे... आता काय करू या...

दशरथ - मी पटेल ला बोललो. उद्या लग्न करू शकतो का? तो हो बोलला आहे...

मोहन - लगेच उद्या अरे दशरथ कसं होईल सगळं....

दशरथ - सगळी तयारी तर आपली झाली आहे... आपल्या जवळच्या लोकांना फोन करून कळवून सांगू आपण...

मोहन - हळदीच काय मगं... ती तर उद्या होणार होती. सगळचं हॉल वर करू या का....

दशरथ - हो तसचं करू या.. मी भटजी ला फोन करतो.. कार्यक्रमाचे मुहूर्त सगळं ठरवतो. मग तुला कळवतो.. नाहीतर तुला पण कॉनफरस कॉलवर घेतो. दोघे ही बोलू आपण..  मला एवढाच वाटत अजुन उशीर नको. दोघांचं आयुष्य सुरळीत होऊन जाईल.....

मोहन - मला पण दोघं आपली पोर सुखी झालेली पहायची आहेत. आयुष्यात अजुन काय पाहिजे.

घराच्यांच सगळं फायनल ठरतं. समर आणि विभाच लग्न उद्या करायचं...


खुप उशीर झाला असतो. समर आणि विभा दोघे ही घरी पोचतात.

सुनीता - समर तु फ्रेश होऊन ये. थोड बोलायचं आहे. आम्ही वाट बघतोय.

समर - आलो आई... समर फ्रेश होऊन येतो.

दशरथ - तुमचा आजचा फोटोशूट कार्यक्रम कसा झाला.

समर - छान झाला. खुप मजा केली.....

राघवी - दादा मला फोटो दाखव ना.

समर - काही फोटो मोबाईल मध्ये आहेत. ते बघ.

दशरथ - समर लग्न उद्या करायचं ठरवलं आहे. लग्नाच्या हॉल मालकाचा फोन आलेला. काही दिवसांनी मुंबई तील नियम जास्त कडक करणार आहेत. मोहन शी पण माझं बोलणं झालं. घरातील जवळच्या लोकांना आम्ही फोन करून आज निमंत्रण दिलं आहे. हे सगळं घाईत करावं लागेल.

समर - ठीक आहे. या सगळया साठी विभा च्या घरचे तयार आहेत ना. उद्या हळदीचा कार्यक्रमाच काय मग.

सुनीता - हॉल वर सगळं करू या. मी सगळी तयारी केली आहे. सगळ्यांनी आता लवकर झोपा.

राघवी - आई दादा - वहिनीचे फोटो बघायला ये ना खुप छान आले आहेत.

सुनीता - दाखव हो खरंच दोघे किती सुंदर दिसत आहात. लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभत आहे. दोघे पण असेच नेहमी खुश रहा.

समर - समर विभा चे फोटो बघत असतो. एकत्र असताना दिवस कसा संपला हे समजलंच नाही. रात्रीचे एक वाजले असतात. समर ला बेड वर झोपून सुद्धा डोळ्यावर झोप काही येत नसते.

तेवढ्यात विभा चा कॉल येतो.
समर - सगळं ठीक असेल ना एवढ्या रात्री का हि कॉल करते. बोल विभा ठीक आहेस ना.

विभा - हो मी ठीक आहे. मला झोपच येत नव्हती. म्हणून तुला कॉल केला. झोपलेलास का?

समर - नाही, मला पण झोप येत नव्हती. सगळं कसं पटापट होत आहे ना. आता लग्न पण उद्या च करून घ्यावं लागणार आहे. महानगर पालिकेनच्या नवीन नियमानुसार लग्नात पंचवीस लोक फक्त बोलवू शकतो.

विभा - हो घरी आल्यावर हे कळलं आता. माझ्याशी बाबा बोलले. एका दिवसात हा प्रोग्राम पूर्ण करून टाकायचं बोलत होते.

समर - तुला बरं वाटत आहे ना.

विभा - हो ठीक आहे. खुप मनावर दडपण आल्या सारखं झालं आहे.

समर - सगळं प्लॅनिंग बदलल म्हणून का? बाबांचं मला बोलले लग्न करायचं फायनल आहे ना मग उद्याच करून टाकू सगळी तयारी तर झाली आहे. मिया बीवी राझी तो क्या करेगा काझी.....

विभा - झालं परत तुझ सुरू... हसू का मी आता या वर

समर - खरं तर हसण्या साठीच हे होत. पण तुला नसेल हसायच तर नको राहुदे. काय झालं आहे... सकाळी तर मूड छान होता...परत तुला कोणी त्रास देत आहे का?

विभा - अजुन तरी नाही. पण लवकरच हे सगळं सुरू होईल.

समर - तुला काय बोलायचं आहे.

विभा - मला श्रेया ला भेटायचं आहे. आणि तिला आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करू या का?

समर - शिफ्ट का करू या विभा. हे हॉस्पिटल चागलं आहे. डॉक्टर गुरु स्वतः या केस साठी परमिशन देणार नाहीत ग. आणि आता या वेळेला बाहेरची परस्थिती कशी आहे. हे तुला वेगळं सांगायला नको.

विभा - हो माहित आहे मला पण मला पारकर च्या लोकांवर विश्वास नाही आहे. आपलं लग्न झाल्यावर मी जोशी काकांची केस म्हणजेच त्यांच्या मुलींची शुभांगी ची केस परत ओपन करणार आहे.

समर - ठीक आहे मग

विभा - या सगळ्यांशी कुठेतरी श्रेया चा पण कनेक्शन येत आहे. अजुन तिच्या जिवाला काही त्रास नको. तुला कळत असेल मला काय म्हणायचे आहे.

समर - ठीक आहे मी डॉक्टर गुरु आणि तिच्या वडिलांशी बोलून बघतो. काय म्हणतात ते.

विभा - तेव्हा मी पण येणार तुझ्या बरोबर त्यांना भेटायला. चालेल ना.

समर - हो ये. आता जास्त विचार करत बसू नकोस सगळं नीट होईल. मी तुझ्या बरोबर आहे ना.

विभा - हो असाच आयुष्यभर माझ्या सोबत रहा....

समर - ते तर राहावच लागणार आता.... माझ्याकडे कुठे पर्याय आहे. आणि परत हसतो.....

विभा - समर अस ना... बोलू नकोस माझाशी झा....

समर - अग ऐक मस्किरी केली. राग खरंच नाकावर आहे. फोन च ठेऊन दिला..


नंदा आत्या सकाळी लवकर उठते. देवाची पूजा करून घेते. विभा ला जाऊन जागी करते.
आत्या - लवकर आंघोळ करून घे जा.

विभा - झोपेतून जागी होते. सकाळचे पाच वाजले असतात.
बाहेर हॉल मध्ये येते. तिथे अनिकेत आणि बाबा सगळं सामान हॉल वर घेऊन जायचं बाजूला करत असतात. विभा बाबांन जवळ जाऊन त्यांना एक मिठी मारते... मोहन राव आणि विभा चे दोघांचे ही डोळे पाणावतात.

अनिकेत - विभा आवर लवकर सगळ्या विधी हॉल वर करायच्या आहेत. सगळी लोक लवकर पोचणार आहेत. तुझी हळद पण हॉल वर च होणार.

आत्या - हे पाहून आत्या ला पण भरून येत.

विभा - डोळे पुसत विभा तयारीला जात असते.

तेवढाच गीता घरी येते. आणि विभा ला मिठी मारते. तू अजुन पण तयार नाही आहेस. चल लवकर मला पण तयार होयाच आहे.

आत्या - चला आता ही विभा ला तयार करेल. आपण बाकीची तयारी बघू या.

गीता - या लॉक डाऊन मुळे सगळं कसं लवकर करावं लागणार आहे.

विभा - गीता आज आई ची खुप आठवण येते.

गीता - तुझा आई चा आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहे ग. तु साडी कुठे ठेवली आहेस. कपाटात दिसत नाही आहे.

विभा - या कपाटातील खालील सगळया पिशव्या घे. यामध्ये माझे वेगवेगळे विधीचे सगळे कपडे आहेत. टिकली, दागिने आणि बांगड्या मेकअप सामन पण ठेवलं आहे. ही पहिली बॅग दे.

गीता - हे कधी केलंस सगळं अरे वा...

विभा - काल रात्री समर जवळ बोलून झाल्या नंतर....

गीता - समर दिसतो तसा नाही आहे. अनिकेत ने काही तरी शिकावं यातुन नाती कशी जपायची असतात.

विभा - बोलेन हो मी तुझ्या अनिकेत जवळ

गीता - विभा तू पण ना तस काही नाही आहे.

विभा - छुपाकर भी नहीं छुपता ये है दिल का मामला....

गीता - लाजते... आपण नंतर बोलू या टॉपिक वर आता तुला तयार करू या. हे घाल आगोदर पायातले पैंजेन....


खाली गाडी वाट बघत असते. घरातील सगळे तयार होऊन हॉल वर निघतात.

अनिकेत गाडी समोर नारळ फोडतो....

विभा आणि समर चे कुटुंब हॉल वर पोचतात. हॉल वर विभा चे नातेवाईक आणि समर चे जवळ चे नातेवाईक आले असतात.

समर आणि विभा चा हळदीचा कार्यक्रम सुरू करतात. विभा ची ओठी भरली जाते. ऐका अर्थी हे खरंच एन्जॉय करण्या सारखं असतं. समर आणि विभा खुप खुश असतात. सुनीता आणि दशरथ आपल्या मुलाचा लग्न सोहळा मन भरून पाहत असतात. नातेवाईक येत असतात. अनिकेत मोहन राव दोघे ही स्वागत करत असतात....

राघवी आणि गीता दोघी ही समर आणि विभा ला हळद लावत असतात.

विभा चे मामा मामी समर च्या आई वडिलांची भेट वस्तू , नारळ, ओटी देऊन पुढील विधीला सुरवात करतात.

भटजी - तुम्ही दोघे ही गणेश पुजे साठी लवकर तयार होऊन या.....

विभा आणि समर दोघे ही तयारीला जातात.... इथे पूजेची तयारी झाली असते. 

विभा आणि समर दोघे ही तयार होऊन येतात....

दोघांची ही गणेश पूजा सुरू होते..... एका बाजूला समर च कुटुंब बसलं असतं.... दुसऱ्या बाजूला विभा विधी साठी आपल्या मामा मामी बरोबर बसली होती.

विभा चे मामा मामी कन्यादान करणार होते... गणेश पूजा पूर्ण होते....

आता भटजी मंगलाष्टक बोलायला सुरवात करतात....  समर आणि विभा मध्ये अंतर पाट धरला जातो... शुभ मंगल सावधान बोलल्यावर दोघांवर तांदूळ आणि फुलांचा वर्षाव होत असतो...

समर आणि विभा ऐकमेकंच्या गळ्यात हार घालतात... आता सप्तपती फेरे घेतलं जात होते.

समर - विभा चा हात पकडतो. तिला आयुष्य भर तुझी साथ निभवेन हे वचन देतो..

विभा - तुझ्या सुखांत तुझ्या सोबत असेन.. तसचं तुझ्या दुःखात तुझ्या पुढे असेन.... आपल्या आयुष्यात असलेल्या आपल्या कुटुंबाचा मी मान ठेवेन.....

भटजी - आता मुलीला मंगळसूत्र घाला.....

सुनीता मंगळसूत्र समर च्या हातात देते. सगळे मन भरून हा सोहळा पाहत असतात....

समर - मंगळसूत्र घालतो. आणि कपाळी कुंकू लावतो....

विभा च्या बाबांचे डोळे भरून येतात..

लग्न साधेपणाने पार होत....

समर आणि विभा दोघे ही खुश असतात. विभा आणि समर समोर सुखी जीवनाची स्वप्न पाहत असतात.

पाहुणे मंडळी जेवणासाठी जातात.... मग घरचे लोक पंगतीला बसतात.

विभा आणि समर ला घरी घेऊन निघतात. विभा ला बाबांना आणि आत्या ला सोडताना खुप वाईट वाटत असतं.

हॉल मधून सगळे निघतात. घरी विभाचं स्वागत चागलं धुम धड्याक्यात होत.

दारातील माप ओलांडून विभा घरात प्रवेश करते....

सुनीता दोघांची नजर काढते... समर आणि विभा ला देव्याच्या पाया पडायला घेऊन जातात.

इकडे मोहन, अनिकेत आणि नंदा घरी पोचतात. विभा शिवाय घर कसं शांत झालं होत...

दिवस भराच्या धावपळीमुळे सगळेच थकले असतात...
राघवी विभा ला फ्रेश होण्यासाठी रूम मध्ये घेऊन येते.

विभा साडी बदलून बाहेर येते. समर रूम मध्ये येतो.

राघवी - वहिनी मी झोपायला जाते बाय गुड नाईट...

समर कपाट मधून टॉवेल घेतो. विभा मी फ्रेश होणून येतो. तू झोपलीस तरी चालेल. तू थकली असणारं.


विभा काहीच बोलत नाही. विभा किचन मध्ये पाणी पियाला जाते...

सुनीता - विभा अग काही पाहिजे का तुला

विभा - काकू रूम मध्ये पाण्याची बॉटल नव्हती.

सुनीता - काळजी करू नकोस. तुला कॉफी देऊ का मी बनऊन.

विभा - मी बनवू का कॉफी चालेल का तुम्हाला

सुनीता - बनव कॉफी पण मला नको. समर ला रात्रीची कॉफी आवडते. तुम्ही दोघे घ्या. मी झोपायला जाते....

विभा - राघवी आणि काका कॉफी घेतली का?

सुनीता - ते दोघे कधीच झोपले.... उद्या लवकर उठा... सत्यनारायण पुजा आहे...

विभा - कॉफी बनवते. रूम मध्ये घेऊन जात असते.

समर फ्रेश होऊन बाहेर येतो. तर विभा रूम मध्ये दिसत नसते. दार पण उघड असतं. समर बाल्कनीत उभा असतो.

विभा कॉफी चा मगं घेऊन येते. समर कॉफी घे.

समर - अरे वा तुला कसं माहीत मला रात्रीची कॉफी पियाला आवडते.

विभा - मला नव्हत माहित तुला आवडते ते मी माझ्या साठी बनवत होते. मला सवय आहे. तेव्हा काकू बोलल्या तुला पण  रात्रीची कॉफी पियाला आवडते. म्हणून रे.....

आणि दोघे ही हसू लागतात...

समर - कॉफी छान झाली आहे...

विभा - आभारी आहे....

समर विभा यांच्या गप्पा सुरू होतात... खुप वेळ बोलत राहिल्यावर ते दोघे भानावर येतात.

विभा - समर खुप च उशिर झाला रे... आता आपण झोपू या... उद्या पूजा पण आहे....

समर - आज फक्त झोपायच का? प्रेमाने विभा ला जवळ घेत असतो. विभा समर च्या मिठीत झोपते...तेवढाच समर चा फोन रिंग होतो....

विभा - एवढा रात्री कोणी कॉल केला आहे...

समर - थांब बघतो.... हॅलो हा ड्रॉक्टर गुरु बोला....

गुरु - समर माफ करा मी आता कॉल केला तुम्हाला पण गोष्टच तशी आहे... मी सकाळ पासून खूप वेळा कॉल करत होतो. पण तुम्ही फोन उचलत नव्हतात.

समर - गुरु श्रेया तर ठीक आहे ना..

गुरु - तेच सांगायचं आहे. श्रेया ला शुद्ध आली आहे.  थोडा अशक्त पणा शरीरात आहे.

समर - काय बोलत आहात ड्रॉक्टर... खरचं श्रेया ला शुद्ध आली आहे.... मी उद्या हॉस्पिटल मध्ये येतो.

हे ऐकुन समर खुप खुश होतो. विभा ऐकलस श्रेया शुध्दीवर आली आहे...
उद्या आपण तिला भेटायला जाऊया....
आनंदाने समर विभा ला मिठी मारतो....

विभा पण खुश असते. तिच्या मनात वेगळीच बैचेनी सुरू झाली असते. तिला खिडकीच्या बाहेरील काळोख फारच गडद वाटू लागला होता.

अचानक पणे विभा ला मंदिरा जवळ बसलेला त्या पंडिताचे शब्द आठवू लागले.....

"येणारी वेळ तुझ्या प्रेमाची परीक्षा घेईल"...

विभा भीतीने डोळे बंद करते... ही वेळ आली आहे का आता..... सगळं चागलं होत असताना सुद्धा माज मन का आनंदी नाही आहे.....

श्रेया चा या बातमीने मला का असं होत आहे?

येणारा नवीन दिवस काहीतरी नवीन घेऊन येणार आहे.....