Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग अठरा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग अठरा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

गीता आणि विभा दोघी ही किचन आवरून घेतात. आत्या अनिकेत आणि मोहन यांच्या गप्पा सुरू असतात.

गीता सगळ्या साठी बडीशेप घेऊन येते. आत्या विभाला विचारते.
आत्या - विभा समर शी तुझ्या गैरसमज बदल सगळं बोलणं झालं तुज ना. त्यांनी  समजून घेतलं ना तुला.

विभा - होय आत्या सगळं बोलणं नीट झालं. मी बेडरूम मध्ये जाऊ उद्या ऑनलाईन केस च हेयरिंग आहे. थोड स्टडी करून घेते.

आत्या- जा कर काम. तुझ्या ऑफिस मध्ये सांगून ठेव. आता दहा दिवस सुट्टी पाहिजे काही काम होणार नाही.

गीता - हो विभा किती तयारी बाकी आहे. उद्या च प्रि वेडिंग फोटो सुट पण आहे ना. तू फ्रेश वाटायला पाहिजेस. उगाच कामाचं टेन्शन नको.

अनिकेत - उद्या किती वाजता जाणार आहेस.

विभा - अजुन वेळ ठरली नाही आहे. पण दुपारी निघणार आहोत. हे सांगून विभा रूम मध्ये जाते.

गीता - विभा तू हो पुढे मी नंतर येते झोपायला.

आत्या - आज माझे पाय खुप दुखत आहेत. दादा तू गोळ्या घे आणि आराम कर.

मोहन - हो गोळ्या घेतो. मघाशी दशरथ ने फोन केला होता. त्याला कॉल करतो.

गीता - काकी मी पायाला तेल लावते. थोड बर वाटेल.

अनिकेत - गीता कॉफी घेणार आहेस का?

आत्या - आताच जेवण झाली ना रे. आता कुठे कॉफी घेताय.

गीता - मला नको आहे.

अनिकेत - मी माझ्या साठी करतो मग.

गीता पायाला तेल लाऊन रूम मधून बाहेर येते. अनिकेत बाल्कनी मध्ये कॉफी घेत उभा असतो. गीता हात धुवते आणि बाल्कनी मध्ये जाते.

अनिकेत - आलात मॅडम

गीता - अजुन पण इथेच आहेस. झोपला नाहीस.

अनिकेत - तुझीच वाट बघत होतो. तू तुझ्या घरी आपल्या बदल कधी बोलणं करणार आहेस. तुझ्या आई - वडिलांशी मी बोलू का?

गीता - नको थांब जरा. विभा च लग्न होऊ दे. मग आपण आपल्या घरी बोलू या. तुझी आई माझा हा प्रॉब्लेम स्विकारेल ना. मला याचीच खूप भीती वाटते. या मुळे नकार नको देयाला.

अनिकेत - गीता तस काही होणारं नाही. तू खूप विचार करू नकोस. गीतू तुज आता माझ्या वर पहिल्या सारखं प्रेम राहील नाही आहे.

गीता- तू मला परत गीतू बोललास. हो नाही आहे प्रेम. मला नाही बोलायचं जा.

अनिकेत - अरे अरे बाबा थांब. थोड बोल ना. लगेच नाटक सुरू होतात तुझी.

गीता - तुला बोलता येत का नीट. वाद तुज सुरू करतोस. म्हणून मला बोलायचं नसतं. मला किती बोलायचं असतं तुझ्या जवळ पण तुला तो पण वेळ नसतो. ऑफिस मध्ये पर्सनल बोलू नये. घरी आल्यावर पण फोन वर वेळ देत नाही आहेस. आज मी घरी राहिले तर तुला चिडवण्यात खुप मजा येत आहे.

अनिकेत - ओके माफ कर. आता बोल. मी ऐकतो तुझ सगळं. ये बस शांत.

विभा काम आवरून पाणी पिण्या साठी रूम मधून बाहेर येते. अनिकेत आणि गीता च बोलणं सुरु असतं. विभा मनात विचार करते. दोघे ही एकत्र किती छान दिसतात. गीता बदल आत्या शी बोलायला पाहिजे. अनू साठी गीता अगदी बरोबर मुलगी आहे.

विभा ला समर चा कॉल येतो.

समर - हाय विभा

विभा - बोल

समर - जेवण झालं का तुमचं.

विभा - हो

थोडा वेळ समर शांत असतो.

हॅलो समर बोल काय झालं.

समर - काही नाही. तू बोल काय करतेस.

विभा - जस्ट आताच केस स्टडी करून झाले. आज गीता पण घरी राहायला आली आहे. अनिकेत आणि गीता च एकमेकांशी चागलं पटत.

समर - मग विचार काय तुमचा.

विभा - अजुन तरी काही विचार केला नाही. पण करू विचार करायला. गीता मला माझी भावजय म्हणून आवडेल.

समर - सगळं फायनल केलं वाटत. बर आहे.

विभा - उद्या दुपारी किती वाजता निघू या आणि आपण कुठे जाणार आहोत.

समर - तेच मला बोलायचं होत. उद्या दुपारी ३.३० ला आपण  निघू या. मी गाडी बुक केली आहे. आपल्या बरोबर मंगल मूर्ती कंपनी चे कॅमेरा वाला आणि मेकअप ड्रेस परिधान करणारे असतील.

विभा - ओके आपण कुठे जात आहोत.

समर - इथे जवळच वसई ला भुई गाव आहे. त्या ठिकाणी जात आहोत. रात्री प्रयत्न परत येऊ. जास्त लांब पण नाही जाऊ शकतं. सध्या सगळी कडे लॉक डाऊन होत आहे.

विभा - ठीक आहे. बाय चल उद्या बोलू.

जोशी सरांचा कॉल का येत होता. उद्या बोलते.

समर - अजुन पण मना मध्ये एक वेगळ्या प्रकार ची रुख रुखं आहे. सगळं नीट होऊ दे.

सकाळी लवकर उठला वर विभा सगळी कामं आवरून घेते.

आत्या - सगळ्यांनी नाष्टा करून घ्या चला.

अनिकेत आणि गीता दोघे ही ऑफिला एकत्र निघतात.

विभा - गीता आज पण संध्याकाळी घरी ये. मी आत्याला तुझ्या आई शी बोलायला सांगते.

गीता - अग माझे इथे कपडे नाही आहेत.

विभा - संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर अनिकेत बरोबर घरी जा. आणि सगळं सामान घरी घेऊन ये.

गीता - आई जवळ बोलून घेते मी. बाय...

विभा जोशी सरांना कॉल करते.

विभा - हॅलो सर कसे आहात. काल कॉल केलेला. मी खूप उशिरा पाहिलं.

जोशी सर - हो केलेला. मी ठीक आहे. केस बदल बोलायचं होत. तुला भेटायला जमेल का? तुझ लग्न आहे. मला माहित आहे. पण माझ्या कडे जी माहिती आहे. त्यांनी तुझ काम पूर्ण होईल.

विभा - समजते मला मी लवकरच पुणा ला येणं करेन.

जोशी सर - मी जास्त काही बोलत नाही. तू हुशार आहेस. काळजी घे.

विभा ची ऑनलाईन केस घोरपडे यांची सुरू होते. दोन तास केस चालू राहते. वकिलांचे उलट जबाब प्रश्न सुरूच असतात. परत दुसरी तारीख पडणार असते. पण तेवढ्यात विभा पुरावे दाखऊन शेवटी निकाल लावण्यास विनंती करते.


राघवी - आई मी पण दादा बरोबर जाऊ का ग?

सुनीता - कुठे?

राघवी - फोटो शूट ला ग?

सुनीता - तुझा आभ्यास झाला आहे का? उद्या परीक्षा आहे ना.

राघवी - रात्री आल्यावर करेन.

सुनिता - नको ही फायनल सेमिस्टर परीक्षा आहे. तू पुस्तकं जाऊन वाच.

राघवी - ऐक ना... प्लीज

सुनीता - मला काही ऐकायचं नाही. आणि समर तुला स्वतः पण घेऊ न जाणार नाही.

समर ऑफिस मधून निघत असतो. ऑफिस खाली मंगल मूर्ती टीम ची गाडी आलेली असते.

समर विभा ला कॉल करून तयार राहायला बोलतो. समर आणि विभा भुई गाव ला पोचतात. त्या ठिकाणी खूप सारी हिरवळ असते. नदी वाहत असते. डोंगरातून सूर्य मावळताना दिसत असतो. पक्षांची चिव चिव कानी ऐकू येत असते.

समर आणि विभा तयार होतात. मेकअप वाले मस्त मेकअप करतात. वेगवेगळ्या हेअर स्टाइल देतात. त्या ठिकाणी खूप सारे सुंदर फोटो काढतात. कॅमेरा वाला वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो काढत असतो. समर आणि विभा ऐकमेकांच्या अजुन जवळ येत असतात.

विभा साडी मध्ये खूपच सुंदर दिसत असते. समर विभा ला एक टक पाहत असतो. ही वेळ जाऊच नये असं समर ला वाटत असतं. खूप वेळे नंतर दोघांना असा निवांत मिळाला असतो. समर चा प्रत्येक स्पर्शातून विभा ला त्याचा प्रेमाची जाणीव होत असते. या सगळ्यात विभा ला खूप लाजायल होत असते. आयुष्यात हा अनुभव समर बरोबर विभा साठी नवीनच असतो. नात्याची एक सुंदर सुरवात होत असते. विभा आणि समर खूप सारे फोटो काढतात. नदी जवळ फोटो काढत असताना विभा चा पाय घसरतो. समर तिला पटकन पकडतो.

कॅमेरा वाला - सर तुम्ही असेच पकडुन रहा ही पोज पण छान आहे.

समर आणि विभा ला या सगळ्याच खूप हसायला येत. दोघे ही खुप एन्जॉय करतात. संध्याकाळी सूर्य मावळणी ची वेळ होते. सगळं सामान घेऊन निघत असतात.

विभा - समरचा हात पकडते. थॅन्क्स यु समर. आज जे हे क्षण अनुभवले तुझ्या मुळे सगळं झालं. मला वाटलं पण नव्हत की तू आपल्या नात्या तील गोडव्या ला असा जपून ठेवशील. मी फक्त एका बाजूने विचार करत बसले. पण तू सगळं कसं निभावून घेतलस. आय लव्ह यू समर फॉर माय लास्ट ब्रीथ ऑफ हार्ट.....

समर - विभा च्या गालाला हात लावतो. आणि तिला जवळ घेऊन मिठीत घेतो. आय लव्ह यू टू माय बायको.... विभा तुझा माझ्या सगळ्या गोष्टी वर अधिकार आहे. जर तू माज दुःखात सहभागी होतेस तर तू माझ्या सुखात देखील भागीदारी आहेस. तो तुझा हक्क आहे. आणि तो तुझ्या पासून कोणी ही हिरावून घेणार नाही. हे वचन आहे.

समर ने विभा ला मिठीत घेतल्यावर विभा ला रडायला येते.

समर - विभाचे डोळे पुसतो. आता हे रडणं कधी थांबणार आहे. जेव्हा पण मी तुला जवळ घेणार तेव्हा तू अशीच रडणार आहेस का....

विभा - मला नाही माहित... पण हे होत अस...

समर - रडू बाई माझी.....

दोघे ही या सुंदर आठवणी घेऊन मुंबई ला येण्यास निघतात. विभा समर च्या खांद्यावर डोके ठेऊन खिडकीतून बाहेर बघत असते. समर विभा च्या डोक्यावरून हात फिरवत असतो. रात्रीचं बाहेर थंड वातावरण झालं असतं. वेळ कसा निघून जात असतो ते दोघां ना हि समजत नाहीं.... विभाते दोघं ऐकमेकाना अस ओळखत असतात की विभा आणि समर हे एकमेकांचे सोलमेड असतात.....

प्रेम या जगात सर्वात सुंदर अशी भावना आहे. आयुष्यात समोरील पार्टनर वर निर्मळ प्रेम करा. तुम्हाला ही परत तेच प्रेम भेटेल......


 

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now