Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग सोळा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग सोळा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

अनिकेत घरी डॉक्टरांना बोलवतो. डॉक्टर घरी आल्यावर मोहन राव यांना तपासतात. मोहन रावांचे बी. पी खूप वाढले असते. विभा आणि आत्या पण रूम मध्ये थांबलेल्या असतात.  

डॉक्टर - अनिकेत मोहन यांना अचानक असं काय झालं. खूप बी.पी वाढला आहे. या अशा अवस्थतेत त्यांना हृदयाचा खूप मोठा झटका पण येऊ शकतो. काळजी घ्या. त्रास होईल असं काही करू नका.

अनिकेत - शांत पणे विभा कडे बघतो. हो डॉक्टर आम्ही काळजी घेऊ. मामा ना हॉस्पिटल मध्ये एडमिट करावं लागेल का?

डॉक्टर - सध्या तरी नको. पण जर बी.पी कमी नाही झाला तर मग विचार करावं लागेल. मी तुला औषध लिहून देत आहे. ती आगोदर तू घेऊन ये.

विभा - डॉक्टर मी घेऊन येते. 

डॉक्टर आणि विभा एकत्र बिल्डिंग खाली उतरत असतात. 

डॉक्टर - विभा बाबांना कोणता विचार त्रास देत आहे का? आता तर तुझं लग्न पण ठरलं आहे. काही काळजीच कारण नाही ना.

विभा - तसं काही खास नाही काका. धावपळीमुळे बाबांना त्रास झाला आहे.

विभा मेडिसिन घेऊन घरी येते. तेवढयात समर चा कॉल येतो.

समर - हॅलो विभा

विभा - बोल समर

समर - तू कुठे बाहेर आहेस का? कॉल नंतर करू का?

विभा - बिल्डिंग जवळ रोड वर चालत आहे. बोल काही कामा साठी फोन केलास का?

समर - हो मी श्रेया ची केस ओपन करायचं ठरवत आहे. या केस शी निगडित तुझ्याजवळ काय माहिती आहे ती मला पाहिजे. तुला जमत असेल तर भेटून बोलू आपण.

विभा - ठीक आहे. कधी भेटायचं.

समर - मी तुला कळवेन. बाकी घरी सगळे ठीक आहेत.

विभा - बाबांना बर नाही वाटत आहे. त्यांचा बी पी वाढला आहे. मी आज बाबांना आणि आत्या ला लग्न नाही करायचं हे सांगितलं.  

समर - मग काय म्हणाले काका? 

विभा - माझा निर्णय पटत नाही आहे. लग्न तर करावं लागेल मग ते तुझाशी किंवा दुसऱ्यां कोणाशी तरी

समर - काय, हे काय मत आहे? 

विभा - बाबा असच बोलत होते. आणि मग त्यांचा बी पी वाढला. मग अनिकेत ने डॉक्टरला बोलावलं. आता झोपले आहेत. या सगळ्यांचा त्यांच्यावर खूप मोठा इफेक्ट झाला. 

समर - काकांना तू असा काही निर्णय घेशील अशी अपेक्षा नसेल.

विभा - हो

समर - काळजी घे.

विभा - ओके बाय.

पारकर ची माणसं बिल्डिंग जवळ फेऱ्या मारत असतात. त्यातला एक माणूस विभा ला चालताना अडवतो.

पारकरचा माणूस - मॅडम जरा जपून चालत जावा. तुमच्या पायाखाली बघा बॉम आहे.

विभा - समोर अचानक कोणीतरी आल्यामुळे विभा घाबरते. तुम्ही कोण आहात. माझा मार्गातून बाजूला हो.

पारकरचा माणूस - बुउउउउम्म्म्मम्म मॅडम घाबरलो मी. आमच्या मालकाने संदेश दिला आहे तुझ्यासाठी "मच्छली जल कि राणी हे जीवन उसका पाणी हें| हात लगाओगे तो डर जायेगी बाहर निकालो गे तो मर जायेगी " आता ठरवा विभा मॅडम माश्याला तुम्हाला पाण्यात ठेवायचं आहे कि तळून - कापून खाल्याला देयाचं आहे. टेस्टी लल्लगळगळगळगलं.

विभा - पारकर चे लोक आहात तुम्ही त्याला सांग असं वागून मी घाबरत नाही.

पारकरचा माणूस - पण विभा मॅडम मच्छली तर घाबरते ना..... मच्छली ला वाचव. कर्माने मरेल नाहीतर. ती नीता काकी तुझी कशी गायब झाली कळलं का तुला तसंच मच्छली ला गायब करायचं आहे. हाहाहाहाहाहा 

हे पारकर ची माणसं विभाला घाबरुवून निघून जातात.

विभा खुप घाबरली असते. तिला काय करावं काही सुचत नसत. ती घरी जाते. बेल वाजवते. अनिकेत दार उघडतो.  

अनिकेत - विभा ठीक आहेस ना. तुला घाम का आला आहे.

विभा - ठीक आहे. मला थोडं बर वाटत नाही आहे. बाबा ला शुद्ध आली का? ती चालत बेडरूम मध्ये जाते. तिथे तिचे बाबा बेड वर बसलेले असतात. बाबा या गोळ्या घ्या तुम्ही तुम्हाला बरं वाटेल.

मोहन - मला काही नको आहे. हेच दिवस बघायचे बाकी होते. ठीक राहून काय करू आज जी लोक मान देत आहेत तेच उद्या हसणार आहेत. एकुलती एक मुलगी तीच पण आयुष्य नीट करता आलं नाही. मोहन याच्या डोळ्यातून पाणी येत. 

विभा ला स्वतःच्या बाबांना एवढा खचताना बघायला होत नाही. 

विभा - बाबा तुम्ही जास्त विचार करू नका. आणि त्यांचे डोळे पुसते. तुम्ही जस ठरवलं आहे तसं सगळं होईल. मी समर जवळ लग्न करायला तयार आहे. माझं चुकलं मी खूप मोठा चुकीचा निर्णय घेतला होता माफ करा. मला तुम्हाला गमवायचा नाही आहे. 

मोहन - तू हे खरं बोलत आहेस. 

विभा - हो बाबा मी वचन देते. मी समर जवळच लग्नाला तयार आहे. मी माझा हट्ट सोडत आहे. तुमच्या शिवाय माझ्यासाठी या जगात काहीही महत्वाचं नाही आहे. माफ करा. आणि विभा ला रडायला येत.

आत्या - शांत हो विभा अशी रडू नकोस. सगळं नीट होईल ग.

 

 

पारकर - पोरगी घाबरली का? तिला खूप खूप घाबरवा 

पारकर चा माणूस - मालक ती जास्त घाबरलेली दिसत नव्हती. मुलगी आहे ना. सटकन कानाखाली पडते.

पारकर - बांगड्या भरा रे याच्या हातात..... विसरलास पारकर चा माणूस आहेस तू कोण आहेस पारकर चा माणूस..... 

त्या विभा च्या मनात दहशत निर्माण करा. कि ती काहीही करायच्या आगोदर पारकर या नावाने घाबरलीच पाहिजे.

आगोदर त्या मच्छली ला शोधा. कुठे सागरात लपून बसली आहे. असं जाळ टाका कि तिला त्या जाळ्यात अडकून बाहेर यावं लागेल. ती मच्छली जिवंत पाहिजे मला. ती विभा च्या हाताला लागता कामा नये....

पारकर चा माणूस - हो मालक....  

समर सकाळी उठतो. बागेत चालायला जातो. बागेत एका ठिकाणी शांत पणे उभा राहतो. समोर तलावात बदकांची पिल्ले एका मागून एक पाण्यात चालत असतात. समर हे दृश्य एक टक पाहत असतो. आयुष्य पण असंच आहे. पुढे पुढे चालतच जात. मनातील शांतता फार महत्वाची असते. जीवनात योग्य तो मार्ग निवडण्यासाठी शांतता फार महत्वाची असते. प्रत्येक क्षणाला सगळंच आपल्या मनासारख होत नसत. आपला गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदला कि आपलं आयुष्य पण बदलतो. हेच निसर्ग सांगत असतो. आयुष्यातील सगळ्या अडचणीचे समाधान करणारे उत्तर आपल्या स्वतःकडेचं असत. फक्त ते प्रत्येकाने शोधावं लागत. फार वेगळा अनुभव समर ला या क्षणाला होत असतो. सूर्याची किरणं पाण्यावर पडून तरंग निर्माण होत असतात. सुखावून टाकणार ते कोवळं ऊन शरीलाला ऊर्जा देत होत.

समर ला पाठीमागून कोणीतरी खांद्यावर हात लावतो.

हे पण दिवस जातील समर....

समर मागे वळून बघतो. समोरील व्यक्तीच्या चेहऱ्यावर सिम्त हास्य असते.

 

 

 हि नवीन व्यक्ती कोण आहे? कोणत्या वळणांवर होडी आता थांबणार आहे. बघू पुढील भागात........

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now