Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग पंधरा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग पंधरा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

घरातील सगळी काम झाल्यावर सुनीता विभा ला फोन करते. 

सुनीता - हॅलो विभा कशी आहेस?

विभा - मी ठीक आहे. तुम्ही कश्या आहात काकू?

सुनीता - लग्न करून तू घरी आलीस ना की मी खऱ्या अर्थाने ठीक होईन ?

विभा - विभा ला यावर काय बोलावं सुचत नाही. ती फक्त हो म्हणते.

सुनीता - विभा काय झालं ग? शांत का आहेस?

विभा - काही नाही काकू

सुनीता - तुला आई ची आठवण आली का? आज तुझी आई असती तर तिला किती आनंद झाला असता विचारू नकोस.

विभा ला आवाज रडल्या गत होतो.

सुनीता - विभा असं रडू नकोस ग. आयुष्यात काही चांगलं होत असताना डोळ्यातून असं पाणी आणू नये. तुझी आई जरी असती तिने पण तुला हेच सांगितलं असत. आता मी पण तुझा आई सारखीच आहे. डोळे पूस आगोदर आणि आज संध्याकाळी आत्या बरोबर घरी ये... 

विभा - घरी

सुनीता - हो तुझ्यासाठी काही दागिने घेण्याचे आहेत. मी सोनाराला घरीच बोलावलं आहे. विभा लग्नात सगळं कसं तुझ्या मनासारखं होईल. तुझी आई हि माझी मैत्रीण होती ग. आमचं एकमेकींशी फार जमायचं. अजून देखील कधी तिची आठवण आली कि मला राहायला होत नाही.   

विभा - ठीक आहे काकू येते मी... फोन ठेऊन देते.

विभा च काही बिनसलं वाटत. बोलताना आवाज पण नेहमी सारखा वाटत नव्हता. समर काही बोलला असेल का? कि श्रेया बद्दल तिला कळल्या मुळे नाराज झाली असेल. श्रेया च कारण असेल. 

सुनीता समर ला पण फोन करून घरी लवकर बोलावते. विभा आणि तिची आत्या घरी येणार आहेत तर वेळेवर ये.

समर ऑफिस मधून निघतो. ऑफिस बाहेरील फुल वाल्याकडून सुंदर गुलाबाचं फुल घेतो. थोड्या वेळेत घरी पोचतो. घरी विभा आणि नंदा आत्या आलेल्या असतात. समर आणि विभा एकमेकांना बघतात. विभा चे डोळे परत पाणावले जातात. हे समर ला कळत. तो आत्याशी बोलून रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी जातो. 

सुनीता सगळ्यासाठी गरम चहा घेऊन येते. विभा पटकन उठते ती चहाचा ट्रे सुनीता काकू कढून घेते. सगळ्याला चहा देत असते.

दशरथ - सुनीता तो सोनार अजून आला नाही. त्याला फोन करून बघ कुठे आहे तो...

सुनीता - आहो केलेला फोन त्याला निघाला आहे. आता येईलच तो.

नंदा आत्या - सुनीता अग राघवी दिसत नाही आहे. घरी नाही आहे का ?

सुनीता - तिजी परीक्षा सुरु झाली आहे. अभ्यासा साठी मैत्रिणी कडे गेली आहे. विभा चहा घे.

विभा - नको मला.

नंदा आत्या - विभा समर ला पण चहा दे जा... तो पण कामावरून दमून आला आहे. चहा छान झाला आहे सुनीता.

विभा आत्या कडे बघते. 

अग अजून इथेच उभी आहेस चहा थंड होईल. समर ला चहा दे जा आता या पुढे तुलाच सगळं द्यावं लागेल.

विभा आत्या कडे रागाने बघत पुढे जाते. समर बॅग मधून गुलाबाचं फुल बाहेर काढतो. मागून विभा समर ला चहा घे असं बोलते. 

समर - चहा घेतो. थँक यु.

विभा रूम च्या बाहेर निघत असते.  

समर - विभा थांब ना. तुला माझ्याशी बोलायचं होत ना.

विभा - हो समर.. पण हि वेळ योग्य नाही आहे.

समर - तुला तुझा मनातील माझाशी बोलायला आयुष्यात येणारी प्रत्येक वेळ हि आपल्यासाठी योग्यच असणार आहे. तू बोल मी ऐकतोय.

विभा - विभा थोडी घाबरून नजर खाली करत बोलायचा प्रयन्त करत असते. तिला समर समोर हे बोलायची हिंमत होत नसते. चहा च्या ट्रे ला घट्ट पकडून विभा समर ला बोलते. मला हे सगळं नाही जमणार. आपण वेगळे होऊ या. मला तुझ्याशी लग्न नाही करायचं आहे. 

समर - का असं काय झालं ? ( शांत पणे बोलतो ) 

विभा - मला तू नाही आवडत. माझं प्रेम नाही आहे तुझ्यावर.

समर - चहा चा कप बाजूला ठेवतो. विभा च्या जवळ जातो. तिच्या हातातील चहाचा ट्रे बाजूला ठेवतो. विभा चे थरथरणारे हात हातात घेतो. तू हे सगळं माझा डोळ्यात बघून बोल मग मला विश्वास बसेल.

विभा - विभा ला समर चा स्पर्श होताच मनातील साचलेले सल भरून येते. तिला रडायला येत. विभा समर च्य हातातून हात काढून घेत असते. पण समर ने ते घट्ट पकडलेले असतात. समर माझा हात सोड. 

समर - मी हात सोडेन पण आगोदर तू माझाशी अशी का वागत आहेस ते सांग. तू का माझ्यापासून दूर जात आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे. आपलं लग्न होणार आहे. तुला माझा भुतकाळ मी सांगितलं तर मी काही चूक केली का? 

विभा - चूक नाही केलीस. पण मला तुझ्याबरोबर राहायचं नाही आहे.

समर - विभा तुझ्या मनात खरंच काय चालू आहे. बोल माझाशी या सगळ्याचा मला पण खूप त्रास होत आहे.

विभा - हात सोडत नसल्या मुळे विभा रागात समर ला दूर ढकलते. हे बघ मला जे तुला सांगायचं होत ते बोलून झालं आहे. हा माझा फायनल निर्णय आहे. आणि मला तुला त्याची कारण देण्याची गरज वाटत नाही. आणि रूम च्या बाहेर जात असते.

समर - विभा चा हात पकडून तो परत तिला मागे घेतो. तु काय समजतेस स्वतःला स्वतःला जेव्हा वाटेल तेव्हा प्रेम करणार जेव्हा दूर करायचं आहे तेव्हा लांब जाणार. मला तुझा मनातील कळत सगळं तू का अशी वागत आहेस ते. हे बघ असा चुकीचा विचार मनात आणू नकोस. तुला साधं खोटं बोलायला पण जमत नाही आहे. माझ्याकडे बघ तुझा हा राग बघून मला तुझी चीड येत नाही आहे. त्यामुळे असं नाटकी वागायचं विचार पण करू नकोस. श्रेया माझा भूतकाळ होता. तो काही मला पुसता येणार नाही. पण तू माझा वर्तमान आणि भविष्य आहेस. हे बदलता पण येणार नाही. मला तुझा हा निर्णय मान्य नाही आहे. माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि ते तसंच राहणार आहे. मी या लग्नासाठी काही नकार देणार नाही. सगळ्या विधी ठरल्या प्रमाणेच होणार आहेत.

विभा - समर तू का असा वागतोस. यामध्ये कोणी हि सुखी होणार नाही आहे. हे बघ श्रेया वर मी अन्याय केला असं मला आयुष्यभर वाटत राहील. मला तीच हे सुख हिरावून घेयाच नाही आहे. पिल्झ ऐक माझं.

समर - विभा तुला हे असं कस वाटू शकत. श्रेया वर जीवापाड प्रेम करत होतो मी. त्या वेळी काही महिन्याने आमचं लग्न पण होणार होत. आणि मी श्रेया साठी थांबलो नव्हतो का? तीन वर्ष मी तिची साथ देत आहे आणि पुढे पण देणार आहे. मी किंवा तू तिला फसवत नाही आहोत. विभा माझं प्रेम तुझ्यावर आहे. तरी तू मला श्रेया बरोबर राहायला सांगत आहेस. हे असं वागणं त्यावेळेला श्रेया वर झालेला अन्याय असेल. जे मला श्रेया बद्दल वाटत नाही ते मी का खोटं नाटक म्हणून नातं निभावू. मला नात्यात खोटारडेपणा नको आहे. तुला मी नको असेन तर तसं बोल पण या कारण साठी जर तू लग्न करत नसशील तर हा तुझा मूर्खपणा आहे.

विभा - विभा शांत पणे फक्त रडत असते.

समर - समर ला विभा ला असं बघून खूप वाईट वाटत. समर या सगळ्या झोन मधून गेलेला असतो म्हणून त्याच्या विचारणा मध्ये सरळ स्पष्ट पणा असतो. तो विभा ला बेड वर बसवतो. स्वतः तिच्या समोर खाली बसतो. हा रुमाल हे डोळे पूस घे. थोडं पाणी पी.

विभा - नको मला

समर - हट्ट करू नकोस. पाणी पी बरं वाटेल. विभा पाणी पिते. हे बघ विभा तुला जे वाटत आहे. ते चुकीचं आहे असं मी बोलत नाही. ठीक आहे तुझा पण काही भावना आहेत. त्यामुळे तू हा निर्णय घेत आहेस. फक्त मला हे पटत नाही आहे. मी तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही. आयुष्यात प्रेमाची नाती मनातील खोल अशी भावना कळणारी फार कमी मिळतात. तुला आज जो त्रास होत आहे हे आज मला तू जरी सांगितलं नाहीस तरी ते जाणवत. आणि हे सत्य तर मी बदलू शकत नाही. हो तुझ्या बद्दल काळजी वाटते. दिवस भरात तू काय करत अशील हे विचार पण येऊन जात असतात. जेव्हा कि तू माझा बरोबर नसतेस. पण तुझ्या बद्दल विचार करण काही थांबत नाही. आता हे सगळं तू करायला थोडी सांगतेस.

विभा - काही महिन्या ने हे सगळं नीट होईल. विसरून जाशील तू....

समर - खरं बोलतेस तू. विसरेन मी तुला पण हे बाहेरील जगाला दाखवण्या साठी मनात तर तू माझा आठवणीत जिवंत असशील. तुला वाटत असेल कि तुझ्या अशा वागण्याने मी पुढे जाऊन श्रेया ला शुद्ध आल्यावर तिच्याशी लग्न करेन तर हि तुझी चुकीची समज आहे. तुला मी कोणत्याही बंधनात अडकवून ठेवणार नाही. हे सगळं तू तुझ्या बाबा जवळ बोल. जे काही फायनल ठरेल ते मी माझ्या घरच्यांशी बोलेन. विभा समर च बोलणं शांत पणे ऐकत असते. समर उठतो. बाजूच्या टेबल वरुर गुलाबाचं फुल विभा ला देतो. हे तुझ्या साठी आणलं आहे. विभा फुल घेते. समर च हे असं रूप बघून तिला नवल वाटत. मी असं वागल्या वर पण हा शांत पणे माझ्याशी बोलत आहे.

तेवढयात राघवी येते. दादा वहिनी काय करत आहात? किती वेळ झाला सगळे बाहेर वाट बघत आहेत तुमची.

राघवी - विभा तू रडलीस का? सगळं ठीक आहे ना. दादा काही बोलला का तुला

विभा - नाही ग राघवी डोळयात धूळ गेली होती. मी चेहरा धुऊन घेते. 

राघवी - माझा बरोबर चल मी तुला वॉश रूम दाखवते. 

विभा राघवी बरोबर बाहेर निघून जाते.

या सगळ्या गोष्टीच समर ला फार टेन्शन आलं असत. हे सगळं कसं सांभाळून घेऊ हे कळत नव्हतं. बाबांशी बोलू का या विषयावर नको घरी जर कळलं तर विषय अजून वाढेल. मग परिस्थिती हाताच्या बाहेर जाईल. विभाला थोडा वेळ देऊ या आपण बघू या काय होत आहे ते. 

हॉल मध्ये सगळे बसलेले असतात. सोनार आलेला असतो. तो एक एक नवीन नवीन दागिने दाखवत असतो. या सगळ्यात विभा च लक्ष नसत. पण तिला हे सगळं इथे समर चा घरी कोणाला दाखवून देयाच नसत. तिला तिच्या बाबांशी बोलायचं असत. 

नंदा आत्या - अगं विभा लक्ष कुठे आहे तुझं मंगळसूत्र कोणतं पसंत पडत आहे.

विभा - मला काहीच कळत नाही आहे.

नंदा आत्या - समर तू ये बाजूला इथे बस हिला आता पासूनच काही सुचत नाही आहे. तुला कोणता आवडतोय बघ.

समर विभा च्या बाजूला जाऊन बसतो. 

समर - विभा तुला कोणता आवडला आहे. 

विभा - मनात विचार करते. आता या सगळ्याला काय अर्थे आहे. सगळ्यांची मन फक्त दुखावली जातील. समर तुच बघ तुला कोणतं आवडतंय का?

समर - हा मंगळसूत्र छान आहे. सिम्पल आणि स्वीट विभा ला सुंदर दिसेल.

विभा - मनात बोलते. याला कसं कळलं कि मला हा मंगळसूत्र बघता क्षणी आवडल होत. जाऊंदे आता हा विचार करून काही फायदा नाही. 

बघता बघता बाकीचे दागिने पण ठरवले जातात.

सुनीता - ऐकलंत का सोनार बुवा हे दागिने मी माझा मुली साठी बनवत आहे. लवकरात लवकर बनवून द्या. आता लग्नाला दोन आठवडे राहिले आहेत. 

सोनार - तुम्ही काळजी करू नका. आम्ही वेळेवर तुम्हला सगळे दागिने बनवून देऊ.

दशरथ - हा घ्या ऍडव्हान्स चेक.

विभा - हे सगळं बघून विभा ला अजून प्रेशर वाढत असतं. माझं मत घरातील हे सगळे कसे स्वीकारतील. खरचं देवा कुठेतरी पळून जावंस वाटत आहे. एव्हडी भीती तर कधी परीक्षेला पण वाटली नाही.

विभा आणि आत्या माने याच्या घरून निघतात. समर त्याला सोडयला जातो. 

विभा घरी पोचते. अजून पण बाबा घरी आलेले नसतात.

रात्रीचे नऊ वाजले असतात. विभा बेडरूम मध्ये फेऱ्या मारत असते. 

अनिकेत - विभा ठीक आहेस ना. असे अजून किती फेऱ्या मारणार आहेस.

विभा - ठीक आहे. बाबा आले का?

अनिकेत - मामा नाही आला अजून

तेवढयात दारावरील बेल वाजते. विभा च्या मनातील भार वाढतो. तोंड सुक पडू लागत.

अनिकेत बाहेर जाऊन दार उघडतो. तर मोहन राव आलेले असतात.

अनिकेत - मामा आलास तू विभा कधी पासून तुझी वाट बघत आहे.

मोहन - बोलावं विभा ला

तेवढयात नंदा आत्या पण किचन मधून बाहेर येते. दादा सगळया पत्रिका वाटून झाल्या का रे?

मोहन - हो बऱ्या पक्की झाल्या आहेत. इथल्या जवळच्या लोकांना देण्याच्या बाकी आहेत. तुला अजून कोणाची नाव देयाची असतील तर सांग तसं.

आत्या - थोड्या देऊन ठेव मला मी माझ्या मैत्रिणीना पण देऊन येते. विभाला त्या पण ओळखतात ना. त्यांच्या मुलाच्या लग्नाला पण त्यांनी बोलावलं होत. आता आपल्या अनिकेत च लग्न कधी होईल देव जाणे. कि डायरेक्ट लग्न करून बायकोला घरी घेऊन येईल सांगू शकत नाही.

विभा - विभा बाहेर येते. बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे.

मोहन - आगोदर या पत्रिका घे. तुला तुझ्या ऑफिस मध्ये किंवा कोणत्या मित्र मैत्रिणींना देण्याच्या असतील तर देऊन घे. आज काळ सगळे ऑनलाईन पत्रिका पाठवतात. पण मला ते पटत नाही. 

विभा - विभा पत्रिका घेते. 

मोहन - बोल काय पाहिजे तुला

विभा - मला काही नको आहे. मला हे लग्न करायचं नाही आहे.

आत्या अनिकेत आणि मोहन खूप आश्चर्य चकित होऊन जातात. 

मोहन - डोकं फिरलंय का तुझं काय बोलत आहेस. 

अनिकेत - एक मिनिट मामा. विभा काय झालं तुझं आणि समर च काही भांडण झालं आहे का? कोण काही बोललं का?

आत्या ला आगोदर पासून थोडी चाहूल लागली होती. पण असा काही विभा निर्णय घेणार हे वाटलं नव्हतं.

विभा - आमचं भांडण झालं नाही आहे. सगळं ठीक आहे. पण मला समर जवळ लग्न करायचं नाही आहे.

मोहन - तुझ्यात आणि समर मध्ये जर सगळं ठीक आहे. मग लग्नाला नकार देत आहेस काय कारण आहे.

विभा - बाबा समर च्या आयुष्यात माझ्या आगोदर श्रेया नावाची मुलगी आहे. ती कोमात आहे. जर मी समर शी लग्न केलं तर श्रेया आणि समर एकत्र नाही येऊ शकत म्हणून मला लग्न नाही करायचं आहे.

अनिकेत - अगं विभा पण समर च तुज्यावर प्रेम आहे. या बद्दल माझं समर जवळ बोलणं झालं आहे.

मोहन - अनिकेत शांत रहा जरा. तुला समर बोलला का कि लग्न नाही करायचं आहे. 

विभा - हा माझा निर्णय आहे. समर माझ्याशी लग्नाला तयार आहे. मला कोणाबरोबर चुकीचं नाही वागायचं नाही आहे.

मोहन - विभा तुझं समर वर प्रेम आहे कि नाही

विभा - बाबा मला

मोहन - मला फक्त हो किंवा नाही हेच ऐकायचं आहे

विभा - हो आहे. आणि विभा च्या डोळयात पाणी येत.

मोहन - हे बघ विभा समर च्या वडिलांनी म्हणजेच दशरथ ने मला या सगळ्या गोष्टीची कल्पना आगोदर दिली होती. आणि आपण काही चुकीचं करत नाही आहोत. तुमचं दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. मग लग्न करायला काय अडचण आहे. तुम्ही दोघे खूप चांगले ओळखतं पण आहात. तुला समर च्या स्वभाव किंवा विचार जर पटत नसते म्हणून तू लग्नाला नकार देत असतीस तर मी समजू शकलो असतो. तू थोडा वेळ घे. खूप घाई करत आहेस तू विभा. पण या गोष्टीसाठी समर ला नकार देणं हे समरच्या प्रेमावर केलेला अन्याय आहे. मला हे नाही पटत आहे. याच समर ची काय चूक आहे. तू समर चा विचार केलास का? यात समर च काय म्हणणं आहे 

विभा - समर ला हे नाही पटत आहे. पण तो माझा वर जबरदस्ती करणार नाही आहे. बाबा माझा निर्णय फायनल आहे. आणि ती बेडरूम मध्ये जाण्यास निघते.

मोहन - थांब विभा अजून माझं बोलणं संपलं नाही आहे. तुझ्या आणि समर च्या लग्नाच्या पत्रिका गाव भर वाटून झाल्यात. सगळी खरीदी, हॉल आणि जेवणापासून सगळं नक्की झालं आहे. दशरथ ने आज तुला घरी बोलावून दागिने पण बनवायला दिले आहेत. मी जर दशरथ शी बोलणं केलं तर तो हे माझं सगळं ऐकून सुद्धा घेईल पण मला विभा तुझा घेतलेला निर्णय मान्य नाही आहे. तुम्हा मुलांना कसलं भान आहे कि नाही. कि सगळा पोर खेळ वाटत आहे. समाजात कसं वावरायचं आम्ही ते पण सांगू द्या. दोन्ही घरानाची इज्जत जाणार याचा विचार केलास का? तोंड दाखवायला जागा नाही राहणार. लोक मागून दोष काढतील ते वेगळंच असेल. पुढे तुमच्या आयुष्यच काय मग?   

नंदा आत्या - दादा शांत हो. आपण नंतर बोलू या विषयावर          

विभा - मला नाही पटत हे सगळं

मोहन - ठीक आहे. नको करूस समर शी लग्न मी दशरथ याच्याशी बोलून घेतो. पण तुझं लग्न ठरलेल्या दिवशीच होणार आहे.

विभा - म्हणजे तुम्ही काय बोलत आहात?

मोहन - तुला माझं बोलणं पटत नाही आहे ना. लहान पणापासून तुला जे पाहिजे ते सगळं तुला देत गेलो. का लहान पणीच तुझी आई गेली तुला सोडून म्हणून कधी चार बोट पण तुला लावली नाही. आज हे असे दिवस दाखवायला. तुला समर शी लग्न नाही करायचं आहे ना नको करून मी तुझ्या साठी दुसरा मुलगा बघतो त्याच्याशी लग्न ठरवतो तुझ

विभा - बाबा हे बरोबर नाही.

मोहन - सगळ्याच गोष्टी तुझ्या मनासारखा होणार नाहीत हे लक्षात ठेव. तुझं भलं बुर कळलंत मला. बाप आहे तुझा. तुला स्वतंत्र विचार करायला दिल याचा अर्थ असा नाही कि तू तुझ्या आयुष्याचे कसे पण निर्णय घेशील. एक तर समर शी लग्न कर नाहीतर दुसऱ्या मुलगा बघतो त्याच्या बरोबर लग्न लावून देतो. तुला माझं बोलणं पटत नाही ना. मग आता ठरव तुला काय मान्य आहे ते.   

मोहन राव याच हे सगळं ऐकून बी पी वाढलं असत. अनिकेत मामानं बेडरूम मध्ये आराम करायला घेऊन जातो.

अनिकेत - विभा आई तुम्ही आत जावा आपण नंतर बोलू या वर. 

 

आता आपण पुढील भागात बघू या कि विभा समर आणि तिच्या लग्नाबद्दल काय ठरवते.......  

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now