Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग चवदा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग चवदा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

विभा शांत पणे समर च्या बरोबर चालत - चालत हॉस्पिटल मधून बाहेर येते. विभा ला या क्षणाला आपण काय बोलावं हे सुचत नसत. ऐरवी कोणत्याही विषयावर खूप सारी बडबड करणारी विभा आता पूर्ण पणे गप्प झाली असते. विभा च्या वागण्यात झालेला हा बद्दल समर ला जाणवत होता. हा सगळा गुंता विभा कशा प्रकारे समजून घेईल. याच गोष्टीची भीती समर च्या मनात वाढत होती. या क्षणाला समर ला विभा शी बोलायचं असत. पण विभा च गप्प राहणं त्याच्या मनाला त्रास देत असत.

समर - विभा तू ठीक आहेस ना...

विभा काहीच बोलत नाही. जस तिला काही ऐकायला नाही आलं. ती पुढे चालत जाते. समर मागून येऊन विभा च्या हाताला पकडतो. विभा लक्ष कुठे आहे तुझं. मी बोलतोय तुझ्याशी, काय झालं तू ठीक आहेस ना....

विभा - शांत पणे बोलते. हो मी ठीक आहे समर. मला घरी जायचं आहे. आपण रिक्षा बघू या. खूप उशीर झाला आहे.

समर - काही चुकलं का माझं. मी आता जे तुला श्रेया बद्दल सांगितलं ते तुला पटल नाही का? अशी गप्प नको राहूस. बोल माझाशी काहीतरी. हे बघ तुला जे काही प्रश्न असतील ते विचार मला मी बोलेन तुझ्याशी.

विभा - तसं काही नाही आहे. मला थोडं बर वाटत नाही आहे. आता मला घरी जायचं आहे.

समर - ठीक आहे. मी सोडतोय तुला घरी चल.

समर घरी जाण्यासाठी रिक्षा बघतो.  दोघे हि रिक्षात बसतात. रिक्षात बसल्यावर पण विभा रिक्षा बाहेर बघत असते. विभा च्या आत्या ची बिल्डिंग जवळ येत. रिक्षा थांबते. समर आणि विभा दोघे हि रिक्षातून उतरतात. विभा पुढे चालत जात असते. 

समर - थांब विभा. ऐक माझं तुला आता काय वाटत आहे हे कळतंय मला. पण तू स्वतःला या बद्दल काहीही त्रास करून घेयाचा नाही आहेस. हे बघ आपल नातं जस आगोदर होत. तसच ते आता पण राहणार आहे. या मध्ये काहीही बद्दल होणार नाही. मला मान्य आहे. हे सगळं तुला कळल्यानंतर तुला वाईट वाटत आहे. पण माझा मनातील तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही. माझ्यावर विश्वास ठेव. माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर हे बोलून समर विभाच्या गालाला हात लागतो.

विभा - तेवढ्याच रागाने विभा समर चा हात उडवून लावते. तुला एकदा सांगितलं कळत नाही का . मी ठीक आहे. मला घरी जायचं आहे. मला बर वाटत नाही आहे. आणि तुझं हे काय सुरु आहे? मला नाही ऐकायचं आहे हे सगळं. पिल्झ समर तू निघून झा इथून.

समर - विभा ला असं बिथरलेलं बघून समर तिला शांत हो असं बोलतो. हो मी घरी जातो. तुला वर फ्लॅट जवळ सोडतो. 

समर दारावरील बेल वाजवतो. समोरून विभा ची आत्या दार उघडतात.

आत्या - अरे आलात फिरून या दोघे आत.

विभा काही हि न बोलता सरळ बेड रूम मध्ये निघून जाते. 

आत्या - समर विभा ला काय झालं?

समर - आत्या तिची थोडी तब्बेत ठीक नाही आहे. 

आत्या - अच्छा, तू बस ये आत.

समर - नको आत्या उशीर होत आहे. मी घरी जातो.

आत्या - ठीक आहे.

खाली उतरल्यावर समर विभा च्या बेड रूमच्या खिडकीला बघत असतो. विभा बाय बोलायला नेहमी प्रमाणे तिथे उभी आहे का पण खिडकीच बंदच असते.

इथे विभा बेड रूम मध्ये येते आणि बेड रूम च दार लावून घेते. विभा च स्वतःवरचा धीर सुटतो आणि ती रडायला लागते. तिला आयुष्यात खूप महत्वाचं काही गमावलं असं वाटत असत. विभा दाराला टेकून तिथेच बसून रडत असते. तेवढ्यात आत्या दार ठोकवत असते.

आत्या - विभे दार उघड.

विभा डोळे पुसते आणि दार उघडते.

आत्या - बाहेर जेवलीस बाळ. नसशील तर जेवून घे आगोदर

विभा - मला भूक नाही आहे आत्या. थोडं झोपायचं आहे.

आत्या - तुझे डोळे असे का दिसतायत. काय झालं?

विभा - माझं डोकं फार दुखत आहे. मला झोपायचं आहे.

आत्या - ठीक आहे कर आराम. ती कपाटातील डोके दुखीची गोळी घे बर वाटेल.

आत्या ला कळत विभा चा चेहरा पाहून काहीतरी झालं आहे. विभा ला थोडा वेळ देयाला पाहिजे. सगळं होईल ठीक मग .     

विभा परत दार लावून घेते. रागाने स्वतःची पर्स बेड वर फेकून देते. बाथरूम मध्ये जाऊन शॉवर चालू करून त्या खाली उभी राहते. तिच्या मनातील भावनांचा तिच्याशीच खेळ सुरु झाला होता. स्वतःच मत तिला पटत नव्हतं किंवा घेता येत नव्हतं. खूप घाई केली का? मी समर ला लग्नाला हो म्हणायला. पण बाबांनीच हे सगळं ठरवलं होत. फक्त योगायोगाने मी त्याला आगोदर भेटली. आणि तो मला आवडू लागला. त्याच्या आयुष्यात अजून पण श्रेया आहे. ती बरी होऊन जर परत आली तर मग मी काय करू. यात श्रेया ची तरी काय चूक आहे. मला कोणाला हि फसवायच नाही आहे. मी जर समर शी लग्न केलं तर ते दोघे कधी हि एकत्र येऊ शकत नाहीत. माझं पण समर वर जीवापाड प्रेम आहे. आयुष्यात पहिल्यादा कोणाच्या तरी खरं प्रेमात पडली. किती हतबल झाली आहे मी कि आज ते मला समोर असून मिळवता येत नाही. काय करू देवा मला सुचत नाही आहे. मी जो विचार करते तो योग्य कि अयोग्य आहे. या सगळ्यावर परत विचार करायला नियतीने मला भाग पाडलं आहे. समर मला पाहिजे आहे पण त्याला मी घेऊ पण शकत नाही. विभा ला एक सारखं रडायला येत असत. या सगळ्या गोष्टी माझा आयुष्याशी आणि कामाशी जोडल्या गेल्या आहेत. नीता काकीला ना पण त्या लोकांनी मारून टाकलं आहे. माझा मुळे कोणाला हि त्रास नको व्हायला. रडून रडून खूप वेळे नंतर विभा शांत होते.  डोळे पुसते शॉवर बंद करून बाहेत येते.

आपल्याला जे वाटत ते सगळं आपण समर जवळ आणि बाबांशी बोलू या. पण आता लग्न नको करूया. हो झालं फायनल निर्णय लग्न नाही करायचं. थोडा त्रास होईल पण मी करेन हॅण्डल. असा विचार करत विभा झोपून जाते. 

इकडे समर घरी पोचतो. विभा च्या अशा वागण्याने तो जास्तच डिस्टंप झाला असतो. हॉल मध्ये दशरथ राव बसलेलं असतात. 

दशरथ - आलात चिरंजीव काय झालं चेहरा का असा दिसतोय. 

समर - काही नाही बाबा

दशरथ - ये इकडे बस बोल काय झालं. बोलशील तर बर वाटेल.

समर - बाबा आज मी विभा ला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो होतो. तिला श्रेया बद्दल सगळं सांगितलं. विभा लास्ट तीन वर्षा पासून या केस वर काम करते. त्या केस शी श्रेया चा पण संबंध आहे बाबा. श्रेया चा अकॅसिडेंट नाही झाला बहुतेक तिला मारण्यात आलं आहे असं मला वाटत आहे. मी हे सगळं सांगितल्यावर विभा खूप शांत झाली. माझ्याकडून तिला या सगळ्याची अपेक्षा नव्हती. आता पण तिला कॉल केला मी नाही उचलत आहे ती. काही सुचत नाही आहे बाबा.

दशरथ - समर तुला मनापासून आयुष्य कोणा सोबत घालवाच आहे.

समर - म्हणजे मला कळत नाही तुम्हाला काय विचारायचं आहे.

दशरथ - माझा सरळ साधा प्रश्न आहे. तुझा आई ने आणि मी विभा ला पसंत केली तुझा साठी म्हणून तुला विभा बरोबर लग्न करून राहायचं आहे. कि तूज अजून सुद्धा श्रेया वर प्रेम आहे तर तुला तिच्या साठी थांबायचं आहे. हे मला कळून दे आगोदर तुझं मत काय आहे? हे लग्नाचं सगळं तुझा आई ने एव्हडं पटकन जमवलं कि मला तुझ्याशी नीट बोलता पण आलं नाही. मोहन हा माझा मित्रच असल्या मुळे त्यांनी पण या नात्याला होकार दिला. विभा हि तर खूप चांगली मुलगी आहे. एक बोलू समर तिला मी तिच्या लहान पणापासून ओळखत आहे. तिचा स्वभाव, विचार, संस्कार खूप चांगले आहेत. जरी तुझी आणि विभा ची पत्रिका जुळली नसती तरी मी या लग्नाला होकार देणार होतो. कारण मी या गोष्टीवर खूप असा विश्वास ठेवत नाही. विभा हि तुझा साठी योग्यच मुलगी आहे. आणि या घराला एकत्र बांधून ठेवणारी सून. पण हे माझं मत आहे तुला काय वाटत ते सांग आगोदर मला.

समर - बाबा मला विभा बरोबरच आयुष्यभर एक प्रामाणिक सोबती म्हणून राहायचं आहे. मला विभा शी हे नातं विश्वासा वर मजबूत करायचं आहे. माझा आयुष्यातील प्रत्येक क्षणावर बायको म्हणून फक्त विभा चा हक्क राहणारं आहे. जेव्हा मी विभा ला पहिल्यादा पाहिलं तेव्हाच मला ती एक माणूस म्हणून खूप आवडली. बाबा काही लोकांमध्ये समोरच्याना मोटीवेट करून पुढे जाण्यास सांगण्याचा जो गुण असतो ना तसं मी विभाच्या स्वभावात पाहिल. ती समोरील व्यक्तीला तो जसा आहे तस स्वीकारते. नेहमी हसत प्रसन्न राहणे. विभा जवळ गप्पा मारताना कधी हि कंटाळा येत नाही आणि वेळ कधी संपून जातो याचा भान पण मला राहत नाही. मला विभा ला गमवायचा नव्हतं म्हणून मी तिला लग्नाची मागणी टाकली. 

दशरथ - मग श्रेया च काय?

समर - बाबा श्रेया वर माझं खूप प्रेम आहे. मी तुमच्याशी खोट नाही बोलणार. श्रेया चा अपघात झाला नंतर मला तिच्या शिवाय जगायला खूप त्रास झाला. या सगळ्या मधून मला बाहेर पडायला खूप वेळ लागला. हे तुम्ही पाहिलच आहे.  मग मी स्वतःला कामात रमवून घेतलं. माझा ग्रुप मध्ये किंवा ऑफिस मध्ये पण मुली होत्या. त्यांच्याशी माझं बोलणं होत होत. कामामुळे भेटणं पण होत राहायचं. खूप वेळा अशी वेळ पण आलेली आहे कि त्या जवळ येण्याचा प्रयन्त करत होत्या. काही चांगल्या पण होत्या. ज्यांना नात्यात कमिटमेन्ट पाहिजे होती. पण तेव्हा मला कधी असं जाणवलंच नाही. किंवा माझा पाय घसरला नाही. पण विभा माझा आयुष्यात जेव्हा आली तेव्हा सगळं कसं चांगलं वाटू लागलं. तिचा स्वभाव खूप स्थिर आणि शांत आहे. जे मला चांगलं वाटत. मला विभा ला गमवायचा नाही आहे म्हणून मी श्रेया बद्दल तिला सगळं सांगून टाकलं. श्रेया कधी बरी होईल ती वेळ मला नाही माहित पण जेव्हा पण ठीक होईल तेव्हा तिला एक चांगला माणूस म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पार करेण. जो पर्यंत श्रेया स्वतः आयुष्यात खंबीर पणे स्वतः परत उभी राहत नाही तो प्रयन्त तिची सगळी जबाबदारी मी घेणार आहे. हे मी मनापासून ठरवलं आहे. मी विभाची साथ कधी हि सोडणार नाही हा शब्द दिला आहे. तो मी पूर्ण करेन. विभा मुळे आई आणि राघवी पण खूप खुश आहे.  

दशरथ - तू तर श्रेया ला पण वचन दिल होतंस.

समर - पण आता माझ्या मनातील नात्याचं रूप वेगळं आहे बाबा. जेव्हा पण श्रेया ला शुद्ध येईल तेव्हा तिच्या बरोबर मला खोट्या मुखवट्यात नाही राहायचं आहे. श्रेया ला आयुष्यात माझी जी पण मदत लागेल. त्या क्षणाला मी तिथे तिच्या बरोबर असेन. पण संसार नाही होणार. तिच्या बरोबर संसार करायचं स्वप्न मी स्वतः पाहत होतो . म्हणून तर तिच्या सांगण्यावरून मी वेगळं घर पण बुक केलं तेव्हा. आणि त्या घराला सजवलं पण. बाबा आता हे सगळं परत पहिल्या सारख नातं मी नाही जगू शकत. जो पण टाइम मी श्रेया बरोबर घालवला तो चांगलाच होता. तो तर आठवणीत राहणारच आहे. बाबा काही नाती सगळ्या सुखाच्या पलीकडील असतात. मला विभा ला सांगावं लागत नाही मला काय वाटत आहे. ते तिला माझा वागण्यातून आगोदरच कळून जात. विभा च माझा आयुष्यात असंच माझा मनाला आनंदात टाकणार आहे. आता मी विभा ला घेऊन जो निर्णय घेतला आहे. तो माझा पक्का निर्णय आहे. मला माझा आयुष्यात विभा पाहिजे बाबा.

दशरथ - श्रेया ला शुद्ध आल्यावर तुझे हे सगळे विभा बद्दलचे मत बदलणार तर नाहीत ना. समर जेव्हा आपण एखाद्यावर मनापासून प्रेम करतो आणि काही कारणाने त्याला सोडून दुसऱ्याला आपल्या मनात स्थान देतो. तेव्हा हे आपण का करत आहोत हे मुद्दे स्वतःला तरी स्पष्ठ असावेत. या सगळ्यात तुझी काही चूक नव्हती तरी तू स्वतःला क्लिअर राहायला पाहिजेस. तुझी भावना जशी बदलली तसे तुझे निर्णय नको बदलयाला.

समर - बाबा मी आता पंचवीस - सत्तावीस वर्षाचा मुलगा नाही आहे. आयुष्यात गरजे प्रमाणे माणसं बदलायला. या सगळ्या भावना मधून मी गेलो आहे. विभा बद्दल मला प्रेम आहे कि आंतरिक ओढ आहे यातील बऱ्या पैकी फरक कळतो मला. मला नात्यात खरंच कसली अपेक्षा आहे हे कळून गेलं आहे. विभा हि तशीच मुलगी आहे. पण हे सगळं विभा ला कळू दे. 

दशरथ - काही गोष्टी समर वेळे वर सोडून देत जा. सगळं नीट होत मग. पण तुझा निर्णयावर तू शेवट पर्यंत ठाम रा. मला काय वाटत आईला काय पाहिजे या पेक्षा तुला आणि विभा ला काय पाहिजे हे महत्वाचं आहे. विभा च काय मत आहे? हे तिच्याशी बोलून घे. या प्रकरणा मुळे थोडी गोंधळी असेल पोरगी. तू प्रेमाने तिला साथ दे. किचेन मध्ये जा. दूध पिऊन झोप जा. उपाशी पोटी नको झोपूस. 

समर - बाबा खरंच बर वाटलं तुमच्याशी बोलून. तुमचा हाच आधार दर वेळी मला पुढे जाण्यास मदत करतो. थँक यु

दशरथ - स्वतःला आयुष्यात काय पाहिजे हे ओळखण्यासाठी असे प्रश्न विचारावे लागतात. तेच मी केलं समर.

 

सकाळी राघवी लवकर उठते. कॉमर्स ची परीक्षा सुरु झाली असते. परीक्षा हि ऑनलाईन होणार असते. राघवी स्वतःच सगळं आवरून अभ्यास करायला बसते.

सुनीता घरातील सकाळची सगळी काम करून घेते. समर ऑफिस ला निघत असतो. सुनीता त्याला नास्ता आणि डबा देते.

समर - आई मी ऑफिस ला निघत आहे.

सुनीता - समर आज जरा लवकर घरी ये.

समर - ठीक आहे. कोणी येणार आहे का?

सुनीता - विभा साठी दागिने बनवाचे आहेत. मी सगळ्या दागिन्यांचे डिजाईन अल्बम घरीच दाखवायला बोलावून घेतले आहेत. विभा ला आणि तिच्या आत्या ला पण बोलावणार आहे. तू पण असशील तर तुमच्या आवडीनेच सगळं बनवेन. 

समर - चालेल येतो लवकर. बाय 

सुनीता - काय हो? कुठे लक्ष आहे तुमचं 

दशरथ - पेपर वाचतोय. बोल

सुनीता - हिकडे बघा आगोदर तो पेपर राहुंदे बाजूला

दशरथ - बोला

सुनीता - काल हा रात्री किती वाजता आला. 

दशरथ - अकराला

सुनीता - काही बोलला का?

दशरथ - कशाबद्दल

सुनीता - कशाबद्दल मी काही जगाबद्दल विचारात आहे का? माझा एक मुलगा आहे तर मग मी त्याच्या आयुष्यात काय चालू आहे त्या बदलच बोलणार ना. 

दशरथ - अच्छा, तो काल विभा ला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेला होता. श्रेया ला भेटवायला. त्यांनी समर आणि श्रेया या दोघांच्या नात्या बद्दल सगळं सांगितलं आहे.

सुनीता - हे सगळं त्या ला आताच सांगायचं होत. लग्न  झाल्यावर पण सांगू शकला असता ना.

दशरथ - ऐका अर्थी जे झालं ते योग्य झाल सुनीता. समर स्वतः सुद्धा या गुंत्या बदल स्पष्ठ झाला आहे. समर ला काय पाहिजे हे त्याला मनापासून कळलं आहे. आणि विभा ला पण काय पाहिजे ते पण कळेल आता.

सुनीता - कोणत्या मुलीला आपला नवरा कोणत्या दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होता हे ऐकून समाधान भेटेल.

दशरथ - हो तुझं बोलणं बरोबर आहे. समर आणि श्रेया हे स्वतः हुन वेगळे झाले नाही आहेत. त्याना परीस्थितीने दूर केलं आहे. नाहीतर आपल्याला श्रेया पण सून म्हणून पसंत होती. विभा ने हे सगळं बघून स्विकारुन समर च नातं निभवायचं ठरवलं तर समर आणि विभा च नातं अजून मजबूत होईल त्यांच्या दोघांच्या मनापासून. समोरच्याला मनापासून विश्वासाने स्विकारणं हेच तर गरजेचं असतं बाकी नाती काय आहेत ग.

सुनीता - देवा सगळं नीट कर. मी तुला पाच नारळाची ओटी भरेन. 

दशरथ सुनीता कडे बघतात आणि परत पेपर वाचायला सुरवात करतात.

समर च काम करतांना सगळं लक्ष फोण कडे जात असत. रोज सकाळी गुड मॉर्निंग चे मॅसेज पाठवणारी विभा. आज दुपार झाली तरी फोन नाही.

समर विभा ला कॉल करतो. ती फोन उचलत नाही. परत समर कॉल करतो. 

विभा फोन उचलते.

विभा - हॅलो

समर - कशी आहेस?

विभा - मी ठीक आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. आज संध्याकाळी भेट.

समर - समर अजून कोणता हि विषय काढता नाही. विभा ला हो भेटतो मी.  

विभा फोन कट करून ठेऊन देते.

समर विचार करत असतो. विभा च्या मनात काय चालू असेल आता. जे पण असेल ते सगळं मी ऐकून घेणार आहे. तिला जे बोलायचं आहे ते बोलून दे. विभा ला असं वाटत असेल कि ती माझा आणि श्रेया च्या मध्ये येते. मला माहित आहे. ती दुसऱ्याचा विचार जास्त करत असते. 

विभा परत समर चा फोटो बघून रडायला लागते. विभा स्वतःच मनात विचार करत असते. आता प्रयन्त किती तरी अश्या नात्यातील केसस पाहिल्या आणि सोडवल्या सुद्धा. खूप साऱ्या बायकांना आधार देऊन परत आयुष्य नव्याने सुरू करा सांगत असायची. आज स्वतःला का कंट्रोल करता येत नाही आहे. हे सगळं किती हेवी होत आहे. स्टॉप करून पण विचार स्टॉप होत नाहीत. का प्रेम केलं मी समर वर....

 

 

मित्रांनो आता पुढे आपण पाहणार आहोत. समर आणि विभा च लग्न कसं होणार. हो मित्रांनो लग्न तर होणारच पण आता तरी विभा ला हे मान्य नाही. या सगळ्या मनाच्या अडचणीत समर विभा ची साथ कशी निभावेल हे आपण पुढच्या भागात पाहू.

अजून एक बोलावसं वाटतंय आपल्या आयुष्यात आपलं कुटुंब खरंच खूप महत्वाचं रोल प्ले करत असत. मुलं लहानाची - मोठी होत असताना अनपेक्षित पणे त्याचा स्वभाव, विचार हे सगळे गुण ते आपल्याकडून बघूनच घेत असत किंवा तसे मुले घडत असतात. दुसर्याशी चुकीचं वागत असताना मुलांना थांबवणं. ती चूक कशी आहे ते समजावून सांगणं. दिवसातून थोडा वेळ त्याच्याशी गप्पा मारणं. मुलं काय करतात. त्यांना काय आवडतंय हे जाणून घेणे. त्यातून त्याची विचार करण्याची पद्धत कळते. या सगळ्या वागल्यातुन त्याची विचाराची प्रगती होत असते. मग मोठं झाल्या वर काय योग्य आणि काय अयोग्य हे त्यांना स्वतःला कळत. आपण आयुष्यभर त्याचे निर्णय नाही घेऊ शकत. आयुष्यात स्वतःसाठी योग्य निर्णय कसे घेण्याचे हे त्यांना लहानपणा पासून शिकवणे गरजेचे आहे.तसेच त्या घेतलेल्या निर्णयांवर ठाम राहायचे. धन्यवाद...                           

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now