Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग तेरा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग तेरा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

कालच्या प्रवासामुळे समर थकलेला असतो. इकडे सुनीता याचं सगळी कामे आवरून होतात. अजून पण समर तयार होईन आला नाही. म्हणून त्या समर ला रूम मध्ये बघायला येतात. समोर समर शांत पणे झोपलेला असतो. सुनीता याला समर च्या लहान पणाचे दिवस आठवू लागतात. लहान असताना पणखेळ खेळून असाच थकून झोपून राहत होता. त्या समर च्या जवळ जातात. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात.             

सुनीता - समर उठ ऑफिस ला जायचं आहे ना?

समर - हो उठतो. किती वाजलेत आई

सुनीता - आठ वाजलेत

समर - अग तू मला आगोदर उठवायला पाहिजे होतस. उशीर झाला. 

सुनीता - रोज लवकरच जातोस. कोणतं युद्ध जिंकून येतोस. रोजचीच तुमची ती कागदाची काम इथून उठायचं तिथे जाऊन बसायचं.

समर - बोलून झालं तुझं.

सुनीता - हो

समर - अजून काही बाकी राहील असेल ते पण बोलून टाक. 

सुनीता - जावा आवरून घ्या.

समर आंघोळीला जातो. 

राघवी - आई मी निघते. थोडा उशीर होईल. दुपारी घरी येईन.

सुनीता - नास्ता केलास ना

राघवी - हो मी आणि बाबा ने नास्ता करून घेतला आहे. बाय बाबा

दशरथ - नीट जा. सुनीता मी पण पतपेंडीत जाऊन येतो. आपली महिन्याची जमा खात्यातील रक्कम भरून येतो. 

सुनीता - आहो येताना या गोळ्या जरा घेऊन या.  

दशरथ - ठीक आहे. अजून काही आणू का?

सुनीता - नको, घरी सगळं आहे.

समर - गुड मॉर्निंग बाबा

दशरथ - गुड मॉर्निंग चल येतो मी

सुनीता - समर हा चहा आणि ब्रेड ला मेव्हणीज लावून देते. आणि स्वतः ला पण चहा पियाला घेते. समर एक विचारू का?

समर - बोल ना आई 

सुनीता - काळ घाईत तू विभा ला आणायला पुण्याला गेलास काही अडचण तर नाही ना.

समर - मला पण तुझ्याशी या बद्दल बोलायचं आहे. पण आता ऑफिस ला जातो. रात्री आपण बोलू.

सुनीता - समर तसं काळजी सारखं काही नाही ना

समर - पाहिलं तर आहे. सोडलं तर नाही. आपल्या ठरवण्यावर सगळं आहे आई. मला तर फार अडकल्या सारखं झालं आहे. 

सुनीता - काळजी नको करून मी आहे ना. रात्री बोलू आपण तू हा डबा घे नीट जा.

समर ऑफिस ला पोचतो. अनिकेत आणि गीता दोघे हि चहा पित असतात.

अनिकेत - समर तुला पण चहा सांगू का?

समर - नको. थँक यु 

अनिकेत आणि गीता पण चहा पियुन कामाला सुरवात करतात.   

समर - गीता मागच्या महिन्याचे बँक स्टेटमेंट मागितलेस का? 

गीता - हो तुझा बाजूच्या कप्प्यात बघ ठेवले आहेत. 

अनिकेत - समर हि वेंडर ची बिल घे. मी स्टॉक मध्ये जाऊन तपासून घेतले आहेत. बिलावर तारीख पण टाकली आहे. तू एकदा बघ बरोबर असतील तर मग पेयमेन्ट करायच आहे.

गीता - अनिकेत मागच्या महिन्यातील तिवारी ची बिल अजून पण क्लिअर झाली नाही आहेत. त्याने वाटत चेक बँकेत डिपॉजिट केला नाही आहे. 

अनिकेत - हो नाही केलाय. त्याच ऑफिस बंद आहे. त्याच्या ऑफिस मध्ये कोविड ची पाच माणसं भेटली. 

समर - हा कोरोना कधी थांबेल देव जाणे.

गीता - मागचं वर्ष असच घरीच काम करून घेतलं. या सगळ्यात आपल्या सेल्स वर चांगलाच इफेक्ट झाला आहे. 

समर - हे होणारच होत. अनिकेत आज मार्केटिंग डिपार्टमेंट बरोबर चार ची मीटिंग आहे. सगळी तयारी केलीस ना.

अनिकेत - हो मी सगळे पॉईंट नोट करून ठेवले आहेत. 

समर - गुड

शिपाई - समर साहेब तुमच्या साठी हे पत्र आलं आहे. 

समर - दे अरे पण हे आलं कुठून नाव नाही आहे. तुला कोणी दिल.

शिपाई - ऑफिस च्या गेट जवळ एक माणूस आला होतो. त्यांनी तुमच नाव सांगितलं आणि सिक्युरिटी वाल्याला देऊन गेला.

समर - ठीक आहे. समर पत्र ओपन करतो.

प्रिय मित्रा, 

आपल्यात अजून तरी काही वाद नाही आहे. म्हणून मित्र म्हटलं आहे. तुझा विभा ला आवर घाल ती खूप पुढे पुढे धागे शोधत जात आहे. तिच्यावर खूप प्रेम करतोस ना. मग तिला सांभाळ. तुझं लहान सुंदर कुटुंब बनायच्या आधीच संपून नको जायला रे मित्रा खरंच मला मनापासून वाटत हे आमच्या कृपेमुळे एका प्रेमाला तर गमावून बसला आहेस. बघ विचार कर. आम्ही खुश तर तु पण खुश........

तुझा हितचिंतक......
 

समर त्या पत्राचा गोळा करून रागाने फेकून देतो. अनिकेत हे सगळं बघत असतो. अनिकेत ते पत्र उचलतो आणि वाचतो. हे खूप मोठ्या लेव्हल वर प्रकरण आहे हे अनिकेत ला कळून जात.

अनिकेत समर च्या खांद्यावर हात ठेवतो. समर शांत हो. आपण या बद्दल नंतर बोलू. 

आत्या - विभा आज तू नीट जेवलीस पण नाही.

विभा - मला भूक नाही आहे ग

आत्या - आता लग्न जवळ आलं आहे. त्याच टेन्शन घेत आहेस का? अगं मी सुनीता ला आणि त्यांच्या कुटूंबाला चांगली ओळखते. खूप चांगली माणसं आहेत. घाबरू नकोस. 

विभा - तसं नाही ग

आत्या - मग समर नीट वागतोय ना तुझ्याशी

विभा - समर ना हो चांगला वागतोय. त्याचाच विचार करत होती. कधी कधी मला कळतच नाही कि त्याला काय सांगायचं आहे. असं वाटत कि मी खरंच याला पूर्ण ओळखते का?

आत्या - विभे आयुष्यात कधी हि कोणाला पूर्ण ओळखता येत नाही ग. काहींना काही राहूनच जात बघ. 

विभा - मग अशा वेळी काय करायचं

आत्या - हसते वेडी ग माझी विभा. तुला एकच सांगेन जे तुझं हक्काचं आहे. ते तुझा या मुठीतून कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. आणि जे तुझा नशिबात नाही त्या ला किती तरी घट्ट बांधून ठेव ते वाळू सारखं तुझा हाताच्या मुठीतून निघून जाणार आहे. कोणाच्या हि नात्याला जखडून नको ठेऊस. प्रत्येकाला आपल्या मनातील सगळ्याच गोष्टी बोलायला एक वेळ लागतो . तू जेव्हा समर च्या मनातील तो टप्पा गाठशील तेव्हा ते सगळं तो मोकळ्या मनाने तुझा समोर सांगेल विश्वास ठेव. 

विभा - आज संध्यकाळी मी समर ला भेटणार आहे.

आत्या - छान तयार होऊन जा. हा असा चेहरा घेऊन जाऊ नकोस.

विभा मनात विचार करत असते. समर मला त्याच्या आयुष्यातील इम्पॉर्टन्स पार्ट मनात असणार ना. कि अजून काही आहे जे त्यांनी मला सांगितलं नाही. प्रत्येक वेळी त्याची ती शांतता माझा मनात फार भीती निर्माण करत असते. 

काल पण तो त्या केस बद्दल काही तरी माहित आहे असं बोलत होता. त्याचा या केस शी काय संबंध असणार आहे. समर ला काय माहित आहे.

अरे आत्या ला सांगायचं राहूनच गेलं कि नीता काकीला पगार देण्याचा आहे. 

विभा - आत्या आत्या कुठे आहेस?

आत्या - आत बेडरूम मध्ये ये. कपड्याच्या घड्या करते.

विभा बेडरूम मध्ये जाते. अग आत्या मला नीता काकीचा पगार देण्याचा राहूनच गेला आहे. मी सकाळ पासून कॉल करते पण फोन लागतच नाही आहे. आणि अजून ती घरी कामाला पण आली नाही. कुठे बाहेर गेलेय का?

आत्या - आत्याचे हातातले कपडे घडी करताना खाली पडतात. विभा नीता आता आपल्यात राहिली नाही. 

विभा - म्हणजे तुला काय म्हणायचं आहे.

आत्या -आत्या बेड वर खाली बसते. ती हे जग सोडून निघून गेली.

विभा - काय अग पण तीन दिवस आगोदर तर आम्ही भेटलेलो. तेव्हा तर ती ठीक होती. काय झालं तिला

आत्या - माहित नाही ग पण कोणीतरी तिच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. पोलीसाना तिच्या नवरावर संशय आहे. त्या दिवसा पासून तो फरार आहे.

विभा - सुन्न होऊन बसून राहते. याचा माझा केस शी तर काही संबंध नसेल ना. मी नीता काकींना जाताना चिट्टी देऊन गेली होती. माझ्यावर पारकर ची लोक नजर ठेऊन पण आहेत. काय करू मी. कुठून हि मार्ग दिसत नाही आहे. जे झालं आहे ते चुकीचं असून शांत कसं बसून राहू. या पारकर च्या अजून कोणत्या अर्धवट अडकलेल्या केसेस आहेत. त्या शोधून काढून त्या लोकांची मदत घेऊ का? हे देवा काहीतरी मार्ग दाखव मला शुभांगीला न्याय मिळवून देयाचा आहे. 

तेवढयात विभा ला समर चा फोन येतो. 

विभा - हॅलो बोल समर

समर - विभा आता एक आमची मिटिंग होणार आहे. ती एक तासात संपेल.तू तयार राहा. मी तुला येयाला येतो.

विभा - अरे नको तू पत्ता पाठव मी वेळेवर पोचते.

समर - ठीक आहे. मी तुला पत्ता पाठवतो. जर मला उशीर झाला तर थांब जाऊ नकोस कुठे? मी कॉल उचलो शकलो नाही तर मला मॅसेज कर. मी रिप्लाय करेन. आणि हा सांभाळून ये.

विभा - हो समर आणि 

समर - अजून काही बोलायचं आहे का बोल लवकर मी मीटिंग साठी निघत आहे.

विभा - आय लव्ह यु

समर - आय लव्ह यु टू माय स्वीट हार्ट....

संध्याकाळचे पाच वाजतात. विभा निघायला तयार होते. समर ला कॉल करते तर तो फोन उचलत नसतो. मग ती समरला मॅसेज ड्रॉप करून ठेवते. थोड्या वेळेने समर चा ओके येतो. दिलेल्या पत्ता वर विभा पोचते. समोर हॉस्पिटल दिसत असत.

विभा समर ची वाट बघत हॉस्पिटलच्या आवाऱ्यात झाडाखाली उभी असते. मला समर ने या हॉस्पिटल मध्ये का बोलावलं असणार. माझा केस च्या रिलेटेत त्याला काही बोलायचं होत. या हॉस्पिटल मध्ये कोण असणार. 

तेवढ्यात समर मागून येतो.

समर - विभा जास्त वेळ थांबावं लागल का ग

विभा - नाही रे ठीक आहे. तुझी मिटिंग नीट झाली ना

समर - हो चांगली झाली

विभा - इथे जवळच होती का?

समर - हो चल आपण हॉस्पिटल मध्ये जाऊ या?

विभा - विभाची पावलं जड होत होती. समर तुला काय सांगायचं आहे मला

समर - माझ्यावर तुझा विश्वास आहे ना

विभा - हो 

समर - विभा चा हात पकडतो. चल मग

समर डॉक्टरांची परमिशन घेऊन. विभा ला श्रेया च्या रूम घेऊन जातो.

समर श्रेया चा रूम उघडून विभा ला हात पकडून आत घेऊन जातो. समोर श्रेया बेड वर शांत झोपलेली असते. समर श्रेया ला बघतो परत त्याचे डोळे पाण्याने भरून वाहू लागतात. विभा हे सगळं शांत पणे बघत असते. विभा च्या मनाची धडधड वाढत जाते. 

समर - विभा हि श्रेया कुलकर्णी

हे ऐकून विभाच्या चेहऱ्यावरचे भाव वेगळे होतात.

विभा - समर तू श्रेया ला कसं ओळखतॊस.

समर - विभा श्रेया हि तीच मुलगी आहे. जिच्यावर मी जीवापाड वेड्यासारखा प्रेम करत होतो. 

विभा - पण तू तर बोललेलास कि श्रेया तुझा आयुष्यात आता नाही आहे.

समर - श्रेया जवळ जाऊन बसतो. आता तरी कुठे आहे ती माझ्यासोबत. विभाला हात पकडून बाजूला असलेल्या टेबल वर बसायला सांगतो. हे बघ विभा तू मनात आपल्या नात्याबद्दल कोणता हि गैरसमज आणू नकोस. तुला हे सगळं मला आगोदरच सांगायचं होत. माझी आणि श्रेया ची ओळख एका लहान मुलांच्या अनाथ आश्रमा मध्ये झाली. मी त्या अनाथ आश्रमात पुस्तक आणि कपडे मुलांसाठी देण्यासाठी गेलेलो. श्रेया त्या आश्रमासाठी एक वर्षांपासून देणगी मिळवण्याचं काम करत होती. मग आमची ओळख झाली ती ओळख मग हळू हळू मैत्रीतून प्रेमात झाली. आमचं सगळं ठरलेलं होत. माझा घरी तिच्या घरी सुद्धा आमच्या लग्नाबद्दल बोलून झालं होत. लग्न झाल्यावर नवीन घरात राहायचं म्हणून मी श्रेया च्या पसंतीने नवीन घर पण घेतलं. सगळं कसं सुखात सुरु होत. आमचं भेटणं बोलणं सुरूच असायच. घर घेतल्या मुळे महिन्याच्या खर्चात वाढ झाली. त्या वर्षी बाबा पण रिटायर झाले होते. म्हणून मी माझा जॉब बदलला. नवीन नोकरीत कामात जवाबदारी वाढत होती. 

विभा तेव्हा काही तरी घडत होत पण मला ते कळत नव्हतं. श्रेया खूप टेन्शन मध्ये असायची. मला ते जाणवत होत. पण ती हे सगळं बोलून कधी मोकळी झालीस नाही. रिपोटर असल्यामुळे तिला वेगवेगळ्या शहरात बातम्या साठी फिरावं लागत असे. पण त्या वर्षी तिच्या खूप साऱ्या फेऱ्या नाशिक पुणे या ठिकाणी होऊ लागल्या होत्या. दोघाना नीट बोलता पण येत नव्हतं. तीन वर्षा पूर्वी असच ती तुझा जोशी काकाच्या मुलीबरोबर नाशिक ला निघाली होती. ते पण अचानक आगोदरच ती पुण्याला जाऊन आली होती. मला हे सगळं तीच वागणं बरोबर वाटत नव्हतं. तिने नाशिक ला नको जायला म्हणून मी तिला थांबवण्याचा खूप प्रयन्त केला पण तेव्हा हे सगळं ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हती. त्या दिवशी पण जाताना खूप रडली. त्या ठिकाणी माझी गरज आहे. मला जावं लागेल असं बोलत होती. वेळ फार कमी आहे. मी आल्यावर तुला सगळं सांगते असं सांगून गेली. असं बोलून समर लहान मुलासारखा रडायला लागला. विभा टेबल वरून उठली समर जवळ जाऊन त्याला धीर दिला. शांत हो समर

समर - हे सगळं माझा मुळे झालं ग. मी त्या वेळी श्रेया बरोबर जायला पाहिजे होत. माझं श्रेया वर खूप प्रेम आहे. मी तीन वर्षा पासून ती कधी बरी होईल याची वाट बघत आहे. मी खूप प्रयन्त केला या सगळ्यातून बाहेर पडायला पण मला श्रेया च्या आठवणी विसरता येत नाहीत ग. तिचा प्रत्येक शब्द- बोलणं, तिच्या बरोबर फिरलेल्या वाटा, तिच्या आवडीच्या वस्तू माझं सगळं लक्ष वेधून घेतात. कधी कधी असं वाटत हे सगळं सोडून मी मुंबई मधून बाहेर निघून जावं. जिथे श्रेया च्या कोणत्याच आठवणी जिवंत नसतील.        

विभा - हे सगळं ऐकून विभा च्या पायाखालील जमीनच कोसळून जाते. मी ज्या मुलीला इतक्या वर्षांपासून शोधत होते. ती समर ची गर्लफ्रेंड होती. या केस ला ओपन करून आपण काही चुकीचं तर करत नाही आहोत ना. या ठिकाणी श्रेया च्या आयुष्याचा प्रश्न आहे. श्रेया कोमात जरी असेल तरी तिच्या मनाला जाणीव तर असणारच. समर मध्ये तिचा जीव गुंतून राहिला असणार. समर ला कसं बोलू हे या क्षणाला मला स्वतःला सुचत नाही आहे. पण या वेळी समर ला माझा आधाराची गरज आहे.  

समर तू काळजी नको करुस सगळं नीट होईल. श्रेया ला पण लवकर बर वाटेल. तू तोंड धुऊन ये जा. इथे श्रेया जवळ मी थांबते. समर फ्रेश होण्यास निघून जातो. समर ला किती त्रास होत असेल याची मी तर कल्पना पण नाही करू शकत. स्वतःचा प्रेमाला असा त्रास होत असताना बघत राहणे खरंच खूप कठीण आहे. या सगळ्यात या दोघ्यांची काय चूक होती. आपण ज्या व्यक्ती वर जीवापाड प्रेम करतो त्या व्यक्ती ला सुखात बघण्यासाठी काहीही करू शकतो. हे आज तू दाखवून दिलस समर. प्रेम तू मिळवण्याचं प्रयन्त केलास नाहीस. प्रेमाची भावना अनुभवून त्यात तू जगत होतास.  

तेवढ्यात रूम मध्ये नर्स येते. मॅडम तुमचा वेळ संपली आहे. विभा विचारातून बाहेर येते. हा ठीक आहे.

विभा - नर्स या श्रेया मॅडम चा रिपोर्ट काय आहे?

नर्स - तुम्ही कोण याच्या 

विभा - मी श्रेया ची मी हिची मैत्रीण आहे. 

नर्स - आता हळू हळू सुधार होत आहे. त्यांना मध्ये मध्ये शुद्ध पण येत असते. 

विभा - मग या पूर्ण ठीक कधी होतील.

नर्स - या वर्ष भरात होऊ पण शकतात किंवा नाही पण होऊ शकत सांगता येत नाही मॅडम. त्याच्या मेंदूला खूप मोठ्या लेवल वर मार लागला आहे. इतकी वर्ष त्या जिवंत आहेत हेच फार मोठं नवल आहे.

विभा हे ऐकून नाराज होऊन निघत असते.        

तेवढ्यात परत ती मागे फिरते. श्रेया जवळ जाते. तिच्या हातावर हात ठेवते.

मला माहित आहे श्रेया तू कोमात आहेस ते. पण तुझा श्वास अजून पण समर च्या प्रेमाने इथे थांबवला आहे. खूप प्रेम करतो ग तुझा वर समर. खरंच खूप नशिबवान आहेस. त्या च्या कडून जे पण तुझा बद्दल ऐकलं आले आहे ते सगळं चांगल्याच आठवणी होत्या. मला वाटलं कि तू त्याला सोडून निघून गेलीस. एवढ्या प्रेमळ चांगल्या माणसाला कोणी कसं सोडू शकत. याच मला नवल वाटत राहायचं. श्रेया अजून सुद्धा त्याने तुझी साथ सोडली नाही आहे. माझा मनातील समर च स्थान अजून मोठं झालं आहे. अरे आपली ओळख तर झालीच नाही मी विभा. आज पासून तुझी पण चांगली मैत्रीण बनण्याचं प्रयन्त करेन. माझा मुळे तुला कोणताच त्रास होणार नाही. माहित नाही पण मला तुझा बदल मनात राग खरंच वाटत नाही ग. तुला आणि समर ला असं समोर बघून मन फार दुखलं माझं. असं कोणाबरोबर पण होऊ नये. तू काळजी करू नको आता समर जवळ मी आहे. मी त्याला या सगळ्यातून बाहेर पडायला साथ देणार आहे. हि तुझी अवस्था कोणामुळे झालं आहे ते पण शोधून काढेन मी. जेव्हा पण तू बरी होऊन समर च्या आयुष्यात परत येशील तेव्हा तुला तुझा संसार तुझं प्रेम जसा आहे तसाच भेटेल. हा शब्द आहे माझा तुला श्रेया...... 

तेवढ्यात समर तिथे येतो आणि बोलतो. विभा चल उशीर होत आहे. हा चल समर. विभा श्रेयाच्या हातावरील हात काढते आणि समर बरोबर चालत रूम च्या बाहेर पडत असते. 

इथे विभा च्या स्पर्शाने श्रेया च्या बोटांची हालचाल होत असते. 

 

आयुष्यात नेहमी काहीतरी चमत्कार होत असतात. आता या तिघांचे आयुष्य एका रेशीम धाग्याने बांधले गेलं असतात.....                                        

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now