प्रेमाचे रंग - भाग बारा

Love' and the way we express it, changes at every stage of life.

नमस्कार मित्रांनो,

मागच्या भागात आपण पाहिलं समर पुण्याला विभाला आणायला जातो. इकडे हॉस्पिटल मध्ये श्रेया ला हळू - हळू शुद्ध येत असते.

सुनीता - राघवी हा कांदा काप. थोडी लसूण पण सोल. मी डाली ला फोडणी देते. डाल गोडी बनवते ग. चालेल ना. आज लवकर जेवण करू या. 

राघवी - हो चालेल. कुठे बाहेर जात आहेस आई

सुनीता - नाही ग आपलं रात्रीच जेवण  झालं कि जरा गुरुचरित्र वाचायला बसेन. वाचनास वेळ मिळतच नाही. बरेच दिवस बघते.

राघवी - वेळ काढावा लागतो आई. हा हे कांदा कापून झाला. मी आपल्याला पापड तळून घेऊ का?

सुनीता - घे पण बाबाना पापड भाजून घे. त्यांना त्रास होतो. समर चा फोन आलेला का ग?

राघवी - हो मघाशी केलेला फोन बोलणं झालं माझ. दोघे ठीक आहेत. दहा ला रात्री बस ने निघणार आहेत.

सुनीता - विभा बरोबर याचा संसार सुरळीत फक्त होउदे. एकदा त्यांना मुलं झाली. कि मग मी तुझा बाबा बरोबर राहायला गावी जाणार. 

राघवी - हसते आई अजून लग्न झालं नाही तू तर दादाच्या मुलानं पर्यंत पोचलीस.

सुनीता - तू जेव्हा आई होशील तेव्हा तुला कळेल. मुलांना सुखात बघून किती समाधान मिळत ते. आयुष्यात त्यांना कोणताच त्रास होऊ नये असच वाटत असत. 

राघवी - हो देवाने नशीब लिहायला तुलाच देयाला पाहिजे होत.

दशरथ - कोण कोणाचं नशीब लिहत आहे.

राघवी - ते सगळं राहुंदे. बाबा आपण फिरायला कधी जाणार आहोत.

दशरथ - समर ला येऊन दे मग ठरवू

सुनीता - फिरायला काय बोलतेस देव दर्शनाला जात आहोत. कुलदेवाची ओटी भरायची आहे.

राघवी - तोंड वाकड करत तेच ग आई

सुनीता - आहो ऐकलंत का?

दशरथ - बोला, आयुष्यभर तुमचं ऐकत आहे.

राघवी आणि दशरथ राव हसतात.

सुनीता - आपण आपल्या बरोबर विभा ला पण घेऊन जाऊया. थोडा समर ला आणि विभाला पण वेळ भेटेल.

दशरथ - तुझी कल्पना चांगली आहे. पण अजून त्याच लग्न झालं नाही. 

सुनीता - तसं हि लग्नाला अजून किती दिवस राहिले आहेत. आपण त्याला लग्न झाल्यावरच दर्शनाला घेऊन जाऊ या. 

दशरथ - तू म्हणशील तसं. अजून काही राणी सरकार.

सुनीता - काही नाही? राघवी झालं हसून तुझं चल ताट घे.

जोशी सर जेवण घेऊन येतात. विभा चल जेवायला बसू या. तिघ्यांसाठी पान घे आणि हा ती किचन मधून तुपाची बरणी पण येताना घेऊन ये.

जोशी सर - समर तू हात धुऊन ये. तुम्हाला दोघांना थोड्याच वेळेत मुंबई ला निघावं लागेल. आपण जेवून झालं कि थोडं बसून बोलू. 

समर - ठीक आहे सर.

विभा सगळ्यासाठी गरमा गरम जेवण पानात वाढून घेते. त्या वरणावर थोडा तूप टाकते. जेवणाची चव छान होऊन जाते. 

समर - सर आज मोदक तुम्ही घेऊन आलात. छान गोड आहेत.

जोशी सर - समर आज मंगळवार आहे. इथे जेवण केंद्रात मोदक बनवतात. मी थाळी संगितली. मग त्या मध्ये सगळं जेवण देतात. अगदी गाजर काकडी सुध्या असते.

विभा - बर आहे.

जोशी सर - मजा तर तेव्हा असते जेव्हा जेवायला सोबत कोणी असेल. आणि जोशी सरांचा आवाज भरून येतो.

विभा - सर मी आहे ना.

जोशी सर - तू तरी किती दिवस राहणार आहेस. आता लग्न झालं कि मुंबईकर होणार.

सगळ्याचे जेवण होतात. विभा बडीशोप देते. 

जोशी सर - मी आवारात जरा चालून आलो. आज जास्तच जेवण झालं.

विभा घराच्या बाहेत बाल्कनीत येते. ठीक आहे सर पण लवकर या.

विभा - समर हि समोरील बिल्डिंग दिसते. त्या तिसऱ्या माळ्यावर मी राहते.

समर - जवळच राहतेस मग

विभा - हो, लहान असतानाच बाबाची बदली झाली इथे. मग कधी मुंबई कधी पुणे यामध्ये शिक्षण पूर्ण झालं माझं.

समर - तू पुढे काय करायचं काही ठरवलं आहेस.

विभा - कामाबद्दल

समर - हो म्हणजे घाई नाही आहे. तुझा साठी सगळंच नवीन असणार आहे.

विभा - स्वतःची फर्म सुरु करायचं ठरवते. सुरवातीला कुठे जॉब भेटत असेल तर बघू मग

समर - चांगला निर्णय आहे.

विभा - तूझ काय मग

समर - माझं काय         

विभा - अरे पुढे तू काय करणार आहेस. 

समर - मला तर फार काम असणार आहेत. 

विभा - ते कोणते 

समर- तुझ्या खूप प्रेम करायचं.

विभा - अच्छा माझ्यावर प्रेम करण हे तुझ्यासाठी काम आहे. 

समर - अगं तस नाही. जितकं चांगलं काम करेन. तसं लवकर नात्यात प्रमोशन भेटेल. असं बोलायचं आहे.

विभा - जा तू माझा शी बोलू नकोस

समर - ठीक आहे. फोन बघत असतो. 

विभा - कुठे जातोस, ये इथे लगेच मी बोलल्या बोलल्या फोन बघायला हात लावतोस. मी जवळ असताना हा फोन बाजूला ठेव.

समर - ठीक आहे सरकार अजून काही हुकूम

विभा - हसते लग्ना नंतर पण तू असाच वागणार आहेस का?

समर - तुला हसवण्या साठी काही पण करेन. विभा तुझ्याशी अजून एक बोलायचं होत.

विभा - बोल ना

समर - मुंबई ला पोचल्यावर माझा बरोबर हॉस्पिटल मध्ये ये तुला या केस च्या जवळच्या काही गोष्टी सांगायचा आहेत.

विभा - तुला या केस बद्दल काय माहित आहे?

समर - ते उद्या सकाळी बोलू. आता तर आपण आपल्या बद्दल बोलू या.

विभा - ठीक आहे. मग आपण फिरायला कुठे जायचं.

समर - हात जोडतो. खरंच वकील आहेस. आगे पिचे कूच नहीं सरळ मुद्याला हात. तू बोल कुठे जायचं. तसे मी तिकीट बुक करतो.

विभा - लाजते

समर - तुझ हे लाजणं काय करू याच

विभा - काही करू नकोस

समर - मग बोला सरकार आपली इच्छा कुठे जाण्यास आहे.

विभा - समर च्या डोळ्यात बघून बोलते. जिथे तू असशील तिथे मी मग ते कोणतं पण ठिकाण असू दे माझा साठी ते बेस्ट प्लेस असेल.

समर - समर विभा चा हात पकडतो. यापुढे आयुष्यात तुला काहीहि बोलायचं असेल तर विचार न करता तू मला सगळं सांगणार आहेस. मी त्या सगळ्यावर विश्वास ठेवेन. तुझ्या सगळ्या अडचणीत मी तुझा बरोबर असेल. मला माहित नाही. हे नवरा बायको च नातं कसं असत. पण हा तुला जेव्हा पण गरज असेल तेव्हा तू मला तुझा सोबत बघशील. तुझा एक चांगला सोबती, चांगला नवरा, चांगला प्रियकर किंवा चांगला मित्र म्हणून आयुष्यात तुझा बरोबर कायम असेन. विभा तू खूप गोड दिसतेस. त्या हुन हि तुझं हे निर्मल मन फार सुंदर आहे. खरंच नशीब लागत स्वतःवर खर प्रेम करणार व्यक्ती भेटायला. आणि त्या व्यक्तीला जपून ठेवायला. आणि मी तुला गमावणार नाही आहे. माझा आयुष्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत मला तुझा वर प्रेम करायचं आहे.

विभा - विभाच्या गालावरून अश्रू वाहू लागतात. हे ऐकताच ती समरच्या ओठांवर हात ठेवते. आयुष्यभर साथ देण्याचं वचन पाहिजे मधेच साथ सोडायचं नाही. तू माझा आयुष्यात असणंच हे माझ्यासाठी माझं आयुष्य सुखाने भरल्यासारखं आहे. तुझं भरलेलं कुटुंब त्यात आपला संसार विचार करूनच खूप चांगलं वाटत. 

समर - तुला वेगळं राहायचं आहे का? तसं असेल तर सांग मला

विभा - अरे नाही रे मला वेगळं नाही राहायचं आहे. मला सर्वा बरोबरच राहायचं आहे. आईची माया, बहिणीचं प्रेम हे सगळं मला तुझा घरात बघायला मिळाल. मला हे सगळं तुझा बरोबर अनुभवायचं आहे. 

समर - तथास्तु

विभा - हे काय

समर - असं बोलत असताना वास्तु पण आशिर्वाद देते. म्हणून नेहमी चांगलं बोलावं.

विभा - सगळेच चांगले विचार करणारे तुझा सारखे नसतात ना. 

समर - बाकीच्यांचे जाऊंदे आपण चांगलाच राहावं. मग कसं चांगलं चांगलं होत. 

विभा - समर आता प्रयन्त कोर्टात किंवा आयुष्यात बघत आले जो चांगला वागतोना . आयुष्यात त्या व्यक्तीला च जास्त त्रास होत असतो.

समर - विभा या त्रासाला आपण उगाच मोठा मान  देतो. आयुष्यात काही घडलं तरी हे माझा बाबतीत असं का झालं हे पकडून बसतो. अग एका अर्थी त्रासाने आपल्याला आपण कुठे चुकलो किंवा काय करायला पाहिजे होतो हे तरी कळत ग. आयुष्यात नव्याने जगायला हा त्रासच कारणीभूत असतो. आपल्या आजूबाजूला असे कितीतरी लोक आहेत त्यांच्या आयुष्यात खूप साऱ्या अडचणी चालू असतात. पण तरी ते आनंदाने आयुष्य जगत असतात. अग देवाला सुध्या वनवास सुटला नाही. आपण तर या रंगमंचावर फक्त आपला रोल रंगवायला आलो आहोत. त्यात रंग कोणते भरायचे, किती भरायचे याकडे लक्ष देण्या पेक्षा जो क्षण आनंदात वर्तमानात जगात येईल ना ते बघावं. अग चित्र खराब काढलं आहे. म्हणून चित्रकलाच शोधून देऊ नये. चित्र काढता तर येत आहे ना यात समाधान मिळवायला शिकायला पाहिजे. प्रत्येक वेळेला नात्यात हे चूक आहे हे बरोबर आहे. असं नाही बघायचं. प्रत्येकाचा अनुभव वेगळा, बघण्याची नजर वेगळी आणि प्रेमाचा डाव सुद्धा वेगळाच असतो. असं काय बघतेस.

विभा - तू बोलत राहिलास कि असच ऐकत रहावस वाटत.

समर - अजून काय काय वाटत? 

विभा - काही नाही.... जा तू

समर - परत

आणि दोघे हि हसू लागतात. तेवढ्यात जोशी सर येतात. 

जोशी सर - तुमच्या गप्पा झाल्या का? विभा जा तुला जे मी सामान दिल आहे ते भरून घे बॅगेत आगोदर विसरशील नाहीतर.

विभा - घेते मी

जोशी सर - समर हे बघ. तुला आता पर्यंत अंदाज आला असेल या प्रकरणाचा हे वाटत तेवढ सरळ नाही आहे.

समर - हो सर

जोशी सर - तू विभा ला नीता काकी बद्दल बोललास का?

समर - अजून तरी नाही. वेळ बघून तिला सगळ सांगायच ठरवलं आहे. मला तिला दुखी बघायचं नाही आहे.

जोशी सर - तुला माझी काही मदत लागली तर सांग मी तुमच्या सोबतच आहे.

समर - हो नक्की सर

विभा आणि समर दोघे हि मुंबई ला येण्यास निघतात. समर आणि विभा जोशी सरांच्या पाया पडतात. 

जोशी सर - सुखी रहा. विभा काळजी घे. 

विभा - तुम्ही पण तुमची काळजी घ्या. निघतो आम्ही

अनिकेत चा विभा ला फोन येतो. 

अनिकेत - विभा बस मिळाली का?

विभा - हो आता आम्ही बस मधेच आहोत. निघालो आहोत.

अनिकेत - ठीक आहे. नीट या. सकाळी समर ला घरी सोडायला सांग. आई ने इथेच येयाला सांगितलं आहे.

विभा - ठीक आहे. 

समर - कोणाचा फोन होता. 

विभा - अनिकेत चा फोन होता. मला सकाळी आत्या कडे सोड. 

समर - ठीक आहे. विभा हि खिडकी बंद कर खूपच थंड हवा आहे. तुला सर्दी होईल. हि शॉल घे. 

विभा - अरे मी ठीक आहे. 

समर - मला माहित आहे. आगोदर हि शॉल घे. तू गाणी ऐकणार आहेस.

विभा - ठीक आहे. 

दोघे हि प्रवासात गाणी ऐकत असतात. तेवढ्या विभा समर च्या खांद्यावर डोकं ठेऊन झोपून जाते. 

समर शांत झोपलेल्या विभा कडे बघत असतो. तिच्या कानातील कोड्स काढतो. विभा ला थंडी लागू नये म्हणून शॉल नीट करतो. विभा समर च्या हाताची पकड अजून घट्ट करून झोपून जाते.                   

विभा आणि समर पहाटे चार ला घरी पोचतात. समर विभाला आत्या च्या घरी सोडतो. 

आता खऱ्या अर्थाने विभा आणि समर च्या प्रेमाची परीक्षा सुरु होणार असते. येणार काळ काय काय दाखवतोय ते पुढील भागात बघू या........                                     

🎭 Series Post

View all