Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग अकरा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग अकरा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

 

अरुण सामान घेण्यासाठी दुकानात जातो. आज दुकानात गर्दी तशी कमीच दिसत असते. तो आजूबाजूला दुकानदार कुठे दिसत आहे का हे बघत असतो. आपल्या वर कोणी लक्ष ठेऊन आहे का? याची त्याला शंका येते. जे काही जिन्नस पाहिजे होते ते घेतो आणि दुकानातून निघत असतो. तेवढ्यात दुकान दाराची नजर अरुण वर पडते.

दुकान दार - साहेब कसे आहात? खूप दिवसांनी दिसत आहात.

अरुण - हो तुम्हालाच बघत होतो. मी नुकताच पुण्याला आलो आहे.

दुकान दार - साहेब काही मदत लागली तर बिनधास सांगा.

अरुण - थोड काम आहे. दुकान दाराच्या जवळ जातो. त्याला एक चिट्ठी देतो. यात सामानाची यादी आहे. या पत्तावर पोचवायचं आहे. मी माझं सामान घेतलं आहे.

दुकान दार - चिट्टी तील सामान वाचून दुकान दार हसतो. अरुण कडे बघून बोलतो. लवकर पोचवतो साहेब....

अरुण बरंच अंतर चालत येतो. समोरील फाटकातुन आत एका घराची बेल वाजवतो. समोरून जोशी सर दार उघडतात. 

जोशी सर - अरुण आत ये.

अरुण - सर सगळं ठीक आहे ना. तुम्ही मला इतक्या घाईने का बोलवून घेतलं.

जोशी सर - काही ठीक नाही आहे. विभा बाहेर ये.

विभा - हॅलो अरुण सर

अरुण - विभा तुम्ही इथे

जोशी सर - हो मीच तिला बोलवून घेतलं आहे. ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच होत आहे. तीन वर्षा पूर्वी काय सत्य लपलं होत हे शोधायचा प्रयन्त सुरु झाले आहेत. पण मला या क्षेत्रात काम करत असून सुद्धा काही हाती लागलं नाही.

अरुण - सर तुम्ही कशाबद्दल बोलत आहात. मला काहीच कळत नाही आहे.

जोशी सर - हे ऐकल्यावर जोशी सरांचा आवाज वाढतो. इन्सपेटर अरुण आता तरी खर बोला. काय लपवत आहात. तुम्हाला विभा ने मुंबई ला तिचा पाठलाग करताना ओळखलं आहे. विभा वर का लक्ष ठेऊन होतात.

अरुण - मला हे सगळं करावं लागलं. माझा कडे दुसरा मार्गच नव्हता. या मुलीला किती वेळा सांगितलं नाद सोडून दे त्या विषयाचा पण नाही ऐकत. नवीन माहिती काढत जाते. पुरावे शोधून काय मिळणार आहे . मेलेला माणूस परत येणार आहे का? आणि हे सगळं करत असताना ती लोक जिवंत ठेवणार आहेत का सर? तुम्ही तुमची मुलगी गमावली आहे. हिला तरी समजवा. परत का त्या नरकात पाय ठेवत आहे. विभा मुंबई ला आल्यावर गप्प बसून नव्हती.             

विभा - अरुण सर मी तुम्हाला तीन वर्षा आगोदर पण सांगितलं होत. जो पर्यंत माझं काम पूर्ण होत नाही. तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. 

जोशी सर - विभा शांत बस. अरुण मला खोटी कारण देऊ नकोस हिने काय केलं आहे. तो विषय तीन वर्षा पूर्वीच संपला आहे.

अरुण - हिने श्रेया तळपते हिला शोधून काढलं. या केस मध्ये पडायची काय गरज आहे.

जोशी सर - श्रेया तळपते....

विभा - अरुण सर तुम्ही तर तिला ऑन पेपर तीन वर्षा पूर्वीच मारून टाकलं आहे. तुम्ही माझाशी खोट बोललात. ती मेली नाही आहे. हॉस्पिटल मध्ये जिवंत आहे. तुम्ही या सगळ्या कामा मध्ये आला नसतात तर आता पर्यंत मी तिचा पर्यंत पोचली पण असते.

अरुण - बघा सर. त्या पारकर ला हे सगळं माहित पडलं ना तर जिवंत मारेल या विभा ला. मी आहे म्हणून वाचत आली आहे. म्हणून लक्ष ठेऊन होतो हिच्यावर सर..

जोशी सर - अरुण ती मुलगी श्रेया जिवंत आहे. हे तू का लपवलंस. 

अरुण - सर जिवंत आहे म्हणजे कोमात आहे ती. तिच्या बापाने या केस मुळे अजून त्रास होऊ नये म्हणून हे कारण पुढे केलं होत. त्या वेळेला कोणाला सांगू नका अशी विनंती पण केली होती. 

विभा - मला श्रेया ला भेटायचं आहे. 

अरुण - अग विभा पण त्याने काय होणार आहे. या घाणीत कशाला हात टाकतेस. तुझं लग्न ठरलं आहे. तू तुझा नवीन आयुष्यवर लक्ष दे. 

विभा - अरुण सर हे शोध घेण्याचा काम तुमचं होत. पण तुमचे हात आणि विचार हे दोन्ही पारकर ने भीतीने बांधून ठेवले आहेत. तुम्ही तुमचं कार्य करा. मला माझं कर्तव्य करू दे.

जोशी सर - मी विभा ला समजावून सांगेन ती या सगळ्यात नाही पडणार.

विभा - सर हे तुम्ही काय बोलत आहात.

जोशी सर - हो विभा हे मीच बोलत आहे. मी एक मुलगी माझी गमावली आहे. मला दुसरी नाही गमवायची आहे.

अरुण - सर मी येतो. काही मदत लागली तर सांगा.

जोशी सर - नक्की अरुण. थँक यु

अरुण तिथून निघून जातो. विभा जोशी सरांवर चिडते.

विभा - सर तुम्ही हे बरोबर केलं नाही. मी इतकी वर्ष सगळे पुरावे गोळा केले आहेत. हे तुम्हाला पण चांगलं माहित आहे. पण आता का आपण मागे पाऊल घेत आहोत.

जोशी सर - विभा हे प्रकरण जेवढ वाटतंय तेवढ आता सरळ राहील नाही आहे. तू स्वतः बरोबर दुसऱ्याचे पण आयुष्य पणाला लावत आहेस. तू आता लवकर मुंबई ला निघून जा. घरचे सगळे काळजी करत असणार. या विषयावर आपण नंतर बोलू या.

विभा - मला काहीच समजत नाही आहे.

जोशी सर - हे बघ शांत हो. इतकी वर्ष वाट पाहिलीस ना. अजून थोडा संयम ठेव. सगळं होईल नीट. पण या केस मुळे कोणाला नुकसान नको होयला.

विभा - कोणाला नुकसान होणार आहे सर

जोशी सर - ठीक आहे आता स्पष्ठ च बोलतो. घरी काय सांगून आली आहेस.

विभा - ऑफिस मध्ये बोलावलं आहे.

जोशी सर - तू कोणाचे कॉल पण घेत नाही आहेस. तुझा ऑफिस मध्ये जर कोणी कॉल केला तर काय करणार आहेस? तुझा वर अरुण लक्ष ठेऊन होता. तुला याचा अर्थ कळतो का? अरुण हा पारकर ला मिळालेला माणूस आहे. तो आपल्या विरोधात जाणार नाही. पण तो आपल्याला मदत पण करणार नाही. पारकर तुझा माणसांना पण त्रास देऊ शकतो. आज हॉस्पिटल मध्ये जी मुलगी श्रेया कोमात आहे. तिझी हि अवस्था कोणी केली विभा? पारकर ने च केली आहे. जर त्याला कळलं तू तिझ्या प्रयन्त पोचत आहेस तर तो श्रेया ला पण मारून टाकेल. हा अंदाज विभा तुला येत नाही आहे का? आणि तुझं फोन च लोकेशन ट्रॅक केलं आहे. आता तरी समज  

विभा - हा ऐकून विभा शांत बसलेली असते. तेवढ्यात समर चा फोन येत असतो.

जोशी सर - बोल समर जवळ विषय अजून वाढवू नकोस. कि ते तुला शोधात इथे पोचतील. 

विभा - बाहेर बाल्कनीत जाते. हॅलो समर

समर - फोन उचल्या मुळे समर ला बर वाटत. हॅलो विभा कुठे आहेस तू? काळ पासून किती कॉल करतो. तू ठीक तर आहेस ना. 

विभा - अरे हो मी ठीक आहे. तू कसा आहेस

समर - तू आता कुठे आहेस ?

विभा - पुण्याला आली आहे. तुझा साठी नीता काकी कडे ठेवलेला मॅसेज तू वाचला नाहीस का? 

समर - अरे मी काळ हॉस्पिटल मधेच होतो. त्यामुळे मला नीता काकींना भेटता नाही आलं.

विभा - हॉस्पिटल मध्ये का रे घरी सगळे ठीक आहेत ना. 

समर - हो घरी सगळे ठीक आहेत. (आता हिला फोन वरती काय बोलू) अग विभा हॉस्पिटल मध्ये एकाला मदत पाहिजे होती. तुझा ऑफिस मध्ये फोन केलेला ते बोलले कि तू ऑफिस मध्ये आली नाहीस. घरी सगळ्याना तू हेच सांगून ठेवलं आहेस.

विभा - हो काळजी करतील म्हणून असं बोलली पण तुला जी चिट्टी ठेवली आहे. त्या मध्ये मी सगळं लिहलं आहे.

समर - तू हे सगळं बोलू पण शकत होतीस.

विभा - माझा कडे तेवढा वेळ नव्हता रे. आणि माझा फोन ट्रॅक केला आहे. म्हणून मी नंबर बंद ठेवणार आहे.    

समर - ठीक आहे. तू लवकर घरी ये परत. मी तुला घेण्यास येऊ का? कुठे येऊ ते बोल.

विभा - समर ला आपल्या बदल काळजी वाटत आहे. हे ऐकून बर वाटत. मी लवकरच परत येत आहे. तू काळजी करू नकोस.

समर - तू किती वाजता निघणार आहेस. आता कोणाकडे आहेस?

विभा - मी आता जोशी सरांच्या घरी आहे. मी आज रात्री ट्रेन ने परत येते.

समर - मला जोशी सर याच्या पण नंबर पाठव. तुझा फोन बंद असेल तेव्हा मी त्यांचा शी बोलून घेईन. जोशी सरांना ट्रेन मध्ये सोडायला बोल. 

विभा - हसत बोलते. समर मी हरवायला लहान नाही आहे. चल मी फोन ठेवते.

समर - बाय. असं काय महत्वाचं आहे ज्याचा साठी विभा घरी खोटं सांगून पुण्याला गेली आहे. आणि त्या बद्दल तिने मला चिट्टीत लिहून ठेवलं आहे. तिचा फोन नंबर पण ट्रॅक केला आहे. म्हणजे विषय खरंच गंभीर आहे. मला नीता काकी ना लवकरच भेटावं लागेल. आता ऑफिस च सगळं काम पूर्ण करतो. मग जेवण्याच्या वेळेला नीता काकींना भेटतो. समर नीता काकींना फोन करतो. कोणी फोन उचलत नसत. परत समर कॉल करतो. समोरून एक बाई फोन उचलते. आवाज थोडा वेगळा वाटतो.  

समर - हॅलो नीता काकी बोलत आहात का ?

बाई - नाही मी तिची आई बोलत आहे.

समर - मला नीता काकी शी बोलायचं आहे. त्या आहेत का?

बाई - ती कालच मेली? असं बोलून ती बाई रडायला लागते.

समर - हे ऐकून समर च्या अंगावर काटा येतो.  असं कस झालं. हजार प्रश्न मनात खेळ करू लागतात. तरी तो त्यां बाईना विचार तो त्यांना बर नव्हतं का? 

बाई - काल रातच्याला कामावरून परत येत होती. तेव्हा कोणी तरी तिच्या मानवरून सुऱ्या न वार केलं. आणि माझी पोर गेली सोडून मला. हे बोलून फोन ठेऊन देते.

हे सगळं ऐकून समर भानावर येतो. हे फार मोठं प्रकरण आहे. जेवढं वाटत तेवढ हे सोपं नाही आहे. विभा ला याची जाणीव तरी आहे. मी विभाला घेयाला पुण्याला जातो. आता उशीर करून चालणार नाही.

समर परत विभा ला कॉल करतो.

विभा - हॅलो बोल समर काय झालं?

समर - विभा मी आता तुला पुण्याला नेयाला येत आहे. तू पत्ता मला सांग.

विभा - अरे याची काहीच गरज नाही. ये स्वतः येईन.

समर - समर रागाने तिला ओरडतो. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला आता च्या आता पत्ता सांग.

विभा - विभा मनात विचार करते. समर ला काय झालं हा चिडला आहे. विभा जोशी सरांचा पत्ता सांगते.

समर - तू तिथेच थांब. मी आल्यावर आपण निघणार आहोत.

विभा - ठीक आहे. पण काय झालं समर

समर - जोशी काका आहेत का? मला त्यांच्याशी बोलायचं आहे.  

विभा - हो आहेत. थांब फोन देते.

जोशी सर - हॅलो

समर - नमस्कार सर मी समर बोलत आहे.

जोशी सर - बोल समर, कसा आहेस. आपली तशी जास्त ओळख अजून झाली नाही. पण विभा कडून तुझा बदल जेवढ ऐकलं आहे. मला खरंच आवडेल तुला भेटायला.

समर - नक्की सर आपण लवकरच भेटू. मला थोडं तुमच्याशी विभा बद्दल बोलायचं आहे. सध्या विभा च काय चालू आहे. मला खरचं माहित नाही. पण तिचा जीव धोक्यात आहे. ति जेव्हा मुंबई वरून निघाली. तेव्हा माझ्यासाठी एक पत्र नीता काकींकडे ठेऊन गेली. जोशी सर मला आताच कळलं कि नीता काकींना कालच रस्त्यावर कोणीतरी मारून ठाकलं. हे मी विभाला काही बोललो नाही. पण हे सगळं प्रकरण मला बरोबर नाही वाटत. मी विभा घेण्यासाठी आता पुण्याला येत आहे. तोपर्यन्त तिची काळजी घ्या. मी लवकरच पोचतो.

जोशी सर - ठीक आहे समर. लवकर ये. बाय. 

जोशी सर मनात विचार करत असतात. समर ला आता सगळं सांगायची वेळ आली आहे.

समर गुप्ता सरांना भेटायला केबिन मध्ये जातो. 

समर - में आय कमिंग सर

गुप्ता सर - आओ समर क्या बात है|

समर - सर मुझे अभि ऑफिस से निकलकर पुणे जाना है|

गुप्ता सर - सब सही है ना|

समर - सर थोडा प्रॉब्लेम हुआ है| इसिलिये जाणा जरुरी है|

गुप्ता सर - ठीक है समर| वापस कब आने वाले हो|

समर - मैं कल तक आ रहा हू| थँक यु सर बाय 

गुप्ता सर - समर ओर कूच मदत लगे तो बता देना| ओर जो भी जरुरी काम हे ओ गीता को समजाके जाना| 

समर - ठीक हे सर |

समर गीता ला जाऊन भेटतो. ऑफिस ची सगळी काम गीता ला समजावून निघतो. अनिकेत त्याला निघत असताना विचारतो. 

अनिकेत - समर लवकर निघत आहेस. काय झालं? कुठे जातोस?

समर - पुण्याला जात आहे. सगळं आल्यावर सांगतो. तोपर्यंत कामाचं थोडं सांभाळून घ्या.

अनिकेत - ठीक आहे. काळजी करू नकोस.

समर पुण्याला जाणारी ट्रेन पकडतो. समर घरी बाबाना फोन करून सगळं सांगतो. बाबा त्याला काळजी घे सांगतात.

समर ला पुण्याला कधी पोचेन असं झालं असत. विभा कोणत्या तरी संकटात अडकली आहे. पुण्याला पोचे पर्यंत संध्याकाळ झाली असते. 

काही तासांनी समर जोशी सरांच्या घरी पोचतो. विभा ला सुरक्षित बघून समर ला बर वाटत. जोशी सर समर ला पाणी पिण्यास देतात. 

जोशी सर - समर थोडा आराम कर. मी आपल्या जेवणाचं सांगून येतो. 

समर - सर तुम्ही का त्रास करून घेताय.

जोशी सर - मी स्वतः जेवण बनवत नाही. डबा लावला आहे. तुमच्या साठी पण सांगतो. मी येतो जाऊन तोपर्यंत तुम्ही दोघ बोला.

विभा - ठीक आहे.

समर - विभा जवळ जातो. तिचा हात हातात पकडतो. हे बघ विभा मी आयुष्यात खूप चांगल्या लोकांना गमावलं आहे. मला तुला गमवायचा नाही आहे. या पुढे जे काही असेल ते तू माझा शी खर बोलत जा. मी समजून घेईन आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवतो.

विभा - विभा ला रडू येत. ती समर ला मिठी मारते. आय लव्ह यु समर मला पण तुझी खूप आठवण येत होती. मला तुला सगळं सांगायचं होत. माझी पण काही कर्तव्य आहेत ते मला पूर्ण करायची आहेत.

समर - हे बघ विभा आपल्या लग्नाला अजून काहीच दिवस राहिले आहेत. मला पण तुला खूप साऱ्या माझा आयुष्यातील आठवणी सांगायच्या आहेत. जे तुला माहित असणं तुझा हक्क आहे. मी तुझा शिवाय नाही राहू शकत. मला फक्त तझी साथ पाहिजे.

विभा - आय एम सॉरी या पुढे तुला सांगून जात जाईन. 

समर - नाही सांगितलंस तर मी जिथे असणार तिथे असाच शोधात तुला मागे येणार आणि मग तुला घेऊन जाणार.

दोघे हि हसतात. 

तेवढ्यात समर ची नजर समोरील भिंती वरील फोटो वर गेली. त्या फोटो ला बघून समर चकित झाला. 

समर - विभा हा तुझा बरोबर कोणाचा फोटो आहे. हि मुलगी कोण आहे?

विभा - हि च्या साठीच मी इथे पुण्याला आली आहे. हि शुभांगी जोशी जोशी सरांची मुलगी.

समर - हिला च तर मी ओंनलाईन शोधात होतो. जिच्या कढून मला श्रेया सोबत काय झालं असणार हे कळणार होत. विभा ला विचारू का आता कुठे आहे हि मुलगी? विभा हि जोशी सरांची मुलगी कुठे आहे? काय करते?

विभा - समर ती आता या जगात नाही आहे. तिचा ऍक्सिडंन झाला अस म्हणतात.  पण मला माहित आहे. तीन वर्षा पूर्वी तिचा खून करण्यात आला होता. 

समर - तीन वर्षा पूर्वी काय झालं होत. 

विभा - शुभांगी तिच्या मैत्रिणी बरोबर नाशिक ला जात होती. मी तेव्हा पुण्यात नव्हते. माझा शिकणासाठी मुंबई ला आले होते. पण शुभांगी बरोबर माझे बोलणे होत असे. आम्ही लहान पानापासून एकाच शाळेत शिकत होतो.       

समर - नाशिक हे ऐकताच समर ला पूर्ण भूतकाळ डोळ्या समोर उभा राहिला. श्रेया बरोबर ची ती रात्र आठवली. जेव्हा ती नाशिक ला जाणार होती. विभा शुभांगी च्या मैत्रीनेच नाव काय होत?

विभा - श्रेया तळपते. मी आता मुंबई आली होती तेव्हा मला तिला भेटायचे होते पण काही कारणांनी मला भेटू दिले नाही. माझा वर नजर ठेवण्यात आली होती.

समर - श्रेया च नाव ऐकून समर सुन्न होऊन जातो. तुझा वर नजर कोणी ठेवली होती. तू का श्रेया ला शोधतेस?

विभा - इन्स्पेटर अरुण हे मला आडवे येत आहेत. श्रेया हि त्या वेळी जे घडलं त्या गोष्टीचा एकच साक्षीचा पुरावा आहे. श्रेया जवळ पारकर चे सगळे पुरावे होते. शुभांगी आणि श्रेया ने हे पुरावे जमा केले होते.

समर - हे सगळं तुला कस माहित आहे.

विभा - शेवटच्या क्षणी माझं शुभांगी च्या फोन वरून श्रेया शी बोलणं झालं होत. श्रेया कडे सगळी माहिती होती. हे मला श्रेया ने सांगितली होत. तिने हे सगळे पुरावे कुठे तरी जपून ठेवले होते. ती मला हे सगळं सांगणार होती. तेवढ्यात फोन कट झाला. परत कॉल करत होती पण फोन कोणी उचलत नव्हतं. मी हे सगळं जोशी काकांना सांगितलं तर त्यांनी शोध सुरु केला. तर काही तासांनी नाशिक फाट्यावर शुभांगीची नदी काठी बॉडी सापडली. या तीन वर्षात मी त्या श्रेया चा शोध घेण्याचा खूप प्रयन्त केला. पण मला तिचा काहीच माहिती नाही सापडली.

समर- मग तू पोलिसांकडे का नाही गेलीस? त्यांनी तुला मदत केली असती. 

विभा - पोलीस ते काहीही करू शकले नाहीत. आम्हाला जशी पाहिजे तशी मदत नाही मिळाली. पोलिसांना पुरावे पाहिजे होते आणि तेच माझा कडे नव्हते.

समर - विभा मी तुला या प्रकरणात मदत करेन. घाबरू नकोस. आपण पुरावे शोधू या...

विभा समर कडे चकित होऊन बघत असते. समर ची नजर खोलवर गेली असते. तेवढ्यात जोशी सर जेवण घेऊन घरी येतात. विभा आणि समर चा गंभीर चेहरा पाहून त्यांना अंदाज येऊन जातो.           

समर च्या नकळत अजून एक चांगली गोष्ट घडत असते. आज हॉस्पिटल मध्ये श्रेया ला शुद्ध आली असते. पण थोड्या वेळेने परत ती बेशुद्ध होते. 

 

समर,विभा आणि श्रेया यांच्या आयुष्यात एक वेगळं वळण येणार असत....     

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now