Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग दहा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग दहा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

मागील भागात आपण पाहिलं कि विभाला जोशी सरांचा फोन येतो. विभा लगेच पुण्याला निघून जाते. समर हॉस्पिटल मध्ये श्रेया सोबत थांबलेला असतो.

समर - डॉक्टर गुरु श्रेया ठीक होईल ना. या महिन्यात तिला दोनदा हा असा त्रास झाला.

डॉक्टर गुरु - समर तुम्ही काळजी करू नका. श्रेया आमच्या उपचारांना रिस्पॉन्स देत आहे. त्यामुळे तिला हा त्रास होत  आहे. श्रेया च्या शरीरामध्ये हळू हळू बदल होत आहे. काही दिवसांनी कदाचित श्रेया ला शुद्ध सुद्धा येईल. आता तुम्ही श्रेया ला जाऊन बघू शकता. 

समर - थँक यु. डॉक्टर गुरु मागील महिन्याचं बिल मला सेंड करायला सांगा. मी पेय करतो.

डॉक्टर गुरु - मी बोलून घेतो. तुम्ही जाऊन बिल भरू शकता. ठीक आहे. 

समर हॉस्पिटल मध्ये बिला बद्दल माहिती काढतो. आणि ऑनलाईन पेंडिंग पेमेंट भरून घेतो. समर परत श्रेया ला बघायला पहिल्या माळ्यावर जात असतो. त्याला आठवत मघाशी विभा ने आपल्याला कॉल केलेला. तो विभा ला कॉल करतो. पण विभा फोन उचलत नाही. समर मनात विचार करतो. विभा कामात असले म्हणून कॉल उचलत नसेल नंतर बोलेन.

श्रेया चे बाबा काळजीत बसलेले असतात. बाबा ना समर आधार देत असतो. श्रेया चे बाबा समर ला सांगतात. तुला ऑफिस ला जायचं असणार निघ तू. मी थांबतो इथे. समर बाबा ना बोलतो. तुम्ही घरी जाऊन थोडा आराम करून या मी आज सुट्टी घेतली आहे.

बाबा- समर तू पण तर जागाच होतास. तुझा तरी डोळयाला डोळा कुठे लागला होता.

समर - तुम्ही घरी जाऊन या मी ठीक आहे. 

बाबा समर च ऐकून घरी निघून जातात. समर परत विभा ला कॉल करतो. विभाच्या फोन ची रिंग फक्त वाजत असते ती फोन काही उचलत नाही. समर ला काळजी वाटू लागते. खूप वेळ झाला. विभा आहे तरी कुठे? माझा नंबर पाहून सुद्धा मला परत कॉल केला नाही. ठीक तर असेल ना. सकाळी कॉल केलेला तेव्हा काही बोलू शकलो नाही. समर अनिकेतला फोन करतो.

समर - हॅलो अनिकेत

अनिकेत - बोल समर आज ऑफिस मध्ये आला नाहीस.

समर - हो मी आज येणार नाही आहे. श्रेया ला बर वाटत नव्हतं. मी आता तिच्या बरोबर हॉस्पिटल मध्ये आहे. 

अनिकेत - सगळं ठीक आहे ना. मी येऊ का?

समर - नको आता सगळं ठीक आहे. अरे विभा कुठे आहे?

अनिकेत - तुला बोलली नाही का ती?

समर - काय झालं?

अनिकेत - अरे ती आज सकाळी पुण्याला गेली आहे.

समर - पुण्याला डायरेक्ट काय झालं पण असं

अनिकेत - काही जास्त बोलली नाही. ऑफिस मधून बोलवल आहे. महत्वाचं काम आहे असं बोलून निघाली.

समर - अच्छा, तिने सकाळी कॉल केलेला. पण माझं बोलणं झालं नाही. आता कॉल करतोय तर फोन उचलत नाही आहे.

अनिकेत - ती कामात बीजी असेल. फ्री झाली कि तुला कॉल करेल.

समर - अनिकेत विभा च्या पुण्याच्या ऑफिस चा नंबर असेल तर मला पाठव ना. 

अनिकेत - हो सेंड करतो.

समर परत विभा ला कॉल करतो. विभा काही फोन उचलत नाही. तेवढ्यात नर्स समर ला मेडिसिन आणायला सांगते. समर मेडिसिन घेयाला जातो. समर ला आईचा कॉल येतो.

सुनीता - समर श्रेया कशी आहे?

समर - आता ठीक आहे.

सुनीता - तू घरी कधी येणार आहेस.

समर - रात्री येईन.

सुनीता - ठीक आहे. काही खाऊन घेतलंस का ?

समर - हो चल बाय.  

अनिकेत विभा च्या ऑफिस चा नंबर सेंड करतो. समर मॅसेज बघतो. त्याला विभा ने पाठवलेला पण मॅसेज शो होतो. विभाने काय मॅसेज सेंड केला आहे. तो ओपन करून वाचत असतो. "समर मला खूप सार तुझ्याशी बोलायचं आहे. नीता काकी ला भेट आणि तिच्या कडे तुझ्यासाठी एक चिठी ठेवली आहे ती वाच." त्यात विभाने जे लिहलं असत ते वाचून समर ला काहीतरी वेगळीच चाहूल लागते. असं का हिने लिहलं आहे. माझ्यासाठी चिठी ठेवली आहे. म्हणजे ती फोन वर हे सगळं सांगू शकत नव्हती. विभा कोणत्या अडचणीत तर नाही आहे ना. आपल्या ला लवकर विभा शी बोलावं लागेल.

समर विभा च्या ऑफिस मध्ये फोन करतो.

समर - हॅलो शाह फर्म, मी समर बोलत आहे. विभा जाधव आहे का? मला विभा शी बोलायचं आहे.

समोरील व्यक्ती - सॉरी सर पण विभा मम् सुट्टी वर आहेत. त्या नेक्स्ट वीक जॉईंट होणार आहेत.

समर - नाही ओ त्याना तातडीने बोलावण्यात आलं आहे. विभा आज सकाळीच लवकर निघाल्या आहेत. आता तर त्या पोचल्या पण असणार. जर त्या आल्या तर कृपा करून मला कॉल करायला सांगा. माझं नाव समर माने आणि माझा नंबर पण तुम्ही लिहून घ्या.

समोरील व्यक्ती - ठीक आहे सर, पण विभा मम् जवळ काल च आमचं बोलणं झालं होत त्या नेक्स्ट वीक मधेच येणार आहेत.

आता समर खरोखर घाबरतो. विभा खोटं का बोलली? तिला तर खोट बोललेलं आवडत नाही. अनिकेत ला सांगू का हे? नको माझ्याकडे अजून काही ठोस माहिती नाही आहे. सगळ्यात आगोदर नीता काकी ना भेटू या. मग सगळं माहिती पडेल. 

समर - अनिकेला फोन करून नीता काकी याचा नंबर मागतो?

अनिकेत - काय झालं समर सगळं ठीक आहे ना तू नीता काकी चा नंबर का मागत आहेस. 

समर - अरे विभा ने माझ्यासाठी घरी एक गिफ्ट ठेवलं आहे. ते तिने नीता काकी जवळ ठेवलं आहे. त्या बदल बोलायचं आहे. 

अनिकेत - काही सिरीयस नाही ना. ठीक आहे. मी नीता काकी कढून घेऊन येतोना मग. 

समर - ठीक आहे. रात्री भेट. मला थोडा उशीर होईल.

अनिकेत - ओक बॉस... 

समर श्रेया च्या रूम मध्ये जातो. श्रेया ला दुरून बघत असतो. त्याला तीन वर्षा पूर्वीच आठवत असत. खूप मुसळधार पाऊस पडत असतो. नवीन नोकरी असल्या मुळे समर ऑफिस मध्ये उशिरा प्रयन्त काम करत बसलेला असतो. श्रेया चा एक सारखा फोन येत असतो. समर काही लक्ष देत नाही. ऑफिस मधून निघाल्यावर तो श्रेया ला कॉल करतो. पण तेव्हा श्रेया काही फोन उचलत नाही. खूप पाऊस असल्या मुळे समर घरी जातो.

सुनीता - जेवायला वाढू का?

समर - हो आई आज श्रेया शी काही बोलणं झालं का ग तुझं

सुनीता - नाही रे. काय झालं 

समर - तिला कॉल करत आहे पण उचलत नाही आहे.

सुनीता - समर त्या नवीन घरात काय काम करायचं आहे. ते एकदा दोघांनी बघून तरी घ्या.

समर - हो मी श्रेया जवळ बोललो आहे. या बद्दल ती लवकरच सगळं फायनल करणार आहे.

सुनीता - ठीक आहे.

समर श्रेया च्या बाबाना फोन करतो.

समर - हॅलो बाबा श्रेया आहे का? तिला खूपदा कॉल केला उचलत नाही आहे. तिज्याशी थोडं बोलायचं आहे.

बाबा - श्रेया घरी नाही आहे.

समर - मग कुठे आहे.

बाबा - ती आज संध्याकाळी पुण्याला जायला निघाली. आता तर पोचली पण असेल. 

समर - पुण्याला का?

बाबा - तिची शुभांगी जोशी मैत्रीण आहे. तिच्या शी काही काम आहे. असं बोलत होती.

समर - ठीक आहे बाबा. फोन आलं तर मला कॉल करायला सांगा. फोन ठेवतो मी

समर ला हे काही ठीक वाटत नसत. श्रेया च काय चालू आहे. तिला पुण्याला जाण्याची काय गरज होती. मला बोलली असती तर मी पण बरोबर गेलो असतो. परत एकदा श्रेया ला फोन करतो पण कोणी नाही उचलत. समर झोपून जातो.

सकाळी समर नेहमी प्रमाणे लवकर उठतो. स्वतःच सगळं आवरून घेतो. सुनीता समर ला चहा - नास्ता देते. समर नास्ता करून घेतो. ऑफिस ला जायला निघतो. घरून जाताना डबा बरोबर घेऊन जातो. समर ऑफिसला ला वेळेवर पोचल्यावर कामास सुरवात करतो. आज चा दिवस समर चा पूर्ण बीजी जातो. त्याला च्या बॉस ने एक नवीन प्रोजेक्ट दिलेल असत. ते त्याला दोन दिवसात पूर्ण करायचं असत. आज दिवस भरात आपण श्रेया ला कॉल केला नाही. याची समर ला जाणीव होते. तो श्रेया ला कॉल करतो. आज परत खूप मुसळधार पाऊस पडत असतो. 

समर - हॅलो कुठे आहेस?

श्रेया - आता घरी आहे. पण थोड्या वेळेने घरून निघीन.

समर - घरून निघणार. अग काल तू पुण्याला गेलीस ना.

श्रेया - हो

समर - मग आता परत कुठे? श्रेया चा रडायचं आवाज येत असतो. श्रेया खार सांग काय प्रॉब्लेम आहे. तू काही लपवत आहेस का माझा पासून. बोल

श्रेया - काही नाही. मी तुला नंतर सगळं कॉल करून सांगते. माझा कडे आता वेळ नाही आहे. मला लवकर निघायचं आहे.

समर - थांब मी घरी येत आहे. मला बोलायचं आहे. समर श्रेया च्या घरी पोचतो.

दारावरील बेल वाजते. श्रेया दार उघडते. समोर समर ला बघून तिचे डोळे भरून येतात. समर बॅग बाजूला ठेवतो. श्रेया ला असं रडत बघून त्याला काही सुचत नसत. 

समर - श्रेया माझ्याकडे बघ. काय होत आहे. 

श्रेया - काही नाही. खूप नर्वस झाल्या सारखं झालं आहे. परत बॅगेतील सामान भरायला घेते.

समर - बाबा कुठे आहेत? तू एकटीच घरी आहेस. तू पुण्याला का गेली होतीस. आता कुठे जात आहेस. सॉरी त्या दिवशी तुझे कॉल मी नाही घेऊ शकलो. परत तुला कॉल केलेला पण तू उचला नाहीस. तुला बर वाटत नाही आहे का?

श्रेया - थोडी शांत होते. बाबा आत्या कडे गेले आहेत. उद्या सकाळी घरी येतील. मी आता शुभांगी बरोबर नाशिक ला जात आहे. 

समर - नाशिक ला तिथे का? आणि हि शुभांगी कोण आहे? तुझी बेस्ट फ़्रेंड्स तर नाही आहे.

श्रेया - समर चे हात हातात घेते आणि त्याचा डोळ्यात बघून बोलत असते. समर खूप साऱ्या गोष्टी तुला सांगायच्या आहेत. पण माझा कडे आता तेव्हडी वेळ नाही आहे. मी तुला परत आल्यावर सगळं सांगेन. प्रॉमिस.... आणि घट्ट मिठी मारते. 

समर - समर ला काही कळत नसत. आज श्रेया ला काय होत आहे? तो तिला जवळ घेतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. ऐक आज तू नको जाऊन मी तुझ्याबरोबर उद्या संध्याकाळी येतो. आपण दोघे जाऊ या. माझं ऑफिस मध्ये एक प्रोजेक्ट उद्या देण्याचं आहे. ते झालं कि आपण निघू. घाई करू नकोस.

श्रेया - मी ठीक आहे. कोण्याच्या तरी आयुष्याचा प्रश्न आहे रे. माझी गरज आहे आता. श्रेया हि रिपोर्टर असते. आणि समाजातील अत्याचार होणाऱ्या बायकांना न्याय मिळून देत असते.

समर - तू आगोदर सगळं मला खर सांग. काय झालं आहे. मगच मी तुला सोडेन. नाहीतर

श्रेया - ठीक आहे. सगळं सांगते मी तुला    

समर ला घरून फोन येतो.

राघवी - हॅलो दादा, अरे बाबांना ठीक वाटत नाही आहे. लवकर घरी ये.

समर - आलो 

श्रेया - काय झाल

समर - अग बाबा ना बर नाही वाटत आहे. मला निघावं लागेल. तू काय बोलत होतीस.

श्रेया - आता याला सगळं सांगायला नको टेन्शन घेईन. खोट बोलावं लागेल. अरे नेहमी प्रमाणे कंपनी वाले बायकांना पगार जास्त देत नाहीत या विषयावर मला आता काम करायच आहे. म्हणून नाशिक ला जात आहे.

समर - श्रेया अजून काही नाही ना. जे तुला मला सांगायचं आहे. तुझे डोळे काही तरी वेगळंच बोलत आहेत. तू नको जाऊस नाशिक ला. 

श्रेया - हे बघ माझं जे ठरलं आहे ते फायनल आहे. तू लवकर घरी जा. 

समर - ठीक आहे. मला फोन करायचा आणि काळजी घे. लवकर परत ये. 

हे बोलून समर घरी निघून जातो.

इथे दशरथ राव याना बर वाटत नसल्या मुळे हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करावं लागत. समर आणि सुनीता याच सगळं लक्ष त्या गोष्टी मध्ये असत. दशरथ राव याच्या वर पटापट उपचार सुरु होतात. समर आई ला सकाळी ये लवकर आता तू घरी जा सांगतो. आणि स्वतः हॉस्पिटल मध्ये थांबतो. सुनीता डॉक्टरांशी बोलून दशरथ याची तब्बेतीची विचारपूस करून निघते. 

समर रात्रीचा बाहेरील बाकड्यावर बसलेला असतो. श्रेया बद्दल विचार करत असतो. श्रेया ला कॉल करतो. पण श्रेया फोन उचलत नाही. आता प्रयन्त श्रेया ला मी एवढ कधी घाबरलेले पाहिलं नाही आणि श्रेया वरून - वरून दाखवत होती की सगळं नीट आहे. पण ती आतून फार बिथरली होती. हे समर ला जाणवलं होत. तिला काय सांगायचं होत. कि बोलायचं थांबली. आज मला तिचा हात हातात पकडताना फार वेगळीच अनामिक भीती मनात का जाणवत होती. जस मी तिला गमावून बसेन. माझा मनात असे विचार का येत आहेत. समर परत श्रेया ला फोन करतो. पण श्रेया काही फोन उचलत नाही. 

नर्स - मिस्टर समर मिस्टर समर ऐकताय ना

समर - नर्स ची हाक ऐकून भानावर येतो. सॉरी काय झालं.

नर्स - तुम्हाला बाहेर थांबावं लागेल आता. आमच्या श्रेया मम् चे कपडे बदलांयचे आहेत.  

समर -ठीक आहे. समर श्रेया ला परत एकदा बघतो आणि रूम च्या बाहेर येतो. 

समर विचार करत असतो. श्रेया ला असं काय सांगायचं होत मला जे शेवट प्रयन्त मला माहिती पडलंच नाही. ती पुण्याला आणि नाशिक ला का गेली होती. काही तरी अजून होत जे मला इतकी वर्ष झाली तरी माहित नाही पडलं. पोलिसांना पण काहीच कसं भेटलं नाही. या सगळ्या गोष्टी परत तिथेच थांबल्या जशी श्रेया थांबली आहे. 

समर ला अनिकेत च्या फोन येतो. 

अनिकेत - हॅलो समर

समर - बोल रे

अनिकेत - अरे त्या नीता काकी मला ते पत्र देत नाही आहेत. विभा ने ते तुलाच देयाला सांगितलं आहे. असं बोलत आहेत. 

समर - ठीक आहे. मी उद्या त्यांना विभा च्या घरी त्यांना भेटतो.

अनिकेत - ठीक आहे. मी घरी जातो आता बाय.

तेवढ्यात श्रेया चे बाबा हॉस्पिटल मध्ये येतात. ते समर ला घरी जायला सांगतात. समर घरी जायला निघतो. काही गरज लागली तर मला फोन करा बाबा असं सांगतो. 

घरी आल्यावर फ्रेश होऊन समर आपल्या रूम मध्ये शांत बसलेला असतो. फोन मध्ये फेसबुक ओपन करतो. आणि जस्ट वेळ जात नसतो म्हणून बघत असतो. तेवढ्यात त्याच्या मनात एक विचार येतो. शुभांगी जोशी हीच पुढे काय झालं. नाशिक ला जाताना हि श्रेया बरोबर होती. तिला पण हॉस्पिटल मध्ये तीन वर्ष आगोदर ऍडमिट केलं होत. बस हीच माहिती मिळाली होती. शुभांगी जोशी आता काय करत असेल. आपण तिला शोधायला पाहिजे. पण कस शोधणार. समर फेसबुक वर जस्ट नाव सर्च करतो. खूप साऱ्या शुभांगी जोशी नाव तिथे आलेले असतात. त्या नि कधी पाहिलं पण नसत म्हणून त्याला ते पण ओळखता येत नाही. मग समर श्रेया च्या फेसबुक अकाउंट मध्ये जातो. तिच्या फ्रेड लिस्ट मध्ये शुभांगी जोशी सर्च करतो. हो फ्रेंड लिस्ट मध्ये एक नाव असतो. समर ची बेचैनी अजून वाढत जाते. माहिती बघण्या साठी तो त्या नाव वर क्लिक करतो. जे समोर येत हे पाहून समर ला धक्का बसतो. शुभांगी जोशी आणि समर मध्ये कॉमन फ्रेड म्हणून विभा च नांव येत असत. विभा कशी ओळखते शुभांगी जोशीला. समर चे हात थर थर कापू लागतात. त्याचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नसतो. विभा पण पुण्याला गेली आहे. माझा फोन उचलत नाही आहे. काही अडचण तर नसेल ना. तो विभाला परत कॉल करतो. पण कोणी कॉल उचलत नाही. हे काय होत आहे. हे देवा मला विभा ला गमवायचा नाही आहे.  

 

समर च्या मनात आता खूप सारे प्रश्न तयार झाले होते. आता आपण पुढे बघ या हा तिडा कसा सुटणार ते.....                                                                                                                                                                            

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now