Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग नऊ

Read Later
प्रेमाचे रंग - भाग नऊ

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

 

आत्या - विभा कुठे आहेस? अनिकेत जेवायला बसायचं आहे. सगळ्यांनी लवकर या. 

विभा - आत्या आली. विभा डायरेक्ट किचन मध्ये जाते. जेवण बाहेर घेऊन येते. आत्या तू बस आणि जेवण वाढायला सुरवात कर. मी सगळं घेऊन येते. अनिकेत तुला चटणी पाहिजे का?

अनिकेत - हो, मामा कुठे आहेत?

विभा - बाबा आत फोन वर बोलत आहेत. येतील ते.

मोहन जाधव - दशरथ जवळ बोलत होतो. आता साखरपुडा कुठे करायचा तसंच जागा ठरवायला पाहिजे. कोणा - कोणाला बोलवायचं हे पण ठरवावं लागेल. आता या करोनामुळे सगळ्या अटी घातल्या आहेत. ते नियम पण पाळावे लागतील.

आत्या - दादा घरातील पहिलं च कार्य आहे. नाही म्हटलं तरी जवळच्यांना बोलवावं लागेल. 

मोहन - हो ( हात धुऊन जेवायला बसतात )

आत्या - ताक पण बनवलं आहे. 

विभा - हे बघ घेऊन आली. मी ताकासाठी वाट्या घेऊन येते.

आत्या सगळ्यांना ताटात जेवण वाढते. सगळे गप्पा मारत जेवत असतात. 

आत्या - उद्या खरेदीला किती वाजता निघायचं विभे. हे सगळं किती घाईत होतंय. साडी तर आपण बघू ग पण बॉऊज च काय करणार आहेस. एवढ्या लवकर शिवून कुठे मिळणार.

विभा - आत्या बॉऊज रेडी मेंड बघणार ग.

आत्या - मी मेंहदीचा कोन घेऊन आली आहे. जेवल्यावर मेहंदी काढ.

विभा - ठीक आहे. मला एका केस चा अभ्यास करायचा आहे. मग मेहंदी काढते.

विभा रूम मध्ये तिची पुढच्या आठवड्यात होणारी घोरपडे यांची केस बघत होती. एक एक मुदा वाचून घेत होती. ती कामात खूपच गुंतून जाते. रात्रीचे दोन वाजतात. आत्या ला जाग येते. तर विभा च्या रूम ची लाईट चालू असते. 

आत्या - विभा झोप आता रात्रीचे दोन वाजलेत.

विभा - हो झोपते, केस पूर्ण होत आलेली आहे.

आत्या - तुला कॉफी देऊ का?

विभा - नको तू झोप जा. मी बनवून घेते.

आत्या झोपायला जाते. विभा किचन मध्ये जाते. स्वतः साठी गरम कॉफी बनवते. विभा कॉफी मंग मध्ये घेऊन रूम च्या खिडकीत उभी असते. वातावरणात बाहेर खूप थंड हवा असते. बिल्डिंग खाली रस्त्यावर कोणीतरी उभं असत जे वर विभा च्या खिडकी कडे पाहत असत. सुरवातीला हे विभाला कळत नाही. तिचं लक्ष नसत. असेल कोणीतरी असं वाटत. पण थोडा वेळाने परत ती खाली बघते. तर तो जॅकेट घातलेला माणूस वर बघत असतो. विभा ला हे विचित्र वाटत. असं एकाच ठिकाणी उभं राहून कोणी वर का पाहत आहे. त्या व्यक्तीचा चेहरा त्याच्या मनक्की कॅप मुळे दिसत नसतो. विभा पडदा लावते. कॉफी चा मंग टेबलं वर ठेवते. रूम ची लाईट बंद करते. परत खिडकी जवळ जाऊन हळूच पडद्या आड खाली वाकून बघते. तेव्हा कोणी दिसत नसत. अजून उशीर नको म्हणून विभा बेड वर जाऊन झोपते. 

सकाळी दाराची बेल वाजते. मोहन राव घराचं दार जाऊन उघडतात. समोर नीता कामाला आलेली असते. 

नंदा आत्या - कशी आहेस नीता खूप दिवसांनी आपली भेट झाली.

नीता - बरी आहे. तुम्ही आज इथे आत्या ताई

नंदा आत्या - रागाने बोलते. मी माझा भावा कडे तुला विचारून येऊ का?

नीता - घाबरून माफ करा. मला तस नव्हतं म्हणाच.

अनिकेत - हे सगळं बघून हसतो. आई समोरच्याला का घाबरवतेस.

नंदा आत्या - घरी कोणी घाबरत नाही म्हणून बघत होते हि तरी घाबरते का बघूया

मोहन आणि विभा पण हसतात.

विभा - नीता काकी किचन मध्ये सामान आणून ठेवलं आहे. नास्ता च जरा बघा.

नंदा आत्या - नीता नास्ता गरम पाहिजे. आणि हसते.  

नीता - हो आत्या ताई करते.

अनिकेत - आई मी ऑफिस ला निघतो. संध्याकाळी भेटू. 

नंदा आत्या - अरे थोडं खाऊन जा. 

अनिकेत - नको ग उशीर होईल. बाय मामा, बाय विभा

अनिकेत ऑफिस ला पोचतो समर आगोदरच आलेला असतो. 

अनिकेत - गुड मॉर्निंग साहेब, कोणत्या विचारात आहात. कि आता पासूनच लग्नाची स्वप्न पाहत आहात.

समर - आलात गुड मॉर्निंग, तस काही नाही. मी विभा चा विचार करत होतो. तिला अजून पण श्रेया बद्दल सगळंच सांगितलं नाही. हे सगळं मला लग्नाच्या आगोदर बोलायचं आहे. काहीही लपवून ठेवायचं नाही आहे. हे सगळं विभा कसं स्विकारेल हा विचार करतोय. 

अनिकेत - तुझं श्रेया वर प्रेम होत हे बोललास ना तिला

समर - हो मी बोललो आहे. पण श्रेया आता कोणत्या कंडिशन मध्ये आहे. हे विभा ला पूर्ण पणे माहित नाही. श्रेया अजून पण माझी जबाबदारी आहे. त्याच्यात मी काहीही कमी पढून देणार नाही.

अनिकेत - हे सगळं शांत पणे ऐकून घेत होता. तू हे सगळं विभा ला भेट आणि बोल.

समर - आज संध्याकाळी तू पण येणार आहेस ना

अनिकेत - हो येणार आहे.

समर आणि अनिकेतचा पूर्ण दिवस कामात जातो. संध्याकाळी समर ला आईचा फोन येतो.

सुनीता - समर मी आणि राघवी आता घरून निघत आहेत. तू लवकर दादर मार्केट ला पोच. 

समर - ठीक आहे आई. आई विभा ला पण फोन करून सांग. मी अनिकेत बरोबर येतो. 

सुनीता - हो तिच्याशी बोलून झालं आहे. नंदा आणि विभा पण पोचतील.

समर - ठीक आहे. बाय  

सुनीता - तुम्ही पण येताय का हो? 

दशरथ - मी मोहन बरोबर त्या हॉल च आणि जेवण्याच्या मेनूच बघणार आहे. मला वेळ मिळणार नाही. तू हे पैसे घे तुला जी काही खरीदी करायची आहे. ती कर. नंतर नीट घरी या.

सुनीता - तुमच्या जेवणाचं काय?

दशरथ - मी मोहन बरोबरच बाहेर काही तरी खाऊन घेणार आहे. 

राघवी - मला पण नवीन ड्रेस पाहिजे. 

दशरथ - तुला जे पाहिजे ते घे माझा सोनपरी

सुनीता - तुमच्या कपड्याचा काय? का ते पण मोहन बरोबरच घेणार आहेत.

दशरथ - हसतात मग काय मित्र आता व्याही होणार आहे. मग पार्टी नको.

सुनीता - ठीक आहे. राघवी चल ग लवकर

सगळी जण दादर ला वामन हरी पेठे जवळ भेटणार असतात. नंदा आत्या आणि विभा आगोदरच पोचलेले असतात. थोड्या वेळेत सुनीता आणि राघवी पण येतात.

सुनीता - अजून समर आणि अनिकेत पोचले नाहीत वाटत. विभा कॉल करून विचार ग कुठे आहेत.

विभा - हॅलो समर कुठे पोचलात. आम्ही पेठे च्या इथे उभे आहोत.

समर - तुम्ही आत जावा. आम्ही पोचू आता.

विभा - समर बोलला कि आपण आत जाऊ या ते दोघे आता पोचतील. 

सुनीता आणि नंदा आत्या दुकानात जातात. विभा पण आत जात असते. तिला थोडं वेगळं वाटत. कोणीतरी आपण्यावर नजर ठेऊन आहे. हा भास होत असतो. 

समर आणि अनिकेत पेठांच्या दुकानात पोचतात. समर आणि विभा एकमेकांसाठी अगंठी बघत असतात . विभा ला समर आपल्या बरोबर आहे या गोष्टी ने आनंद होत असतो. खूप साऱ्या अंगठ्या दाखवल्या वर एक नाजूक अंगठी विभाला पसंत पडते. अनिकेत समर साठी अंगठी बघत असतो. विभा त्या अंगठीच्या ट्रे मधून एक अंगठी समर साठी पसंत करते. विभा समर ला ती अगंठी घालायला सांगते. त्या अंगठी वरती दोन हार्ट शेप असतात. हि अगंठी बघून समर ला त्याचा भूतकाळ आठवतो. श्रेया ने पण समर ला एक अंगठी भेट म्हणून दिली असते. त्या अंगठी वर पण दोन हार्ट शेप होते. त्याचे डोळे सहज बंद होतात. विभा समर च्या खांद्याला हात लावते. तसा तो भानावर येतो. 

विभा - काय झालं नाही आवडली का तुला ? ठीक आहे दुसरी बघूया मग

समर - मला आवडली आहे. हि फायनल करूया. 

विभा - हि घालून तर बघ मापाची आहे का? ती अंगठी बरोबर मापाची होते. 

सगळ्याला पसंत केलेल्या अंगठ्या आवडतात. आता सगळे कपडे खरेदी करण्या साठी दादर वेस्ट ला मार्केट मध्ये जातात. समोरच खूप सारे शॉप बाजू बाजू ला असतात. संध्याकाळ होत आली असते. मार्केट मध्ये माणसांची गर्दी पण वाढत होती. सगळे तुलसी म्हणून साड्याच दुकान असत. तिथे विभा साठी हिरवी साडी घेण्यास जातात. विभा ला दुकानात वेगवेळ्या साड्या दाखवत असतात. एक एक साडी विभा आरशात स्वतःला लावून पाहत होती. मागे उभा राहून आरशातूल समर तिला साडी चांगली आहे कि नाही हे खुणवुन सांगत होता. समर ला एक साडी खूप आवडते. तो ती त्या दुकानदाराला काढायला सांगतो व विभाला देतो. विभावर हि साडी उठून दिसत असते. विभा परत आरशात बघते. समर हसत हो म्हणून मान हलवतो. विभा ची आत्या विभाला अजून एक नवीन कोरी सुंदर साडी साखरपुढ्या आगोदर घालायला घेते. सगळं कस मनासारखं होत असत. विभा ची साडी बघून राघवी पण स्वतः साठी साडी घेण्याचं ठरवते. विभा राघवी साठी एक नेव्ही ब्लू रंगातील साडी घेते.

मग समर साठी कुर्ते दाखवण्यात येतात. अनिकेत आणि राघवी एक एक कुर्ती समर ला लावून पाहत असतात. एक क्रीम रंगाची कुर्ती सगळ्यांना पसंत पडते.

सुनीता दशरथ रावण फोन करते. 

दशरथ - हॅलो बोल

सुनीता - सगळी काम झाली का तुमची

दशरथ - हो आताच झाली आहेत. आम्ही प्रशांत हॉटेल मध्ये जेवायला आलो आहोत.

सुनीता - थोडा वेळ थांबा. मग आम्ही पण येतो. आमची पण खरेदी झाली आहे.         

सगळे आता प्रशांत हॉटेल मध्ये जेवायला जात असतात. दादर च्या गर्दी मध्ये रस्त्यावर चालताना विभा ला एक व्यक्ती धक्का मारून पुढे जातो. विभा रागाने मागे वळून पाहते. तर तिचा स्वतः वर विश्वास बसत नसतो. एक जॅकेट घातलेला माणूस पुढे चालत असतो. त्यांनी मनक्की कॅब घातलेली असते. विभा त्याच्या मागे जाणारच असते तेवढ्यात समर तिचा हाताला पकडतो. 

समर - विभा त्या रस्त्याने नाही जायचं इथून चल. आणि तिला स्वतः बरोबर चालत घेऊन जात असतो.

विभा मागे वळून बघत असते. आता कोणी दिसत नसत. विभा च्या मनात विचार सुरु होतात. कोण आहे? माझा भास तर नव्हता. मला त्यांनीच धक्का मारला होता. आपल्याला जोशी सरांशी लवकरच परत बोलावं लागेल.

सगळे प्रशांत हॉटेल मध्ये जेवून घेतात. मग आपापल्या घरी निघून जातात. घरी येई प्रयन्त नऊ होतात. दशरथ राव जवळच्या लोकांना फोन वरून साखर पुढ्याच आमंत्रण देत असतात. समर विभाला कुर्ती घालून फोटो सेंड करतो. पण ती ऑनलाईन दिसत नसते. मग समर विभाला कॉल करतो.

विभा घरी पोचल्यावर फ्रेश होऊन रूम मध्ये विचार करत बसली असते. मोहन राव पण सगळ्याला फोन करून आमंत्रण देत असतात. अनिकेत सगळ्यांना फोन वर पत्ता पाठवत असतो.

विभाला समर चा कॉल येत असतो.  

समर - हॅलो विभा  

विभा - बोल

समर - आवाज का असा आहे. तू ठीक आहेस ना

विभा - हो रे

समर - मी तुला फोटो सेंड केला आहे. तू पहिला पण नाही.

विभा - पाहते मी. हँडसम दिसतोस.

समर - तो मी लहान पणापासून आहे.

विभा - अच्छा

समर - विभा मला तुझ्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे.

विभा - बोल ना

समर - मला तुला भेटून बोलायचं आहे. उद्या सकाळी तुला जमेल का?

विभा - तू फोन वर बोल ना. भेटून बोलण्या सारखं काही महत्वाचं आहे का ?

समर - हो मला तुझ्याशी श्रेया बद्दल बोलायचं आहे.

तेवढ्यात आत्या येते ती विभा ला हाताला मेहंदी काढायला सांगते. आत्या ने गीताला घरी बोलावलं असत. गीता विभा कडून तिचा फोन घेते. 

गीता - हॅलो समर आता जे काही बोलायचं आहे ते साखरपुडा झाल्यावर आता भेटता पण येणार नाही. 

समर - गीता तू

गीता - हो मी झोप तू आता

समर - बाय

गीता विभा च्या दोन्ही हातावर सुंदर मेहंदी काढते. 

चिमणीच्या चिव चिव आवाजाने विभा ला जाग येते. विभा स्वतःचे मेहंदीचे दोन्ही हात बघत उठते. आरशा समोर उभी राहून छान हसून गुड मॉर्निंग विभा असं बोलते. 

सकाळ पासून दोघांच्या घरातील सगळी लकभक चालू असते. अनिकेत हॉल वाल्या शी बोलून सगळी व्यवस्था नीट करा असं सांगून घेतो. 

सुनीता - नाईक पंडितांना फोन करून हॉल चा पत्ता देतात. साखरपुढ्याला लागनार सगळं सामान घेऊन या सांगते.

राघवी - घरातील प्रत्येकाच्या कपड्याची तयारी करत असते.

सुनीता - आहो सगळे हॉल वरच येणार आहेत कि घरी कोणी येणार आहे का म्हणजे गाडी च बघायला.

समर - माझा ओळखीत ट्रॅव्हल वाले आहेत. त्यांना सागंत येईल.

दशरथ - सुनीता तुझा घरचे सगळे डायरेक्ट हॉल वरच येणार आहेत. बोलले मला. माझी ताई फक्त भाऊंना घेऊन घरी येणार आहे.

सुनीता - राघवी विभाच्या ओठी च सगळं सामान एका बाजूला ठेव.

 

इकडे अनिकेत पेढ्याची दिलेली ऑर्डर अजून घरी पोचली नाही म्हणून दुकान वाला फोन करत असतो. विभा ची मामा मावशी घरी येतात. विभा मावशीला जाऊन मिठी मारते. मावशी तू एकटीच आलीस आर्या नाही आली. मामा मामी आणि माझे भावंडं कुठे आहेत.

मावशी - विभा तू कशी आहेस ते सांग. तू खुश आहेस ना  

विभा - हो आणि मावशीला परत मिठी मारते.

मावशी - थोडा वेळेत सगळी जण पोचतील. तुझी मामी तिच्या बरोबर ओळखीच्या बांगडी वाली ला घेऊन येत आहे. चुडा भरावा लागेल ना आता.

नीता - सगळ्यांना नीता पाणी आणून देते. 

मावशी - नीता हे गजरे मडक्यावर ठेव. गार राहतील. 

मोहन - फोन केल्यावर तुम्ही आलात बर वाटतंय. घर कस भरलेलं वाटतंय. 

मामा - भाऊ विभा च्या लग्नाचं ऐकून बर वाटलं. माने कुटुंब हे आपल्या गावातील च आहे. 

थोडा वेळेत विभा ची मामी आणि भावंडं घरी येतात. विभाला हिरवा चुडा हातात भरला जातो. गीता विभा ला रूम मध्ये तयारी साठी घेऊन जाते. सगळे आप आपली तयारी करतात. विभा तयार होयून बाहेर येते. आज विभा नक्षत्रा प्रमाणे सुंदर दिसत असते. घरून निघायची वेळ होते. विभा देवाला नमस्कार करते. आईच्या फोटोला पाया पडते. 

अनिकेत खाली गाडी घेऊन तयार असतो. विभा च्या मामा पण गाडी असते. सगळे आप आपल्या गाडीत बसतात. नंदा आत्या सगळं सामान बरोबर घेऊन निघतात.

सगळे हॉल वर पोचले असतात. समर च पण कुटुंब हॉल वर पोचल असत. 

नाईक पंडित बसून साखरपुढ्याची सगळी तयारी करत असतात. पाने विडा लावत असतात. हॉल मध्ये सगळे नाते वाईक आणि फ़्रेंड्स आलेले असतात.

नाईक पंडित - सुनीता तुम्ही मुलीची जाऊन ओटी भरा. मग मी पुढच्या विधी ला सुरवात करतो.

सुनीता स्वतःचा नंदेला, बहिण आणि भावजेला घेऊन विभा च्या खोलीत जातात. समर ची आत्या विभाची ओटी भरते. राघवी विभा चे फोटो काढत असते.        

विभा ला साखर पुड्याच्या विधी साठी वर बोलवण्यात येत. विभा हिरवी साडी नेसून तयार होऊन येते. गीता आणि आर्या तिच्या बरोबर असतात. मग विभा ला पूजा करायला सांगतात. मग समर ला पण बोलावतात. समर पण पाया पडून घेतो. मग दोघांना अंगठी घालायला सांगतात. समर आणि विभा एकमेकांना अंगठी घालतात. सगळी जण आनंदाने टाळ्या वाजवत असतात. मग समर विभा ला पेढा भरवतो. 

राघवी - समर आणि विभा समोर केक घेणून येते. समर आणि विभा केक कट पण करतात.

सगळे आता विभा आणि समर ला आशिर्वाद देण्यास वर येत असतात. काहीं जण गिफ्ट पण घेऊन आले होते. समर चा ऑफिस चा ग्रुप पण असतो. समर सगळ्याजवळ विभा ची ओळख करून देत असतो.

आता विभा आणि समर चे एकत्र फोटो काढत असतात. समर विभाची मेहंदी बघतो. कुटुंबा बरोबर पण फोटो काढले जातात. तेवढ्यात समोरून विभा ला जोशी सर आणि येताना दिसतात. ते फुलाचा बुके देतात. आणि विभाचं अभिनंदन करतात. 

विभा समर आणि जोशी सरांची ओळख करून देते.  थँक्यू सर तुम्ही आलात. 

जोशी - तू माझा मुली सारखी आहेस. तुला जेव्हा पण गरज असेन तेव्हा मी तुझा बरोबर असेनच. विभा च्या डोक्यावर हात ठेवतात आणि निघून जातात. 

साखरपुढ्या खूप छान झाला. सगळे घरी जातात. रात्री विभा झोपताना अंगठी कडे बघत झोपून जाते. समर विभा बरोबर काढलेले फोटो पाहत असतो. 

तेवढयात समर ला हॉस्पिटल मधून फोन येतो. श्रेया चे बाबा पण हॉस्पिटल मध्ये असतात. ते समर ला फोन करून बोलवायला सांगतात. श्रेया ला श्र्वास घेयाला त्रास होत असतो. हे ऐकून समर कसला हि विचार न करता निघतो

सुनीता त्या ला नको जाऊन असं सांगत असते. आज तुझा साखर पुढा झाला आहे. मी बाबा ना सांगते जायला. पण श्रेया च्या बाबतीत समर कोणाच हि ऐकून घेण्यास तयार नसतो. 

तो हॉस्पिटल मध्ये पोचतो. समर डॉक्टर गुरु यांची विचार पूस करतो. ते हॉस्पिटल मध्ये नसतात. समर डॉक्टर गुरु ना फोन करतात. आणि हॉस्पिटल मधील सगळी अपडेट देतात. श्रेया चे बाबा खूप घाबरले असतात. ते समर ला बोलतात तुला मी आज बोलणार नव्हतं रे माहित आहे तुझा आज साखरपुढा झाला आहे. पण मला काही सुचत नव्हतं. स्वतःच्या मुलीला मी असं नाही बघू शकत. माझं दुसरं कोणी नाही रे इकडे आणि रडू लागतात. समर त्यांना शांत होण्यास सांगतो. डॉक्टर गुरु येतात आणि सगळी परिस्थिती सांभाळून घेतात. 

दशरथ फोन करून समर जवळ बोलत असतात. समर हॉस्पिटल मधे जे होत असत ते सगळं सांगतो. समर रात्र भर हॉस्पिटल मध्ये थांबतो. सकाळी समर हॉस्पिटल कॅन्टीन मधून श्रेया च्या बाबा साठी चहा घेऊन येतो. समर डॉक्टर गुरु ना जाऊन भेटतो.

समर - डॉक्टर गुरु हे असं सगळं का होत आहे.                      

डॉक्टर गुरु - श्रेया ची बॉडी ट्रेंटमेन्टला रिस्पॉन्स देत आहे. तुम्ही घाबरू नका. असं होणं स्वाभाविक होत. 

समर - मला काहीच कळत नाही आहे. हे चांगलं आहे कि वाईट

डॉक्टर गुरु - हि काहीतरी चांगलं होण्याची सुरवात आहे. असं म्हणेन मी

विभा च्या कॉल समर ला येत असतो. मी एक कॉल घेतो. 

डॉक्टर गुरु - ठीक आहे.

समर - हॅलो विभा तुला मी नंतर कॉल करतो बाय. अस बोलून फोन ठेऊन देतो. परत डॉक्टर गुरु आणि समर च बोलणं सुरु होत.

विभा समर च्या घरी सुनीता काकू ला फोन करते.

विभा - काकी थोडं बोलायचं होत.

सुनीता - बोल ग

विभा - मी समर ला आता कॉल केलेला पण तो बाहेर बीजी आहे वाटत. मला माझा कामासाठी पुण्याला जावं लागत आहे. मी निघते आता.

सुनीता - अग अजून थोडे दिवस राहिली असतीस तर बर वाटत असत. बरोबर बाबा पण आहेत का?

विभा - हो मान्य आहे. बाबा काही दिवसांनी येणार आहेत. पण काम तेवढच गरजेचं आहे. नाहीतर ऑफिस मधून मला फोन करून बोलावलं नसत.

सुनीता - ठीक आहे. सांभाळून जा. काळजी घे आणि फोन करत राहा.

विभा - हो नक्की. समर ला फोन करायला सांगा.

 

थोड्या वेळे पूर्वी विभाला जोशी सर फोन करतात. दोघांत काहीतरी खूप असं गंभीर बोलणं होत असत. ते विभाला आताच्या आता निघायला सांगतात. विभा नीता काकींना आवाज देऊन बोलावते. आणि सांगते हि चिठी समर ने मागितल्या वर त्यालाच द्या.   

विभा घरच्यांना समजावून कामाच नाव सांगून निघत असते. बाबा तिला थांबायला सांगतात. पण विभा बॅग भरायला घेते. विभा आणि समर याच एकमेकांशी बोलणं होत नाही. दोघांच्या हि आयुष्यात काहीतरी वेगळं सुरू होत असत. विभा समर ला मॅसेच करते - त्या मध्ये लिहिते कि "समर मला खूप सार तुझ्याशी बोलायचं आहे. नीता काकी ला भेट आणि तिच्या कडे तुझा साठी एक चिठी ठेवली आहे. ती वाच."

 

 

समर आणि विभाचं आयुष्यात एक वेगळं वळण भेटत आहे. आता पुढील भागात काय आहे हे आपण लवकरच पाहू.........

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now