Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग आठ

Read Later
प्रेमाचे रंग - भाग आठ

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,  

 

झोपेतून सकाळी विभाला जाग आली. मस्त आल्याच्या चहाचा सुंगध येत होता. विभा फ्रेश होऊन किचन मध्ये जाते. समोर आत्या उपमा बनवत असते.

विभा - गुड मॉर्निंग आत्या आणि मिठी मारते.

आत्या - गुड मॉर्निंग विभे झोप झाली का ग पूर्ण तुझी लवकर उठलीस. रात्री उशीर आलात ना. थोडं झोपायचं अजून.

विभा - जाग आल्यावर असच पडून राहायला मला नाही आवडत.

आत्या - चल चहा आणि उपमा घे. ती गीता उठली का?

विभा - नाही. नास्ता करून घेते मग उठवते तिला 

आत्या - ठीक आहे. आज दुपारी दादा येणार आहे.

विभा - बाबा इथे येणार आहेत.

आत्या - असं काय करतेस विभे आज संध्याकाळी मानेच्या घरी जायचं आहे. आठवत आहे ना.

विभा - अरे हो मी तर विसरूनच गेली.

आत्या - तयारीला लागा. संध्याकाळी साडी नेस तुझा कडे आहे ना ग, नसेल तर माझी साडी नेस.

विभा - ठीक आहे.

विभा गीताला जाऊन उठवते. अनिकेत आणि गीता फ्रेश होऊन येतात. आत्या त्यांना नास्ता देते.

आत्या - आज काय सुट्टी घेतली आहे का?

अनिकेत - नाही आई. कामाला आता निघत आहोत.

गीता - थँक यु काकू. 

आत्या - थँक यु काय ग. तू पण माझ्या मुली सारखी आहेस. ये ग परत कधीतरी घरी गीतू तुझ्याशी खूप साऱ्या गप्पा मारायच्या आहेत.

गीता - नक्की येईन मी. पण तेव्हा परत उपम्याचा बेत झाला पाहिजे.

आत्या आणि अनिकेत हसतात. 

आत्या - करेन ग. संध्याकाळी लवकर ये अनिकेत. 

अनिकेत - हो.

विभा बाबा ना फोन करायला घेते. रात्री समरचा आलेल्या मॅसेज वर नजर जाते. ती मॅसेज ओपन करते. मॅसेजचं वाचून तिला खूप आनंद होतो. समर ला सगळं कळलं तर. विभा बाबा ना फोन लावते.

विभा - हॅलो बाबा कुठे पोचलात.

बाबा - बस मध्ये आहे. दोन तासात पोचतो.

विभा - ठीक आहे. मी आत्याच्या इथून निघते. सांभाळून या बाय.       

विभा घरी जाण्यासाठी तयार होत असते.

विभा - आत्या चल निघते मी.

आत्या - नीट जा. दुपारी मी घरी येते.

विभा - चालेल.

विभा रिक्षाची वाट बघत रस्त्या वर उभी असते. तेवढ्यात समर चा समोरून कॉल येतो.

समर - विभा ने मॅसेज सीन केला आहे. हे पाहून कॉल करतो. हॅलो गुड मॉर्निंग विभा कशी आहेस.

विभा - मी ठीक आहे. तू काय करतोस?

समर - तू बाहेर आहेस का कुठे? गाड्याचा आवाज येत आहे. 

विभा - हो घरी जात आहे. रिक्षा बघते. आज दुपारी बाबा घरी येतील. 

समर - ओके काही खास आहे का? आणि हसतो

विभा - हो खूप च खास दिवस आहे.

समर - आज काय आहे? 

विभा - तुला माहित नाही. बर - मनात विचार करते (मेरी बिल्ली ओर मेरेको हि म्याव ) तुला संध्याकाळी कळेल.

समर - तुझा बिल्डिंग जवळ ये ? अजून एक भेट तुमची वाट बघत आहे.

विभा - कोणती भेट

समर - ये लवकर

विभा आनंदात काय असेल भेट म्हणून लवकर रिक्षा करते आणि घरी जायला निघते.

समर ऑफिस ला जाताना वाटेत फुलवाल्या कडे थांबून खूप सारे गुलाबाची फुले घेतो. आणि विभा च्या बिल्डिंग खाली येऊन थांबतो.

थोड्या वेळेत विभा पोचते. रिक्षेतून उतरते. समोर समर गुलाबाच्या सुंदर फुलांचा बुके घेऊन उभा असतो. हे पाहून विभा फार खुश होते.

समर - लवकर पोचलीस.

विभा - हं, तू इथे आज ऑफिस नाही आहे का?

समर - काश असं करता आलं असत. पण आज जावं लागेल मला. हि सुंदर फुल विभा तुझा सुंदर मनातील निर्मल प्रेमासाठी आणि फुलांचा बुके पुढे करतो. 

विभा - ती फुल हातात घेते.

समर - चल मी ऑफिस ला निघतो.

विभा - बस एवढच

समर - मग अजून काही करू का? तू बोल

विभा - काही नाही. गुलाबाची फुल सुंदर आहेत. थँक यु 

समर - बाय 

समर रिक्षाला थांबतो आणि निघून जातो.  विभा समर ला हाताने बाय करत रिक्षा कडे बघत उभी असते. तेवढ्यात तिच्या बोटाला गुलाबाचा काटा टोचतो. ती भानावर येते. बोटातून रक्त येत असत. बोटाला रुमाल बांधून विभा घरी जाते.

घराचं दार उघडते. गुलाबाची फुल समोरील फ्लॉवर पॉट मध्ये ठेवते. कपाटातील साड्या बघत होती. कोणती नेसू हि निळी कि हि पिवळी नको पिवळी. गुलाबी छान आहे. आरशा समोर स्वतःला लावून बघत असते. सगळ्या वस्तूची तयारी करून बाजूला सगळं करून ठेवते. किचन मध्ये जाते आणि उशीर होईल म्हणून जेवणाला सुरवात करते. स्वतः साठी लिंबू सरबत बनवते आणि पिते. तेवढ्यात विभा ला ऋचा चा कॉल येतो.

विभा - बोल ऋचा कशी आहेस

ऋचा - खूप वैतागले आहे. लवकर ये तू 

ऋचा आणि विभा या एकाच फर्म मध्ये काम करत असतात. 

विभा - अग हळू किती मोठयाने बोलतेस. फोन च्या बाहेर आवाज येत आहे.

ऋचा - यार हे सगळं मला हॅण्डल करायला नाही होत आहे. त्या घोरपडे यांची केस कोर्टात सोमवारी होणार आहे. अजून काही तयारी नाही झाली. तू ये लवकर ग.

विभा - हो नेक्स्ट वीक मध्ये पोचते. डोन्ट वरी मी करेन हॅण्डल. त्या केस चे ज्या नोट बनवल्या आहेस त्या जरा मला मेल कर.

ऋचा - ठीक आहे. मी त्या नवरा बायको दोघांचे डिटेल मेल करते तुला

विभा - बाकी कशी आहेस

ऋचा - माझं जाऊंदे, तू ज्या कामाला गेलेलीस ते झालं का पूर्ण

विभा - ऋचा काम काय? माझा बघायचं कार्यक्रम आहे

ऋचा - तेच ग

विभा - आज संध्याकाळी आहे. 

ऋचा - पण हे तर लास्ट वीक मध्ये होणार होत ना

विभा - हो पण काही कारणाने आज होणार आहे.

ऋचा - आरोपीच्या आवाजावरून असं वाटतंय मुलगा पसंत आहे.

विभा - बस करा गेस करण मॅडम

ऋचा - चल बाय मला बॉस चा कॉल येत आहे. बेस्ट ऑफ लक

दारावरची बेल वाजते. विभा दार उघडते. समोर विभाचे बाबा आलेले असतात. बाबा ना बघून विभा खूप खुश होते. किचन मधून पाणी आणून देते.

बाबा - कशी आहेस बेटा.

विभा - मी बरी आहे बाबा. तुम्ही हात पाय धुऊन घ्या. मी जेवायला वाढते. खिचडी बनवली आहे.

बाबा - गरम पाण्यानी आंघोळ च करून घेतो. प्रवसा मुळे थोडं थकायला झालं आहे. 

विभा - ठीक आहे. मी गिजर चालू करते.

समर ऑफिस मध्ये काम पूर्ण करत असतो. त्याच्या मनात विचार येतो. आपण विभाला श्रेया ला भेटवायला पाहिजे का? विभाला वर वर सगळं सांगून झालं आहे. पण पूर्ण सत्य अजून माहित नाही. पण तसा वेळ पण मला भेटला नाही. सगळं कस पटापट होत आहे. मी तिला सगळं लवकर सांगेन.

अनिकेत - समर चला लवकर किती वाजले बघा. आज तुमचा दिवस आहे साहेब

समर - हो निघतो रे.

अनिकेत - तुला मी सोडतो. पटकन निघ. मी खाली वाट बघतो. 

दोघे हि अनिकेत च्या बाईक वर बसतात.

अनिकेत - कपड्याची तयारी केलीस का

समर - तयारी त्यात काय शर्ट आणि पॅन्ट च घालणार आहे.

अनिकेत - अरे हो पण कोणता रंग

समर - हे मी काही पाहणार नाही आहे. जो चांगला असेल तो घालणार आहे.

अनिकेत - विभा ला पिंक रंग आवडतो

समर - मग आता मी पीक शर्ट घालू, अनिकेत तू पण ना

अनिकेत हसतो, उतरा घर आलं तुमचं. बाय

समर घरी पोचतो. घरी सगळी तयारी झालेली असते. घर सुनीता यांनी छान सजवलं असत. 

सुनीता - समर फ्रेश होऊन घे. मी कपडे बेड वर ठेवले आहेत. तेच तू घाल.

हे ऐकून समर सरळ रम मध्ये जातो. समोर बेड वर लाईट पिंक रंगाचा शर्ट ठेवलेला असतो.

त्या कपड्याकडे बघून समर बोलतो - याला म्हणतात नशीब. जे होणार असत त्या गोष्टी फिरून अशा येतात.

सुनीता - नाईक गुरुजींना फोन करतात

नाईक गुरुजी - बोला माने वाहिनी

सुनीता - वेळेवर या आज सगळी तयारी झाली आहे.

नाईक गुरुजी - हो मी वेळेच्या आतच पोचेन. काळजी करू नका.

दशरथ - तू नाईक गुरुजींना घरी बोलवतेस.

सुनीता - सगळं कस समोर रा समोर होऊन जाऊंदे. आज लग्नाची तारीख ठरवू या.

दशरथ - सुनीता हि घाई बरी नाही.

सुनीता - मुलाच्या सुखा  साठीच करते. काही चुकीचं नाही करत.

दशरथ - सगळं मान्य आहे ग. पण दोघांना एकमेकांना समजून तरी घेऊंदे

सुनीता - आपल्या वेळेला आपण तर एकमेकांना पाहिलं पण नव्हतं. संसार चांगला झाला ना. एकमेकांना कुठे ओळखत होतो.

दशरथ - अग आताच जमाना वेगळा आहे.

सुनीता - म्हणूनच एवढ्या सगळ्या अडचणी येतात.

राघवी - आई हळू तुझा आवाज आत पर्यंत येत आहे. शांत हो. तुला जे वाटेल ते कर. ठीक आहे.

सुनीता - मला कोण समजूनच घेत नाही.

तेवढ्यात दारावरची बेल वाजते. नाईक गुरुजी आले असतात.

दशरथ - नमस्कार गुरुजी, या आत या

सुनीता - राघवी पाणी घेऊन ये

राघवी पाणी घेयाला जाते. 

सुनीता - बसा गुरुजी

नाईक गुरुजी - कसे आहेत सगळे

दशरथ - देवाच्या कृपेने सगळे ठीक आहोत.

नाईक गुरुजी - समर कुठं आहे.

सुनीता - आताच ऑफिस मधून आला आहे. तयार होत आहे. बाहेर येईल आता.

समर - नमस्कार गुरुजी (पाया पडतो)

गुरुजी - सुखी रहा. काम कस चालू आहे.

समर - सगळं नीट आहे.

राघवी - हे घ्या पाणी

नाईक गुरुजी - मुलीकडील लोक नाही आली अजून

सुनीता - फोन वर बोलणं झालं आहे. पोचतील आता. तुम्ही पत्रिका बघून घ्या. 

नाईक गुरुजी - पत्रिका दोघ्यांचा जुळत आहेत. त्याच्या लग्नाचा योग बघतो.

सुनीता - दोघांच्या पत्रिका आणून देते.

अनिकेत विभा च्या बिल्डिंग जवळ गाडी घेऊन येतो. अनिकेत विभा ला कॉल करतो. 

अनिकेत - विभा मी खाली आलो आहे. या लवकर

विभा - ठीक आहे.

आत्या अनिकेत बिल्डिंग खाली पोचला आहे. आपण निघून या का?

आत्या - मला सगळं सामना घेतलं ना एकदा बघू दे. त्यांच्या घरी रिकाम्या हाती कुठे जाणार आपण. विभा तुझी तयारी झाली ना सगळी. विभे साडीत फार सुंदर दिसतेस. 

विभा - परत एकदा आरशात बघून घेते. हो मी तयार आहे. बाबा चला.

मोहन जाधव - नंदा तू आणि विभा या बॅगा घेऊन खाली उतरा. मी दार लावून येतो.

अनिकेत गाडी चा दरवाजा उघडतो. विभा आणि आत्या मागे बसतात. मोहन राव मागून खाली येतात. ते अनिकेतच्या बाजूला बसतात. 

समर विभा ला मॅसेज करतो. समर - कुठे पोचलात.

विभा - ऑन द वेय.

समर - ठीक आहे.

इथे गुरुजी दोघांच्या पत्रिका बघत असतात. थोडा वेळेत विभा च कुटुंब माने याच्या घरी पोचत. राघवी त्यांचं छान स्वागत करते.

सुनीता - या जाधव भाऊजी, ये विभा बसा. नंदा तू कशी आहेस. 

नंदा आत्या - मी ठीक आहे. किती दिवसांनी आपण भेटत आहोत.

दशरथ - मोहन कसा आहेस.

मोहन जाधव - मी ठीक आहे. तू कधी पुण्याला येतोस ते बोल

दशरथ - आता आपण ज्या कार्या साठी भेटलो आहोत. ते बोलू या   

हे सगळं बोलणं सुरु असताना विभा हळूच समर कडे बघत असते. आज समर ने पण पिंक रंगाचा शर्ट घातला आहे. दोघांचे पण कपडे सेम मॅच होत असतात.

अनिकेत - गाडी पार्क करून वर येतो. नमस्कार काका, काकी कशा आहात.

दशरथ - आम्ही सगळे ठीक आहोत. बस इथे

सुनीता - हे गुरुजी नाईक हे समर आणि विभा च लग्नाचं मुहूर्त बघत आहेत.

दशरथ - त्या आगोदर मला थोडं बोलायचं आहे. आम्हाला विभा हि सून म्हणून पसंत आहे. मला समर पण बोलला कि त्याला विभा आवडते. मला विभा आणि समर ला बोलायचं आहे. तुम्हाला अजून थोडा वेळ पाहिजे का एकमेकांना समजून घेयाला. म्हणजे लग्नाची तारीख आपण तशी पाहू या. नवीन नात्यात उगच गैर समज नको. मला काय म्हणायचे आहे हे समर तुला कळत असणार.

समर - होय बाबा मला विभा आवडते. मी लग्न करायला तयार आहे. पण अजून थोडा वेळ जरी गेला तरी चालेल.

दशरथ - विभा तुझं काय मत आहे.

विभा - मला पण काही हरकत नाही. माझं जॉब पण पुण्याला आहे. तोपर्यत मला थोडा वेळ भेटेल इथे नवीन जागेत स्थ्रिर होण्यास.

मोहन - जस सगळ्यांना ठीक वाटेल तस करू. माझी काही हरकत नाही आहे. 

सुनीता - आपण गुरुजी ना विचारू या.

गुरुजी - तुमचं सगळं मी ऐकत होतो. पण हीच अडचण आहे. दोघ्यांची पत्रिका जुळत आहे. पण पत्रिके प्रमाणे लग्नाचा मुहूर्त येणाऱ्या दोन महिन्यात आहे. नंतर वर्ष भर योग नाही आहे. वर्ष संपल्यावर विभा ला आठवा गुरु लागत आहे. त्या मध्ये लग्न करता येणार नाही दोघांच लग्न मोडण्यावर येऊ शकत. दोन वर्ष असेच जातील. त्या पेक्षा या येणाऱ्या दोन महिन्यात लग्न चा चांगला मुहूर्त काढतो. तुम्ही दोनी घराणी लग्न हुरकून टाका. सगळं मंगळ मय होईल.

सुनीता - ठीक आहे गुरुजी तुम्ही म्हणाल तसंच करतो.

सगळे आनंदाने एकमेकांन कडे बघत असतात.

राघवी खुश होईन सगळ्यांना पेढे देते. विभा चे घरचे सगळे खुश असतात. विभा पण खुश असते. अनिकेत गाडी तुन आणलेलं सामान सुनीता काकूंना देतो.

सुनीता - याची काय गरज होती नंदा.

नंदा आत्या - घे ग काही जास्त नाही आहे. आता तर घरचे संबंध जुळून येत आहेत. आपल्याला किती तयारी करावी लागेल. गुरुजी शुभ तारीख तर सांगा आम्हाला.

समर आणि दशरथ राव दोघे हि शांत बसलेले असतात. 

गुरुजी - आता येणाऱ्या तीन दिवसानी पंधरा हि तारीख एक आहे. आणि पुढच्या महिन्यात सतरा रविवार आहे. चांगला मुहूर्त आहे. बघा तुम्ही आता.

दशरथ - अजून दुसरी तारीख पुढे नाही होऊ शकत का गुरुजी. म्हणजे खूप घाई होईल ना दोन्ही कुटूंबाला असं माझं बोलणं होत.

सुनीता - करू ओ आपण सगळं नीट. नंदा पण आहे. आम्हला या तारखा चालतील आपण तीन दिवसांनी साखरपुडा करू आणि पुढच्या महिन्यात लग्न. हो ठरलं मग भाऊजी तुमचं काय मत आहे.

मोहन जाधव - खूप घाई होईल. पण नंतर मुहूर्त नसेलं तर मग आता जे ठरत आहे. ते मला मान्य आहे.

अनिकेत - मग आता समर आणि विभा च्या लग्नाची सुपारी फोडायची ना.

अनिकेत समर ला पेढा देतो. हा विभा ला दे. सगळे आनंदाने यात सहभागी होतात. राघवी या क्षणाचे खूप सारे फोटो काढत असते.

दशरथ राव - गुरुजींना नारळ आणि दक्षिणा देऊ केलं. समर आणि विभा तुम्ही पाया पडा याच्या

समर आणि विभा दोघे हि गुरुजी च्या पाया पडतात.

नाईक गुरुजी - सुखी रहा. विभा बाळा होणारा पुढचा प्रवास थोडा खडतर आहे. मन शांत ठेव. मार्ग भेटत जाईल. हे बोलून निघून जातात.

विभा परत विचार करायला सुरवात करते. हे सगळं असं काय होत आहे. 

समर विभा कडे बघतो. ती त्याला वेगळी वाटते.

समर - विभा कुठे हरवलीस? तुझा चेहऱ्यावर हसू छान वाटत. हा असा विचार करणारा चेहरा नाही.

विभा - हे ऐकून विभा हसते. तस काही नाही रे. काही तरी वेगळं जाणवत आहे.

राघवी - काय चालू आहे तुमचं काय जाणवत आहे. ह्म्हम्हम्हम

समर - तुझं इथे काय आहे? बोलून पण देऊ नकोस.

राघवी - आता फोटो टाइम आहे. एक पूर्ण फॅमिली फोटो होऊन जाऊंदे.

सगळे एकत्र येतात आणि राघवी सेल्फी मध्ये फॅमिली फोटो काढत असते. समर विभा चा हात पकडतो. तर तिच्या हाताला लावलेली बँडेज पट्टी जाणावते.

समर विभा ला विचारतो - हे काय लागलं?

विभा - काम करताना असंच लागल. 

मोहन जाधव - चला मग आम्ही निघतो आता. बाकीचं जे आता ठरलं आहे त्या प्रमाणे तयारी करू.

दशरथ - हो नक्की, काही मदत लागली तर हक्काने बोल.

सुनीता - नंदा आपण उद्या च साखरपुढ्याचे कपडे आणि अंगठी घेऊ या. विभा आत्या बरोबर उद्या संध्याकाळी भेट मग. समर ला पण मी बोलवेन. 

नंदा - ठीक आहे. बाकीचं आपण फोने वर बोलूच. 

विभा समर ला बाय बोलते. सुनीता आणि दशरथ याच्या पाया पडते. राघवीला भेटते आणि निघते.

अनिकेत गाडी बाहेर काढतो. सगळे घरी जायला निघतात. तेवढ्यात समर चा मॅसेज येतो. विभा तू खुश आहेस ना.

विभा - हो रिप्लाय देते.

समर - नेहमी अशीच खुश रहा. मी नेहमी तुला असच खुश ठेवेन.  

विभा - एक बोलू समर 

समर - एक काय दोन बोल ना.

विभा - आपण अजून पण एकमेकांना तेवढे ओळखत नाही. या कमी वेळेत तु माझं मन जिंकून घेतलस . मला तू आवडतोस. हे मॅसेज वर बोलायला नको पण मला हे सांगणं गरजेचं वाटत म्हणून बोलते. माझाशी कधी हि खोटं बोलू नकोस. मला या गोष्टीचा खूप राग येतो. मला नाही पटत हे सगळं. जे असेल ते सरळ सांगावं. 

समर - फक्त ऐकत असतो. हो विभा मी कधी हि खोटं बोलणार नाही. बाय

शांत पणे बेड रूम मधील कपाटातील श्रेयाच्या फोटो पाहतो. श्रेया लवकरच तुला विभाला भेटवेन.

             

तर मग अस ठरलं विभा आणि समर याच लग्न आता पुढे बघू कि त्यांच्या सत्यनारायण पूजेला बारा का वाजले आहेत.                     

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now