Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग सात

Read Later
प्रेमाचे रंग - भाग सात

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

गीता समर ला आवाज देत असते. अभय, रोहित आणि राघवी पण येऊन पलंगा वर बसले असतात.  

समर - सगळे आलात, पांडू सगळ्यासाठी पाणी घेऊन ये.

पांडू - होय साहेब

राघवी - विभा ठीक आहे ना दादा

समर - हो आराम करते. वैद्य येऊन गेले. विभा च्या पायाला लेप पट्टी लावली आहे.

रमे - साहेब जेवण तयार आहे. मी जेवायला वाढू का?

अभय - आम्ही हात धुऊन येतो. मग सगळे एकत्र बसू जेवायला. अनिकेत आला का रे 

समर - कॉल करतो. विचारतो कुठे आहेत. समर कॉल करत असताना अनिकेत वाड्यात येताना दिसतो. आता तुलाच कॉल करत होतो.

अनिकेत - समर खूप भूक लागली आहे. 

समर - मग चला जेवायला. गाडी चालू आहे ना

अनिकेत - हो थोडं इंजिन मध्ये काम केलं त्यांनी बाकी गाडी ठीक आहे. उद्या सकाळी आपण निघू.

रमे आणि पांडू जेवणासाठी सगळ्यांना केळीची पान वाढतात. 

गीता - अरे वा आजचा जेवणाचा बेत काय आहे.

रमे - ताई साधंच जेवण बनवलं आहे. भाकरी, भात , ताक , मेथी ची भाजी आणि थोडा गोड शिरा बनवला आहे. तोंडी लावायला मिरचीचा ठेचा आहे. इथं मुंबई सारखा भाज्या कुठे मिळतात. सामानासाठी तालुक्यात जावं लागत.

गीता - रमे तुमच्या हाताला छान चव आहे. जेवण मस्त झालं आहे.

रोहित - गरम गरम जेवण चांगलं वाटतंय. शिरा छान बनवला आहे.  

अभय - रोहित शिरा जेवणा नंतर गोड म्हणून दिला आहे. तू आताच सुरु झालास. हे ऐकून सगळे हसायला लागतात. समर तू पण जेवायला बस.

समर - अरे विभा पण येते ना. 

अभय - तू तर बस. राघवी गेले तिला आणायला.

विभा राघवी बरोबर येते. विभा साठी जेवायला टेबल ठेवला असतो. राघवी जेवायला बसते. समर विभा कडे बघत असतो. विभा ला थोडं अवघडल्या सारखं होत असत. विभा समर कडे बघते. समर काही हि न बोलता नजरेनेच विचारतो - काय झालं?

विभा - काही नाही म्हणून मान हलवते. हे सगळं राघवी बघत असते. तिची शंका आता खरी ठरते. सगळ्यांचं जेवून पूर्ण होत.

रोहित - मला झोप येत आहे. मी झोपायला जातो. 

अभय - सगळ्यांनी सकाळी दहा प्रयन्त तयार रहा आपण निघणार आहोत. गाडीवाले तुम्ही कुठे झोपणार आहात.

गाडीवाले - मी इथेच बाहेर पडवीत झोपतो. पांडू असले ना माझा बरोबर

पांडू - आवर ग रमे. मी रमे ला घरला सोडून येतो.

विभा - तुम्ही पण दोघे जेवून घ्या. 

रमे - बाई साहेब माझी भांडी धुऊन झाली कि आम्ही दोघे जेवून घेऊ. तोवर तुम्ही आराम करा. पायाला पट्टी बांधली आहे ना. 

विभा - मी रूम मध्ये जाते.  समर तिचा हात पकडतो. 

समर - हळूच विभा शी बोलत असतो. तुला उचलून घेऊन जाऊ का सांग तस

विभा - शांत पणे चल सगळे आहेत इथे. 

समर हसतो.

विभा - तू असा काही मनात विचार पण आणू नकोस. नाहीतर बघ

समर - मी काही केलं का? आता हसण पण पाप आहे.

विभा - फार नाटकी आहेस

समर - विभाला बेड वर बसवतो. तू झोप मी गरम पाणी घेऊन येतो.

विभा - थांब समर राघवी गरम पाणी घेऊन येणार आहे.

समर परत विभा कडे बघत असतो.

विभा - पिल्ज अस बघत नको राहूस.

समर - ठीक आहे दुसरी कडे बघतो मग

विभा - तस  नाही रे   

समर - मग कस आहे. हे बघ विभा तुझ्या मनात जे काही असेल ते बोल माझाशी. तुला आपलं नातं फार घाई मध्ये होत आहे अस वाटत का? तुला अजून थोडा वेळ पाहिजे का? 

विभा - तस नाही रे

समर - हे बघ मला तुला खरंच गमवायचा नव्हतं. म्हणून मी लग्नाची मागणी घातली. 

विभा - तुझं खरंच माझा वर प्रेम आहे. कि मी तुला आवडते.

समर - आपल्याला जो आवडतो त्याच्यावर आपलं मनापासून खर प्रेम असत. हो हे खर आहे. त्याच्या शी आपल्या आठवणी स्वभावाच्या, विचारांच्या जोडलेल्या असतात. प्रेमाची खरी भावना हि पण आहे. विभा जो या पलीकडे जाऊन मनाच्या आत्माला खरं ओळखतो. त्या मध्ये तो व्यक्ती जसा असतो तसा पूर्ण पणे मान्य असतो. ज्याच्याशी आपण आपल्या आयुष्यातील सुख पण हसून सांगू आणि दुःख सुद्धा वाटून घेऊ. तू तशी आहेस. तू मला नव्याने प्रेमाचे खरे रंग दाखवलेस. मनातील ती प्रेमाची शून्य ची जाणीव तू करून दिलीस. ज्या मध्ये कोणती हि अपेक्षा नसते. तुझ्यावर इतकं प्रेम करतो. मनात अशी कोणती हि शंका आणू नकोस. 

विभा - समर आय लव्ह यु

समर - हे तू बोलली नसतीस तरी तुजा डोळ्यातून दिसतंय मला. आय लव्ह यु टू विभा....

राघवी गरम पाण्याची पिशवी घेऊन येते. काय झालं दोघे शांत का आहात? दोघे हि हसतात.

समर - मी निघतो. गुड नाईट.

सकाळी पक्षाच्या आवाजाने विभा ला जाग येते. विभाला आता बर वाटत असत ती उठते. विभा स्वतःच सगळं आवरून घेते. राघवी शांत झोपली असते.विभा बाहेर स्वयंपाक घरात जात असते. 

रमे - बाई साहेब तुम्ही उठलात सुद्धा हे घ्या गरम चहा बर वाटेल तुम्हाला

विभा - तू कधी आलीस

रमे - आताच आली. पटकन चहा ठेवला. नास्ता ला काय करू बोला.

विभा - काय सामान आहे ग

रमे - इथे तर रवाच आहे. 

विभा - तांदळाचं पीठ आहे ना

रमे - हो आहे ना

विभा - मग घावणे बनव. सगळयांना आवडतील. 

रमे - ठीक आहे बाई साहेब मी चुलीवर बनवते लवकर होतील.

विभा - तुझा घरी कोण-कोण असत ग.

रमे - मी आणि माझा नवरा. 

विभा - मी आली हा. तू थांब.  विभा बॅगे मधून नवीन साडी घेऊन येते. जी तिने स्वतः साठी नेसायला घेतली होती. रमे हि साडी घे. तुला हा रंग छान दिसलं.

रमे - बाई साहेब याची काय गरज नव्हती. साहेब आम्हला या कामाचे पैसे देणार आहेत. 

विभा - हो माहित आहे. तू माझी पण खूप काळजी घेतलीस. त्या साठी माझा कढून तुला छोटी भेट.

रमे - बाई साहेब तुम्ही खूप चांगल्या आहात. किती वाजता निघणार आहात.

विभा - सगळे उठले कि निघू मग.

रमे सगळ्यांना चहा आणि घावणे नास्ता ला देते. सगळे आवरून घेतात. अभय आणि अनिकेत सगळं सामान गाडीत ठेवतात. 

समर ला आई चा कॉल येतो.

सुनीता - हॅलो समर निघालात का?

समर - होय आई तू कशी आहेस

सुनीता -आई ची लवकर आठवण आली. कालच्या दिवसात एक फोन तरी केलास का?

समर - सॉरी आई, राघवी शी बोलणं झालं ना तुझं

सुनीता - ते सगळं जाऊंदे. उद्या संध्याकाळी जाधवच्या मुलीशी तुझा बघण्याचा कार्यक्रम ठरवलं आहे.

समर - आई मला तेच सांगायचं होत. मला जमणार नाही.

सुनीता - तुझं मी काही ऐकणार नाही आहे. त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला मी घरी बोलावलं आहे.

समर - अंग आई मला तुला एक सांगायचं आहे.

सुनीता - ते सगळं आल्यावर बघू. आगोदर लवकर घरी पोचा. समर काही बोलेल त्या आगोदर आई फोन ठेऊन देते. 

रोहित - समर चल उशीर होत आहे.

गीता, विभा, राघवी गावातील मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतात. मंदिरा बाहेर एक भटजी बसले असतात. प्रत्येक जण जाऊन त्यांचा आशिर्वाद घेतात. राघवी गीता आणि विभा पण पाया पडायला जातात. 

गीता आणि राघवी च पाया पढून होत. त्या पुढे गाडी जवळ चालत जातात. भटजी चे डोळे बंद असतात. विभा त्यांना बघते आणि पायाला नमस्कार करते आणि निघत असते. 

भटजी - तुझा मनात कोणता प्रश्न खेळतोय 

विभा - आवाजाने मागे वळून बघते. घाबरते आणि काही नाही असं बोलते. 

भटजी - आमच्याशी खोटं बोलू नकोस. तु विधीच विधान बदलायला आली आहेस. लक्षात ठेव तुझा मार्गात भरपूर संकट येतील पण तू घाबरू नकोस ते तुझे कर्म आहेत. देवा वर विश्वास ठेव.

विभा - तुम्ही काय बोलत आहात

समर विभा ला भटजी शी बोलत असताना बघतो आणि उशीर होत असल्या मुळे हाक मारत असतो. पण विभा च लक्ष नसत मग तो विभा जवळ जातो.   

भटजी - तुझा जवळ जे आहे ते सगळं येणारी वेळ मागेल. प्रेमाचं समर्पण द्याव लागेल तुला मुली. लक्षात ठेव.

तोपर्यंत समर विभा जवळ पोचतो. तिचा हात धरून चल उशीर होत आहे. कुठे बघतेस चल लवकर सगळे वाट बघत आहेत.

विभा ला हे ऐकून फार भीती वाटत असते. मी तर या भटजी ना काहीच सांगितलं नाही. प्रेमाचे समर्पण हा शब्द तिच्या कानात घुमत असतो.

गाडी पुढील प्रवासाला सुरु होते. सगळे गपा मारत एकमेकांशी मजा करत असतात. पण विभाचं कशात हि लक्ष लागत नसत. ती खिडकीतून बाहेर धावणारी झाड बघत असते. आता गाडी कळसुबाई डोंगरावर पोचते. फार उंच डोंगर असतो. वाऱ्याचा वेग खूप गतीने पळत असतो. सगळे गाडी तुन उतरतात. गीता - अनिकेत समोर बर्फाचा गोळ्याची गाडी बघून तिथे खायला जातात. राघवी अभय आणि रोहित समोर फिरत जात असतात. समर विभा बरोबर असतो. 

समर - काय झालं विभा तू नाराज का वाटतेस? काही त्रास होत आहे का?

विभा - नाही रे समर

समर - मस्त स्माईल दे आपण सेल्फी काढू. 

विभा - हे ऐकून विभाला हसू येत. तू कुठे पण सेल्फी साठी सुरु होऊ शकतोस.

समर - हो तुझा बरोबर तर कुठे पण आणि डोळा मारतो. 

विभा - तुज काय करू मी

तेवढ्यात सगळे येतात. आम्ही पण तुमच्या बरोबर सेल्फी मध्ये 

समर - स्माईल चीझ

खूप सारे फोटो काढून झाले. सगळे जण बर्फाचा गोळ्याचे रंगबिरंगी चव घेत होते. सगळे जण पूर्ण डोंगर फिरून घेतात. तिथली एक गुफा पण बघून होते . गुंफेतील कोरीव काम हे पुरातन काळातील असत. ऊन आता डोक्यावर आलं होत. सगळ्याच्या पोटात कावळे ओरडू लागले होते. सगळ्यांनी गाडीवाल्याला जवळ असलेल्या हॉटेल मध्ये पेटपुजे साठी गाडी थांबवायला सांगितली. 

सगळ्याच पोट भरून जेवून झालं. आता पिकनिक मस्त रंगात आली असते . प्रत्येकाचा आनंद वाढत असतो. विभा ची पण आता सगळ्याशी चांगली मैत्री झाली असते. आता पुढील ठिकाण साठी सगळे तयार झाले. धामा गिरी जवळ विप्पासना मेडिटेशन सेन्टर मध्ये जात होते. विप्पासना मेडिटेशन हे जगातील सर्वात मोठं मेडिटेशन सेन्टर आहे. धामा गिरी ला सगळे पोचतात. सगळी कडे शांतात असते. 

अभय, रोहित विप्पासना सेन्टर बाहेरून बघत असतात. विभा गीता आणि राघवी सेन्टर चा आत जाऊन शांत बसतात. अनिकेत आणि समर एकमेकांशी सेन्टर बघत - बघत बोलत असतात. विभाला विप्पासना सेन्टर मध्ये बर वाटत. विभा डोळे बंद करून शांत बसली असते. तिच्या मनात एकसारखे त्या भटजी च बोलणं घुमत असत. मग ती स्वतःला विचारात थांबवते. विभा असं स्वतःला विचारात त्रास करून घेऊ नकोस. माइंड शांत ठेव. विभा घाबरू नकोस. हे बघ आयुष्यात जे पण होईल ते फेस करायला शिक. हि जी मनातील शांतात कायम ठेव.

विभा च्या हाताला स्पर्श होतो. ती डोळे उघडून बघते. तर बाजूला समर बसलेला असतो. या अशा क्षणाला तिला समर ची साथ फार सुखावून जाते. विभा मनात ठरवते. आता काही हि झालं तरी आपण या आयुष्यात समर ची साथ सोडायची नाही. सगळे विप्पासना सेन्टर मधून निघतात. सगळ्याचे इथे दोन - तीन तास गेले असतात. आता घराच्या परतीला सगळे लागले असतात. सगळे या आठवणी मनात ठेऊन निघाले. 

गाडीवाला सगळ्यांना इगतपुरी स्टेशन ला सोडतो. संध्याकाळची सात ची ट्रेन आली असते. सगळे जण ट्रेन मध्ये डब्यात जातात. दिवस भर फिरून सगळे थकले असतात. आज रात्री मुंबई पोचणार होते. विभाला सुद्धा दिवस भर चालून पायावर जोर आलेला असतो. विभा शांत सीट वर बसते. समर विभा च्या समोर येऊन बसतो. 

समर - विभा बर वाटत आहे ना

विभा - हो थोडा पाय दुखत आहे

समर - तुझं आज दिवस भर बरच चालणं झालं

विभा - हो पण मला खरंच खूप छान वाटलं. फ्रेश झाल्या सारख आता नव्याने कामाला लागायला तयार आहे. समर तुमच्या ग्रुप खूप छान आहे. मला समजलं पण नाही कि मी कधी त्या मध्ये एक झाली.

समर - विभा तुमच्या काय? आपल्या ग्रुप आहे. तू आता काही वेगळी नाही आहेस.

विभा - हो, मग मिस्टर समर आता पुढच्या प्लॅन काय आहे तुमच्या

समर - तेच सांगायचं होत. थोडी गडबड झाली आहे.

विभा - काय झालं

समर - उद्या संध्याकाळी माझा आईने माझा लग्नाचा बघण्याचा कार्यक्रम ठरवलं आहे. मुलीकडील लोकांना घरी बोलावलं आहे.

विभा - (हे सगळं विभा ला माहित असत) अच्छा  

समर - मी घरी गेल्यावर आपल्या बदल आई शी बोलणार आहे. माझ्यावर तुझा विश्वास आहे ना विभा

विभा - हो समर स्वतः पेक्षा जास्त विश्वास माझा तुझ्यावर आहे. 

समर - तुझा पायाला मी क्रिम लागतो. 

विभा - आता नको रे

समर - सगळे थकुन झोपलेले आहेत. कोणाचं लक्ष पण नाही आहे. 

गीता - विभा खर आहे . आम्हला काहीच ऐकायला येत नाही आहे.

समर आणि विभा दोघे हि हसतात.

समर - विभा च्या पायाला नवीन लेप पट्टी लावत असतो. तेव्हा त्याच लक्ष विभाच्या पैंजणा वर जातो. त्याला आठवत जेव्हा या पिकनिक ला सुरवात झाली. तेव्हा हेच पैंजण त्याचे लक्ष वेधून घेत होते. विभा तुला पायातील पैंजण फार सुंदर दिसतात. आयुष्यात कधी हि काढू नकोस. 

विभा लाजून हसत हो बोलते.

रात्री चे एक वाजता ट्रेन दादर ला पोचते. सगळे ट्रेन मधून सामान घेऊन उतरतात. आता प्रत्येकाचे मार्ग वेगळे होणार असतात. अभय आणि रोहित सगळ्यांना बाय बोलून निघतात.

अनिकेत - गीता तू आता आमच्या बरोबर चल. सकाळी तुला मी घरी सोडतो.

गीता - ठीक आहे. मी आईला सांगते.

अनिकेत - तुझा बाबा शी माझं बोलणं झालं आहे. चल तू.

समर आणि राघवी पण टैक्सी बघत असतात. अनिकेला गीता आणि विभा बाय बोलून निघतात.

समर - विभा काळजी घे. तुला मी सकाळी कॉल करेन. बाय 

समर आणि राघवी घरी पोचतात. राघवी आईला भेटते आणि झोपायला जाते. 

दशरथ माने - प्रवास कसा झाला समर

समर - बाबा सगळ्यांनी खूप मजा केली.

सुनीता - झोप तू पण

समर - आई बाबा मला तुमच्या शी थोडं बोलायचं आहे.

दशरथ - सगळं ठीक आहे ना

समर - माझं एका मुलीवर मनापासून प्रेम आहे. मला तिच्या बरोबरच लग्न करायच आहे.

दशरथ - कोण आहे ती खुश होऊन विचारतात. नाव काय त्या मुलीचं 

सुनीता - समरच्या आईला सगळं माहित असत. तरी रागाने बोलते. ते काही चालणार नाही समर. आम्ही तुझ्यासाठी जाधवांची मुलगी पहिली आहे.

समर - अग आई पण मी तिला ओळखत नाही. मी पाहिलं तरी कुठे तिला. विभा वर माझं मनापासून प्रेम आहे. 

सुनीता - मग एकदा फोटो तरी पाहून घे. आणि फोटो दाखवते.

समर - आई मला नाही बघायचा आहे. 

सुनीता - अरे एकदा बघ तरी तुझा विभा सारखी तर दिसत नाही ना

समर - विभा चा फोटो बघून खूप खुश होतो. आई तू विभा ला कशी ओळखतेस

सुनीता - समर हि तीच मुलगी आहे. जी आम्ही तुझा साठी ठरवली आहे. विभा चे वडील तुझा बाबांचे मित्र आहेत.

समर - आई तुला हे माहित होत. विभा माझा बरोबर पिकनिकला आहे.

सुनीता - ते तर मला माहित होतच. पण तुला त्या रात्री रिक्षा समोर भेटलेली मुलगी आणि सकाळी चालायला गेलेलात तेव्हा बागेत भेटलेली मुलगी पण विभाचं होती. हे पण माहित आहे.

दशरथ आणि समर दोघे पण हसतात. 

दशरथ - समर बघितलंस म्हणून मी तुझा आईला सि आय डी ची टीम मेंबर बोलतो. कुठून कशी कुठली माहिती काढेल. देव जाणे.

समर - खरंच आई

सुनीता - खरंच काय ? पण मुलगी चांगली आहे रे.

समर आणि दशरथ दोघे हि एकत्र बोलतात - हो

आणि सगळे हसायला लागतात.

दशरथ - आता हे लग्न पक्क करायचं मग

समर - मी झोपायल्या जातो चला गुड नाईट.

हे सगळं ऐकून समर मनापासून खरंच खूप आनंदी असतो. सगळं कस मनासारखं जुळून येत होत. विभा ला कॉल करू का? नको झोपली असेल. तिला मॅसेज सेंड करतो. आय लव्ह यु प्रिय बायको.....

 

 

आता उद्या बघू या समर आणि विभा चा आयुष्यात कोणते आनंदाचे क्षण फुलांच्या सडा पसरून बहरत आहेत.    

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now