Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग सहा

Read Later
प्रेमाचे रंग - भाग सहा

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

काही कारणांमुळे मला पुढचा भाग लिहायला उशीर झाला. त्याबद्दल मी माफी मागते. कथेत विभा आणि समरच पुढे काय होणार आहे. हे प्रत्येक जण जाणून घेण्यास आतूर आहे. हे कंमेंट वरून मला कळलं. या पुढे जास्त वाट पाहायला नाही लावणार. चला कथेला सुरवात करू या.        

कुंदन वाडी या गावामध्ये सगळे जण येतात. या ठिकाणी गाडीवाला गावातील लोकांशी बोलून सगळ्यांसाठी राहायची आणि जेवण्याची सोय करतो. डोगंराच्या पायथ्याशी वसलेलं हे सुंदर गाव. सगळी जण चालत चालत गावात जातात. विभा ला चालायला होत नसत. ती हळू हळू चालत असते. विभा चा पाय दुखत असल्या मुळे ती राघवी चा हात पकडून चालत असते. समर पण विभा बरोबरच चालत असतो. समोर एक सुंदर मोठा जुना वाडा दिसतो. वाडा बघून सगळे खुश होतात. मुंबईला असे वाडे बघायला कुठे मिळतात. प्रत्येका साठी राहायची रूम वेगळी असते. रूम ला मोठ्या खिडक्या त्यामधून छान हवा येत असते. 

अभय - गाडी वाले काका या मोठा वाड्यात कोण राहत नाही का ?

गाडीवाले - बरीच वर्ष झाली. हे बंद च असत. इथे कोणी राहत नाही. या वाड्याचे मालक बाहेर गावी कामाला असतात. ते वाड्याची देखरेख करण्यासाठी पैसे पाठवून देतात.

गीता - फार सुंदर घर आहे. अनिकेत चल आपण आपले फोटो काढू या?

अनिकेत - आगोदर सगळे फ्रेश होऊ या. जेवणाचं काय ?

गाडीवाले - मी रमे ला सांगितलं आहे. रमे इथे जवळच राहते. रमे आणि पांडू इथे आता येतील.

राघवी, विभा आणि समर वाडा जवळ पोचतात. विभा ला वाड्याच्या पायऱ्या चढायला खूप त्रास होत असतो. समर विभा ला त्रास होताना बघू शकत नसतो. समर आपल्या हातातील बॅग राघवीला पकडायला सांगतो. समर विभा जवळ जातो. 

समर - थांब मी तुला उचलतो. तुला पाय टेकायला खूप त्रास होत आहे.

विभा - नको रे.

समर - काहीही ऐकत नाही. तो सरळ विभाला उचलतो आणि वाड्याच्या पायऱ्या चढून आत वाड्यात घेऊन येतो.

विभा - समर च हे अस आपल्या साठी वागणं विभा ला अजून प्रेमात गुंतवत असत.

राघवीला आईचा फोन येतो. 

सुनीता - हॅलो कुठे आहात. काही फोन नाही.

राघवी - आम्ही ठीक आहोंत आई

सुनीता - आता कुठे आहात?

राघवी - कुंदन वाडी उशीर झाला आहे म्हणून सगळे इथे थांबलो आहोत.

सुनीता - ठीक आहे. समर कसा आहे?

राघवी - आई दादा पण ठीक आहे. आई दादा ने वहिनी शोधली आहे असं वाटत.

सुनीता - काय

राघवी - काही नाही ग असच

सुनीता - माझाशी खोट बोलू नकोस. मला ऐकायला येत. ती मुलगी कोण आहे.

राघवी - विभा अनिकेत ची बहीण. दादा ला आवडते वाटत.

सुनीता - अनिकेत कुलकर्णी का?

राघवी - अनिकेत नावाचा दादा चा एकच जवळचा मित्र आहे. काय आई 

सुनीता - चांगलं आहे.

राघवी - चक्क तू चांगलं आहे हे म्हणालीस. अरे वाह आई आता तुला काही अडचण नाही. 

सुनीता - मी ओळखते त्या मुलीला विभा जाधव हीच मुलगी जी मी तुझा दादा साठी पाहिली आहे.

राघवी - आई खरंच ओह्ह्ह्हह्ह माय गॉड मला तर विश्वास बसत नाही आहे. दादा आणि वहिनी

सुनीता - आता हे सगळं जाऊन तुझा दादा ला नको सांगूस. त्यांनी तर विभा ला पाहिलं पण नाही आहे. दादाची चमची..... थांब जरा आणि मला फोन करून सगळं सांगत जा.

समर - राघवी आत ये लवकर

राघवी - हो आली दादा. चल बाय आई मी फोन ठेवते. दादा बोलवत आहे. बाबा कसे आहेत.

सुनीता- ठीक आहेत तुझी आठवण काढतात. रात्री फोन कर.

राघवी - हो बाय. 

राघवी - बोल दादा 

समर - तू आणि विभा पण फ्रेश होऊन या. दोघीना पण बर वाटेल. हा समोरचा रूम तुमचा आहे. मी सामान ठेवलं आहे.

विभा - थँक यु समर कडे बघून बोलते 

राघवी - चल वहिनी बोलते आणि डोळे बंद करते. अरे देवा काय बोलते मी. सॉरी विभा

समर आणि विभा दोघे हि हसतात.

रोहित - अरे आपण गावात फिरायला जाऊ या का?

अनिकेत - तुम्ही सगळे जा. विभा जवळ कोणी तरी थांबा पण. मी गाडी वाल्या बरोबर गाडी च बघून येतो.

तेवढ्यात वाड्यात रमे आणि पांडू येतो. गाडी वाला रमे आणि पांडू ची ओळख सगळ्याशी करून देतात. 

अनिकेत आणि गाडीवाला गाडी दुरुस्त करायला निघून जातात.

गावात संध्याकाळची मंदिरात आरती होत असते.

रोहित - चला मग कोण कोण येत आहे.

राघवी - मी पण येते. 

अभय - मग विभा जवळ कोण थांबणार. अजून तिला बर नाही वाटत. वैद्य बुवा पण येणार आहेत. 

राघवी - दादा थांबेल. ( तेवढाच दोघांना एकत्र वेळ भेटेल)

अभय - समर कुठे आहे. 

तेवढ्यात समर तिथे येतो.

अभय - कुठे होतास.

समर - त्या पांडू बरोबर वाड्यात कुठे काय आहे ते बघत होतो. खूपच मोठा वाडा आहे.

अभय - ते ठीक आहे. आम्ही सगळे आता गावात मंदिरात जात आहोत. तू विभा जवळ थांब. तिची काळजी घे. वैद्य बुवा पण येतील.

समर - राघवी थांबणार होती ना. ठीक आहे मी थांबतो.                 

रोहित,अभय,गीता आणि राघवी वाडीतील मंदिर बघायला जातात. समर विभा जवळ थांबतो.

विभा तिच्या रूम मध्ये बसली असते. समर रमे कडे गरम पाण्याची पिशवी मागतो.

रमे - हि घ्या साहेब. मी तुम्हाला गरम पाणी भरून देते. बाई साहेबाना पायाला खूप लागलं आहे. तुम्ही शेकवा त्यांना बर वाटेल. हि पिशवी घ्या. साहेब मी जेवणाचं बघते. काही लागलं तर पांडूला सांगा. 

समर - पिशवी घेतो आणि विभा च्या रूम मध्ये येतो.

विभा - बेड वर बसून खिडकीतून बाहेर चंद्राला बघत असते. 

समर - आत येऊ विभा

विभा - येणा समर विचारतोस काय? सगळे कुठे गेले आता.

समर - अग ते वाडीतील मंदिरात गेले आहेत.

विभा - तू नाही गेलास

समर - शांत राहतो. विभा कडे बघतो. तुला कंपनी कोण देणार म्हणून थांबलो. तुझा पाय दे मी शेकवतो. तुला थोडं बर वाटेल.

विभा - अरे नको रे मी करते तू नको

समर - मी करतो तुला त्रास होईल वाकायला. तू ऐकणार आहेस कि नाही. नाहीतर

विभा - हसून नाहीतर काय करणार

समर - बेड वर बसतो. नाहीतर असं म्हणून समर स्वतःच पाय जवळ घेतो आणि पायाला शेकवायला सुरवात करतो. 

विभा - आआआ पाय इथे दुखत आहे.

समर - उद्या आपण डॉक्टर कडे जाऊ या. त्यांनी तुला बर वाटेल. आता लेप पट्टी लावायला वैद्य बुवा येतील. असं का माझा कडे बघतेस.  

विभा - काही नाही. एक बोलू समर

समर - बोला (पायाला शेकवत असतो)   

विभा - काही नाही नको.

समर - बोल ना काय विचारायचं आहे. तू जे विचारशील ते मी सांगेन. काही झालं तरी आपण चांगले मित्र आहोत. 

विभा - हो खूप चांगला मित्र आहेस. एक माणूस म्हणून पण तू खूप चांगला आहेस. मला तू आवडतोस समर      

समर - आता समर विभा कडे बघतो. आवडतो म्हणजे फक्त मित्र म्हणून ना.  

विभा - विभा ला समर च्या नजरेत बघायला होत नसत. ( बोलताना हे काय मनातील सांगून गेली) खाली बघ ना समर असं माझा कडे बघू नकोस.

समर - ठीक आहे. तू म्हणशील तस. पण तुला लाजायला काय झालं. हे एवढे मोठी हसू गालावर कोणासाठी आहे.

विभा - काही नाही. मी बाहेर चंद्रा कडे बघते.

समर - चंद्र बोलत आहे का तुझा शी काही

विभा - तो चंद्र फार दूर आहे. तो काही बोलत नाही. पण या जवळच्या चंद्राने तरी मनातील बोलावं काही.

समर - हे ऐकून समर ला इशारा कळतो. काय ऐकायचं आहे तुला

विभा - ते सगळं जे तुझे डोळे प्रत्येक क्षणाला माझ्याकडे बघून बोलत असतात. जे मला जाणवत असत.

पांडू - साहेब वैद्य बुवा आले आहेत. 

दोघे हि भानावर येतात.  

समर - या वैद्य बुवा

वैद्य - काय झालं आहे.

समर - हिच्या पायाला मुका मर लागला आहे.

वैद्य - विभाच्या पायाला बघतात. पिशवीतून काही लेप पावडर काढतात. हा लेप हिच्या पायाला लावत आहे. उद्या सकाळ प्रयन्त हिला बर वाटेल. हि पट्टी रात्र भर पायाला बांधून ठेवा. पायावर जास्त ज़ोर देऊ नका. 

विभा - ठीक आहे.

समर - चला मी सोडायला येतो तुम्हाला. तुमची फिज किती झाली.

वैद्य - अनिकेत म्हणून भेटायला आलेले. त्यांनी मला इथे येण्यास सांगितलं. त्यांनी घरीच मला पैसे दिले. 

पांडू - साहेब मी सोडतो त्यांना. 

तेवढ्यात विभा चा फोन वाजतो. समर तो फोन स्पीकर वर ठेव ना आत्याचा फोन आहे. खिडकी जवळ नेटवर्क तरी आहे.

समर फोन उचलतो आणि स्पीकर कर ठेवतो.   

आत्या - विभे कशी आहेस. अनिकेत सांगत होता तुझा पायाला लागलं आहे.

विभा - हो आत्या. आता मी ठीक आहे. थोडा मुका मार आहे. लवकर ठीक होईल.  

आत्या - लवकर बरी हो ग. पाय गरम पाण्याने शेकवत रहा. मुंबई ला परत आल्यावर तुजा बघण्याचा पण कार्यक्रम होणार आहे. माहित आहे ना. मुलाकडील लोकांचा फोन आलेला. पुढचा आठवडा सांगितलं आहे.  

हे ऐकून समर चा चेहरा पडतो. तो विचार करायला लागतो.     

विभा - ( अग थांब आत्या) हो आत्या  

आत्या - काळजी घे ग ( आत्या फोन ठेऊन देते) 

विभा - समर फोन कट कर.

समर च लक्षच नसत

विभा - समर ला हात लावते अरे काय झालं. तुझं लक्ष कुठे आहे. माझं बोलणं झालं. फोन कट कर.

समर - अच्छा, फोन कट झाला आहे.

विभा - ठीक आहे.

समर - विभा तुझं लग्न ठरत आहे. तू मला सांगितलं पण नाही.

विभा - अरे बघण्याचा कार्यक्रम आहे. अजून काही फायनल नाही झालं.

समर - पण जर मुलगा तुला आवडला तर तू हो बोलशील ना.

विभा - विभा मनात हसत. हो

समर - मग तुला तो मुलगा आवडला आहे का?

विभा - तस अजून काही

समर - काही बोलू नकोस. मला तुझ्याशी आपल्या बद्दल बोलायचं आहे.

विभा - आपल्या बद्दल

समर - विभा चा हात हातात घेतो. खिडकींतून येणारी थंड झुळूक त्यांना स्पर्श करून जात होती. ते दोघे हि एकमेकांच्या नजरेत पाहत धुंद होऊन मोहून गेले होते. या क्षणाला समर ला विभाला पाहतच राहावं हे वाटत होते. समर हाताची पकड अजून घट्ट करून बोलायला सुरवात करतो.

विभा मी जेव्हा तुला पहिल्यादा रिक्षा समोर पाहिलं तेव्हाच माझा मनाला एक वेगळी जाणीव झाली. तू इतरांन पेक्षा फार वेगळी आहेस. तुझं दिसणं त्यांहून हि तुझं हसण फार सुंदर आहे. तुझे हे बोलके डोळे भरपूर साऱ्या गोष्टी बोलून जातात. तुझं निरागस स्वभाव माझा मनाला भावत होता. तुझा कडे मी कधी खेचलो गेलो हे माझ मलाच कळलं नाही. तुझ्या स्वभावातला साधे पण मला आवडला. 

थोडा वेळ बोलायचा थांबतो. माझं श्रेया वर जीवापाड प्रेम आहे. माझ्या आयुष्यातील श्रेया च स्थान मी दुसरं कोणाला हि देऊ शकत नाही. ती आज माझा आयुष्यात नाही आहे. पण तिच्या आठवणी माझा बरोबर असतात. हे सांगत असताना समरचे डोळे भरून येतात. हे ऐकून विभा चे डोळे पण पाणावले. विभा विचार करते - कोणी इतकं कस निर्मल प्रेम कोणावर करू शकतो. विभा माझं कुटुंब खूप साधं आणि चांगलं आहे. माझं कुटुंब माझा साठी फार महत्वाचं आहे. जर तू माझा आयुष्याचा भाग होणार असणार तर ते तुला पण महत्वाचं असल पाहिजे. विभा मी खरा असा आहे. जे तुला जाणून घेयाच होत. तुला जर मी मनापासून आवडत असेन तर तुला मला माझा भुतकाळ सकट स्विकाराव लागेल. तुला हे सगळं मान्य आहे.

विभा - हे ऐकून विभा ला खूप आनंद होतो. समर च्या पकडलेल्या हातावर हात ठेऊन गोड हसत समर ला हो मला मान्य आहे असं बोलते.

समर पण आनंदाने विभा कडे बघत असतो.                       

आज या क्षणाला मी समर माने तुला लग्नाची मागणी घालतोय. आयुष्यभर माझी पत्नी होऊन मला साथ देशील का? माझी होशील का?

विभा - विभा ला काहीच सुचत नसत. काय बोलू मी हे असं काही होईल हे तिला वाटलं पण नव्हतं. तिचा हात थंडगार पडतो. समर च्या हाताची उब तिला आता जाणवत असते. हे सगळं ऐकून विभा रडायला लागते.  

समर - विभा ला रडताना बघून समर विभाला त्याच्या मिठीत घेतो. आणि हसत बोलतो शांत हो ग मी  तुला लग्ना साठी मागणी घालत आहे. तुला ओरडत नाही आहे. 

विभा - हो माहित आहे. पण हे सगळं खूप अचानक झालं म्हणून  

समर - विभा मी माझा आई ला उद्याच आपल्या बदल सांगणार आहे. ठीक आहे. सो डोन्ट वरी.

सगळी जण बाहेरून घरात येतात. गीता समर ला आवाज देत असते. 

समर - विभा चे डोळे पुसतो. शांत हो. सगळे आले वाटत. मी बाहेर बघून येतो.

विभा ला खूप सुखद अनुभव आता मिळालेला असतो. तिचा या सगळ्यावर विश्वास बसत नसतो. ती खिडकीतून बाहेर चंद्र कडे बघते आणि थँक यु बोलते. 

 

मित्रांनो आता समर आणि विभा यांची लगीन घाई कशी सुरु होईल हे आपण येणाऱ्या पुढील भागात पाहू या. धन्यवाद.....                                                                             

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now