Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग पाच

Read Later
प्रेमाचे रंग - भाग पाच

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मैत्रांनो,

विभाला हे सगळं स्वप्नं वाटत होत. वडिलांनी ज्या मुलाला आपल्यासाठी पसंत केलं आहे. तो समर आपल्याला हि आवडतो हे तिला जाणवत होत. त्याच्या नजरेतील काळजी तिला दिसत होती. या आगोदर विभा कधी प्रेमात पडली नव्हती. हो पडणं च म्हणेन याला जी गोष्ट आपल्या मनात नसते आणि अचानक पणे घडत त्याला पडणं च बोलणार. पहिल्यांदा कोणाच्या प्रेमात पडणे हि भावना जितकी सुंदर असते. तेवढाच त्रास देखील होतो. हा येणारा काळ विभाला दाखवणार होता. तिची स्वतःची ओळख स्वतःला होणार होती. 

सगळी जण आपल्या जागेवर जाऊन बसतात. या सगळ्या गोष्टी मुळे समरला पण थोड विचित्र वाटत असत. पण हे तो दाखवत नाही. 

गीता- अनिकेत तुला वेळे वर निघता येत नव्हता का? जर आता ट्रेन सुटली असती तर

अनिकेत - सॉरी या पुढे अस नाही वागणार. पाहिजे तर कान पकडतो माझे.

हे पाहून विभाला हसू येत. 

गीता - ठीक आहे केलं माफ. 

अनिकेत सगळयांकडे बघून सांगतो. हि माझी बहीण विभा. विभा हा अभय, रोहित हि गीता याला तर तू ओळखतेस समर आणि हि समरची बहीण राघवी.

विभा - हाय

राघवी - विभा तुला मी काय बोलू ताई कि विभा

समर - ताई कुठे बोलतेस?

विभा - तू मला विभा म्हणूनच हाक मार.

आता बऱ्यापैकी प्रत्येक जण आपल्या जागेवर स्टेबल झाले होते. घरून आत्या नि इडली दिली होती. विभा पेल्ट घेते आणि सगळ्यांना इडली चटणी देते. समरच्या घरून पण सुनीता काकी नी वडे दिले असतात. राघवी डबा विभा जवळ देते आणि तिला सांगते. हे पण या पेल्ट मधेच ऍड कर. गीता एक एक डिश पुढे देत जाते. अजून काही पाहिजे असेल तर सांगा मला. 

समर - विभा आणि गीता तुम्ही पण खायला घ्या. आम्ही काही लागलं तर घेऊ स्वतः

आता प्रत्येकाचं खाऊन झालं असत. रात्र असल्या मुळे वातावरणात थंडी खूप असते. प्रत्येक जण स्वेटर आणि शॉल घेतात. 

रोहित - मग आता आपण अंताक्षरी खेळू या. 

राघवी - ठीक आहे. टीम बनवू या. मी, दादा, विभा हि एक टीम आणि अभय दादा, रोहित आणि गीता, अनिकेत हि एक टीम ओके.

समर - मी नाही खेळत. तुम्ही खेळा. एक महत्वाचा फोन करून येतो. 

राघवी - ठीक आहे. अनिकेत तू आमच्या टीम मध्ये ये.

अनिकेत - ठीक आहे समर उठ मला बसून दे इथे. आता बरोबर आहे.

समर ला हे सगळं बर नसत वाटत. म्हणून तो बाहेर येऊन पॅसेज मध्ये थांबतो. सगळ्यांचा गाण्याचा आवाज बाहेर येत असतो. कसे गात आहेत. बाहेर शांत पणे बघत असतो. अंधारात बाहेर दिसणारे लाईटीचे दिवे, पटरीला लागून असलेली मोठी झाडे फार भव्य वाटत होती. 

अभय च्या टीम वर 'र' येत. राजा को राणी से प्यार हो गया. 

राघवी 'य' यादो कि बारात निकली हे दिल के द्वारें.

गीता परत 'र' - राहो मे उनसे मुलाकात हो गयी जिसे डरते थे वही बात हो गयी ल ला आ ल ला आ तुमच्यावर अ 

अनिकेत - अ कस य ना

गीता - मी म्युजिक पण गात होते ना. मग अ  

अनिकेत - हे देवा असं पण अ वरून गाणं

रोहित - टिक टिक वन टिक टिक टू टिक टिक 

राघवी - अरे थोडा वेळ द्या आठवत आहोत. 

विभा मी गाते - ओरे मन वा तू तो बावरा हे, तुही जाणे तू क्या सोचता हे, तुम जेसा कोई एक तारा एक तारा प्रेम रंग कोई एक तारा प्रेम मलंग तेरा एक तारा....

समर विभा च्या आवाजाने ओढला जातो. तो परत सीट वर बसायला येतो आणि विभाला शांत पणे बघत असतो. तीच ते निर्मल पणा त्याला भावतो. हि बाकीच्या पेक्षा वेगळी आहे. हे जाणवत असत. 

सगळे मस्त मजा मारत असतात. गप्पा मारत एकमेकांची उडवत असतात.

अनिकेत - समर आलास तू मिस केलस हे सगळं.

गीता - चला झोपूया आता खूप उशीर झालं आहे. सगळे स्वतःच्या सीट वर जातात. गीता विभाला विचारते तू वरच्या सीट वर झोपणार आहेस.

विभा - नको मी खालीच झोपते. हे बर आहे.

राघवी बोलते विभा मी तुझा समोरची सीट घेते.

गीता - ठीक आहे मग समर तू वर झोप मी या बाजूच्या सीट वर झोपते.

बाहेर आज चंद्राचं प्रकाश छान पडलं असत. विभा हि झोपून जाते. राघवी पण झोपते. समरला झोप काही येत नसते. तो खाली बघतो. जाऊ का मी बाहेर झोप येत नाही आहे. तेवढ्यात समर ची नजर विभा चा पायाकडे जाते. खिडकीतून चंद्राचे प्रकाश विभाच्या पायाचा पैजण वर पडत असतात. त्याला हे सगळं मोहून टाकत असत. पैजण विभा च्या पायात किती सुंदर दिसत आहेत. हिची प्रत्येक गोष्ट मला गुंतवून ठेवते. हे समर ला जाणवला लागलं असत. विभा आपल्याला खरंच आवडते का? नाही असं कस होईल.

समर खाली उतरतो. विभाच्या पायावर सरकलेली चादर टाकतो. आणि बाहेर पॅसेज मध्ये जातो. ट्रेन सुरु असते. समर बाहेर बघण्या साठी खाली बसतो. आगोदर किती धमाल मस्ती करायचो. आता हे सगळं मनाला टोचत. शांतता बरी वाटते. फक्त समोर काय होत आहे हे बघत राहणे. हे विचार करत असताना. 

पाठीमागून विभा येते. 

विभा - समर काय करतोस इथे? आत चल खूप थंडी आहे. तू स्वेटर पण घातला नाही आहेस. हि शॉल घे. 

समर - थँक यु विभा. बस ना थोडं बोलायचं होत.

विभा - बोल ( विभा पण बसते)

समर - एखाद्या नात्या मध्ये खरं काय पाहिजे असत. तेव्हा ते परिपूर्ण होत.

विभा - तू कोणत्या नात्या बदल बोलत आहेस. प्रत्येक नातं हे वेगळं असत. जीवनात माणसांनीच वेगवेगली नाते बनली आहेत आणि आपण त्यांना कसे जपत आहोत त्या वर सगळं अवलंबून आहे. 

समर - माझ लग्न ठरत आहे. माझ्या आईने माझ्यासाठी मुलगी बघितली आहे. मला हे काही चुकीच आता नाही वाटत. माझा आई च माझा वर फार प्रेम आहे. माझा सुखात तीच सुख आहे. पण कुठे तरी पटत नाही. एखाद्यावर प्रेम नसताना हि का लग्न करून आयुष्यभर त्याच्या बरोबर राहायचं.

विभा - समर चे हे सगळे असे प्रश्न ऐकून विभा भांबावून जाते. याच्या मनात काय चालू आहे?  हे तिला बघायचं असत. समर तुझं कोणावर प्रेम आहे का मग त्याच्या जवळ लग्न करायचं आहे. 

समर - हे ऐकून समर शांत राहतो. जिच्या वर मी प्रेम करतो ती माझा आयुष्यात नाही येऊ शकत. म्हणून मी आयुष्यात पुढे जायचं ठरवलं आहे.

विभा - हे ऐकून विभाला फार वाईट वाटत. तुला तुझं मन काय सांगत आहे. तू ज्या मुलीशी लग्न करणार आहेस. तिच्यावर तुझं प्रेम नाही आहे. पण तुझा कुटुंबाला ती आवडली आहे. हे बघ नवरा - बायको च्या नात्यात फक्त प्रेम नको असत रे. त्या नात्यात प्रामाणिक पणा, एकमेकांबद्दल काळजी असणे, किती जरी अडचणी आल्या तरी त्या वेळी साथ देणे, आपण जसे आहोत तसं आपल्याला स्विकारणे, विचारांची स्वत्रंतता, तिचा आणि तिच्या बरोबर असेलल्या लोकांचा मान ठेवणे. तुझी जशी ओळख वाढत जाईल तसं ते नातं फुलत जात. तू त्या मुलीला समजून घेशील. तुझे आणि तिचे विचार आणि स्वभाव मिळाले कि प्रेम होत जात रे. ते आगोदर पासून कधीच कोणत्या नात्यात नसत. आई सुद्धा आपल्या मुलावर न बघता प्रेमाचं नातं जोडते ना. जेव्हा ते बाळ गर्भात असते. तिने मुलाला कुठे पाहिलं असत. तरी ते अनलिमिटेड प्रेम असत ना. त्या प्रेमात त्या आईला मुलां पासून काही भेटावं याची अपेक्षा पण नसते. पण तरी तीच प्रेम असत ना. आणि ते तिला सिद्ध करावं लागत नाही. तुला करायचं असेल तर असं प्रेम समजून घे. मग सगळं नीट होईल. भूतकाळ हा आठवणी साठी चांगला आहे रे. पण भूतकाळाला घेऊन समर नाही जगता येत. तू चालू वेळेत जगायला शिक.    

समर - विभा तू किती चांगला विचार करते. या पद्धतीने मी कधी प्रेमाकडे पाहिलं सुद्धा नव्हतं. तू तर प्रेमाचा रंगच बदलून टाकला आहेस. तू कधी कोणावर मनापासून प्रेम केलं आहेस का? म्हणून हे सगळं बोलत आहेस. 

विभा - याला आता कस सांगू कि तुझ्या या चांगल्या स्वभावाच्या प्रेमात मी पडत आहे. नाही रे.

समर - एक बोलू ज्याच्या शी  तुझं लग्न होईल खरंच नशीबवान असणार. कोणी इतकं कस समजून घेऊ शकत.

विभा - हात जोडून बोलते. मंडळ आभारी आहे. मी जाते झोपायाला. आणि दोघे हि हसू लागतात.

सकाळी ट्रेन नाशिक स्टेशन ला थांबते. सगळे आपले सामान घेऊन उतरतात. अभय गाडी वाल्या ला कॉल करतो. कुठे आहेस आम्ही नाशिक ला पोचलो आहोत.

गाडीवाला - साहेब मी बाहेरच थांबलो आहे. येतो मी. एक एक सामान घेऊन गाडीवाला सगळं डिकीत ठेवतो.

सगळ्याना आता फ्रेश वाटत असत. सगळे मस्त टपरीवर गरम चहा घेत असतात. गाडीवाल्याला सांगतात अगोदर तू आम्हाला हॉटेल वर सोड मग आम्ही अर्धा तासात खाली येतो. मग ठरल्या प्रमाणे फिरायला निघू. सगळे आप आपल्या घरी पण फोन करून कळवतात. 

आत्या - विभा काळजी घे ग. तुम्ही सगळे ठीक आहात ना.

विभा - हो आत्या.. तू पण काळजी घे. नंतर करते फोन चल ठेवते.    

सगळे आता फ्रेश होऊन निघतात. हॉटेल मधून निघत असताना. विभा चा पाय घसरतो. विभा खाली पडणार असते. तेवढ्या समर तिला पकडतो. विभा परत समर च्या डोळ्यात बघत हरवून जाते. आता समर पण विभाला बघत असतो. इतक्या जवळ आज ती पहिल्यादा त्याच्या जवळ असते. राघवी हे बघते. विभा तुला काही लागलं नाही ना. असं विचारते. दोघे हि काही झालं नाही असे वागत असतात. मी ठीक आहे राघवी. माझा पाय घसरला इथे.

समर - जपून चाल विभा असं बोलतो आणि पुढे निघून जातो.

विभाला समरची साथ पाहिजे असते. पण अजून पण त्याच्या मनात काय चालू आहे हे तिला कळत नसत.

सगळे गाडीत बसतात. याचा प्रवास सुरु होतो. समर विभाला बघत असतो. हे काही विभाचा नजरेतून चुकत नाही. विभाच्या काय तर हे सगळ्यांना कळून जात. गाडीत बसून सगळ्याच गाण्यातून चिडवणं पण सुरु होत. विभा खुश आहे हे बघून अनिकेत ला हि बर वाटत. राघवी तर गोरी गोरी पान फुलासाखी छान दादा मला एक वाहिनी आण या गाण्याला गात असते. समर ला राघवीचं टॉड कळतो. तो विभा कडे न बघता. खिडकीतून बाहेर बघत असतो.

अमृतेश्वर मंदिरा जवळ गाडी थांबते. हे शंकराचं मंदिर फार पुरातन असत. सगळे जण दर्शनासाठी आत मंदिरात जात असतात. शंकराची पिंडी फार सुंदर असते. मंदिराच्या गाभाऱ्यात मनाला फार शांत वाटत. 

सगळे पाया पडतात आणि मंदिराला प्रदिक्षणा घालायला जातात. समर हात जोडून उभा असतो. तो देवा ला सांगत असतो हे देवा माझा मनाची हि जी काही घालमेल होते ती थांबावं. मला माझा आयुष्यात शांतता पाहिजे. बस झाला हा गोधंळ. मला सुख पाहिजे. तेवढ्यात विभा घंटा वाजवते. समरच मनातील बोलणं थांबत. विभा शंकराच्या पिंडीची पूजा करते. समोर ठेवलेली प्रसाद स्वतः घेते आणि समर ला पण देते. 

विभा - देव तुझं सगळं मागणं पूर्ण करेल. 

समर - तू काही मागणार नाही का देवा जवळ

विभा - देव जे पण देणार ते चांगलंच असणार माझा विश्वास आहे.

गीता - अरे इथे बोलत काय आहात. चला आपण फोटो काढु या. सगळे फोटो काढत असतात.

समर विभा कडे बघतो. मी तुझा एक फोटो काढू का? 

विभा - आपण आपला फोटो काढू या. आणि सेल्फी ऑन करते. समर हंस तरी. तुझा बरोबर असा फोटो काढू का? 

समर - हसतो. मला हा पीक सेंड कर.

विभा - ठीक आहे. समरचा शांत पण विभाला आवडतो.

गाडीवाला - साहेब चला लवकर आता आपल्याला पुढील ठिकाणी जायाच आहे. 

अभय - भाऊ आता आपण कुठे जाणार आहोत.

रोहित - आता कळसुबाई डोंगरावर जात आहोत. 

गीता - फार उंच असेल ना. 

रोहित - हो, चला लवकर. 

गाडी आता नागमोडी वळणावर सुरु होते. एका बाजूला डोंगर आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी. 

राघवी - हे रस्ते कसे आहेत ना दादा. गोल गोल फिरून चक्कर येत आहे.

गाडीवाला - हा असा रस्ता अजून पंधरा वीस मिनटं असणार आहे. आता चड सुरु होईल. सगळ्यांनी नीट बसा. 

रोहित - रस्ते अजून थोडे मोठे पाहिजे होते ना. 

समर - अरे हा डोंगरी भाग ना हा असाच असतो. इथे रस्ते मोठे नाही करता येत. दर वर्षी पावसाळयात डोंगराची माती सरकत जाते.

समोरून वेगात गाडया येत असतात. समर गाडीवाल्याला बोलतो. गाडी हळू चालवा.

गाडीवाला - या अशा  रस्त्या मुळे समोरील गाडी दिसतंच नाही साहेब.

रोहित - काका डोंगरावर पोचवायचं आहे. डायरेक्ट वर नका पोचवू. 

गीता - फालतू जोक नको मारू. आणि सगळे हसतात. 

आणि अचानक समोरून गाडी येते. याच्या गाडीला धडक बसते. धडक बसल्या बरोबर गाडी रस्ता सोडून बाजूच्या कच्या मातीच्या रस्त्यावर जाते. गाडीवाला गाडी ब्रेक लावायला बघत असतो. पण ब्रेक लागत नसतो. सगळे घाबरतात. राघवी रडल्या गत होऊन विभा ला पकडून असते. सगळं एवढ अचानक होत असत कि काय करावं हे कळतं नसत. समोर दोन रस्ते जात असतात. तिथे एक झाड असत. समर गाडीवाल्याला सांगतो. गाडी झाडा समोर न्या तरच ती थांबेल. समर सगळ्यांना पकडून नीट बसा असं पण सांगतो.

सगळे घाबरे असतात. देवाचं नाव घेतात. गाडी समोर झाडाला जाऊन आदळते. राघवी जोरात ओरडते विभा ................. सगळे शांत बसलेले असतात. समर मागे राघवी कडे वळून बघतो. विभा कुठे आहे.  

राघवी - दादा विभा दरवाजातून बाहेर पडली. राघवी रडत असते.

समर - हे ऐकून समर पटकन गाडीतून बाहेर येतो. तो फार घाबरला असतो. समोर कुठे हि विभा दिसत नसते. समर वेडा सारखा विभा च्या नावाने ओरडत असतो. 

अभय, रोहित, अनिकेत हे पण सगळे बघायला येतात. अनिकेत गाडीवाल्याला गीता आणि राघवी जवळ थांबायला सांगतो. समोर सगळी कडे जंगल असत. 

समर - विभा कुठे आहेस? विभा अग आवाज तरी दे...

अनिकेत ला समोर रस्ताच्या बाजूला झाडाला विभाची ओढणी लटकली ली दिसते. आणि तो पळत जातो. समर अनिकेत ला पळताना बघतो.  समर पण जातो. 

विभा रस्ताच्या खाली उतारात पडली असते. तिला शुद्ध नसते. समर कसला हि विचार न करता. त्या उतारात उडी मारतो. तिथली माती सरकत असते. समर विभा ला बघतो. त्याचा जीव  भांडयात पढतो. विभाच्या डोक्याला मार लागलं असत. समर विभाला जवळ घेऊन उचलतो. आणि वर येण्याचा प्रयन्त करत असतो. पण या भागात पाया खालील माती सरकत असते. म्हणून समर ला विभा ला वर घेऊन येयाला जमत नसत. 

अभय गाडी तुन रशी घेऊन येतो. अभय समर ला आवाज देतो.

अभय - समर हि रशी पकड आणि वर ये.

समर एका हाताने ती रशी पकडतो आणि विभा ला घेऊन हळू हळू वर येतो.

अनिकेत पटकन गीता ला पाणी आणायला सांगतो. गीता पाणी घेऊन येते. विभाला अजून पण शुद्ध आली नसते. तिच्या डोक्याला खरचटल्या मूळे रक्त येत असत.

समर - विभाला जवळ घेऊन पाणी पाजायचं बघतो. थोडं पाणी हातात घेऊन तिच्या चेहऱ्यावर शिंपडतो. विभा उठ ना. तिला हलवतो तिच्या चेहऱ्याला हात लावतो. 

राघवी - विभाचा हात हातात पकडून प्लस बघत असते. दादा फार हळू हळू प्लस होत आहेत.

समर - असं नाही होऊ शकत. विभा उठ तू असं नाही मला सोडून जाऊ शकत. समर विभा ला जवळ घेऊन रडत असतो. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय . उठ ना ग. पिल्ज तू पण सोडून नको जाऊस. 

सगळे समर कडे बघत असतात. अनिकेत समर च्या खांद्यावर हात ठेवतो. समर विभाला शुद्ध येत आहे. आपण हिला हॉटेल वर घेऊन जाऊ या. 

विभा उठते. समर तिला मिठी मारून रडत असतो. तुला काही होणार नाही विभा मी आहे ना तू काळजी करू नकोस. हे सगळं ऐकून विभा ला पण रडू येत. 

समर - तू ठीक आहेस ना

विभा - हो आहे. पण विभा चालायच बघते. तर तिच्या पायाला हि लागलं आहे ते कळत. तिला चालायला जमत नाही.

समर गाडीवाल्या ला विचारतो इथे जवळ पास कुठे राहायचं होईल का? परत हॉटेल वर एवढं लांब आता नाही जमणार. 

गाडीवाला - इथे जवळ च एक गाव आहे. तुम्हाला तिथे राहायची मी सोय करतो. आणि वैद्य पण आहेत. या मॅडम ला पण ते बघतील. 

सर्वाना हे पटत. अनिकेत - समर तुम्ही सगळे गावात जावा. मी गाडीवाल्या बरोबर गाडी च बघतो. हि पण दाखवावी लागेल. 

अभय - अनिकेत मी पण येतो तुज्या बरोबर... आगोदर आपण राहण्याचं बघू या

राघवी आणि गीता दोघी हि विभा जवळ बसल्या असतात.

हे सगळं बोलत असताना लांबुन समर विभा कडे बघतो. विभा ला मी काही हि होऊन देणार नाही हे मनात म्हणतो.

 

समर आणि विभा याच एकमेकांवर प्रेम आहे. हे त्यांना आणि आपल्याला कळलं आहे. पण हे ते एकमेकांना कधी आणि कसं सांगणार हे आपण पुढे बघू या.

 

मित्रांनो तुम्ही दिलेल्या चांगल्या प्रतिसादा बद्दल मी खरंच मनापासून तुमची आभारी आहे. तुमच्या कमेण्ड मला वाचून बर वाटत. धन्यवाद.......                                                                                                   

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now