प्रेमाचे रंग - भाग चार

Love' and the way we express it, changes at every stage of life.

नमस्कार मित्रांनो,  

समर ऑफिस ला पोचतो. पटकन कामाला सुरवात करतो. आज अनिकेत आणि समर दोघें हि ऑफिस मधून एकत्र निघतात. समर गाणं गुणगुणत चालत असतो. 

अनिकेत - साहेब आज तुमचा मूड चांगला आहे. काय खास ?

समर - काही नाही रे असच. आज वातावरण चांगलं आहे ना.

अनिकेत - वातावरण आणि गर्दी नेहमी प्रमाणेच आहे. तुझा मनाच्या वातावरणच्या तापमानात बदल झाल आहे.

समर - हसतो, अनिकेत आपण फिरायला जातोय तिथे तुझ्या बहिणीला पण बरोबर घे ना. सगळ्यांशी तिची पण ओळख होईल. 

अनिकेत - विभाला विचारलं मी नाही म्हणाली. कोणाला हि ओळखत नाही असं बोलते. तिची एक मीटिंग पण आहे.

समर - मला ओळखते ना आता. बाकीच्या शी पण होईल ओळख. विभाशी मी बोलतो.

अनिकेत - विभा तुला आवडते का?

समर - काही पण काय विचारतोस अनिकेत फक्त एक मैत्रिण म्हणून रे विचारलं तिच्याबद्दल आणि आमची ओळख फार कमी आहे. फक्त दोन वेळा भेटलो आहोत.  

अनिकेत - हो मान्य आहे. माझी बहीण म्हणून बोलत नाही मी हे सगळं पण विभा खूप चांगली मुलगी आहे. तुला खरंच समजून घेईल. काकू सांगत होत्या तू लग्नांचा विचार करत आहेस.  

समर - मी आई ला वचन दिल आहे. म्हणून मी मुली बघण्याच्या कार्यक्रमाला तयार झालो आहे. पण मी श्रेया ला विसरू शकत नाही. आज जी पण तिची अवस्था आहे. त्याला मी जबाबदार आहे रे. मी थांबलं पाहिजे होत.

अनिकेत - अनिकेत थांबतो. समरच्या दोन्ही खांद्यांना पकडून त्याला बोलतो. किती अजून स्वतःला दोष देत बसणार आहेस. हे सगळं समर तुझा मुळे नाही झालं. मनातून या सगळ्या गोष्टी काढून दे. स्वतःला आरोप्या सारखं नको वागवूस. बाहेर पड. मी तुला श्रेया ला विसरून जा असं नाही सांगणार पण स्वतः साठी आनंदाने आयुष्य जग रे. श्रेया तुझा आयुष्यात परत नाही येऊ शकत. हे तुला पण माहित आहे. मग तू दुसऱ्या मुलीचा विचार करण काही चुकीचं नाही आहे. आज पहिल्यादा मी तुझ्या चेहऱ्यावर आनंद पाहिला. कोणीतरी आहे जे तुला हसवू शकत. बर वाटलं मला मित्रा. आयुष्यात खर प्रेम करणार व्यक्ती प्रत्येकाला पाहिजे असत. 

समर - हे सगळं ऐकून अनिकेतला बोलतो. तुला काय वाटत मी काही प्रयन्त केले नाहीत. पण मला नाही जमत रे श्रेया शिवाय जगायला. तिचं माझा आयुष्यातील सगळ्या गोष्टीवर हक्क होता रे. पण नशिबाने धोका दिला. 

अनिकेत - सगळंच आपला मना प्रमाणे नाही होत. तू तुझा आयुष्यात आता पुढे जा. तुझे आई वडील जे विचार तुझा बदल करत आहेत ते काही चुकीचं नाही आहे. सगळं होईल ठीक. इतक्या वर्षात तू श्रेया शिवाय तुझा आयुष्यात कोणाला येऊन दिलस का? पण आता असं करू नकोस रे.

समर - माझा साठी आई ने एक जाधवांची मुलगी पण बघून ठेवली आहे. 

अनिकेत - ओके मग तुला पसंत आहे का?

समर - मी अजून फोटो नाही पाहिला. जेव्हा बघण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा बघेन.

अनिकेत - (हसतो) मग बघून घे काय माहित मुलगी पसंत असेल. अजून कोणी असेल तर तस सांग आम्हाला..

समर - नाटक बंद कर. तस काही नाही. असेल तर आगोदर तुलाच सांगेन. दोघे पण हसतात. आणि रिक्षात बसतात.

विभा नीता काकींना फोन करते. काकी आपल्याला उद्या दवाखाणात जायचं आहे. सकाळी तयार राहा. विभा ची सगळी काम आवरून होतात. ती पुस्तक वाचत बसली असते. तिच्या फोन वर मॅसेज येतो. ती काही बघत नाही. थोड्या वेळेने परत फोन वर मॅसेज वाजतो. मग विभाचं लक्ष जात. कोण मॅसेज करतोय. हा कोणाचा नंबर आहे.

समर - हाय विभा

           मी समर आणि गुड नाईट च पीक पाठवलं असत.

विभा - अरे हा समर चा नंबर आपण तर सेव्ह केलाच नाही. ती नंबर सेव्ह करते. ती पण गुड नाईट पीक सेंड करते.

समर - समर ऑनलाईन असतो. तो तिला विचारतो. काय करतेस विभा

विभा - पुस्तक वाचत होती. तू बोल.

समर - आता जेवून झालं आहे. बिल्डिंग खाली चालायला आलो आहे.

विभा - ओके. 

आता काय बोलायचं हे सुचत नव्हतं. थोडा वेळ दोघे पण शांत. समोरून समरचा मॅसेज येतो.

समर - मग पिकनिक ला येणार आहेस ना.

विभा - अजून ठरवलं नाही. सांगेन तुला.

समर - एक विचारच होत तुला विचारू का?

विभा - विचार ना ( आता हा काय विचारणार आहे)

समर - तूझं लग्न ठरलं आहे का?

विभा - काय बोलू मी आता? याला कळलं का सगळं. पण सकाळी तर नव्हतं माहित. मी दुसरं काही तरी बोलते. पिकनिक ला तुझी बहीण पण येणार आहे का ? 

समर - तिला नाही विचारलं. राघवी आली कि तू पण येशील का? हुशार वकील आहेस विषय चांगला बदलतेस. ठीक आहे जेव्हा तुला बरोबर वाटेल तेव्हा बोल. मी फक्त मित्र म्हणून विचारात आहे. म्हणजे माझं पण लग्न ठरत आहे ना. तर मग मी काय बोलू त्या मुलीशी जेव्हा ती भेटेल तेव्हा.

विभा - असं आहे का? मला वाटलं. भेटू तेव्हा तुला सांगेन.

समर - तुला काय वाटलं आणि स्माईली पाठवतो. मग भेटणार कधी 

विभा - उद्या सकाळी दिनकर गार्डन ला सात वाजता भेट मी चालायला जाते.

समर - ठीक आहे. बाय

विभा - बाय

आजची रात्र समर साठी वेगळी होती. पण हा होणारा बदल समर ला कळत नव्हता. पण त्याच्या मनाला शांत वाटत. समर विभा चा व्हॉटस ऑप वरील फोटो बघत असतो.

समर सकाळी उठतो. फूड खाऊन घेतो. आणि चालायला जात असतो.

सुनीता - या थंडीत सकाळी सकाळी कुठे जातोस.

समर - आई चालायला जात आहे.

सुनीता - काय चालायची गरज आहे. बारीक तर आहेस. थोडं अजून खात जा. अंगाला लागेल तरी.

दशरथ - सुनीता जाऊदे त्याला. फिटनेस साठी हे सगळं करावं लागत ग. 

समर - हे ऐकून हसतो,  बाय बाबा.

सुनीता - तुम्हाला काही समर मध्ये बदल जाणवतो का ओ .

दशरथ - तरी म्हटलं आमच्या सीआयडी स्पेशल अजून शांत कश्या काय? पेपर मधील कोड सोडवताना. 

सुनीता - मुलं आता मोठी झाली आहेत. आता तुमचं हे असच चालणार आहे. 

दशरथ - हे बघ तुला तो खुश पाहिजे. आता तो कोणामुळे खुश आहे ते आपल्याला माहित नाही. वेळ आली कि कळेल.

विभा गार्डन मध्ये आगोदरच पोचली असते. ती गार्डन मध्ये चालायला सुरवात पण करते. समर भेटायला येईल का? असा विचार करत असते. काल बोलणं झालं. समोरून गेट मधून समर आत येताना दिसला. विभाला खूप आनंद होतो.

समर - गुड मॉर्निग विभा

विभा - गुड मॉर्निग

समर - तू रोज येतेस इथे चालायला

विभा - हो मुंबई ला आली कि येते. मला सकाळी चालायची सवय आहे.

समर - चांगली सवय आहे. 

विभा - तू पण रोज येतोस का?

समर - नाही ग आज च आलो आहे.

विभा - का ?

समर - काल रात्रीच डॉक्टरांनी मॅसेंज करून गार्डन ला जायाला सांगितलं. शरीराला कोवळं ऊन गरजेचं असत. 

विभा - काय तू पण ना.. आणि विभा हसते

समर - तू किती गोड दिसतेस हसताना

विभा - हे ऐकून ती अजून लाजते. 

समर - तुला जे मी काल विचारलं तू उत्तर नाही दिल.

विभा - थोडी काम आहेत रे 

समर - थोडा वेळ काढ ना. परत थोडी तू लवकर मुंबईला येणार आहेस.

विभा - चालताना थांबते आणि समरच्या डोळ्यात बघत असते. तिला त्याच्या डोळ्यात निरागर भाव दिसत असतात. ती समर ला नाही बोलू शकत नाही. ठीक आहे येते मी.

समर - मी राघवीला ला पण बरोबर घेतो तुला बर वाटेल.

विभा - चल मी निघते आता.

समर - भेटल्यावर नेहमी निघायची तुझी घाई असते.

विभा - हसत बोलते परत भेटेन ना. बाय

विभा गार्डन मधून निघून जाते. समर एकटाच चालत असतो. समरच्या मनात विभा बदल विचार येत असतात. विभा माझा बरोबर थोडा वेळ होती. तिझी सोबत किती छान वाटली. काही जणांना थोडा वेळ पण खूप असतो समजून घेऊन आपलंस करायला. तर काही जणांना पूर्ण आयुष्य दिल तरी आपण कसे आहोत हे समजत नाही. हे काय होत आहे. समर हे बरोबर नाही आहे. विभा फक्त एक चांगली मैत्रीण आहे. हे सगळे विचार थांबावं आता. विभा बदल विचार करताना माझं असं का होत आहे. तरी तिला मी जास्त ओळखत नाही. श्रेया ची माझा मनातील जागा कोणी घेऊ शकत नाही. तरी विभाची सोबत हवी असं वाटत आहे. हे माझे वेडे विचार आहेत सोड.

समर अभयला कॉल करतो. अभय अरे अजून दोन सीट बघ.

अभय - कोण येत आहे.

समर - मी राघवीला आणि विभा अनिकेत ची बहीण त्यांना पण बरोबर घेत आहे .

अभय - ठीक आहे. मी गीता शी बोलतो. वेळेवर पोचा पण सगळे.  

आत्या विभाला फोन करते. 

आत्या - विभा अनिकेत बोलला. तू पण पिकनिक ला जात आहेस.

विभा - हो आत्या

आत्या - तू आताच इथे निघून ये. मी प्रवासात खाण्याचे सगळे डबे तयार करून ठेवते. आणि तू अनिकेत बरोबरच निघ. तुम्ही दोघे बरोबरच रहा.

विभा - आत्या मी लहान आहे का ग.

आत्या - तुम्ही पोर किती जरी मोठी झालात तरी आम्हाला लहानच राहणार आहात. 

विभा - ठीक आहे. आता मी नीता काकींना दवाखाणात घेऊन जातं आहे. मग दुपारी मी बॅग घेऊन घरी येते.   

समर घरी जातो. आई राघवी कुठं आहे.

सुनीता - तिचा रूममध्ये असेल. का काय झालं?

समर - मी राघवीला ला पण पिकनिक ला घेऊन जात आहे

सुनीता - हे कधी ठरलं तुमचं. राघवी काही बोलली नाही. ती तुमच्या बरोबर येऊन काय करेल?

समर - अग अनिकेत ची बहीण पण येत आहे. राघवी बरोबर असेल तर तिला पण बर वाटेल

सुनीता - आता अनिकेतच्या बहिणी साठी तू राघवीला घेऊन जाणार काय चालू आहे या समरच....

समर राघवीला सांगायला जातो. हे ऐकून राघवी पण खुश होते. हो मी पण येते तुझा बरोबर. कधी निघायचं आहे. माझी अजून काहीच तयारी झाली नाही.  दादा काय घेऊ बरोबर आपण कुठे कुठे जाणार आहोत. 

समर - तू गीता ला कॉल कर आणि बोल मी ऑफिस ला जात आहे.

राघवी - धावत येते आणि समर ला मिठी मारते. किती छान आहेस तू मी खरंच घरी राहून कंटाळली होती. आता थोडा बदल. तू खूप मस्त आहेस.

समर - आता कळलं तुला आणि दोघे हि हसतात. राघवी तयारी कर लवकर हा. समर निघत असताना बोलतो उशीर नको करुस.

राघवी - आय लव्ह यु दादा नाही करणार उशीर. आई दादा बदलत आहे ना. काही तरी जादू झाली वाटत.

सुनीता - चला कामाला लागा. कामे जादूने नाही होणार आहेत. चल

समर गीता अनिकेत ऑफिस ला भेटतात. आज रात्री निघण्याच त्याच ठरलं असत. सगळी जण दोन दिवस फिरायला लगतपुरी ला जात असतात.   

समर - गीता तिकीट च झालं ना फायनल.

गीता - हो झालं आहे. अमोल आणि राणी दोघे नाही येत आहेत. त्यांचं आपल्या बरोबर येणं रद्द झालं. त्या तिकीट राघवी आणि विभाला होतील. तस हि आता कुठे तिकीट मिळाली नसती रे. आज रात्री अकरा वाजता. सगळ्यांनी दादर स्टेशनला वेळेवर भेटा. मी बाकीच्यांना पण सांगते. 

अनिकेत - किती काळजी करशील गीतू माझी मी वेळेवरच येणारं ग. तुला सोडून कुठे जाणार.

गीता - मी तुझी वाट नाही रे बघणार. पण हा गाडी नक्की तुला सोडून जाणार. जर उशीर केलास तर... मी निघते लवकर बाय.

अनिकेत - थांब गीता मी तुला सोडतो. बाय समर.

समर - विभा ला मॅसेज करतो. यु आर रेडी फॉर पिकनिक.... मी वाट बघतोय. अनिकेत बरोबर वेळेवर ये.  

विभा - समरचा मॅसेज बघते. हो बोलते. 

दादर स्टेशन ला सगळे पोचले असतात. गीता, अभय, रोहित.... अजून पण बाकीचे आले नसतात. 

गीता - हाय अभय,  हाय रोहित तुम्ही दोघे बरोबर आलात का.

अभय - हो ग. बाकीचे कुठे आहेत. त्यांना वेळ सांगितलीस ना बरोबर

गीता - मग काय. थांब मी कॉल करते. हॅलो समर कुठे आहात. दादर ला आम्ही पोचलो. 

समर - ऑन दि वे आहोत. पाच मिनिटात पोचतो.

गीता - समर पाच मिनिटात पोचतोय. 

अभय - अनिकेत आणि त्याची बहीण

गीता - अरे हा त्याला पण विचारते. हा अनिकेत पण ना नेहमी उशीर करतो. 

अभय - तू सांगायचं ना त्याला तुझ ऐकतोय ना.

गीता - हॅलो अनिकेत कुठे आहेस. परत उशीर अरे सगळे आलो आम्ही दादर ला

अनिकेत - गीतू पोचतो ग लवकर थोडी ट्राफिक आहे.

गीता - आता कुठे पोचलात.

अनिकेत - अर्धा तासात पोचू ग .

समर आणि राघवी स्टेशन वर पोचतात.

रोहित - हाय समर कसा आहेस. खूप दिवसांनी भेटत आहोत.

समर - तू कसा आहेस रोहित. मी ठीक आहे. समरची नजर विभाला शोधत असते. 

गीता - कशी आहेस राघवी. छान टॉप आहे.

राघवी - थँक यु गीता ताई.

गीता - हे एवढ सामान काय घेतलं आहे.

राघवी - आई ने खाल्याला दिल आहे.

समर - गीता अनिकेत आला नाही अजून कुठे आहे.

अभय - अरे गीता ने कॉल केलेला. पोचतील आता. 

तेवढ्यात स्टेशन ला राजधानी टर्मिनल ट्रेन येते. रोहित अरे ट्रेन आली आहे. चला आपण आपल्या जागा बघू या. समर विचार करत असतो. विभा अजून पण पोचली नाही. कॉल करू का तिला. अरे दादा चल सामान ठेऊ या ट्रेन मध्ये. मग सगळी जण ट्रेन मध्ये जाऊन आपली जागा ठरवतात. 

गीता - अनिकेत फोन नाही उचलत आहे. 

रोहित - अजून थोडा वेळ आहे. डोन्ट वरी येतील ते.

सगळे एकमेकांशी बोलत असतात. अभय खाली उतरून पाण्याची बाटली बघत असतो.  

समर खिडकी जवळ जाऊन बसतो. आणि आपला मोबाईल वर गाणी ऐकण्या साठी इयर फोन लावतो. आणि शांत पणे डोळे बंद करतो.

पेयसॉन्ग मधून श्रेया ची कविता ऐकू येते. श्रेया ला कविता लिहायची आवड होती. त्यावेळी समर तिच्या कविता रेकॉड करून घेत असे. आणि आज तीच कविता ऐकू येऊ लागली.

समर - श्रेया बोल ना.

श्रेया - सोड ना समर. मला नाही जमणार

समर - अरे बोल ना. किती छान कविता लिहतेस. आज तुझा आवाजात बोल पण मला रेकॉड करून घेण्याचं आहे.

श्रेया - पण हे सगळं कश्याला. मी नोट बुक मध्ये लिहून ठेवलं आहे ना.

समर - हे मला ऐकायला पाहिजे.

श्रेया - मी तुजा सोबतच राहणार आहे.

समर - हो ग बोल ना. तुजा आवाज फार आवडतो मला. ठीक आहे डोळे बंद कर आणि बोल. 

श्रेया समर चा हात पकडते आणि बोलू लागते.

पाऊल

"तुझा सोबत एक एक पाऊल 

पुढे टाकताना साथ मिळू दे

तुझी संजणा......

वाटेत थांबुनी जेव्हा पण मी

मागे वळून पाहीन संजणा.....

बागेतील सोनचाफा च्या पाकळ्या मध्ये

तुझ्या सोबत माझ्या पाऊल खुणा

रुतलेल्या मनास दिसतील रांजसा..... "

हे ऐकून समर डोळे उघडतो. तो कानातील एयर फोन काढून बाजूला ठेवतो. मन त्याच फार बैचेन होत. तेवढ्यात ट्रेन मध्ये तिकीट बघायला येतात. गीता तिकीट दाखवते. या दोन तिकीट कोणच्या आहेत. अजून कोण येणार बाकी आहे का? त्यांना लवकर येणास सांगा. ट्रेनची निघायची वेळ झाली आहे. 

रोहित - हो अजून आमचे दोन मित्र आहेत. येतील आताच.

गीता - हा अनिकेत पण ना येन वेळेला अडचणी निर्माण करतो. तरी त्याला बोलली होती वेळेवर ये.

समर - अनिकेत ला फोन करतो. तो काही उचलत नाही.

गीता - अरे मी पण किती वेळा करत होती फोन नाही उचलत आहे.

समर - विभा च्या नंबर वर फोन करतो. रिंग होत असते पण कोणी उचल नाही. समरला विभा बदल काळजी वाटू लागते. काय प्रॉब्लेम झाला असेल. फोन का उचलत नाही. समर परत विभाला कॉल करतो. तरी ती कॉल उचलत नाही.

आता तर ट्रेन चा भोंगा वागतो. अभय ट्रेन च्या दाराशी येऊन बघत असतो. त्याला समोरून अनिकेत आणि विभा पळत येताना दिसतात.

अभय - अरे अनिकेत लवकर ये. ट्रेन सुटते. समर लवकर ये याच सामान आपण घेऊ या. समर ट्रेन मधून खाली उतरतो.

ट्रेन हळू हळू सुटायला सुरवात होते. स्टेशन वर जास्त गर्दी नसते. समर अनिकेत पासून एक एक बॅग घेत असतो.

अनिकेत विभा ची पण बॅग घेतो. 

अभय - अरे चला आता ट्रेन मध्ये चढा लवकर. अभय अनिकेला हात देतो आणि ट्रेन मध्ये घेतो.

समर पण ट्रेन मध्ये पटकन चढतो. विभा फक्त राहते. समर तिला बोलतो - विभा लवकर ये हे हॅण्डल पकड. विभाला भीती वाटत असते. समर च्या मनाची बैचेनी अजून वाढत जाते. काय करू. 

समर विभाला आपला हात पुढे करतो. विभा घाबरू नकोस विश्वास ठेव माझ्यावर काही नाही होणार तुला माझा हात पकड ये लवकर....

विभा समर चा हात पकडते. समर तिला जवळ ओढुन घेतो. विभा घाबरून समर च्या मिठीत जाते आणि त्याला घट्ट पकडते. 

गीता, अभय, अनिकेत, रोहित, राघवी हे सगळे दोघांकडे बघत असतात. हे समर चा लक्षात येत. तो विभा ला दूर करत. ठीक आहेस ना विभा असं विचारतो. विभा पण भानावर येते. तिला पण लाज वाटते. हो ठीक आहे.

समर - काय बघत आहात. फक्त मित्र आहोत. चला आता....

सगळे हसत डब्यात जातात. 

समर ला त्याच्या मनात काय चालू आहे हे कळेल का? विभा समर ला आपली खरी ओळख सांगेल का? काय होईल हे पुढे बघू या.....   

🎭 Series Post

View all