Nov 30, 2021
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग तीन

Read Later
प्रेमाचे रंग - भाग तीन

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..

नमस्कार मित्रांनो,

अनिकेत आणि विभा चालत - चालत बिल्डिंग जवळ पोचतात. विभा फालुदा खाऊ या का? चल ना....

विभा - तू काही बदलणारं नाहीस. भैया मुझे रोझ फेव्हर फालुदा देना | अनिकेत तुला कोणतं ?        

अनिकेत - मला कोणता पण फालुदा चालेल पण चॉकलेट आईक्रीम बरोबर.

विभा - काय आवड आहे.

अनिकेत - कधी तरी वेगळी टेस्ट पण घेत जा वकील बाई..... ऎक तुला एक ड्रेस घेण्याचा आहे. उद्या दुपारी भेटशील का ?

विभा - मला ड्रेस काही खास. माझा बर्थडे तर नाही आहे. मग हे सगळं कशाला अनिकेत राव....

अनिकेत - तुझ्या भाऊबीज च गिफ्ट राहील होत. ते देत आहे. किती सुनावलं होतास तेव्हा. त्या वेळी काही ऑनलाईन नाही पाठवू शकलो. फुगून बसली होतीस बेडका वाणी. 

विभा - मी बेडूक 

अनिकेत - हे घे फालुदा शांत हो. मस्त आहे.

विभा - चांगला आहे.

अनिकेत - उद्या भेट मग... मी कॉल करेन तुला. बाय

विभा - ठीक आहे. बाय

विभा घरी जाते. बाबाचा फोन येत असतो.

बाबा - हॅलो बेटा, कॉल उचला नाहीस. कुठे आहेस.

विभा - बाबा मी आताच घरी आली. अनिकेत ने घरी सोडलं आता. आज आत्या कडे गेली होती. तुम्ही कसे आहात. 

बाबा - मी ठीक आहे बेटा तुला ऐक सांगायचं होत.

विभा - बोलाना बाबा.

बाबा- अगं शनिवार चा जो बघण्याचा कार्यक्रम होणार होता. तो थोडा पुढे होणार आहे.

विभा - "हे ऐकून विभा डायरेक्ट विचारते" का काय झालं ? नंतर भानावर येते, म्हणजे मला असं विचारायचं आहे. अच्छा असं काय झालं. माझी दुसरी पण काम आहेत ना किती थांबणार मी. 

बाबा- थोडा वेळ अजून थांब. तुझा त्या सुनीता काकू आहेत ना त्यांचा फोन आलेला. त्यांनी सांगितलं लवकर तारीख पण कळवू असं पण बोलल्या. तुझा आत्याला पण फोन करून सांगतो आता.  

विभा - ठीक आहे बाबा. 

विभा नाराज होऊन फोन ठेवते. काय झालं असेल. कार्यक्रमच रद्द केला. समर ला आपण आवडलो नसू का? त्याला पण तर माझा फोटो दाखवला असेल. माहिती दिली असेल. सोड जाऊदे चल विभा झोपूया स्वतः शीच बोलते. नको ते विचार नको करत बसू यार... 

दशरथ - सुनीता चहा दे. उशीर होत आहे. लवकर बँकेचे काम करून घेतो. आज शेवटची तारीख आहे.

सुनीता- शिरा आणि चहा घेऊन येतात. 

दशरथ - काय झालं सकाळ सकाळ तुझा चेहरा का पडला आहे. बर नाही वाटत आहे का?  

सुनीता - काही नाही ओ. मी ठीक आहे.

दशरथ - मग नाराज का दिसतेस. 

सुनीता - काल त्या जाधवांना फोन करून सांगितलं कि शनिवारचा कार्यक्रम पुढे करू म्हणून. येवढ सगळं जुळूवुन आणलं. आता या मुलांची नाटकं बघत बसा.

दशरथ- समर नाही म्हणाला का? 

सुनीता - ते जरी बोलला असताना तरी चाललं असत मला मी दुसरी मुलगी बघितली असती. याने अजून जाधवच्या मुलीचा फोटो तरी कुठे पहिला आहे. आई तुला मी शब्द दिला आहे. तुला पसंत आहे ना मुलगी मग मला काही प्रॉब्लेम नाही. जस मला संसार करायचा आहे. हि आताची पिढी. डोक्याला त्रास काय कमी आहे. याच कधी लग्न करू. मग राघवी पण तर आहे. तिच्या साठी पण मुलगा बघावा लागेल. 

दशरथ - होईल ग सगळं नीट. देवाने आगोदरच सगळ्या गोष्टी ठरवल्या असतात.

समर- बाबा कोणत्या गोष्टी ठरवत आहात.

दशरथ - तुझी आई आणि मी जाधवांच्या मुली बदल बोलत होतो. चांगली मुलगी आहे. तिच्या वडिलांना मी ओळखतो. तू एकदा फोटो तरी बघून घे. तुला पसंत आहे का.

समर - कार्यक्रम आता पुढे गेला आहे. मी फिरायला जातोय म्हणून परत आल्यावर आई परत तारीख ठरवेलच ना. मग तेव्हा समोरच बघून घेईन. आणि तस हि होकारच देयाचा आहे. नकार देयाला काही कारण माझा कडे तरी नाही आहे. आणि विषय बदलतो ते बॅंकचे पेपर द्या मला मी आज दुपारी हे काम करतो. माझा ऑफिस जवळच हि मेन शाखा आहे. आणि उठून निघून जातो.

सुनीता- समर शिरा तरी खाऊन जा. 

समर - तू डब्यात दे. उशीर होत आहे. मी निघतो.

समर ऑफिस ला पोचतो. समोर टेबल वर अनिकेत काम करत बसला असतो. समर विचार करतो याला कालच विचारू या का? तू त्या मुलीला कस ओळखतॊस. काय करू.

अनिकेत - हाय समर शुभ प्रभात काय झालं असं का बघतोस'

समर- शुभ प्रभात काही नाही रे' असच 

अनिकेत - चेहऱ्याला काही लागलाय का माझा

समर - कॉम्पुटर चालू करतो. आणि कामाला सुरवात करतो. काही लागलं नाही.

अनिकेत - म्हणजे तुला माहित पडलं वाटत सगळं. तू फोटो बघितास का . 

समर - फोटो आता तू पण, तुला कोणी सांगितलं फोटो बदल आज सगळे फोटोच्या मागेच लागले आहेत. हे सगळं तुला आई ने सांगितलं असेल ना. तस हि बघण्याचा कार्यक्रम रद्द झाला आहे.  

अनिकेत - मला कोणी सांगितलं म्हणजे. का रद्द केलात. तू अजून त्या मुलीचा फोटो पण पहिला नाहीस समर.

समर - आपण फिरायला जात आहोत ना. माझं जाऊदे. तू तुझं सांग काल रात्री मी तुला एका मुली बरोबर फिरताना पाहिलं. आमची पण नजर असते. 

अनिकेत - हो होतो बाहेर. तू ओळखतॊस का त्या मुलीला.

समर - ओळखतो पण नाव नाही माहित मला. त्या रात्री ज्या मुलीला आणि बाईला हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलो होतो ती तीच मुलगी होती.

अनिकेत - हॉस्पिटल कशाला.

शिपाई - समर साहेब तुम्हाला गुप्ता सर नि केबिन मध्ये बोलावलं आहे. 

समर - आलो मी. आणि समर विषय तसाच ठेऊन निघून जातो.

अनिकेत - समर खरंच श्रेया ला विसरला असेल का. आपण विभाला हे सगळं सांगू या का? आज दुपारी भेटणार आहे ना बोलू या तिज्याशी आणि कामाला सुरवात करतो.

दुपारी जेऊन झाल्यावर अनिकेत विभाला कॉल करून ऑफिस जवळील मार्केट मध्ये बोलवतो. विभा मार्केटला भेटते. 

अनिकेत - चल आपण या दुकानात जाऊ या. इथे छान ड्रेस मिळतात. खूप सारे कपडे बघतात. त्या मध्ये विभाला एक ड्रेस आवडतो. तो ती घेते.  चला वकील बाई आता आपण निघू या. मी ऑफिसला जात आहे. तुला घरी सोडू का?

विभा - नको माझं बँकेचं काम आहे. ते कि करते नाही मग घरी जाणार आहे. 

अनिकेत - विभा तुझ्याशी एका टॉपिक वर बोलायचं होत.

विभा - बोल ना. तेवढ्यात समर अनिकेत ला आणि विभाला बघतो. समोरून त्यांच्या जवळ चालत येतो. 

समर - हाय अनिकेत तू इथे विभा कडे बघून पण हाय बोलतो. 

अनिकेत - अरे हो हिचा साठी ड्रेस घेण्याचा होता म्हणून इथे आलो होतो. हि माझी बहीण विभा

समर - अनिकेत ची बहीण आहे हि. हे ऐकून त्याला थोडं बार वाटत. हाय विभा आणि हात मिळवतो. विभा पण हात मिळवते. दोघे हि एकमेकांकडे हसत बघत असतात. समर ला विभाला भेटून फ्रेश वाटत असत.  

अनिकेत - हे काय चालू आहे. यांनी विभाला ओळखलं नाही वाटतं. समर मी निघतोय तू पण येतोस का?

समर - समरच लक्षात येत. तो विभाचा हात सोडतो. मला बँकेत जरा काम आहे. ते करून मग ऑफिस ला येतो. बाय

अनिकेत - विभाचं पण बँकेत काम आहे तिला पण बरोबर घेऊन झा.

विभा - अनिकेत कडे रागाने बघते. काय करतो हा | नको मी जाईन बँकेमध्ये

अनिकेत - मी निघतो. 

समर - अरे मी सोडतो तुला माझं पण काम बँकेतच आहे. चल ना. खूप गरम होत आहे ना.

विभा - हो दुपारचं खूपच ऊन असत.

समर - इथे जवळच ज्युस सेन्टर आहे. आपण ज्युस पिऊया का? खूप छान मिळत. समर ला विभा बरोबर अजून थोडा वेळ घालावयाची असते.     

विभा - काय माणूस आहे हा. बघण्याच्या कार्यक्रमाला मला नाही बोलतो. आणि आता ज्युस साठी विचारात आहे. (असेल काही कारण) हो ठीक आहे.

ज्युस सेन्टर ला समर  आणि विभा दोघे हि जाऊन बसतात. 

समर - तू अनिकेत ची बहीण आहेस. 

विभा - हो, अनिकेत माझा आत्या चा मुलगा आहे.

समर - मग तू राहायला कुठे असते. तू बोललीस कि इथे नवीन आहेस.

विभा - मी पुणे ला राहते. इथे एका कामासाठी आली होती. यांनी मला ओळखलं नाही वाटत. हा नॉर्मल बोलत आहे. 

समर - हि पण पुणे ची. मनात बोलतो सगळे पुणे ची लोक आयुष्यात येत आहेत. आणि थोडासा हसतो.

विभा - काय झालं हसत का आहात. 

समर - काही नाही ग. आणि तू मला नावाने हाक मारू शकते. आपण ज्युस ऑर्डर करू या. इथे मोसंबी ज्युस चांगलं आहे. चालेल तुला. 

विभा - ओके. 

समर - तुझा घरी कोण कोण असत. 

विभा- मी आणि बाबा आहोत. माझी आई मी लहान असतानाच वारली.

समर - माफ कर. मी फक्त माहिती म्हणून विचारलं. तू जॉब करतेस का?

विभा - हो मी कोर्टात वकील आहे. अजून तरी स्वतःच काही सुरु केलं नाही. ऐका फर्म मध्ये काम करते. तू अनिकेत च्या ऑफिस मध्ये आहेस ना. सुनीता काकी आणि काका कसे आहेत. 

समर - हो एकाच ऑफिस मध्ये आहोत. खूप साऱ्या केसेस सोडवल्या अशील ना छान. तू आई बाबा ना ओळखतेस का? अनिकेतने कडून ऐकलं असणार. विभा अजून किती दिवस आहेस इथे.

विभा - अजून काही पक्क नाही. काम झालं कि जाणार आहे.

समर - तू अनिकेत बरोबर माझा घरी जेवायला ये. माझा आईशी आणि बहिणीशी तुझी ओळख करून देतो. त्या बाई कश्या आहेत. ज्यांना तू हॉस्पिटल मध्ये घेऊन गेलेलीस.

विभा - नीता काकी ठीक आहेत. हो नक्की. चल बँकेत जाऊया. उशीर होत आहे.

समर - हो चल.

दोघे हि बँकेत जातात. दोघे हि काम करून बँकेतून बाहेर पडतात.

विभा - चल बाय समर

समर - विभा थांब ना. अजून एक विचारच आहे.

विभा - मनातील धडधड वाढते. काय झालं समर काय बोलायचं आहे.

समर - चुकूच नको समजूस. पण या शनिवारी आम्हचा ग्रुप बाहेर फिरायला जाणार आहोत. तर तू पण येशील का? बर वाटेल मला.

विभा - समर कडे बघतच राहते. तिला याची अपेक्षा नव्हती. 

समर -  अगं अनिकेत पण आहे. आपण एकमेकांना ओळखत नाही. माहित आहे मला पण तरी तुला हे विचारावंस वाटलं. विचार करुं सांग. आणि तुझा फोन नंबर पण दे. काही मदत लागली तुला तर मी करेन.

विभा - मनांतल्या मनात हसत असते. कार्यक्रम रद्द केला आणि डायरेक्ट फिरायला बोलावत आहे. यांनी आपल्याला ओळखलं नाही वाटत. थोडी याची पण फिरकी घेऊ या. कसा आहे हा. 

समर - काय विचार करतेस. नसेल देण्याचा नंबर तर नको देऊन चालेल.

विभा - तसं नाही रे देते नंबर.

समर - त्या नंबर वर समर तिला कॉल करतो. हा माझा नंबर सेव्ह करून ठेव. आज पासून आपण पण मित्र असं बोलून हात मिळवतो. विभा पण हात भेटवते. बाय समर निघते मी उशीर होत आहे.   

समर - मग तू पिकनिकला येणार ना हसत विचारतो.

विभा - बघू सांगते मी.

समर - मी कॉल करेन तुला. बाय.

 

 

विभा आणि समर याची मैत्री तर झाली. पण अजून पण समर ला विभा बदल खर माहित नसत. पण विभा मनात काहीतरी वेगळंच शिजत असत. हे आपण पुढे बघू.....                

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now