प्रेमाचे रंग - भाग दोन

Love' and the way we express it, changes at every stage of life.

नमस्कार मित्रांनो,

सकाळी कोवळे ऊन रूमच्या खिडकितून आत येते. सात चा अलार्म वाजतो आणि विभाला जाग येते. विभा उठते आणि खिडकीतून बिल्डिंग खाली बघत असते. वातावरणात थोडा गारवा असतो. सूर्याच्या किरणांनी शरीलाला थोडी ऊब लागत असते. विभाला हे वातावरण फार छान वाटत असत.

विभा फ्रेश होऊन येते. किचन मध्ये चहा करायला ठेवते. नीता काकींना जाग येते. अजून पण डोक्याची जखम दुखत असते. विभा त्यांना थोडा वेळ अजून झोपा बर वाटेल तुम्हांला असं बोलते. पण नीता काकी काही ऐकत नाहीत. विभा त्यांना पण गरम चहा आणून देते. 

विभा - आता बर वाटत आहे ना तुम्हांला..

नीता - हो थोडा त्रास होतं आहे. पण गोळ्यानी अंग दुखायच थांबलं आहे. ताईसाहेब आता मी ठीक आहे. 

विभा- काकी तुम्ही का नवऱ्याचा मार सहन करत आहात. पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार करा. तुम्ही स्वतः काम करत आहात. दुसऱ्यावर अवलंबून पण नाही. मग हा त्रास का सहन करत आहात.

नीता- ताई साहेब तुम्ही बरोबर बोलत आहात. पण माझा नवरा आहे तो मी असं नाही वागू शकत त्याच्या बरोबर त्याला त्रास होईल.

विभा - हा विचार तुमचा नवरा करतोय का तुमच्याबद्दल. रात्र भर तुम्ही माझा कडे आहात. त्यांनी तुम्हाला कुठे आहात हे विचारायला कॉल तरी केला का ओ. अशा माणसा बरोबर का संसार करताय. त्याला तुमची साधी माणूस म्हणून पण काळजी नाही आहे.

नीता - कसा जरी असला तरी तो माझा नवरा आहे. देवा ब्राम्हणाच्या साक्षीने लगीन केलं आहे.

विभा - काकी कोणत्या जगात आहात तुम्ही. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो त्याच्या पेक्षा स्वतःवर होणारा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. त्या माणसाचं तुमच्यावर प्रेम नाही आहे. तुम्ही घाबरू नका मी तुम्हाच्या नवऱ्याला शिक्षा देईन. कस मारलं आहे त्यांनी तुम्हाला एखाद्या जनावरा सारखं काही वाईट झालं असत तर. तुमची काळजी कोणी घेतली असती. किती अशक्त पणा आला आहे तुम्हांला. कस हे सगळं सहन करता नेहमी आणि का? 

मला बाबा सांगत होते. तुम्हाला मुलं होत नाही. म्हणून हा असाच एकसारखा त्रास दिला जातो. तुमच्या घरच्यांनी या मध्ये पडायच बघितलं तर त्या लोकांना पण शिव्या देऊन घरातून बाहेर काढलं. एक माणूस म्हणून तुमच्याशी हे अस वागणं बरोबर नाही काकी. खूप साऱ्या अडचणी आयुष्यामध्ये असतात. पण नवरा असा नसतो. कोणती पण गोष्ट असू दे तो ते सगळं समजून घेऊन आयुष्यात शेवट पर्यन्त साथ देतो. दूर नाही करत. ते खर नातं.        

नीता - ताई तुम्ही नका या सगळ्या मध्ये पडू. तुम्ही माझी जी मदत केली त्या बदल मी आभारी आहे. हे माझाच आयुष्याचे गोते आहेत. जे मलाच सहन करावे लागतील. माझा माणूस फार वाईट आहे. मला घरातून बाहेर हकलून देईल. मग मी कुठे जाणार. माझ माहेर च दार भी माझा साठी आता बंद झालं आहे. तुम्ही मला मदत करत आहात हे जर त्याला कळलं तर तो तुम्हाला पण त्रास देईल. तुम्ही इथे दोन आठवड्यासाठी राहायला आल्या आहात. नका या मध्ये पडू हात जोडते पाहिजे तर पाया पडते.

विभा- नीता काकींना असं दुबळं बघून विभाला त्यांची दया येते. ती काहीच बोलत नाही.

नीता - मी पोहे बनवते.  

दारावरची बेल वाजले . विभा दार उघडते. समोर अनिकेत उभा असतो. 

अनिकेत - कश्या आहात वकील बाई.

विभा- मी ठीक आहे. तू आज डायरेक्ट इथे आत्या कुठे आहे ती नाही आली. काकी अनिकेत साठी पण पोहे बनवा.

नीता - होय ताई..   

अनिकेत - आईला वेळ नव्हता. आज ती बाहेर जमिनीच्या कामासाठी गेली आहे. तिने तुला जेवायला आणि राहायला घरी बोलावलं आहे. तू इथे एकटीच का राहत असतेस.

विभा - मी माझा कामासाठी आले आहे. आणि मला इथे राहायला आवडत. आईच्या बराच आठवणी या घरात आहेत. बर वाटत मला इथे. आता आई माझा आणि बाबाच्या आयुष्यात नाही आहे. पण इथे आई जवळ असल्या सारखं जाणवत.तू बोल.

विभा हि तीच मुलगी आहे जी समर च्या आईने सुनीता बाईने समर साठी पसंत केली असते. विभा जाधव हि मोहन जाधव याची एकुलती एक मुलगी. विभाची आई विभा दहावी ला असताना एका अपघातात मरण पावते. 

अनिकेत - विभा या शनिवारी तुझा काय प्लॅन आहे. तू फ्री आहेस का ? फिरायला येशील का? आमचा कॉलेज चा ग्रुप फिरायला चालला आहे. ऑफिस मधील पण काही मित्र आहेत. 

विभा - नाही जमणार रे. शनिवारी एक मीटिंग आहे. तुमच्या ग्रुप मध्ये मी कोणाला ओळखत नाही. तू जा खूप मजा कर. आत्या किती वाजता घरी येणार आहे. 

नीता - ताई मी नास्ता बनवला आहे तुमच्या दोघा साठी मी घरी जाते आता.

विभा- ठीक आहे. सावकास जा. मेडिसिन वेळेवर घे. काही गरज लागली तर मला कॉल कर. परवा आपण परत डोक्याची पट्टी बदलायला जाऊ या.

नीता - येते. येते अनिकेत भाऊ.

अनिकेत - काकी काय लागलं तुम्हाला.

विभा- मी सांगते तुला. तुम्ही जावा काकी आराम करा.

समर ऑफिस मध्ये त्याच्या नवीन प्रोजेक्ट वर काम करत असतो. नेहमी प्रमाणे बॉस ने एक नवीन जबाबदारी समर ला दिली असते.  जेवणाची वेळ होते. सगळे जेवायला कँटीन मध्ये भेटतात.

गीता - किती उशीर करतोस समर. लवकर येत जा.

समर - माफ कर. थोडं काम महत्वाचं होत. 

अनिकेत - हॅलो गीतू कशी आहेस. हॅलो समर 

गीता- किती वेळा तुला सांगू अनिकेत माझं नाव गीता आहे मला नाही आवडत गीतू बोललेलं.

अनिकेत - अग प्रेमाने बोलतो ग.

गीता- नको बोलूस प्रेमाने. नको आहे तुझं प्रेम.

समर - चला बस करा. जेवला सुरवात करा आता.

अनिकेत कुलकर्णी विभाच्या आत्याचा मुलगा हा समर चा  मित्र असतो. दोघे पण ऑफिस मध्ये एकाच डिपार्टमेंट मध्ये काम करत असतात. 

अनिकेत - शनिवारच बाहेर फिरायला जायचं फायनल आहे ना. तुम्ही सगळे येत आहात ना. अजून कोण कोण येत आहेत.  

समर - हो फायनल आहे. अभय शी बोलून घे. मला नाही माहित.

गीता- सहा सात जण होत आहोत. मी रेल्वेची तिकीट बुक केली आहे. या मध्ये रेल्वे स्टेशन पर्यन्त कोण कोण पोचतात ते बघू. आणि सगळे हसायला लागतात. समर काकूंना सांग कारल्याची भाजी छान केली आहे. मला फार आवडते. 

समर - हो सांगतो आई ला.   

अनिकेत - तू येणार आहेस ना गीतू.

गीता- रागाने डोळे मोठे करून बघते. तुझी तिकिटच रद्द करून टाकते.

अनिकेत - कर तिकीट रद्द. पण जिथे फुल जाणार तिथे फुलपाखरू तर येणारच ना..   

समर- चला मी निघतो माझ जेवण झालं आहे. तुम्ही बसा.

रात्रीचे आठ वाजले असतात.

अनिकेत - अरे मित्रा मी निघतो. अजून किती वेळ थांबणार आहेस.

समर - ठीक आहे जा. सकाळी टीडीएस च ऑनलाईन कर भरता आलं नाही. नेट प्रॉब्लेम होता. हे भरतो आणि मग मी निघणार आहे.

अनिकेत - ओक बाय... लवकर निघ. 

ऑफिस मध्ये अजून पण काही कर्मचारी काम करत असतात.

समरच सगळं काम पूर्ण झालं असत. समर ची निघायची तयारी सुरु होते. कॉम्पुटर मधील सगळे फोल्डर बंद करत असतो. तेव्हा त्याची नजर श्रेया आणि त्याच्या फोटो वर जाते. तो त्या फोल्डर मधील सगळे फोटो बघत असतो. किती छान वेळ होता. श्रेया किती गोड आणि बिनधास होती. तिची ती बडबड ऐकण्यात मला खूप बर वाटत असे. तिला शांत बसायला सांगितलं तर बोलायची आयुष्यभर तुला अशीच माझी बडबड ऐकून घ्यावी लागणार आहे. आज शांत होऊन बसली आहे. काहीच बोलत नाही. ती जशी आहे तशी ती माझीच आहे. तिची मी साथ कधीच नाही सोडणार. समर ला हे सगळं आठवून रडायला येत. 

समर च श्रेया वर जीवापाड प्रेम आहे. तिच्या आठवणी शिवाय त्याचा दिवस पूर्ण होत नसे. समर च्या डोळ्यासमोर श्रेया त्याच्या पासून निसटून जात होती. हे सगळं बघून समर हतबल होऊन जातो. या सगळ्याला तो स्वतःला जबाबदार मानत असतो. हे सगळं माझा मुळेच झालं. त्या दिवशी मी श्रेया ला थांबवलं पाहिजे होत. किंवा तिच्या बरोबर जायला पाहिजे होत. घरून बाहेर जाताना श्रेया नि रडत मारलेली शेवटची मिठी त्याला आठवते. तिचे रडून सुजलेले डोळे आठवतात. त्यांनी तिचा डोक्यावरून हात फिरवून तिला जवळ घेतलेलं आठवत असतं. खूप समजवलं तिला तरी ऐकत नव्हती. तिच्या हाताचा तो थंडगार स्पर्श अजून देखील वाटत तिचे हात माझा हातात आहेत. आज माझा त्या चुकी मुळे मी श्रेया ला गमावून बसलो आहे. ती जवळ असून हि नसल्या सारखी झाली आहे. 

समर चा फोन वाजतो. समर या आठवणीतून भानावर येतो. हॉस्पिटल मधून फोन आला असतो.

डॉक्टर - समर तुम्हाला आता हॉस्पिटल मध्ये येयाला जमेल का? थोडं बोलायचं आहे.

समर - हो डॉक्टर गुरु मी लवकर येतो. श्रेया ठीक आहे ना. तिला काही झालं नाही ना. 

डॉक्टर - श्रेया ठीक आहे. तिच्या बद्दलच बोलायचं आहे.

समर - कॉम्पुटर बंद करतो. डोळे रुमाल्यानी पुसून घेतो. पटापट हॉस्पिटल ला जातो.

समर हॉस्पिटल ला पोचतो. डॉक्टर गुरु समरची वाट बघत असतात.

डॉक्टर - हॅलो समर, माफ कर तुला आगोदर माहिती न देता. कॉल करून आता लगेच बोलावलं.

समर - डॉक्टर श्रेया ठीक आहे ना. 

डॉक्टर - हो मला तेच तुला सांगायचं आहे. तिच्या अपघाता नंतर तिच्या मेंदूतील बऱ्याच पेशी खराब झाल्या होत्या. खूप मोठा मार बसला होता. त्या वेळी आम्ही काही करू शकत नव्हतो. जेवढ जमल तेव्हडे उपचार देऊन तिला बर करायचं पाहत होतो. पण आम्हाला या मध्ये यश आलं नाही. आणि श्रेया कोमात गेली. गेली तीन वर्ष तिच्या वर उपचार सुरु आहेत. या उपचारात समर तुम्ही पण फार मदतच केली. आताचे जे रिपोर्ट काढले आहेत. त्या मध्ये थोडी चांगला बदल दिसत आहे. श्रेया कोमातून बाहेर येऊ शकते.

समर - हो खरंच डॉक्टर. धन्यवाद डॉक्टर. समर ला फार बर वाटत.

डॉक्टर - समर शांत बसा. पूर्ण ऐकून घ्या माझं. हो हे खरं आहे. श्रेया मध्ये चांगला बदल होत आहे. पण ती आगोदर सारखी कधी नॉर्मल होईल हे अजून तरी वेळ सांगता येत नाही. अजून काही टेस्ट आहेत त्या आम्हाला करून घ्याव्या लागतील. 

समर - ओके. श्रेया च्या बाबांना तुम्ही हे सगळं सांगितलं का ?

डॉक्टर - मी कॉल केलेला त्यांच्या शी बोलणं झालं आहे. 

समर - ठीक आहे डॉक्टर गुरु. मी श्रेया ला भेटू शकतो का?

 डॉक्टर - हो, जाऊ शकता तुम्ही.

समर श्रेया च्या रूम मध्ये जातो. समोर श्रेया बेड वर झोपली असते. हे बघून परत समर ला वाईट वाटत. तो तिचा जवळ जाऊन बसतो. नेहमी प्रमाणे श्रेया चा हात हातात घेतो. आणि बोलायला सुरवात करतो. 

समर - कशी आहेस श्रेया. तुला खूप मिस करतो ग. लवकर बरी हो ना. तुझा शिवाय नाही जमत ग जगायला. हे सगळं बोलत असताना समरचे अश्रू श्रेयाच्या हातावर पडत होते. या पुढे तुला मी कुठेच एकटीला बाहेर जाऊन देणार नाही. तुझा सोबतच राहणार आहे. फक्त तू लवकर बरी हो. मग जे बोलशील सगळं तस होईल. समर श्रेयाचा हात घट्ट पकडतो आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत असतो. समोर श्रेयाला असं बघून समर सगळं विसरून जात असे. 

नर्स - सर तुमची भेटायची वेळ संपली आहे. आता तुम्हाला जावं लागेलं.

समर - श्रेया च्या डोक्याला किस करतो. डोक्यावरून परत हात फिरवतो आणि रूम मधून बाहेर पडतो. हॉस्पिटल मधून निघताना समर श्रेया च्या बाबांना फोन करतो. आणि जे काही डॉक्टरांशी बोलणं झालं असत ते सगळं सांगतो. 

हॉस्पिटल बाहेर येऊन समर रिक्षा बघतो. घरी जायला निघतो.

विभा - आत्या जेवण खरंच खूप छान झालं आहे. तुझा हाताची आमटी म्हणजे लाजवाब. 

आत्या - तू कधी हे सगळं बनवायला शिकणार आहेस. कि होणाऱ्या नवऱ्याला केस पेपर वर भूक भागव असं सांगणार आहेस. आता हे जेवण पण बनवायला शिका जरा. एक काम कर आता आली आहेस ना तर माझ्याकडेच रहा मीच तुला हे सगळं शिकवते. 

विभा - हो ग आत्या शिकेन आता. 

अनिकेत - इतक्यात कुठे वकील बाई लग्न करणार आहेत.

आत्या - अरे या शनिवारी बघण्याच्या कार्यक्रम आहे. म्हणून दादा नि विभा ला इथे पाठवलं आहे.

अनिकेत - काय हे कधी ठरलं. मला कोणीच कसं सांगितलं नाही. मामा पण काही बोलले नाही. आणि हि वकील बाई पण काही बोलली नाही. 

विभा - गालातल्या गालात हसत असते.

आत्या - त्या साठी घरी असावं लागत. तुम्ही इकडे तिकडे फिरतच बसा. मग कस कळणार. विभाचं लग्न झालं कि आपण तुझा साठी पण मुलगी बघू. 

विभा - हो आत्या आपण याच पण लग्न ठरवून ठेऊया. 

अनिकेत - माझा लग्न माझ्यासाठी मुलगी मी बघेन. तुम्हाला शोधायची गरच नाही.

विभा - माझी होणारी वाहिनी तू बघून ठेवली आहेस म्हणजे. आत्या ऐकलस का. विभा चिडवायला लागते.

अनिकेत - ते सगळं जाऊदे. वकील बाई साठी बघितलेला मुलगा कोण आहे. कोणाचे एवढे दिवस खराब आले आहेत. 

विभा अनिकेतला एक फटका मारते.

आत्या - अरे तू ओळखतॊस त्याला तुझा मित्र समर दशरथ माने. याच स्थळ आलं आहे. आपला विभा साठी 

अनिकेत - समर च स्थळ विभा साठी

आत्या - हो, चांगल कुटुंब आहे. खुश राहील आपली विभा तिथे.

अनिकेत - हो बोलून शांत बसतो.

विभा - चल आत्या मी निघते. खूप उशीर झाला आहे. उद्या सकाळी बाहेरची दुसरी पण खूप काम करायची बाकी आहेत. मी निघते. अनिकेत चल मला सोडायला.

आत्या - इथेच झोप ना. तू सांगून ऐकणार पण नाहीस. बापावरच गेली आहेस. तो पण माझं ऐकत नाही. 

विभा आणि अनिकेत दोघे पण एकमेकांन कडे बघून हसतात.

अनिकेत विभाला सोडायला घरी जात असतो.

समर रिक्षातून घरी जात असताना. रस्त्यात त्याला विभा आणि अनिकेत चालताना दिसतात. समर विभा ला बघून ओळखतो. हि तर काल भेटलेली मुलगी आहे. हीच आपण नाव पण नाही विचारलं. हि अनिकेत बरोबर काय करत आहे. अनिकेत हिला ओळखतो. अनिकेतची मैत्रीण असेल वाटत. पण चांगली मुलगी आहे. या अनिकेत ला हिच्या पासून लांबच राहायला सांगितलं पाहिजे. समर स्वतःशीच मनात बोलतो - पण आपण का हा विचार करत आहोत. आपल्याला काय कराच आहे. काल भेटली तेव्हा साधी वाटली. आणि या शहरात नवीन पण आहे असं बोलली. याला कशी ओळखते. समर तुला काय कराच आहे. हे विचार थांबावं आगोदर. या मुलींचे विचार का येतात माझा मनात हिला तर मी ओळखत पण नाही फक्त काळ अचानक भेट झालेली.

आता पुढे समर आणि विभा कसे एकमेकांना भेटतील हे आपण बघू या.......

🎭 Series Post

View all