Jan 27, 2022
प्रेम

प्रेमाचे रंग - भाग सतरा

Read Later
 प्रेमाचे रंग - भाग सतरा

नमस्कार मित्रांनो,

हे पण दिवस जातील समर.....

समर मागे वळून बघतो. तेजस तू कसा आहेस मित्रा.....

तेजस - मी ठीक आहे. तू बोल कसा आहेस? मी ऐकलं लग्न ठरलंय तुझं

समर- हो. म्हणजे अजून पण तू बातम्या काढतोस तर तुझी सवय जाणार नाही. 

तेजस - अरे पेशाने मी सी आय डी डिपार्टमेंट काम करत आहे. हे माझ्या रक्तातले गुण आहेत. समोरच्याची माहिती ठेवणे. 

समर - इतके महिने कुठे होतास तू. तुझा फोन पण बंद होता. 

तेजस - माझा नवीन नंबर देतो तुला.

समर - तेजस आता पर्यन्त किती मोबाइल नंबर बदलणार आहेस. 

तेजस - हसतो, काय करू पर्याय नाही आहे.

समर - इथे कधी आलास.

तेजस - कालच मी घरी आलो. आता सकाळी मॉर्निंग वॉल्क ला आलो. तर समोर तुमचे दर्शन झाले. मग ठरवलं तुला आशिर्वाद  देऊ या. मग श्रेया कशी आहे. आता तिला काही त्रास होत नाही ना. श्रेया कोमातून बाहेर कधी आली. तुझं लग्न ठरलं हे ऐकून मला खूप आनंद झाला. 

समर - तेजस तुला चुकीचा समज होत आहे. माझं लग्न विभा बरोबर होणार आहे. श्रेया अजून पण कोमातच आहे. 

तेजस - ओके माफ कर. मला वाटलं जाऊदे. मग या विभा वहिनी काय करतात. विभा वाहिनीच नाव ऐकल्यावर चेहऱ्यावर कसं हसू येत हा. पोटात गुदगुल्या होत आहेत का? मग हनिमून ला कुठे जाणार आहात.लग्नाची तयारी झाली का? लग्न कधी आहे. तू हसतोस समर म्हणजे लग्न झालं कि काय ?

समर - किती हे तुझे प्रश्न थांबणार आहेत कि नाही ? हसू नाहीतर काय करू. पुढच्या चोवीस ला मंगळवारी लग्न आहे. 

तेजस - अरे वाह मेरे यार कि शादी हे मेरे यार कि शादी हे मी तर खूप नाचणार.

समर - शांत उभा रहा. आपल्याकडे सगळे बघत आहेत. तुझं नाचून झालं असेल तर आपण निघू या. तू कुठे होतास ते नाही सांगितलंस. 

तेजस - या वेळेची खूप मोठी गोष्ट आहे. पुरसत मध्ये सांगेन तुला कधी.... 

समर घरी येतो. ऑफिस ला जाण्याची तयारी करत असतो. तेवढ्यात विभा चा व्हॉट अप वर मॅसेज येतो.

हाय समर

मी लग्नाला तयार आहे. माझा निर्णय मी बदलला आहे. तुला सांगायचा होता. पण तुला फोन करण्याची माझी हिंमत होत नव्हती. म्हणून तुला मॅसेज करत आहे. 

समर - हे वाचून समरचा जीव भांड्यात पडतो. त्याला विभाला कोणत्या हि कारणाने गमवायच नव्हतं. पण तिच्या मनातील भावना समजून हि घेण्याच्या होत्या.

समर विभा ला कॉल करतो. 

विभा - यांनी मॅसेज वाचला वाटत. हॅलो समर

समर - नाटक करत रागातच बोलतो. स्वतःला कोण समजतेस तू? लग्न मोडणं आणि परत जुळवण हे सगळं बोलणं फोन वर ठरवणार आहेस. मला हे सगळं पटत नाही. तू आज संध्याकाळी भेट आणि बोल तसं.

विभा - ठीक आहे. याला काय झालं हा असा का बोलतोय बहुतेक चिडला असेल. आपण समर ला खूपच दुखवलं आहे.

समर ला विभाला भेटायचं असत. म्हणून हि सगळी नाटक असतात.   

 

विभा घरातील सगळी काम करून घेते. बाबांना गोळ्या देते. आत्या मी बेडरूम मध्ये आहे. थोडं माझं ऑफिस च काम करते. आज संध्याकाळी समर ला भेटायला जाणार आहे. 

आत्या - ठीक आहे. मी खाली संध्या काकू कडे जाऊन येते. त्यांना बर वाटत नाही आहे.

विभा - लवकर ये पण

आत्या - हो, दादा झोपलाय ना. त्याला आराम करून दे.

विभा बेडरूम च्या दारातून तिच्या बाबा कडे पाहत असते. माझ्यामुळे तुम्हांला खूप त्रास झाला बाबा यापुढे मी कोणतं हि पाऊल असं टाकणार नाही ज्यांमुळे तुम्हाला तुमची मान समजा पुढे अपमानाने खाली करावी लागेल. या सगळ्याला मी जबाबदार आहे. भूतकाळ आठवून विभा चे डोळे भरून येतात. मनातले विचार थांबवत विभा कामाला सुरवात करत असते.  

 

विभा ऋचा ला कॉल करते. 

ऋचा - हॅलो मॅडम

विभा - हॅलो अजून मेल केला नाहीस.

ऋचा - आता करते. उद्या किती ला ऑनलाईन केस सुरु होणार आहे.

विभा - अकरा ची वेळ दिली आहे. बाहेरील या अशा परिस्थितीमुळे डिवोर्स ची केस सुद्धा ऑनलाईन होणार आहे. 

ऋचा - काल घोरपडे याचा फोन आलेला. त्यांना डिवोर्स मुच्युल मध्ये पाहिजे असं बोलत होते.

विभा - मग केस कशाला फाईल केली. दोन वर्ष फुकटच गेली ना.

ऋचा - आता अक्कल आली. काय बोलणार. तुझी सगळी तयारी झाली ना.

विभा - हि हेरिंग झाली ना कि मी डोक्याने शांत होईन. मग पुढे अजून एक केस वाट बघत आहे. तिला ओपन करायच आहे.

ऋचा - अच्छा, सरांचा कॉल आलेला का? अजून मला तरी कोणती डिटेल्स दिली नाही.

विभा - तुझा मेल आता रिसिव्ह झाला. थँक यु मी फोन ठेवते. बाय.

 

विभा केस ची स्टडी करत असते. घोरपडे याना फोन करून दोघांशी नवरा बायकोशी सर्विस्तर बोलून घेते. केस ची एक बाजू तरी क्लिअर झाली होती. आता उद्या फक्त निर्णयाची वाट बघावी लागणार होती.

तेवढ्यात आत्या घरी येते. विभाला केस च काम करताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही.

आत्या - विभा अग निघालीस नाहीस.

विभा - कुठे

आत्या - समर ला भेटणार आहेस ना. त्याज्याशी निट प्रेमाने बोल. 

विभा - अरे हो विसरली मी. मी तयार होते. आत्या मी काही त्याला खाणार नाही आहे. 

आत्या - ते तुम्ही काही पण करा. हसते

विभा - आत्या......

आत्या - जा लवकर...

समर ने समोरून कॉल पण केला नाही. मी कॉल करते. काय झालं. बेल वाजून पण फोन उचलत नाही. बीजी असेल. विभा तयार होते. निघायच्या आगोदर परत समर ला कॉल करते. तरी समर फोन काही उचलत नाही. भेटायचं आहे कि नाही कसा आहे हा... विभा समर ला मॅसेज करते. घरून निघाली आहे. 

ठरल्या प्रमाणे विभा नेहमीच्या ठिकाणी भेटायाला पोहचते. समर ची वाट बघत बाकावर बसलेली असते. ती परत समर ला मॅसेज करते. मी पार्क मध्ये पोचली आहे. कुठे आहेस तू. कॉल करते तरी समर फोन उचलत नसतो. बराच वेळ होतो तरी समर काही पार्क मध्ये पोचत नाही. आता विभा ची काळजी वाढू लागते. 

विभा एक सारखी कॉल करत असते. पण समोरून समर चा काही रिस्पॉन्स नसतो. आता विभा घाबरते. समर फोन उचलणार नाही असं कधी होत नाही. काय करू मी. विभा च्या मनातील समर वर असलेलं प्रेम आता तिच्या डोळ्या तुन वाहू लागलं होत. 

तेवढ्यात समर विभा समोर येतो. विभा च्या बाजूला बसतो. तिला डोळे पुसायला रुमाल देतो.

समर - काय झालं. रडत का आहेस?

विभा - समर ला बघून विभा ला खूप आनंद होतो. तिची मनातील भीती दूर पळून जाते. ती समर ला प्रेमाने मिठी मारते. मी किती घाबरले होते. तू कुठे होतास? तुला किती कॉल केले मी. रिप्लाय तरी देण्याचा. 

समर - रिप्लाय केला असता. तर तुला असं बघायला मिळालं नसत. तुझं माझ्यावर मनापासून प्रेम खरं आहे. हे मान्य करायला किती वेळ घेतेस. असच कोणासाठी पण आपल्या डोळ्यात पाणी नाही येत ग वेडाबाई कुठली आणि समर विभा ला आपल्या मिठीत घट्ट घेतो. या पुढे असं मनाशी खेळणं बंद कर. स्वतः अपराधी पणाची भावना नको घेऊस. मी पण तुझ्या शिवाय राहू शकत नाही.

विभा - सॉरी समर मी खूप चुकले. माझ्यामुळे बाबांना आणि तुला खूप त्रास झाला. या पुढे मी असं नाही वागणार. समर आयुष्यात चांगली माणसं मिळायला पण नशीब लागत.

समर - हे असं वागत असताना तुला पण तर त्रास होत होता. हे मला जाणवत होत. विषय वाढू नये म्हणून मी शांत झालो. सगळं वेळेवर सोडून दिल. झालं ते झालं आता ते सगळं विसरून जा. आता आपण नव्याने सुरवात करू. आगोदर रडणं थांबव.

विभा - समर तू खूप चांगला आहेस. मी तुला नकार दिल्या नंतर पण तू माझ्याशी प्रेमाने वागत होतास. तुझ्या घरी पण तू काही कळू दिल नाहीस. जर त्यांना कळलं असत तर काका आणि काकी यांनी माझा राग च केला असता. तुम्ही खूप मोठा तमाशा पण करू शकला असतात माझं किंवा माझ्या कुटूंबाचे नाव खराब झाले असते पण तसं काहीच केलं नाहीत. 

समर - विभा आपण ज्याच्या वर मनापासून प्रेम करतो ना. तेव्हा आपण स्वतः पेक्षा जास्त त्याच्या सुखाचा, समाधानाचा, विश्वासाचा त्याला आनंदात ठेवण्याचा विचार करत वागत असतो. जेवढ त्याला खुश ठेवता येईल तसा प्रयन्त शेवट पर्यंत करत असतो. बाबांना सगळं मी आगोदरच सांगितलं होत.

मग आता काय विभा माने लग्न करणार ना माझ्याशी कि अजून पण काही अटी आहेत.

विभा - समर बस ना आता तू मला आयुष्यभर असाच चिडवत राहणार आहेस का? सॉरी

समर - ठीक आहे. काहीतरी वेगळं कर मग तू

विभा - वेगळं काय करू काही पण

समर - अरे काहीपण काय तू त्रास दिलास ना मग आता हि शिक्षा आहे.

विभा - शिक्षा

समर - तुला जे सुचेल ते कर

विभा - समर

समर - लवकर

विभा - काय करू ओके ठीक आहे. डोळे बंद कर आगोदर

समर - काय करणार आहेस.

विभा - समर कर ना. तू माझं ऐकणार आहेस. तरच मी काही तरी करेन.

समर डोळे बंद करतो. विभा समर चा हात हातात घेते.

"तुझ्या सोबतीने आयुष्य जगताना 

तुझी साथ पावलो पावली अशीच राहुंदे राजसा.....

तुझी आठवणींत स्वप्नात वाट पाहताना

हळूच ओंजळ भरुनी मला रातराणी दिलीस तू सांजना.....

खूप मी रुसले खूप मी फुगले, दूर जाउनी कोपऱ्यात बसले.

सारे हट्ट माझे समजुनी आयुष्यात प्रेमाने सुखाचे रंग तू रंगवलेस प्रिया....."

असं बोलून विभा थांबते. समर डोळे उघडतो.

समर - सुंदर तुला पण कविता करता येतात.

विभा - नाही तुझ्या मुळे कविता करता येतात.

दोघे हि हसतात.  समर खूप उशीर होत आहे. आपण घरी निघूया. आत्या वाट बघत असेल. 

समर - मी तुला घरी सोडतो चल. उद्या दुपारी बाहेर जेवायला भेटशील का?

विभा - उद्या माझी केस आहे. किती वेळ लागेल माहित नाही.

समर - ठीक आहे. पण हळद लावल्या वर तुला बाहेर भेटता येणार नाही.

विभा - हो, गीता ने सगळी तयारी केलीली आहे. दिवस फार कमी राहिले आहेत ना. 

समर - मग परवा भेटणार का? 

विभा - ब्युटी पारर्ले वाली घरी येणार आहे. आणि दुसऱ्या दिवशी मेहंदी आहे. आता आपण लग्नालाच भेटू. 

समर - विभा हे बरोबर नाही हा. अरे आपण प्रिवेडिंग फोटोशुट पण केले नाहीत.

विभा - हे सगळं आगोदर प्लॅनिंग करावी लागते.

समर - मी सगळ फायनल केलं आहे. तू फक्त मला तुजे तीन तास दे.

विभा - तू हे कधी केलस. आणि माझी कपड्यांची पण काही तयारी नाही आहे.

समर - ते पण म्यानेज होईल ग.

विभा - ठिकाण कुठे जातोय आपण.

समर - तू फक्त हो म्हण. बाकी सगळं तयार आहे ग राणी..

विभा - समर नाटक बंद कर

समर - अरे खरं बोलतोय. उद्या संध्याकाळी पक्का

विभा - ठीक आहे. दुपारी कॉल करते. 

समर - मी ऑफिस मधून लवकर निघेन मग.

विभा - चल बाय... घरी पोचलस कि कॉल कर.

समर - लव्ह यु बाय....

विभा घरी जाते. गीता दार उघडते.

गीता - या या स्वागत आहे आपलं

विभा - तू कधी आलीस. मला फोन करायचा ना.

गीता - आत्या ला बोलली मी पण त्या बोलायला थांब येईल च.

विभा - आता आली आहेस तर आज रहा इथे. 

गीता - नको अनिकेत उशिरा सोडेल मला

अनिकेत - तू तर लग्नाच्या तयारी साठी इथे राहायला येणार होतीस ना.

गीता - ते मी दोन दिवसांनी येणार आहे.

आत्या - चला जेवायला बसू या.

विभा बाबांना भेटायला बेड रूम मध्ये जाते. 

विभा - बाबा आज मी समर ला भेटले. त्याला मी सगळ सांगितलं आहे. माफ करा बाबा. 

मोहन - विभा बस इथे मला समर चा फोन दोन आठवडा आगोदरच आला होता. हे सगळं मला त्यांनी आगोदरच सांगितलं होत. तुझ्या मनात श्रेया ला घेऊन काय चालू आहे ते. त्यांनी तुझी बाजू घेऊन मला समजावलं स्वतःचा पण निर्णय सांगितला मला तुला समजून घेण्यास बोलले. मला राग तुझा या गोष्टीचा आला कि असा समजून घेणारा माणूस भेटणं खरंच नशिबाचा भाग आहे. तुला हे समजत नव्हतं. ठीक आहे. विभा तुझ्यावर त्याच खरंच खूप प्रेम आहे.

विभा - माफ करा बाबा. जेवायला चला.

समर घरी पोचतो. समर च्या चेहऱ्यावरील आनंद पाहून दशरथ यांना सगळं नीट झालं याचा अंदाज येतो. 

सुनीता - समर फ्रेश होऊन ये आपण जेवायला बसू या.

समर - हो आई. राघवी कुठे आहे? 

सुनीता - तिला चपाती बनवायला लावलं आहे. थोडी घरातील पण काम येयाला पाहिजेत. 

समर - मी येतो आवरून लवकर

दशरथ - आज विभा ला भेटलास ना. सगळं नीट झालं ना. 

समर - हो बाबा सगळे गैरसमज दूर झाले आता. बरं वाटत आहे.

सुनीता - सगळं नीट होईल काळजी करू नकोस. तुझ्या पाठीशी आमचे आशिर्वाद आहेत.     

अडचणीच्या काळात देवाचे आणि आई - वडिलांचे आशिर्वाद च आपल्याला बाहेर पाडण्यात साह्य करतात......

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now