प्रेमाचे बंध (अंतिम भाग)

कथा मालिका


भाग/५
माई आणि अप्पा बाहेर येताच नुपूर आणि राजेश उठून उभे राहतात.

"माई ,अप्पा तुम्ही येथे कसे? नुपूर बोलली.

माई अप्पा नुपूरने सांगितले की तुम्ही फिरायला गेलात म्हणून. मग तुम्ही सरांच्या घरी कसे?"

"अरे, थांब राजेश. किती प्रश्न विचारशील त्यांना."

"पण, सर."

"ते मला रस्त्यावरून चालत जातांना दिसले.म्हणून मी येथे घेऊन आलो त्यांना."

"माई अप्पा तुम्ही फिरायला गेले होता ना. मग इथे कसे? इथे कधी आलात?"

त्यांना गावी जायचे आहे राजेश. त्यांच्या हक्काच्या घरी. जिथे नात्यांचा गंध असेल. जिथे प्रेमाचे झरे पाझरतील आणि त्यांना स्वतः चे स्वातंत्र्य असेल. मुक्तपणे उडण्यासाठी मोकळे आभाळ असेल.जिथे मुलाच्या घरी राहूनही परकेपणाची जाणीव होते. तिथे त्यांना नाही रहायचे. त्यामुळे त्यांच्या घराची किल्ली दे. तुम्हांला त्यांचा त्रास होतो. त्यामुळे ते रस्त्यावर भीक मागून पैसे जमा करत होते. मला ते दिसले म्हणून मी त्यांना माझ्या घरी घेऊन आलो."

"दे घराची किल्ली दे राजेश. आम्हांला निघायचे आहे."

वसंतरावांच्या आवाजात करारीपणा जाणवला.

अप्पा ते घर...

"अरे ,असा अडखळतोस कशाला? तू माझ्या कडून घराची किल्ली घेतली होती ना डागडुजी करायला. काय सोय केली ते बघायचे आहे मला."

नुपूर आणि राजेश खाली मान घालून उभे होते.

"अरे ,राजेश काय म्हणत आहे अप्पा. त्यांच्या घराची किल्ली दे परत."

"अप्पा ते घर मी.... विकले."

"काय?"

अप्पा जवळ जवळ किंचाळलेच.

अप्पा,माई मला माफ करा. मी तुम्हाला न सांगता हे घर विकले आणि या गोष्टीला आता सहा महिने होऊन गेले. मला या नवीन घराचे पैसे भरायचे होते. कर्जाचा डोंगर वाढत चालला होता. मला ते पैसे भरून कर्ज निल करायचे होते."

"अरे, पण, कधी केलं हे सगळं.मला कसे माहित नाही."

एकदा मी नवीन राशन कार्ड करायचे आहे. असे सांगून काही कागदांवर तुमच्या सह्या घेतल्या होत्या आणि त्यात तुमचा चष्मा फुटला होता. तेव्हाच मी घाईघाईत तुमच्या आणि माईच्या सह्या घेतल्या आणि घर विकले. त्यांना मी सहा महिन्यांची मुदत मागितली होती. त्यामुळे मी तुम्हांला येथे मुंबईत घेऊन आलो."

माई आणि अप्पांना मोठ्ठा धक्का बसला. ते मटकन खालीच बसले.आपल्या मुलाने आपल्याला कळू न देता आपली सही घेऊन आपले घर विकले ही गोष्टच त्यांना सहन होत नव्हती.

"पण, तू असे करू शकतो. यावर माझा विश्वास नाही."

माईंचे डोळे भरून आले. "अरे, राजेश ज्या घरात तू लहानाचा मोठा झाला. जिथे तुझ्या बालपणीच्या आठवणीत आम्ही इतके वर्षे राहिलो. ज्या घरासाठी मी आणि तुझी आई राब राब राबलो. तुझ्या स्वप्नांना सत्यात उतरवण्यासाठी आम्ही झिजलो. ते घर तू विकलेस."

"अहो ,आता कुठे जायचे? "

"माई ,अप्पा तुम्ही कुठेही जाणार नाही. जाईल आता राजेश आणि नुपूर."

सुशांत सरांच्या बोलण्यात राग जाणवत होता.

"पण, सर आम्ही कुठे जाणार?

"अरे, जा की कुठेही. हे जग खूप मोठे आहे. तुम्हांला काय कोणीही जागा देईल भाड्याने. नाही तर एक काम करा. तुमच्या घरात... साॅरी. नाही माई अप्पांच्या घरात तुम्ही भाड्याने राहू शकता. काय नुपूर चालेल ना तुला?"

"सर, आम्ही चुकलो. आम्हांला माफ करा. खरोखरच माई अप्पांच्या प्रेमाला आम्ही नाही ओळखू शकलो. आम्हांला फक्त त्यांचा पैसा हवा होता. आम्ही खूप स्वार्थीपणाने वागलो."

नुपूर तर माईंचे पाय सोडायलाच तयार नव्हती. त्यांच्या पायावर अश्रुंचा अभिषेकच केला.

"उठ नुपूर ,राजेश. आम्ही तुम्हांला कधीच माफ केले. पण, आम्ही पण एक निर्णय घेतला. आता आम्ही गावाकडे जाणार. सर, आम्हांला जाऊ द्या."

"नाही माई अप्पा.तुम्ही कुठेही जाणार नाही. आमच्या जवळच राहायचे."

"नाही नुपूर ज्या विसाव्याचे दोन क्षण एकत्र जगावेसे वाटत होते. तिथे जर विसावाच नाही. तर एकत्र राहून काय फायदा."

"म्हणजे तुम्ही आम्हांला अजूनही माफ केले नाही."

"नुपूर ,जसा राजेश आमचा मुलगा आहे ना. तसा तो या मुलांचा बाबा पण आहे. तेव्हा उगाचच वाईट संस्कार त्यांच्यावर व्हायला नको. आम्ही घेतलेला निर्णय आता बदलणार नाही. दूर राहून आपल्यातला गोडवा कायम ठेवला पाहिजे."

सुशांत सर मध्येच बोलले. "माई ,अप्पा तुम्ही कुठेही जाणार नाही. तुम्ही माझ्याकडे रहा. तुमची सोय मी केली आहे. माझ्या आई वडीलांच्या खोलीत. ते गेल्यानंतर आज पर्यंत ती खोली बंद होती. पण, आता माई अप्पांच्या सहवासात राहून त्यांची उणीव मी भरून काढणार आहे. त्यामुळे आता या विषयावर चर्चा नको."

"हे बघा सुशांत सर , एवढा मोठा आमचा भार"...

"माई ते काही नाही. माझ्यात जीवात जीव असेपर्यंत तुम्ही आमच्याकडेच रहा."नलिनी पण रडायला लागली.

सुशांत आणि नलिनीला एका दिवसात एवढा लळा लागला होता की ते त्यांना जाऊच देत नव्हते.

अप्पा त्यांच्या अख्ख्या आयुष्यात कोणापुढेही झुकले नाही. त्यामुळे ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते.‌ ते जायला निघणारच कि..

पण, मोठ्यांचे हे बोलणे त्यांची नातवड ऐकत होती.

"आजोबा आजी तुम्ही आम्हांला सोडून नका ना जाऊ."

नातवंडाचा हट्ट आणि त्यांचे अश्रु बघून वसंतराव आणि मालतीबाईंनी त्यांचा निर्णय मागे घेण्यासाठी पुरेसा ठरला. बालहट्टासमोर त्यांना झूकावेच लागले. नाराज झालेले माई अप्पांचा निर्णय मागे घेतला.

"प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी सोबत राहोत." सुशांत सर बोलले.

सर, आम्ही माई अप्पांना घेऊन जातो. तुम्ही सुद्धा आम्हांला आशीर्वाद द्या.

©®आश्विनी मिश्रीकोटकर

🎭 Series Post

View all