Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा रंग भाग 4

Read Later
प्रेमाचा रंग भाग 4


श्रेणी - राज्यस्तरीय कथा मालिका

विषय -प्रेमकथा.

जिल्हा - ईरा संभाजीनगर संघ

शीर्षक - प्रेमाचा रंग (भाग 4)


मल्हारनी दिलेल्या एका औषधांच्या गोळीने जान्हवी सकाळी ठणठणीत बरी झाली होती.आजी आनंदाने मुलाला म्हणाली, " अरे दत्ता ,डॉक्टरांच्या हाताला चांगला गुण आहे बघ, जान्हवीला बरं वाटतंय. रात्री देवासारखा धावून आला, त्या डॉक्टरांनी जान्हवीला घरी सुखरूप आणून सोडले. त्याला जेवायला बोलव. आज रविवार आहे तर आपल्याला आणि त्याला सुट्टी असेल."

"बरोबर आहे आई, बघतो."


दत्तांनी मल्हारला फोन लावला. "हॅलो. मल्हार आज आमच्या घरी संध्याकाळी जेवायला या."

पण मल्हारने जान्हवीच्या घरी जाण्यासाठी नकार दिला.

"अहो आज नाही जमणार. आज मला खुपच इमर्जन्सी सिझेरियन आहे. दोन ठिकाणी जायचे आहे. जमणार नाही. मला माफ करा."जान्हवीचे बाबा -" काही हरकत नाही. तुम्ही कधी फ्री आहात ते सांगा. तेव्हा करू."जान्हवीला मल्हारचे आभार मानून रूमाल परत करायचा होता. तिचा ही जरा हिरमोड झाला. जान्हवीने रुमाल स्वच्छ धुवून तिच्या कपाटात जपून ठेवला.


मल्हार जान्हवीच्या घरी जाऊन आल्यापासून मल्हारला सगळीकडे जान्हवीच दिसायला लागली होती.
जान्हवी सतत त्याच्या कडे पहात आहे असा भास मल्हारला होत होता. आज जान्हवीची भेट होऊ शकत नाही म्हणून त्याला वाईट वाटले होते. आज विरहाचे दुःख मल्हारला होते.चतुर्थी च्या निमिय्ताने जान्हवी, तिचे आई, बाबा, आजी, दादा संध्याकाळी सगळे मोठ्या प्रसिद्ध गणपती मंदिरात दर्शनास अाले होते.दर्शन घेतेवेळी रांगेत एका बाईना चक्कर आली . जान्हवीने त्यांना बसवून पाणी दिले. या बाई म्हणजे मल्हारची आई आहे. ही गोष्ट जान्हवीला महित नव्हती . मल्हारच्या आईला तर काहीच महिती नव्हतं त्यामुळे त्यांनी जान्हवीचे आभार मानले.


गणपतीचे दर्शन छानच झाले. आरती मिळाली. प्रसाद घेतला . सगळे कुटूंबीय खूपच खुश होऊन जान्हवी घरी परतले.


रविवारी अख्खा दिवस आज भेट झाली नाही. रात्री जोरदार पाऊस आला . विजांचा कडकडाट आणि लखलखाट झाला. लाईट गेले.
जान्हवी तिच्या खोलीच्या खिडकीतून बाहेर पाऊस पहात होती. तिला कालचा पाऊस, मल्हारने केलेली मदत आठवत होती. जान्हवी एकटीच गालात हसली अन गालावर खळी पडली.

इकडे मल्हार सगळे काम यशस्वीपणे आटपून घरी येऊन त्याच्या रूम मध्ये फ्रेश झाला. मस्त वाफाळलेली कॉफी घेत खिडकीतून बाहेर पाऊस बघत होता. कालचा जान्हवी सोबतचा पाऊस आठवत होता. अचानक विजांचा कडकडाट आणि लखलखाट झाला. मल्हारला भास झाला की जणु जान्हवीने त्याचा हातच धरलाय आणि तो जान्हवी सोबत डान्स करायला लागलाय .

मनात गाणं वाजत होतं -


"कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवते आज का
का हे कसे होते असे ही आस लागे जीवा
कसा सावरू मी आवरू ग मी स्वत:
दिसे स्वप्‍न का हे जागतानाही मला
आभास हा आभास हा
छळतो तुला छळतो मला
क्षणात सारे उधाण वारे, झुळुक होऊन जाती
कधी दूर तूही जवळ वाटे पण काहीच नाही हाती.. "इतक्यात मल्हारची आई आली व मल्हारला एकटाच नाचताना पाहिलं जणु कोणी सोबत नाचत आहे असे त्याचे हावभाव होते .

हे पाहून आई हसली व मल्हारला विचारलं ,"काय रे , प्रेमा-बिमात पडलास का? मल्हार. अरे.. "

मल्हार नाही नाही म्हणाला पण दोघे खुप हसले.


मल्हारची आई - " चल जेवायला."

मल्हारचे जेवणात लक्षच नव्हतं तो भाता सोबत पोळी खात होता , आधी लहान बहिणीने पाहिलं मग एका एकाला खुणावून दाखवलं मग ते सगळ्यांना कळलं.


काका गालात हसत विचारतात - "तुझी तब्येत बरी नाही का मल्हार ?"


मल्हारला ऐकूच आले नाही. मल्हार आपल्याच तंद्रीत. कसबसं जेवला. काय खाल्ले त्याला ही महिती नाही.


काकूने जोरात मल्हारला विचारले - "कोशिंबीर कशी झाली?"

मल्हार म्हणाला - " इतक्या जोरात का बोलते.. फारच छानच झालीय कोशिंबीर. "


काकू हसून म्हणाली -" अरे पण कोशिंबीर केली नाही आज?"


सगळे हसले.


जेवण झाल्यावर ,मल्हार कसाबसा सगळ्यांना टाळून त्याच्या बेडरूम मध्ये वर आला.

मल्हारची झोपच उडाली होती. मल्हारला काही केल्या झोप येत नव्हती.
मल्हारला जान्हवी दिसू लागली. मल्हारला एक दिवसाचा विरह सहन होत नव्हता.

इकडे मल्हार जान्हवीची आठवण काढत होता. तिकडे जान्हवीला उचक्या लागल्या होत्या.
मल्हारच्या मनात आले जान्हवीला सांगावं कसं .
त्यांने मनातल्या गोष्टी पत्रात लिहाव्यात म्हणून पत्र लिहायला घेतले.
सुरूवात केली, परत चुकली वाटली. परत खाडाखोड केली.
त्या कागदाला सोडून नवीन पेज काढले. परत लिहायला घेतले. परत दोन ओळी लिहिल्या परत नवीन पान काढून सुरूवात काय करावी विचार चालू होता.


इतक्यात आई, लहान बहिण, काका, काकू आले . मल्हारचे लक्ष नव्हतेच . बहिणने हळूच वही ओढून घेतली.

आधीच्या पानांवर लिहलेले वाचलं . डॉक्टरांचे अक्षर मेडिकलवाल्या माणसालाच कळणार म्हणाली.

मग काकांनी वही ओढून घेतली ,काकांना काही अक्षरे कळतात काही अजिबात कळत नाहीत


मल्हारची आई म्हणाली - " पुरे..... नका त्रास देऊ गं माझ्या लेकराला. असेल काही मला सगळे कायम सांगत आला आहे. सांगेल.. थोडा वेळ द्या मल्हारला."


मल्हारची काकू - एवढा मोठा डॉक्टर झाला, एवढे मोठे ऑपरेशन केले. कधी भात आणि पोळी खाल्ली नाही. आज काय झालं? कोशिंबीर न करता छान झाली म्हणाला.. कसे काय? "मल्हारची आई - " तो सांगेल गं.. मल्हार सगळे सांगेल आपल्याला.. जरा धीर धर.... मल्हार च्या या गोष्टी आपल्यातच ठेवा. यांना आणि मामांजी आणि आत्यांना लगेच काही सांगू नका कोणी ."


मल्हारचे काका आणि काकू -" बरं वहिनी.. !"


क्रमशःसौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®श्रेणी - राज्यस्तरीय कथा मालिका

विषय -प्रेमकथा.

जिल्हा - संभाजीनगर औरंगाबाद.
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
//