Mar 03, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा चकवा भाग - ११

Read Later
प्रेमाचा चकवा भाग - ११


प्रेमाचा चकवा  भाग ११

विषय - कथामालिका


आज रविवार त्यामुळे निशाकडे लगबग सुरू होती कारण आज पंकज तिला बघायला येणार होता. निशाला विरोध करायचे होते पण तिच्यात तेवढी हिंमत नव्हती त्यामुळे ती गप्पचं बसली.पंकजने एक दिवसाआधी निशाच्या वडीलांना फोन करून तो आणि त्याचे आई - बाबा असे तिघे जण  सकाळी ११ वाजता पर्यंत येणार म्हणून सांगितले होते.सकाळी निशाच्या ताईने छान सडा सारवण करून अंगणात सुशोभित रांगोळी काढली. निशाने पण तिचं तिचं आवरलं. वेळेवर काही धांदल नको म्हणून बाबांनी चहा-नाश्त्याची सोय केली. आई मानपानाची तयारी करीत होती."सौ आवरलं काय तुमचं? काही विसरलं असेल आणायचं तर आताचं सांगा आणून घेतोय नंतर वेळेवर नको सांगू हे राहिलं नि ते राहिलं." बाबा आईला म्हणाले."नाही हो सगळं नजरे खालून घातलं आहे मी, सगळं रेडी आहे." आईने सांगितले.बाबांनी टायमिंग बघितला तर १०.३० वाजले होते."अरे आवरा लवकर ती लोकं कधीही येतील , जा तुझ्या लेकीचं आवरलं काय बघ जाऊन." बाबांनी आईला निशाच्या रूममध्ये पिटाळले.बाबाच्या बोलण्यावर आई निशाकडे निघून गेली."निशा ssss बाळा झाली काय तयारी? तीलोकं कधीही येणार, तू रेडी रहा." निशाच्या रूममध्ये जाताचं आईने तिला विचारले."हो आईss" असं म्हणून निशाने तयारी करायला घेतली.बरोबर सकाळचे १०.४५ ला बाबांना पंकजचा कॉल आला ."हॅलो काका आम्ही घरून निघत आहोत." पंकजने सांगितले."हो...हो..या या आम्ही तयार आहोत." बाबांनी सांगितले."ठीक आहे." असं म्हणून पंकजने कॉल ठेवला आणि ते तिघेही निशाच्या घरी जायला निघाले.निशाच्या बाबांनी त्याला अधीचं त्यांचा पत्ता पाठवला होता. एकाचं गावात असल्यामुळें त्याला एरिया माहिती होता."अहो आवरा सगळे , पाहुणे निघालेत यायला."

बाबांनी फर्मान सोडले आणि निशाला धडधडायला लागले. बरोबर ११ ला पंकजची गाडी त्यांच्या घरापुढे आली. निशाचे बाबा आणि भाऊजी लगबगीने त्यांच्या स्वागताला गेले.


"नमस्कार मंडळी, काही त्रास तर नाही ना झाला तुम्हाला घर शोधायला?" त्यांनी सर्वांना नमस्कार करत अदबीने विचारले."नाही हो, आमच्या पंकजला माहिती आहे हा एरिया म्हणून त्रास नाही झाला, आरामात आलोत आम्ही." पंकजच्या बाबांनी सांगितले.पंकजने पुढे येऊन निशाच्या बाबाचे आशिर्वाद घेतले.
बाबा त्याला बघताच इंप्रेस झाले, खूप सिंपल पण देखणा दिसत होता तो. अगदी साधी राहणीमान होती त्याची. त्यांनी सगळ्यांना आत बसवले.निशाच्या ताईने पाणी आणून दिले.  थोड्या गप्पा टप्पा करून आईने निशाला नाश्त्याचा ट्रे घेऊन जायला सांगितले. निशा थरथरत्या हाताने ट्रे घेऊन समोर गेली.पंकजने तिच्याकडे नजर टाकली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले. निशाने हळदी रंगाची हिरवे काठ असलेली साडी नेसली होती. ती पाहायला इतकी पण सुंदर नव्हती की पाहताचं क्षणी प्रेमात पडावं पण नाकी डोळी नीटनेटकी होती. तिने केसांची वेणी घातली होती. मेकअप नावाला पण नव्हता फक्त कपाळावर एक छोटीसी टिकली, गळयात एक चैन होती, कानात छोटे झुमके.
तिची नजर खालीच खिळली होती. ती हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकत त्यांच्या पुढ्यात आली.तिने आधी पंकजच्या बाबांना नाश्त्याची प्लेट दिली नंतर आई, नंतर पंकजला नंतर तिच्या बाबांना आणि भाऊजींना. सगळ्यांना देवून झाल्यावर ती आत निघून गेली. इतक्या वेळात तिने एकदा पण वर नजर करून कुणाकडे बघितले नाही.त्यांचा नाश्ता झाल्यानंतर निशा चहा घेऊन आली, चहा सगळ्यांना देवून ती पुन्हा आत गेली. पंकजचे बाबा आणि निशाचे बाबा गप्पा मारत बसले. त्यांचे मानपान झाले."अहो मुलीला बोलवता काय जरा?" पंकजच्या बाबांनी विचारले."हो..." त्यांनी निशाच्या ताईला इशारा केला.ताईने आत जाऊन निशाला बोलावून आणले आणि तिला पंकजच्या बाजूच्या चेअरवर बसायला सांगितले.पंकजचे बाबा आणि आईंनी तिला कॉमन प्रश्न केलेत जे सगळ्या कांदे पोहे प्रोग्रॅममध्ये केले जातात." पंकज तुला काही विचारायचं असेल तर विचार शेवटी आयुष्य तुला काढायचं आहे." पंकजच्या बाबांनी विचारले."काका तुमची काही हरकत नसेल तर मी निशाजी सोबत एकांतात बोलू शकतो? बाहेर कुठे नाही, इथेच तुमच्या घरी." तो अडखळत बोलला.निशाच्या बाबांनी थोडा वेळ विचार केला."ठीक आहे तुम्ही निशाच्या रूममध्ये बोलू शकता." बाबा म्हणाले आणि निशाकडे वळले.

"निशा बाळ, घेऊन जा यांना तुझ्या रूममध्ये." बाबांनी निशाला सांगितले.


निशा खाली मान घालून पंकजला आपल्या रूममध्ये घेऊन गेली.थोडा वेळ दोघेही शांत बसून होते. पंकजला काय बोलावं? कुठून सुरूवात करावी? तेच कळत नव्हते.
तो विचार करत बसला. तर इकडे निशा वेगळ्याच झोनमध्ये होती.  तिला कधी एकदा तो बाहेर जातो असं वाटत होतं." हाय..." शेवटी धीर एकवटून आणि काही तरी बोलावं म्हणून त्याने सुरूवात केली.निशाने फक्त मान वर करून त्याच्याकडे एक नजर बघितले आणि पुन्हा जैसे थे." एक विचारू?" तो तिच्याकडे बघत म्हणाला."हम्म...." ती एवढंच बोलली."तुम्ही मनापासून तयार आहात काय लग्नाला?" त्याने विचारले.निशाने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले."सॉरी मला हे बोलून तुमचं मन नाही दुखवायचं आहे पण काय आहे ना मी रोज घटस्फोटित महिलांना भेटत असतो म्हणजे मी एका एन. जी. ओ. साठी काम करतोय तर तिथे भरपूर मुली असतात. घटस्फोट झाल्यामुळे खूप मुली मेंटली डिस्टर्ब झालेल्या असतात. काही काहींना तर जगावसं पण वाटत नाही. खूपदा घटस्फोटामागे अनेक कारणे असतात पण नेहमी असं होत असते की घटस्फोटाला काहीही कारणीभूत असो ना पण लोकं दोष मात्र मुलींनाच देत असतात की तिच्याचं काही चुकांमुळे घटस्फोट झालं असेल आणि यात सर्वात पुढे ना  नातलग असतात. मी काहींना दुसरं लग्न करण्याबद्दल पण सजेस्ट केलं तर त्यांचं उत्तर ऐकून मी सुन्न झालो.त्यांचं मत होतं की आता लग्न संस्थेवर विश्र्वासचं राहिला नाही. एकदा विश्वास पण केला, नवऱ्यावर प्रेम पण केलं होतं  आणि सुखी संसाराचे स्वप्न पण बघितले होते पण काही दिवसामध्येचं सगळं धुळीस मिळाले तर आता पुन्हा एकदा कोणत्या पुरुषावर विश्वास ठेवावा वाटत नाही. पुन्हा मन धजत नाही त्या गोष्टीसाठी, सतत विचार येतो हाही तसाच निघाला तर? याने पण पुन्हा स्वप्न दाखवून ते पायदळी तुडवले तर? एकदा उध्वस्त झालेले जीवन पुन्हा उद्ध्वस्त व्हायला तयार होत नाही असे त्या मुलींचे विचार असतात. म्हणूनच तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मनापासून तयार आहात ना लग्नाला?मला नाही माहिती तुमच्यासोबत असं काय झालं ज्यामुळे तुमचा घटस्फोट झाला पण मी माझ्या परीने इतकं आश्वासन नक्की देऊ शकतो की मी कधीच तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आयुष्यभर तुमचा साथ निभवेल. जेव्हा जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल त्या प्रत्येक प्रसंगी मी तुमच्या सोबत असेल. मी आणि माझी फॅमिली कधीही तुमचा छळ करणार नाही.माझे आई - बाबा खूप समजदार आणि प्रेमळ आहेत. मी तुमच्यासोबत लग्न करायचं म्हटलो तरी त्यांनी एका शब्दाने पण मला विरोध केला नाही. यावरून अंदाज लावू शकता की ते किती समजदार असतील. त्यामुळे तुमचा सासरी सासुरवास होणार हा विचार मनातून काढून टाका.
माझे आई - बाबा माझ्यासाठी सर्वस्व आहेत , आजपर्यंत मी कधी त्यांना दुखावल नाही. बस इतकी मात्र मी  तुमच्याकडून अपेक्षा करूच शकतो की तुम्ही पण त्यांना नाही दुखावणार कधी. बाकी माझं काहीच म्हणणं नाही.


तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य असेल.  तुम्हाला काय घालायचं आहे? काय करायचं आहे? कुठे जायचं आहे? यासाठी माझ्याकडून कोणतेच बंधन नसणार. फक्त काही करतांना एकदा मला सांगत जा बस. मला नाही आवडत माझी मते समोरच्यावर लादायला. प्रत्येकाला विचाराचे स्वातंत्र्य असायला हवे ना. नवरा - बायको झाले म्हणून काय झालं? त्यांची त्यांची एक स्पेस असायला हवी.

मी इतकं बोललो त्यावरून तुम्हाला कळलं असेल मला तुम्ही पसंत आहात. मी जेव्हा तुमचा फोटो बघितला, मला तुम्ही तेव्हाच आवडले.. आजचा कार्यक्रम बस फॉर्मलिटी आहे बाकी काही नाही. माझी जबरदस्ती नाही की तुम्ही तुमचे मत आताचं सांगा. तुम्हाला हवा तितका वेळ घ्या, मला काही घाई नाही. ज्या काही शंका असतील त्या तुम्ही मला नि: संकोचपणे विचारू शकता, मी नक्कीचं त्या शंकेचे निरसन करेल. काही आहे काय तुमच्या मनात सांगा?" त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.निशाने खाली मान घालून  काही नाही म्हणून मान हलवली."ठीक आहे तर मग जाऊया बाहेर?" त्याने विचारले.दोघेही बाहेर आले, आल्या आल्या पंकजच्या आईने त्याला इशाऱ्याने काय म्हणून विचारले तर त्याने एक स्माईल केली त्यामुळे त्यांना जे समजायचं ते समजून गेले." ठीक आहे निमजे साहेब,  येतो आम्ही आता.  आमच्याकडून तर होकार आहे,  तुम्ही विचार करून तुमचा निर्णय द्या.  आम्ही वाट बघू तुमच्या निर्णयाची." पंकजचे बाबा म्हणाले." हो, नक्कीचं कळवतो आम्ही तुम्हाला." बाबा खुशीत म्हणाले.बाबाला तर खूप आनंद झाला त्यांच्या होकाराचा."निशू बाळा, नमस्कार कर सर्वांना."बाबांनी सांगितल्यावर तिने पंकजच्या आई - बाबांच्या पाया पडली. आईंनी काही पैसे तिला दिले आणि सगळ्यांचा निरोप घेऊन ते निघून गेले.
क्रमशः


✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//