Mar 04, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा चकवा भाग -५

Read Later
प्रेमाचा चकवा भाग -५


प्रेमाचा चकवा भाग - ५

विषय - कथामलिका
रात्रभर रडल्याने निशाचे डोळे लाल झाले होते आणि सुजले पण होते. सगळ्यांना वाटले लग्न असल्यामुळे घर आणि घरच्या लोकांपासून दूर जातांना प्रत्येक मुलगी हळवी होत असते म्हणून कदाचित रडली असेल, त्यामुळे तिला फार कुणी प्रश्न केले नाही.मुहूर्ताची वेळ जवळ आली होती, वरात पण आली होती. पार्लरवाली निशाला तयार करत होती, निशा बस स्तब्ध बसून होती.नवरा मुलगा मंडपात आला, निशाच्या मामांनी तिला लग्न मंडपात नेले. त्यांच्या पुढे अंतरपाट धरण्यात आला, प्रत्येक मंगलाष्टकानंतर निशाला तिच्या स्वप्नांचा चुराडा झाल्यासारखे वाटत होते.तिच्या डोळ्यांसमोर सारखे नितिनसोबत घालवलेले क्षण येत होते. मंगलाष्टके झाली, सर्वांनी दोघांवर अक्षता उधळल्या. लग्नविधी पार पडले, निशाच्या चुलत भावंडांनी अतुलचे जूते चोरले. त्यावरून पण खूप हसी मजाक झाली पण निशाचे कशातही मन लागत नव्हते.शेवटी पाठवणीची वेळ आली, निशा आई, ताईच्या गळ्यात पडून खूप रडली. वरात निघाली, या सगळ्यात निशाने एकदा पण अतुलसोबत बोलली नाही पण तो मात्र प्रेमाने तिच्याकडे बघत होता. अतुलच्या घरी निशाचा गृहप्रवेश झाला.निशासोबत तिची ताई आणि आतेबहीण आल्या होत्या, त्यांना एक रूम देण्यात आली होती. सगळे प्रवासाने खूप थकले होते त्यामुळे फ्रेश होऊन झोपून गेले.दुसऱ्या दिवशी त्यांची हळद उतरवणीचा प्रोग्रॅम होता.
घरचे सगळे त्या दोघांची चिडवा - चिडवी करत होते.
अतुल तर खूप एन्जॉय करत होता हे सगळं पण निशा फक्त वरवर खुश असल्याचे दाखवत होती. त्यांच्यात मोजकेच बोलणे झाले होते.सकाळी सत्यनारायण पूजा झाली आणि सायंकाळला रिसेप्शन होते. रिसेप्शन पण छान झाले. अतुलचा शाळेतला सगळा स्टाफ आला होता. निशा सगळ्यांसोबत आदराने बोलली.रिसेप्शनला निशाचे पण नातलग आले होते त्यापैकी काही रात्र वापस गेले तर काही थांबले.दुसऱ्या दिवशी अतुल आणि निशाला घरी घेऊन आले. तिथे पण गावजेवण झाले. सकाळी अतुल आणि निशा परत जाणार होते. तिची ताई तिला हळदी - कुंकू लावायला गेली तर निशाला अचानक चक्कर आली. कुणाला काही कळायच्या आत ती डायरेक्ट खाली कोसळली. अतुलने तिला उचलून तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. निशाच्या भाऊजीने डॉक्टरला घरी बोलावले.डॉक्टर घरी आले आणि तिला चेक केले आणि तिच्या भाऊजीला बाहेर बोलावून एकांतामध्ये काहीतरी सांगितले. ते ऐकून भाऊजी थोडे अस्वस्थ झाले. त्यांनी तिच्या ताईला बाजूला नेऊन डॉक्टरांनी जे सांगितले ते सांगितले. ती पण अस्वस्थ झाली, काय करावं काही कळत नव्हते. आई तर टेन्शनमध्ये आली. ताई आणि भाऊजी कुणाला काही सांगायला तयार नव्हते. न राहवून अतुल निशाच्या बाबाजवळ आला."लग्नाच्या दगदगीमुळे तिची तब्येत  बिघडली असेल तर तुम्ही एक काम करा, तिला काही दिवस इथेच राहू द्या, आराम करू द्या तिला. तिकडे आली तर तिला आराम मिळणार नाही. उलट, घरची कामे करावी लागतील त्यामुळे तब्येत सुधारायची ती अजून बिघडेल." अतुल म्हणाला."पण जावईबापू असं नवीन नवीन लग्न झालं आणि तुम्ही एकट्याने जाणं योग्य वाटत नाही. तुमच्या घरची मंडळी काय बोलणार?" बाबाने थोडे कचरत विचारले."मामांजी तुम्ही माझ्या घरच्यांची काळजी करू नका, मी सांभाळून घेणार त्यांना. निशाची तब्येत सुधारली की मी स्वतः येऊन घेऊन जाणार तिला, मग तर झालं." तो त्यांना आश्वस्त करत म्हणाला.आता जावयाने म्हटल्यानंतर नाही कसं म्हणावं म्हणून बाबांनी नाईलाजास्तव होकार दिला. अतुल जायला निघाला, जाता जाता तो निशाला भेटून जावं म्हणुन तिच्या बेडरूममध्ये गेला. ती अजूनही शुध्दीवर आली नव्हती म्हणून त्याने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवले आणि तो बाहेर निघून गेला. सगळ्यांचे निरोप घेऊन तो एकटाच परत गेला.अतुल गेल्यावर थोड्या वेळाने निशाला जाग आली.
निशाला उठलेलं बघून निशाची ताई तिच्या रूममध्ये गेली, तिने दरवाजा लावून घेतला."बावळट, बेअक्कल, तुला कळत नाही काय काही?" ताई तिच्यावर ओरडली."काय झालं ताई, मी काय केले?" निशाने न समजून विचारले."काय केलं हे पण मलाच विचार? मूर्ख मुली तू प्रेग्नंट आहेस." ताई तिच्यावर रागात ओरडत म्हणाली."काय ?" निशाला जबरदस्त शॉक बसला."आई , बाबा आणि अतुलला कळलं नाही एवढ्याने निभावले , नाही तर काय झाले असते याचा मी विचारही करू शकत नाही. आईने तर विचारून विचारून हैराण करून सोडले, कसंतरी कारण सांगून तिला शांत बसवलं आहे. वेडी आहेस ग तू निशा, हे सगळं करण्याआधी विचार करायला हवा होता. निदान तुझं लग्न ठरल्यानंतर तरी या सगळ्यातून बाहेर निघायला हवं होतं. तू मूर्खासारखे काम करून ठेवले आहेस, आता काय होणार काय माहिती." ताईने डोक्याला हात पकडून निशाच्या बाजूला धपकन बसत म्हणाली. तिला आता काळजी वाटत होती. यातून सुटका होणार परंतु बाकीच्या पासून लपवून कसं करायचं तेच तिला कळत नव्हतं. जर घरी कळलं तर काही खरं नव्हतं आणि अतुलपर्यंत माहिती पोहोचली तर निशाचा संसार सुरू व्हायच्या आधीच उध्वस्त झाला असता."ताई अतुलने काय म्हटले?"  ती अडखळत बोलली." तुला आराम मिळावा म्हणून ते एकटेच गेले गावी, नंतर घ्यायला येणार." ताईने सांगितले.

"सॉरी ताई पण आता काय करायचं ?" निशाने बारीक चेहरा करून विचारले. तिला खूप अपराध्यासारखे वाटत होते. एक तर अतुलपासून खरं लपवणे तिला जीवावर येत होते. खोट्यावर आधारलेलं संसार जास्त काळ टिकत नाही हे तिला माहिती होते पण खरं सांगूनही ते टिकले नसते. उलट, सर्वांना माहिती होऊन त्रास झाला असता म्हणून ती गप्प होती.

तितक्यात तिच्या भाऊजीने बाहेरून दरवाजा ठोठावला. ताईने दरवाजा उघडला, भाऊजी आत येताच ताईने दरवाजा पुन्हा लावला." निशा उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचे आहे, मी त्यांना सगळी कल्पना दिली आहे. आपल्याला उद्याच अबॉर्शन करून घ्यावं लागेल." भाऊजींनी माहिती पुरवली."अबॉर्शन! नाही ना भाऊजी, अबॉर्शन नको ना." ती रडू लागली. आधीच तिने एक अबॉर्शन केले होते आणि पुन्हा दुसरे. तिला वाईट वाटत होते. त्यांच्या चुकीमुळे निष्पाप जीवाचा बळी जात आहे असं तिला वाटत होतं."वेडी आहे काय तू निशा थोडी? तुझं लग्न झालं आहे आता, लग्न झालं नसतं तर उद्याचं तुझं लग्न नितिनसोबत लावून दिलं असतं पण आता ते शक्य नाही आणि हे अतुलचे आहे असं पण म्हणू शकत नाही कारण तो लग्नाआधी तुला कधी तसं भेटायला आलाच नाही. त्याला कळायच्या आत आपण हे करून घेऊ." भाऊजी म्हणाले."ताई तू तरी ऐक ना ग!" ती रडत रडत ताईला विनवू लागली." प्लिज निशू, आता तू आमचं ऐक, आई बाबांना त्रास नको देऊ ग, त्यांना हे सहन होणार नाही आता." ताईने तिच्यापुढे हात जोडले."ठीक आहे जाऊया." ताईने तसं बोलताच निशा अबॉर्शनकरीता तयार झाली.दुसऱ्या दिवशी निशासोबत तिचे ताई , भाऊजी हॉस्पिटलमध्ये जाऊन अबोर्शन करून आले.हॉस्पिटलमधून आल्यावर भाऊजीने नितिनच्या कानावर ही गोष्ट टाकली, तो थोडा सटपटला कारण पहिल्यांदा त्याने परस्पर सगळं केलं होतं पण आता ताई आणि भाऊजीला पण कळलं पण तिचं आता लग्न झाल्यामुळे तो रिलॅक्स होता पण त्याला भाऊजीकडून हे कळलं की काही दिवस निशा इथेच राहणार आहे. त्याच्या डोक्यात खिचडी शिजली पण त्याने सध्या शांत बसण्यात धन्यता मानली.निशाची तब्येत हळूहळू सुधारत होती. निशाचे लग्न होऊन पंधरा दिवस होत आले होते. इतक्या दिवसात तिला ना नितिनने कॉन्टॅक्ट केला, ना अतुलने.दोन - तीन दिवसांनी निशाचा मोबाईल वाजू लागला, स्क्रिनवर नितिनचे नाव बघून तिची कळी खुलली, तिने आजूबाजूला कुणी नाही बघून लगेच कॉल रिसिव्ह केला." हॅलो Sss " निशा म्हणाली." हॅलो निशू कशी आहेस पिल्लू? बरी आहे ना आता तब्येत?" तो काळजीने विचारू लागला."बरी आहे आता." निशा म्हणाली."सॉरी माझ्यामुळे तुला पुन्हा त्रास झाला." तो चेहरा पाडून म्हणाला."इट्स ओके रे, तू वाईट मानून घेऊ नकोस, यात तुझा काही दोष नाही, तुला थोडी ना माहीती होते मी प्रेग्नंट आहे ते, मला पण नाही कळलं यावेळेस." निशा त्याला समजावू लागली."काश तुझ्या लग्नाआधी कळलं असतं तर आज आपण एकत्र असतो आणि आपलं बाळ पण असतं पण काय करणार, माझे नशीबच फाटके आहेत जो तुझ्यासारखी मुलगी माझी लाईफ पार्टनर नाही बनू शकली." तो हताशपणे म्हणाला.त्याचे बोलणे ऐकून निशाला पण रडू आले. तिला पण वाटले काश आधी कळलं असतं तर?"बरं मला सांग, तू किती दिवस आहे इथे?" त्याने विचारले."माहिती नाही अतुल कधी येणार न्यायला?" तिने सांगितले."तो येईपर्यंत आपण भेटू शकतो ना? मला खूप आठवण येत आहे ग तुझी, कधी एकदा तुला बघतोय असं झालं मला, प्लिज भेट ना." तो लाडीगोडी लावत म्हणाला." नितिन, खरं सांगू काय, माझ्यात पुन्हा आता बाळ गमावण्याची क्षमता राहिली नाही. आधीच एक नाही तर दोनदा असं झालं, आता पुन्हा तसचं झालं तर?" तिने तिची शंका विचारली."अरे नाही होणार, आता आपण काळजी घेऊया, तू गोळ्या खात जा." त्याने तिला पर्याय सुचवले."नाही,नको रे! गोळ्यांमुळे पुढे जाऊन मला त्रास होऊ शकतो." ती म्हणाली."अग नाही होणार ,मी डॉक्टरला विचारले आहे. माझ्यावर विश्वास नसेल तर मी डॉक्टरचा नंबर देतो हवं तर तू विचारून घे." नितीन म्हणाला."तरी नको रे, माझं मन नाही मानत आहे त्याला." निशा म्हणाली."हो बरोबर आहे आता तू कशाला भेटणार मला? तुला आता नवरा भेटला तेही पैसेवाला. मी काय गरीब, तुला आता कुठे काळजी असणार माझी? मी किती तडपतो तुझ्यासाठी ते कुठे दिसत आहे तुला? तुझं प्रेम नव्हतं ना माझ्यावर, असतं तर आज तू अशी वागली नसती." तो म्हणाला." अरे असं कसं बोलतो तू? माझं कालही तुझ्यावर प्रेम होतं, आहे आणि राहणार." निशा म्हणाली." नाही, ना होतं, ना आहे." तो तिरसटपणे म्हणाला."प्लिज मला समजून घे ना!" ती त्याला समजावू लागली."नाही, तू मला समजून घे, मला आता तुझी गरज आहे पण असू दे, कळलं मला आता सगळं,  तुझे प्रेम नाही राहले आता माझ्यावर म्हणून तू मला केलेले प्रॉमिस पण विसरली, समजलं मला हे पण असू दे, आता तुला मी कधीच त्रास देणार नाही, ना कधी भेटायला बोलवणार मग मला कितीही त्रास होऊ दे, ओके बाय, तू सुखी रहा, ठेवतो फोन." नितीन नकली अश्रू गाळत म्हणाला."अरे नितिन ऐक ना, असं नको बोलू रे प्लिज... ठिक आहे येते मी तुला भेटायला." निशा रडत रडत म्हणाली."खरंच!" नितीन ते ऐकून खुश झाला."हो ssss" निशा म्हणाली."बघ हा, मन मारून नको येऊ, तुझ्या इच्छेविरुद्ध मी काही करणार नाही." नितीन म्हणाला." नाही, मी स्वतःच्या इच्छेने येणार आहे" निशाने सांगितले."ठीक आहे, मी थोड्या वेळात पत्ता पाठवतो. आता ठेवतो फोन, बाय लव यू जान." तो खुश होत म्हणाला."बाय.." निशा म्हणाली.

क्रमशः


✍️ अश्विनी कांबळे

ठाणे विभाग
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//