Feb 28, 2024
राज्यस्तरीय करंडक कथामालिका

प्रेमाचा चकवा भाग - ३

Read Later
प्रेमाचा चकवा भाग - ३
प्रेमाचा चकवा  भाग- ३


विषय - कथामलिकानिशासाठी मुलाकडून होकार कळल्यापासून निशाचे आई बाबा खूप आनंदी होते कारण मुलगा एक तर सरकारी नोकरीत त्यात शिक्षक. स्वतःचं घर, शेती होती वरून दिसायला पण देखणा होता. दोघांमध्ये वयाचे अंतर पण फार नव्हते.


मोठ्या मुलीने स्वतःच्या पसंतीने लग्न केले होते त्यासाठी बाबा नाराज होते कारण मोठा जावई पाच पैशाची कमाई करीत नव्हता. उलट, पान टपरीवर बसून नको ते उद्योग करत बसायचा. वाईट संगतीने वाया गेला होता, इतकी चांगली आणि समजदार मुलगी त्याला कशी  काय पसंत करू शकते असे त्यांना वाटायचे. आपली मुलगी फसली गेली याची त्यांना खंत होती पण लग्नानंतर मुलीचे हाल होऊ नये म्हणून  त्यांनी त्याला घरजावई करून घेतले.

लग्नानंतर पण काही तो सुधारला नव्हता, सासऱ्याच्या पैशावर उड्या मारत होता म्हणून बाबांना निदान निशाचं लग्न एका चांगल्या मुलासोबत व्हावं असं वाटायचं (  सगळ्या आई बाबांना हे वाटत असते , आपल्या मुलीला एक चांगला जोडीदार मिळावा म्हणून )आई - बाबा मुलाविषयी चर्चा करीत असताना निशा तिथे आली. आई - बाबाच्या बोलण्यावरून तिला अंदाज आला की बहुतेक ते त्या मुलाला होकार देणारं. निशाच्या मनात चलबिचल सुरू झाली. तिला लवकरात लवकर काही तरी करावे लागणार होते. आई - बाबासमोर ती नितीनसोबत  फोनवर बोलू शकत नव्हती त्यामुळे तिने त्याला मेसेज केला.


निशा  :- मला महत्त्वाचे बोलायचे आहे तूझ्यासोबत, आज भेटू शकतोस काय?तिने मेसेज सेंड केला आणि त्याच्या रिप्लायची वाट बघू लागली. तिला खूप धडधडू लागले, तिच्या मनात कमालीची बैचेनी होती. ती डाव्या तळव्यात उजव्या हाताची बोटे घट्ट पकडुन कुरवाळत होती, त्यावरून तिचं मन किती सैरभैर असेल ते समजत होते. १० मिनिटांनी तिच्या मोबाईलची टोन वाजली. तिने अधिरतेने मोबाईल बघितले, अपेक्षेप्रमाणे नितिनचा मेसेज होता.
नितिन :- खाली लिहिले आहे त्या पत्त्यावर ठरलेल्या वेळेत ये.
निशा :- ओके!
तिने रिप्लाय देवून मोबाईल घट्ट छातीशी धरून निःश्वास टाकला. आता तिला कधी एकदा नितिनसोबत बोलून काहीतरी मार्ग काढू असं झालं. तिच्या मनाच्या अस्वस्थेमुळे ती वेळेच्या आधीच तिथे पोहचली.


ती त्याच्या मित्राची रुम होती. तिला आलेलं पाहताच त्याचा मित्र तिथून निघून गेला. नितिन यायचा होता, जस जशी वेळ जात होती, तिची बैचेनी वाढत होती. ती रुममध्ये येरझऱ्या मारत होती.
ती पाठमोरी असताना  तितक्यात तिला दरवाजा लावण्याचा आवाज आला. तिने लगेच मागे वळून बघितले, नितिन होता. नितीनला बघून ती खुश झाली आणि लगेच पळत जाऊन त्याला मिठी मारली. तिच्या डोळ्यांत अश्रू आले होते.
"नितिन मला तुला काहीतरी...."
ती पुढे बोलणार इतक्यात त्याने तिच्या कुर्तीची मागील चेन काढून कुर्ती दंडावरून समोर घेतली.


"अरे मला तुला.." तिने बोलायला पुन्हा तोंड उघडलं तर त्याने तिच्या ओठावर बोट ठेवले."शु sssss काहीच बोलू नकोस.."


त्याने तिच्या ओठावर बोट ठेवून  तिच्या मानेवर ओठ टेकवत बोलला. त्यामुळे ती सांगायची थांबली.त्याने एक एक करत तिचे सगळे कपडे काढले आणि तिला बेडवर ढकलले. स्वतः तिच्यावर आवेशाने तुटून पडला. आज तो अक्षरशः तिला ओरबाडत होता.

तिला वेदना होत होत्या त्यामुळे ती विव्हळत होती पण त्याला त्याच्याशी काहीच घेणे देणे नव्हते.
एखाद्या भुकेल्या प्राण्यासमोर जशी शिकार येते आणि तो त्यावर तुटून पडतो आणि लचके तोडतो तसाच नितिन निशाचे हाल करीत होता. ती त्रास होत असूनही बस त्याच्यासाठी गप्प होती. फक्त त्याला संतुष्ट करण्यासाठी ती सगळा त्रास सहन करत होती. तो नाराज होऊ नये किंवा त्याचा मूड जाऊ नये म्हणून गप्प होती पण तिच्या शरीराला ज्या वेदना होत होत्या त्यापेक्षा तिच्या मनात वादळ होतं.
त्याला हवं तितका वेळ,  हवं तसं  मन भरुन उपभोग घेतल्यावर तो तिच्या बाजुला पडला. तिचे श्र्वासोश्र्वास वाढले होते, ते ती शांत करीत होती. थोडा वेळ गेल्यानंतर तिने विषय छेडला.
" नितिन ssss मला तुला काही सांगायचं आहे." ती त्याच्याकडे बघत म्हणाली.
नितिन गप्पच
"नितिन ss..."  तो काही बोलला  नाही म्हणून तिने थोडे मोठ्याने बोलली.
"बोल ऐकतो आहे.." तो चेहरा उशीत खुपसून बोलला.
"मागे जी मुले आली होती त्यापैकी एकाने होकार दिला." तिने सांगितले.
तिचा आवाज रडवेला झाला, ओठ थरथरत होते. यावेळेस त्याने तिच्याकडे बघितले.निशा पुन्हा समोर बोलू लागली-"तो मुलगा शिक्षक आहे, घर आहे स्वतःचं, भरपूर शेती आहे, एकुलता एक आहे , दिसायला पण देखणा आहे आणि आमच्यात वयाचे अंतर पण कमी आहे म्हणून बहुतेक घरचे त्याला होकार देणार आहेत." तिने त्याला माहिती पुरवली."चांगले आहे ना मग." इतक्या वेळ शांत बसून तिचं ऐकत असणारा नितिन बोलला.त्याच्या वाक्याने तिचे डोळे विस्फारले गेले. तिचा तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता कारण तो तसं काही बोलेल हे तिच्यासाठी अनपेक्षित होते.
"काय?? हे तू बोलत आहेस, तू असं कसं बोलू शकतोस, आपलं प्रेम आहे ना एकमेकांवर." ती पाणावलेल्या डोळ्याने म्हणाली."अरे तू जरा मनाने नाही डोक्याने विचार कर ना! त्याच्याकडे वैभव आहे माझ्याकडे काय आहे ?,ना स्वतःच घर, ना माझे दुकान ,आश्रित आहे मी... त्याने बारीक चेहरा केला


त्याच्यासोबत लग्न करशील तर ऐशो आरामात राहशील, सगळी सुखं तूझ्या पायाशी लोळणं घालतील." तो तिला त्याचे मत पटवून देऊ लागला.निशाला तिच्या कानावर विश्वास बसत नव्हता की नितिन असं काय बोलला म्हणून.
"अरे पण माझं प्रेम तुझ्यावर आहे ना मग अशी कशी दुसऱ्यासोबत लग्न करू?" ती म्हणाली.तिचे डोळे काठोकाठ भरलेले होते. कुठल्याही क्षणी ती रडून देणार अशी तिची अवस्था झाली होती."प्रेम ? प्रेमाचं काय आहे गं! आज माझ्यावर आहे उद्या त्याच्यावर होईल." तो बेफिकिरीने म्हणाला."पण मी तुझ्याशिवाय नाही जगू शकणार." ती त्याच्या छातीवर हात ठेवून म्हणाली.
आता तिला अश्रू अनावर झाले.
"हे बघ निशा, रडू नकोस. थंड डोक्याने माझं ऐक, तू माझ्याशिवाय राहू शकत नाही असं तुला आता वाटत आहे कारण आता तुला माझा सहवास मिळाला आहे म्हणून तुला माझी सवय झाली आहे. उद्या जेव्हा तुला त्याचा  सहवास मिळेल तेव्हा त्याची पण सवय होऊन जाणार आणि प्रेम पण. आपण काय कधीतरीच भेटतो पण तो रोजच असेल तूझ्यासोबत मग काय मज्जाच मज्जा." तो अगदी निर्लज्जपणे तिला डोळा मारत बोलला. तसं बोलताना त्याला काहीही वाटत नव्हते.
"अरे मला त्याच्यासोबत नाही लग्न करायचे आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे ना, चल ना रे आपण लग्न करूया. मी माझ्या घरच्यांना समजावेन. प्लिज ना.." ती काकुळतीला येऊन त्याला विनवू लागली."मी नाही ना गं करू शकत लग्न तूझ्यासोबत राणी." तो अगदी प्रेमाने आणि लाडीगोडी लावत म्हणाला.
"का पण ? आपली कास्ट पण तर सारखी आहे ना मग प्रॉब्लेम काय आहे?" तिने विचारले.
" गोष्ट कास्टची नाही गं!" तो म्हणाला.
" मग कशाची आहे मला तरी कळू दे?" ती बेडवरून उठत म्हणाली.
" अग लहानपणापासून माझे मामा आई आणि माझा सांभाळ करीत आहेत. माझं शिक्षण, आता हे दुकान हे तो उगाच थोडी ना करत आहे." तो तिला पटवून देत म्हणाला.
"मग? " निशाने विचारले." त्याची एकुलती एक मुलगी आहे, त्याला माझं लग्न तिच्यासोबत करून द्यायचे आहे. जर माझं लग्न तिच्यासोबत झालं नाही तर तो आई आणि मला घरा बाहेर हाकलून लावेल आणि दुकानातून पण. आम्ही रस्त्यावर येवू. ठीक आहे मी तुझ्यासाठी रस्त्यावर पण यायला तयार आहे. पण त्यानंतर काय? कूठे जाऊ आपण? कुठे राहू? कुठे वणवण भटकणार मी तुला नि आईला घेवून? माझं शिक्षण पण इतकं नाही की मला चांगली नोकरी मिळेल. जे काम मिळेल त्याच्यात घरभाडे देणार की संसार चालवणार? मला एकदाचे माझे हाल झालेले चालतील गं पण तुझे नि आईचे हाल होताना मी नाही बघू शकणार." तो रडवेला चेहरा करून म्हणाला.त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला.
"म्हणून म्हणतोय  प्लिज त्याच्यासोबत लग्न कर, खुश ठेवेल तो तुला आणि तू माझी काळजी नको करू, आपण भेटत राहू ना असेच तुझं लग्न होईपर्यंत. मी शरीराने जरी नसलो तरी मनाने कायम सोबत असेल तुझ्या. मला पण होणार त्रास पण तुझ्या सुखासाठी मी तो त्रास सहन करायला तयार आहे." तो तोंड पाडून बोलला."प्लिज माझ्यासाठी इतकं पण करणार नाही काय तू? तो तिच्या नजरेत बघत बोलला." त्याने बरोबर तिच्या कमजोरीचा उपयोग करत तिला पटवून दिले की तो किती मोठा त्याग करत आहे पण ती साधीभोळी असल्यामुळे आणि त्याच्यावर अतोनात विश्वास असल्यामुळे तिला ते समजले नाही आणि तिच्या त्या दोन कमजोरीचा तो कायम फायदा उचलत आला होता."ठीक आहे, पण माझी एक अट आहे." ती काहीसा विचार करून म्हणाली."अट? " त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.
" तू मला लग्नाचं गिफ्ट म्हणुन मंगळसुत्र दे. तो लग्नात घालेल त्याचं मंगळसुत्र पण त्यानंतर तू दिलेला तुझ्या नावाचं मंगळसुत्र घालायचं आहे मला कायम.जरी तो लग्न करून मला घेवून जाणार पण मनाने मी बस तुझी असेल." ती मनावर दगड ठेवून म्हणाली पण तिच्या मनाला किती यातना होत होत्या हे तिलाच माहीत होते.
"बस एवढंच ! ठीक आहे घेतो मंगळसुत्र तुला, आता तरी खुश ना?" तो हसत म्हणाला." हो." ती पण हलके हसली.त्याने पटकन तिला मिठीत घेतले, त्याच्या चेहऱ्यावर क्रूर विजयी हास्य पसरले आणि तिला पुन्हा त्याने बेडवर आडवे केले आणि पुन्हा तिचा  उपभोग घेऊ लागला.
त्याला भेटून निशा घरी परतली तर तिला घरचे वातावरण खूप प्रसन्न दिसले. घरचे सगळे आनंदात होते. तिला बघताच तिची आई तिच्याजवळ आली."अरे निशा बाळा आलीस तू?" आईने तिला आलेलं बघून विचारले.
"हो, काय झालं आईं? सगळे इतके खुश का आहात? काही झालं काय?" तिने सर्वांचे प्रसन्न चेहरे बघून विचारले.
" हो गोष्टच तशी आहे खुश होण्यासारखी." आई हसत म्हणाली."कोणती?" तिला काही अंदाज लागत नव्हता.
"अग तुझं लग्न ठरलं. तुझे बाबा त्या मुलासोबत बोलले तर परवाचा मुहूर्त निघाला साखरपुड्याचा. वरून त्या मुलाची काहीच अपेक्षा नाही, त्याला एक रुपया पण नको आहे आपल्याकडून. आम्ही तर खूप खुश आहोत, नशीब काढलं आमच्या पोरीने." असं म्हणून आईने निशाच्या डोक्यावरून दोन्ही हात फिरवून बोटे  कडाकडा मोडली आणि तिच्या बाबाजवळ जावून बसली.
निशा तर हे सगळ ऐकुन सुन्न झाली होती, तिच्या मनात एकदम धस्स झालं. तिने खूप कष्टाने आपले अश्रू रोखून धरले.
थोड्या वेळ सगळ्यांसोबत हॉलमध्येच बसून ती आपल्या रुममध्ये निघुन गेली. तिने आतून कडी लावून घेतली, स्वतःला बेडवर झोकून दिले आणि मगापासून धरून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.....
क्रमशः
✍️ अश्विनी कांबळे


ठाणे विभाग ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Ashwini Kamble

House Wife

मी एक गृहिणी आहे

//