प्रेमात बदलू आपण जरा जरा भाग 1

Premaat Bdlu


प्रेमात बदलू आपण...जरा जरा

निखिलच्या घरचे मृदुलाच्या घरी रीतसर तिचा हात मागायला म्हणून आलेले असतात...

घरात सगळा साग्रसंगीत पोह्याचा कार्यक्रम होणार होता.. सगळी तयारी झाली होती ,नवरी एका पायावर तयार होती

मृदुला ला आईने साडी नेसायला सांगितली आणि तिने झटपट साडी ही नेसली...त्याला साडी खूप आवडते.. त्याने तिला जेव्हा पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती साडी मध्येच पाहिले आणि खूप भावली होती ती..एक विलक्षण सौंदर्य होते.. साडी plain blue साडी... मोकळे सोडलेले केस...एक सेंटर पिन लावलेली... हातात एक कडं... लांब सडक केस,बोटं ही तशीच एकदम लांब..गोरीपान..नाक एकदम सरळ..

मिठाई आणायला सांगितली तशी मृदुलाच्या मिठाई ही ऑर्डर केली..त्यात बरीच मिठाई ही निखिल च्या mostly आवडीची होती, त्याला गोड खूप आवडते...आणि ते असेल तर मग तो खुश... तिला त्याची आवड निवड, सवयी चांगल्याच माहीत झाल्या होत्या..

मग राहिले पोहे तर ते मात्र मृदुला सक्तीने नाही च म्हटली...नको अग पोहे नकोच नको...तू बाकी काही ही बनव पण आता तर पोहे नकोच..

आई अग ही रीत असते ,शास्त्र असतं ते...त्याशिवाय बघण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला असे होत नाही, ते तर हवेच हवे असतात ह्या बघा बघिच्या सोहळ्यात... मी तर तुझ्या पप्पांना चांगले लक्षात राहतील इतके पोहे खाऊ घातले होते...म्हणूनच तर ते आता कधीच पोह्याचे नाव ही काढत नाही ...आणि मी नाव काढलेच तर आधीच ढेकर देऊन मोकळे होतात... म्हणतात पोट भरलं...

मी ही मग हसत टाळी देत विचारते...पोट तेव्हाच भरलं वाटते ...


आईच्या त्या गप्पा ऐकून तिला ही तसेच काही वाटत होते... तिचे ही तिच्या बाबांसारखे हाल झाले होते... त्या सोबत निखिल चे ही तेच हाल होते... पोहे नाव काढताच त्याला ही ढेकर सुरू होत ...

पण ते आईला कसे सांगायचे...आणि नाही सांगितले तर इकडे निखिल चे कसे व्हायचे...


तिने आता हिम्मत करून आईला सांगितलेच, "आई ऐक ना ,जरा आपण प्रोग्रॅम नव्या रिती ने करू ना, पोह्या ऐवजी ढोकल्याचा कार्यक्रम करू या ना ,म्हणजे बघ तो गुजू आहे तर त्याला आपण ढोकळा मागवू या ना ,नाही तर जिलेबी फाफडा, किंवा दाबेली मागवू आपण त्याला खूप
आवडते, तो ही खुश होईल "

आई एकदम तिला डोळे मोठे करत म्हणाली ,"अग तो आपल्या रीतीनुसार बघायला येणार म्हंटल्यावर त्याला आपणजे वाढू तेच खावे लागणार आहे ना.."

मृदुला ,"आई अग तुला सांगायचे आहे काही तरी ."

आई, "बोल ग बाळा बोल पटकन ,आता वेळ नाही अजून पोहे करायचे बाकी आहेत ,त्याची तयारी बाकी आहे आणि वेळ कमी आहे, तू बोल मी पोहे भिजवते..."


मृदुला ,"आई आमचा पोह्याचा कार्यक्रम आधीच झाला आहे,


आई एकदम रागात, "काय"

मृदुला, "एकदम तसा नाही पण आम्ही मैत्रिणी हातगाडीवर रोज पोहे खायला जात असत ,तेव्हा निखिल ही रोज तिथे येत असत..आणि मग
एकमेकांना बघत आमचे कार्यक्रम कसे कधी जुळत गेले काही कळलेच नाही...

त्याने फक्त स्वतःला माझ्या जवळ रहाता यावे ,मला बघता यावे ते ही रोज सकाळी आणि मग माझ्या ह्या जगात त्याची entry व्हावी निदान प्रेमात नाही तर मैत्रीच्या रुपात का असेना मग ह्यासाठी तर त्याने माझ्या आवडीचे पोहे खाण्याचा ध्यासच धरला.


मग त्या निमित्ताने आमची रोज सकाळी भेट होत.. आणि रोज त्याला न आवडणारे पोहे बळे बळे फक्त माझ्यासाठी तो खात असत, आणि असा रोज एक मेकांना बघण्याचा कार्यक्रम नित्यनेमाने होत .

तेव्हाच जेव्हा आम्ही एकमेकांना ओळखत ही नव्हतो ,तो कोण मला माहित नव्हते आणि मी कोण त्याला माहित नव्हते.. त्याला वाटायचे मी गुजू असावी कारण मी गुजू दिसत असावी त्याला आणि मी माझ्या मैत्रिणी शी गुजराती मध्ये बोलत असायची..

आई ,त्याला कोणास ठाऊक कशी आवडले मी...तो मग रोज त्या हात गाडीवर ढोकळा खाण्यासाठी ,जिलेबी फाफडा खाण्यासाठी येत.. आणि मला रोज तो बघत..तो माझ्या कडे बघत असायचा हे मला कधी कळलेच नाही...

मी ही अशी जी माझ्याच नादात कायम असायचे आणि मी ही अशी इतर मुलींपेक्षा वेगळी..म्हणून त्याला मी आवडत गेले...

त्याचे माझ्यात गुंतने हळूहळू चालू होते आणि मी त्याच्या ह्या माझ्यात गुंतत जाण्याला अनभिज्ञ होते... तो हळूहळू प्रेमात पडला माझ्या..

तरी मला तो समोर असून ही दिसला नव्हता कधी..मी माझ्यात असायचे..अगदी वेगळी, अलिप्त..तसा त्याने कधी मला त्रास नाही दिला, ना मला कधी येऊन त्याच्या प्रेमाची कबुली दिली...बस आवडत होते ,आवडत होते त्याला मी..पण त्याने कधी जाणवू दिले नाही...

ओळख करायला ही कधी तो पुढे आला नाही...मग कधी तरी त्याला कळले की मी मराठी मुलगी आहे..मी तेव्हा तुझ्याशी मराठीत फोन वर बोलत होते..त्याला तेव्हा समजले की मराठीत आईला आई म्हणतात म्हणजे ही मुलगी मराठी आहे.. आणि हिला प्रेमात पाडणे सोपे नाही...कारण त्याच्या /माहिती नुसार /मराठी मुली खूप सरळ असतात.

त्यांना स्वतःला शिकून घरच्यांच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसतो..त्यातील मी एक होते.ग तर त्याची हिम्मतच झाली नाही मला काही सांगायची..दुसरी भिती ही होती की मी जर जबर react झाले तर तेल ही गेले आणि तूप ही
गेले.. "



आई, "अग मग ह्या मुलाने हिम्मत कधी केली तुला सांगायची त्याच्या प्रेमाबद्दल "


पाहू कसे त्याने तिला सांगितले तो प्रेम करतो तिच्यावर

क्रमशः...?????


भाग 2..


🎭 Series Post

View all