तिची लिस्ट

Prem


लिस्ट त्याने केली होती आणि ती तिच्या आई वडिलांच्या समोर ठेवली होती..

ती लिस्ट हातात पडली आणि बायकोच्या वडिलांना टेन्शन आले होते ,घाम फुटला होता ,की यांच्या माझ्या मुलीकडून अश्या काय अपेक्षा आहेत की ज्याची यादी तयार केली त्यांनी.
त्यांना ती लिस्ट उघडताच डोळ्या समोर अंधेरी आली..आत्ताच तर लग्न होऊन काही महिने नाही झाले तर हे कसले नियम त्यांनी वाढवून ठेवले आहेत, राणी कडून काय चुकत आहे नेमके कळत नव्हते, पण त्यांना विश्वास होता की माझी राणी कधीच कोणाला दुखावणार नाही. असे तिने मला वचन ही दिले होते मग जावई असे का वागत आहे , राणी कडून काय चुकले आहे..
त्यांना ती यादी दिसत होती पण त्यातील शब्द आता दिसेनासे झाले होते..

हात थरथरत होते, आता फक्त चक्कर येऊन पडायचे बाकी होते..

जावयाला त्यांची ती आवस्था दिसत होती मग त्याने लगेच त्यांच्या हातातली लिस्ट राणीच्या हातात दिली..तिला ही आधीच खूप टेन्शन आले होते...मी तर अगदी सगळ्यांच्या मनासारखे वागत आहे तरी ही कसली लिस्ट त्यांनी तयार केली आहे, अश्या माझ्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत त्यांना की ज्या मी पूर्ण करत नाही..मी तर त्यांची सगळ्यांची काळजी माझ्या स्वतःपेक्षा ही जास्त घेत आहे.. कुठे कोणाची ही तक्रार नाही..असती तर सगळ्यांनी तसे सांगितले ही असते... आणि जेव्हा मी चुकले तेव्हा तेव्हा सगळ्यांनी तसे सांगितले ही आहे..

आता राणीच्या आई वडिलांचे आणि राणीचे हे टेन्शन वाढत होते, त्यांना काहीच कळत नव्हते काय कुठे पाणी मुरत होते..

ह्यांची बैठक होती तिथे आता बाकीचे सासरचे लोक यांना ही मुद्दाम जावई बापू ने बोलावून घेतले होते.. त्यांना ही कळेना आपला मुलगा असे का वागत होता, राणी तर चुकत नाहीच मग हा काय घाट घातला आहे याने, का उगाच तिच्या आई वडिलांना हा टेन्शन देत आहे, राणी सारखी गुणी सून मिळाली तरी अजून कसल्या अपेक्षांची लिस्ट त्याने तयार केली आहे... अजून तरी काय हवे आहे त्याला..

राणीने लिस्ट वाचायला घेतली आणि ती लिस्ट वाचून तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले होते.. एक हस्य ही होते आणि अश्रू ही होते.. तिला कळले होते ती चुकणार नाही पण त्याने जी चूक काढली ती अगदी त्याच्या नजरेतून बरोबर होती.. तिला त्याच्या बद्दल अजूनच प्रेम वाटू लागले होते..

त्यात एकंदर
तिने सर्वात आधी स्वतःला खुश ठेवणे
स्वतःची काळजी घेणे
स्वतःचा विचार करणे
स्वतः आनंदी रहाणे
स्वतः वेळच्या वेळी जेवण करणे
आणि माझ्यासाठी तिने स्वतःला जपणे

ती असेल तर माझ्या जीवनाला अर्थ आहे , तिने ह्या लिस्ट प्रमाणे आयुष्यभर वागावे जेणे करून ती माझी साथ द्यायला आयुष्यभर तयार राहील..

तुझाच नवरा..

©® anuradha andhale palve