प्रेम
माझ्याकडे काही दिवसांपूर्वी एक मुलगा कौंसेलिंग साठी आला होता...
त्याचा प्रेम भंग झाला होता आणि म्हणून तो खूप नैराश्याने ग्रासला होता...
त्याला ट्रीट करताना सगळ्यात पहिल्यांदा मी त्याला प्रेम या शब्दाचा अर्थ विचारला....
आणि अपेक्षित असल्या प्रमाणे त्याने प्रेम या शब्दाला त्याच्या संपूर्ण ज्ञाना प्रमाणे आजूबाजूला त्याने जे कायम ऐकले किंवा पाहिले (TV किंवा मुव्ही मध्ये) त्यानुसार त्याने बोलायला सुरुवात केली...
त्याचे बोलणे झाल्यावर मी त्याला 'प्रेम' ह्या बद्दल काही वाक्ये सुचवली आणि कौंसेलिंग केले...
पण खरंच जर प्रेम या शब्दाला नीट समजून घेणे गरजेचे आहे....
खरं तर ही एक प्रचंड आश्वासक भावना आहे! एक ताकद जी तुम्हाला सक्षम बनवते! एक फिलिंग ज्यात कोणत्याही प्रकारचे व्यवहार नसतात मग ते नात्यातील बंधनाचे असोत किंवा कर्तव्याच्या बाबतीतही!
खरं तर प्रेम ही एकदम पवित्र भावना आहे की ज्या मध्ये एकच आणि एकच ध्येय वाटते ते म्हणजे त्या तुमच्या व्यक्तीला आनंदात बघणे, त्याला आनंद देणे!
जगात सगळ्यात पवित्र असे काही असेल तर ते 'प्रेम'!
"I Love You" हे शब्द फक्त नवरा बायको किंवा गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड याच नात्यात असते असे काही नाही...
एक लहान मूल सुद्धा बोबड्या बोलात आपल्या आई, बाबा, ताई, दादा ला ' I Love You' म्हणतो तर ही मोठी लोक सुद्धा त्या बाळाला हेच शब्द म्हणत असतातच की.
याही पलीकडे आई वडील जे कोणत्याही अपेक्षेवीना मुलांवर करतात तेही 'प्रेमच# असते.
तर मला इथे म्हणायचे की 'प्रेम' या शब्दाला प्रत्येक वेळेला ज्या पद्धतीने घेतले जाते ते दरवेळेस योग्य असतेच असे नाही.
आज कित्येक मुलं मुली रस्त्याने हातात हात घालून फिरताना दिसतात, सोबत जाताना दिसतात याचाच अर्थ ते प्रेमात आहेत किंवा खरंच 'प्रेम'ही भावना त्यांच्यामध्ये आहे असे आपण म्हणू शकतो का...आपण नाही म्हणले तर ऍटलिस्ट त्यांनी तरी ते म्हणावे..
प्रेम हे करावे लागतच नाही ते आपोआप होते आणि जेव्हा होत असते तेव्हा ते कळत सुद्धा नाही.
आपल्याला एखादी व्यक्ती आपली वाटणे हे खूप सुखद आहे. त्या व्यक्तीसाठी आपण काही करावे त्याला आवडते तसे वागावे, ते करावे, त्याला आनंदी ठेवावे
त्याला भरभरून द्यावे याला म्हणतात प्रेम.
त्याच्या आनंदात आपण आनंदी असणे आणि तिथे कोणत्याही भौतिक गोष्टींचा संबंध येत नाही ते खरे प्रेम!
कोणताही हेवा दावा नाही, माझे-तुझे नाही किंवा हे असेच हवे आणि ते तसेच हवे ह्या संकल्पना नाहीत...सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ज्यात व्यवहार नाही ते नाते, ते भाव म्हणजे प्रेम!
प्रेम हे दोन मित्र मैत्रिणी असोत किंवा भावंडे असोत किंवा दोन अशा व्यक्ती की ज्या परस्परभिन्न आहेत पण बंध हे जुळलेले आहेत असे कोणीही असोत त्यांच्यात असू शकते.
ज्यामध्ये घेणे नाही तर देणे असते ते खरे बंध.
ज्याच्यासाठी संपुर्ण जगाशी लढायची तयारी असते आणि त्याची त्या व्यक्तीलाही जाणीव असते असा विश्वास ज्या मध्ये असतो ते म्हणजे प्रेम.
तर या भावनेला आपण मनापासून ओळखुयात!
©©अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा