प्रेम त्याग

Love

प्रेम कोणी करत नसत ते आपोआप होत असतं 
मग प्रेम करणाऱ्यांना हे जग अपणावत का नसतं
प्रेमात असतो विश्वास एकमेकांचा ध्यास 
मग जाती-धर्माकडे बघून 
प्रेम मिळवण्याचा का सुटतो ध्यास

नाही म्हणायला देशातील जातीभेद नष्ट झाला आहे
पण मग प्रेमाच्या बाबतीत हा आडवा का येत आहे
आई-वडिलांचे संस्कार खूप चांगले असतात
आपल्या आयुष्याला एक नवीन वळण देतात 
परंतु प्रेम म्हणल की भिंत बनून ऊभे का राहतात

आजकाल रोडरोमियोंचा सुळसुळाट सुटला आहे
पण सगळ्यांचे प्रेम हे काय टाईमपास नव्हे
माझ्या एका मैत्रिणीन प्रेम केल होत पण
जातीभेदाच घोड त्यांच्यात आडव येत होत
पळून जाण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नव्हती कारण, त्यांच्याकडे होते आई-बाबांच्या संस्काराचे मोती

आई-बाबांसाठी त्यांनी प्रेम त्याग केला 
पण आयुष्यातल पहिल प्रेम त्यांना विसरता येईना
जातीभेदामुळे त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या आणि
प्रेम अंकुर हा त्यागात भस्म झाला

प्रेम अंकुर फुटण्याआधी त्यांनी त्याची विल्हेवाट लावली
कारण त्याबरोबर दुनिया त्यांना जगून देणार नव्हती साली
प्रेम इतकं वाईट असतं का? की प्रेम करणारे वाईट असतात
जर दोघेही वाईट नसतात तर मग लोक त्यांना वाळीत का  टाकतात